रिटे प्रश्न तिरपागडी उत्तरे

Submitted by रघू आचार्य on 30 May, 2024 - 04:40

या चित्रात दोन स्टार्स ओळखा, एक डोळा बंद करून काय दिसले ते सांगा, गायीला गोठ्यात जायचा रस्ता कोणता असे प्रश्न सोमिवर येत असतील तर आपण एका नॉर्मल रिटे वातावरणात आहोत असे समजावे.

अशा प्रश्नांना काही वेळा तिरसट, तिरपागडी उत्तरे (त्या शहराचे नाव टाळले आहे. नोंद घ्यावी) दिलेली असतात कि लोळण फुगडी @ घातल्याशिवाय राहवत नाही.
@ Copyright मामी

या धाग्यावर असाच खेळ खेळायला या.
प्रश्न गहन / अवघड नको. तो रिटे वाटला पाहिजे.
त्याची उत्तरे जास्तीत जास्त ट्रोलिंग वाटेलशी असावीत.
प्रश्नांना क्रमांक देऊयात.
उदा.

0) घराचा छज्जा रस्त्यावर किती फूट असावा?

उत्तरे

प्रश्न 0) जितका जास्त काढता येईल तितका काढावा. एक ना एक दिवस हे सगळे इथेच सोडून जायचे आहे.
Submitted by Gangaram

प्रश्न 0) 50 फूटाला 40 फूट तरी असायलाच हवा.
Submitted by Dhondi Ram

प्रश्न 0) पापड, कुरडया वाळवता येईल इतके तरी असावे.
. Submitted by Thami

खेळ करायचा का सुरू मग?
विचारा प्रश्न..

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संघासाठी कोच करायला २२ पंटर्स पाहिजे, एकदम हट्टेकट्टे.
पाठ भक्कम असणाऱ्याने रांगल्यासारखी पोझिशन घ्यायची. त्याच्या पलीकडे दुसऱ्याने याच्या कडे पाठ करून squat पोझिशन करायची. असे अकरा रांगणारे आणि अकरा squat वाले मिळुन रांगेत चिटकून राहिले की मोठा कोच तयार होईल. संघातील अकराही जण एकावेळी विराजमान होतील मागच्याच्या पाठीला पाठ टेकवून मस्त आरामात.

सगळ्या भारतीयाना कोच करायला हवे जे मैच हारल्यावर असेच खेळायला हवे होते त्याचे हे चुकले ते चुकले असे सल्ले देतात.
म्हणजे कधीच कोणतीही मैच हरणार नाही.

स्वरुप यांच्या प्रश्नाचा क्रमांक ४ आहे.
किल्लीचा प्रश्न क्रमांक ५ आहे.
प्रश्नांना क्रमांक दिले तर मागच्या प्रश्नाचे उत्तर नंतर सुद्धा देता येईल.

नळाचे पाणी गेले आहे, ते पाणी परत कसे आणावे? >>> जिथून बाहेर पडले तिथूनच परत आत ओता.

Btw, तिरपागडे = तिरकस ना?

तर मित्रानो आज आपण बघणार आहोत नळाला पाणी कसे आणायचे. तर त्यासाठी मित्रानो सर्वप्रथम आधी आपल्याला एक नळ विकत घ्यावा लागेल. आणि पुढे काय करायचे पाहण्याआधी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो कि जर तुम्ही आधी सबस्क्राइब केले नसेल तर आत्ताच आमच्या च्यानेलला सबस्क्राइब करा. आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आमच्या च्यानेलची नोटीफिकेशन घ्यायला विसरू नका. तर मित्रानो आपण बघत होतो कि नळाला पाणी कसे आणायचे. तर त्यासाठी हा जो नळ आहे मित्रानो त्याची चावी अशी फिरवावी लागते. हि अशी. हे बघा नळास पाणी आले. तर मित्रानो आमचा व्हिडीओ आपणास कसा वाटला? आवडला असल्यास जरूर लाईक शेअर कॉमेंट करा.

प्रश्न 6.
शेजाऱ्याचा कुत्रा लई भुंकतो ..काय करावं ?

मायबोली वर आले ki samjte या आयटी मध्ये काम करणाऱ्या लोकांना किती रिकामचोट वेळ असतो, लाखात पगार घेऊन , FULL TIMEPASS आणि असले धागे

प्रश्न 6 >>>> तुम्ही जास्त भुंकणारा कुत्रा आणा आणि शेजाऱ्याच्या दिशेला तोंड करुन (कुत्र्याचे ) बांधा.

६ > त्याच्या गळ्यात मांजराच्या आवाजाचे यंत्र बसवावे. म्हणजे भुंकायला गेला कि तो म्यावेल.

प्रश्न ४ - भारतीय क्रिकेट संघाचा कोच कुणाला करावे?

ज्याची असेल दूरवर पो(हो)च
ज्याची असेल काबूत चोच
दाखवू शकेल सर्वांना तोच
बनून टीम इंडियाचा कोच

धडाकेबाज च्या चालीवर वाचावे

प्रश्न ७ - किडनीत ब्रेन हॅमरेज होऊ नये यासाठी काय करावे ?

राजमा आणि अक्रोड कालवून खाणे

Pages