T20 विश्वचषक 2024 - भारत विश्वविजेता !!!

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 June, 2024 - 12:21

काही तासांतच पुरुषांचा २०-२० वर्ल्डकप सुरू होतोय...
भारतील संघाला चीअर करायला हा धागा Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

12/4

आज भारत पाक ...
बालाजी थिएटरमध्ये.. मोठ्या पडद्यावर.. सोबत दारूचे मोठमोठे पिंप. चिअर गर्ल आणि चिअर बॉईज.. जिंकल्यावर आकाश उजळवून टाकणारी आतिषबाजी... नुसता चुराडा.. आणि फुल्ल राडा !

पाक नी टॉस जिंकून ... पुढे काही लिहिले नाही तरी चालेल.. इथे तेच करायचे होते.
पण बरे झाले. मजा येईल आता. निकाल जो लागेल तो लागेल. विकेट सांभाळा बस सुरुवातीचे ओवर.

खेळ म्हणून बघा रे, युद्ध म्हणून नको. नाही तर मोदीजींचा रथ जसा जमिनीवर आला, तसा भारतीय टीमचा पण येईल.

खेळ म्हणून बघा रे, युद्ध म्हणून नको.
>>>>

मजा युद्ध म्हणून बघण्यातच आहे. माहौल तेव्हाच तयार होतो.

माझी लेक तिच्या मैत्रिणींसोबत थिएटरमध्ये बघायला गेली आहे ते याचसाठी.. तिथला माहोल सुद्धा याच भावनेतून तयार होणार Happy

बाकी सामना झाल्यावर काही कटूता मनात ठेवू नये हे मात्र प्रत्येकाने मनात ठेवावे आणि तसेच संस्कार आपल्या मुलांवर करावे.

रोहित, कोहली, सूर्या, दुबे कुणीही अपेक्षेप्रमाणे खेळले नाहीत...
पंत आणि अक्सर च्या जीवावर इथवर आलो
आता हार्दिक पंत ला कशी साथ देतो बघू

पिच कसे आहे, बॉल थांबतोय का वगैरे काहीही विचारात न घेता रॅण्डम खेळत आहेत आयपीएल खेळत असल्यासारखे. प्रत्येकाला फक्त छक्के मारायचे आहेत. टोटल तुक्का. काही कॅचेस सुटले म्हणून नाहीतर आत्तापर्यंत ऑल आउट झाला असता. दीडशे तरी मारा म्हणावं म्हणजे पाकड्यांनाही अवघड होईल.

इथे कंपनीच्या जिममधे, बेसबॉल ग्राउण्डवर बनवलेल्या नेट्स मधे, जेथे चान्स मिळेल तेथे - विंटर मधे इन्डोअर सुद्धा - सराव करून "डे जॉब" वेगळे असणार्‍या युएसए टीमने यांना हरवले आहे आणि हे मिलियन डॉलर दिग्गज चाचपडत आहेत.

प्रत्येकाला फक्त छक्के मारायचे आहेत. टोटल तुक्का
>>
याच प्रयत्नात पंत गेला

जड्डू पहिल्या बॉल वर मांजरेकर ला खूश करून गेला

९६/६ ९६/७
एकंदरीत कठीण आहे. Sad

मोहम्मद आमिरचा एकही बॉल एकाही बॅट्समनला कळालेला नाही. खुद्द पंतनेही आमिरविरूद्ध सगळे शॉट्स चुकवले आहेत. तरीही पंतसाहेबांना सिक्स शिवाय पर्याय दिसला नाही. ५-६ ओव्हर्स बाकी आहेत अजून. हे शेवटची ओव्हर खेळत असल्यासारखे खेळत आहेत.

विचित्र खेळत आहेत

IPL मधून बाहेर आले नाहीत वाटले.
काही लूज शॉट्स खेळले दिग्गज

दुबे अजिबात comfortable वाटला नाही.
पांड्याला तर बॉल दिसतोय की नाही देव जाणे

हे १८०-२०० वाले पिच नाही. इथे १५०-१६० एकदम चॅलेंजिंग स्कोअर असेल. हे पहिल्या ४-५ ओव्हर्स मधे लक्षात यायला हवे होते.

गेला पांडू

आणि पाठोपाठ बुमरा
११२/९

आता परिस्थिती अशी आहे की पूर्ण २० ओव्हर खेळले तरी नशीब.

पंत व अक्षर खेळत होते तेव्हा पाकची बॉडी लँग्वेज एकदम डिफेन्सिव्ह झालेली होती. कॅचेस सोडत होते इतकेच नाही तर कोणता कॅच कोणत्या फिल्डरने घ्यायला जावा हे ही त्यांना झेपत नव्हते. यांनी स्वतःहून विकेट्स फेकल्या आणि त्यांच्यात जान आणली.

Pages