या चित्रात दोन स्टार्स ओळखा, एक डोळा बंद करून काय दिसले ते सांगा, गायीला गोठ्यात जायचा रस्ता कोणता असे प्रश्न सोमिवर येत असतील तर आपण एका नॉर्मल रिटे वातावरणात आहोत असे समजावे.
अशा प्रश्नांना काही वेळा तिरसट, तिरपागडी उत्तरे (त्या शहराचे नाव टाळले आहे. नोंद घ्यावी) दिलेली असतात कि लोळण फुगडी @ घातल्याशिवाय राहवत नाही.
@ Copyright मामी
या धाग्यावर असाच खेळ खेळायला या.
प्रश्न गहन / अवघड नको. तो रिटे वाटला पाहिजे.
त्याची उत्तरे जास्तीत जास्त ट्रोलिंग वाटेलशी असावीत.
प्रश्नांना क्रमांक देऊयात.
उदा.
0) घराचा छज्जा रस्त्यावर किती फूट असावा?
उत्तरे
प्रश्न 0) जितका जास्त काढता येईल तितका काढावा. एक ना एक दिवस हे सगळे इथेच सोडून जायचे आहे.
Submitted by Gangaram
प्रश्न 0) 50 फूटाला 40 फूट तरी असायलाच हवा.
Submitted by Dhondi Ram
प्रश्न 0) पापड, कुरडया वाळवता येईल इतके तरी असावे.
. Submitted by Thami
खेळ करायचा का सुरू मग?
विचारा प्रश्न..
भारतीय क्रिकेट संघाचा कोच
भारतीय क्रिकेट संघाचा कोच कुणाला करावे?
संघासाठी कोच करायला २२ पंटर्स
संघासाठी कोच करायला २२ पंटर्स पाहिजे, एकदम हट्टेकट्टे.
पाठ भक्कम असणाऱ्याने रांगल्यासारखी पोझिशन घ्यायची. त्याच्या पलीकडे दुसऱ्याने याच्या कडे पाठ करून squat पोझिशन करायची. असे अकरा रांगणारे आणि अकरा squat वाले मिळुन रांगेत चिटकून राहिले की मोठा कोच तयार होईल. संघातील अकराही जण एकावेळी विराजमान होतील मागच्याच्या पाठीला पाठ टेकवून मस्त आरामात.
ज्याला बोलायचा पोच असेल तोच
ज्याला बोलायचा पोच असेल तोच क्रिकेटचा कोच होईल!
आएगा तो मोदी ही!
आएगा तो मोदी ही!
मला वाटते कोचवर बसून कोचिंग
मला वाटते कोचवर बसून कोचिंग करणारा हवा. बाकी खेळाडू समर्थ आहेत पैसे भरपूर मिळत असल्याने.
सगळ्या भारतीयाना कोच करायला
सगळ्या भारतीयाना कोच करायला हवे जे मैच हारल्यावर असेच खेळायला हवे होते त्याचे हे चुकले ते चुकले असे सल्ले देतात.
म्हणजे कधीच कोणतीही मैच हरणार नाही.
भारतात कोच 100 कोटी आहेत,
भारतात कोच 100 कोटी आहेत, खेळणारेच कमी आहेत
नळाचे पाणी गेले आहे, ते पाणी
नळाचे पाणी गेले आहे, ते पाणी परत कसे आणावे?
स्वरुप यांच्या प्रश्नाचा
स्वरुप यांच्या प्रश्नाचा क्रमांक ४ आहे.
किल्लीचा प्रश्न क्रमांक ५ आहे.
प्रश्नांना क्रमांक दिले तर मागच्या प्रश्नाचे उत्तर नंतर सुद्धा देता येईल.
नळाचे पाणी गेले आहे, ते पाणी
नळाचे पाणी गेले आहे, ते पाणी परत कसे आणावे? >>> जिथून बाहेर पडले तिथूनच परत आत ओता.
Btw, तिरपागडे = तिरकस ना?
नळावर एक हतोडी मारा पाणी
नळावर एक हतोडी मारा पाणी आणी नळ दोन्ही हातात येतील.
नळाच्या समोर चमचमीत पदार्थ
नळाच्या समोर चमचमीत पदार्थ ठेवा, त्याला पाणी सुटेल.
तीरपागडे = विक्षिप्त, उलटे,
तीरपागडे = विक्षिप्त, उलटे, पालथे, तिरकस
चार दिवस पहिलेच कस्काय गेलं
चार दिवस पहिलेच कस्काय गेलं पाणी? नळाची तोटी आहे ना शाबुत?
तर मित्रानो आज आपण बघणार आहोत
तर मित्रानो आज आपण बघणार आहोत नळाला पाणी कसे आणायचे. तर त्यासाठी मित्रानो सर्वप्रथम आधी आपल्याला एक नळ विकत घ्यावा लागेल. आणि पुढे काय करायचे पाहण्याआधी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो कि जर तुम्ही आधी सबस्क्राइब केले नसेल तर आत्ताच आमच्या च्यानेलला सबस्क्राइब करा. आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आमच्या च्यानेलची नोटीफिकेशन घ्यायला विसरू नका. तर मित्रानो आपण बघत होतो कि नळाला पाणी कसे आणायचे. तर त्यासाठी हा जो नळ आहे मित्रानो त्याची चावी अशी फिरवावी लागते. हि अशी. हे बघा नळास पाणी आले. तर मित्रानो आमचा व्हिडीओ आपणास कसा वाटला? आवडला असल्यास जरूर लाईक शेअर कॉमेंट करा.
दमयंतीला बोलवा
दमयंतीला बोलवा
प्रश्न 6.
प्रश्न 6.
शेजाऱ्याचा कुत्रा लई भुंकतो ..काय करावं ?
मायबोली वर आले ki samjte या
मायबोली वर आले ki samjte या आयटी मध्ये काम करणाऱ्या लोकांना किती रिकामचोट वेळ असतो, लाखात पगार घेऊन , FULL TIMEPASS आणि असले धागे
प्रश्न 6 >>>> तुम्ही जास्त
प्रश्न 6 >>>> तुम्ही जास्त भुंकणारा कुत्रा आणा आणि शेजाऱ्याच्या दिशेला तोंड करुन (कुत्र्याचे ) बांधा.
काय झालं? कुत्र भुंकत होतं.
काय झालं? कुत्र भुंकत होतं.
ग्राईप वॉटर द्यायला सांग तिला.
६ > त्याच्या गळ्यात
६ > त्याच्या गळ्यात मांजराच्या आवाजाचे यंत्र बसवावे. म्हणजे भुंकायला गेला कि तो म्यावेल.
प्रश्न ७ - किडनीत ब्रेन
प्रश्न ७ - किडनीत ब्रेन हॅमरेज होऊ नये यासाठी काय करावे ?
शेजाऱ्याच्या दिशेला तोंड करुन
शेजाऱ्याच्या दिशेला तोंड करुन (कुत्र्याचे ) >>

किडनीत ब्रेन हॅमरेज होऊ नये
किडनीत ब्रेन हॅमरेज होऊ नये यासाठी काय करावे ? >>> डेंटिस्टला भेटा.
महानारायण थैलम् ने गुडघ्यांची
महानारायण थैलम् ने गुडघ्यांची मालिश करावी रोज.
प्रश्न ४ - भारतीय क्रिकेट
प्रश्न ४ - भारतीय क्रिकेट संघाचा कोच कुणाला करावे?
ज्याची असेल दूरवर पो(हो)च
ज्याची असेल काबूत चोच
दाखवू शकेल सर्वांना तोच
बनून टीम इंडियाचा कोच
धडाकेबाज च्या चालीवर वाचावे
धडाकेबाज च्या चालीवर वाचावे>>
धडाकेबाज च्या चालीवर वाचावे>>> सांगायच्या आधीच त्या चालीवर वाचले...भारीच

सगळे च
प्रश्न 6. शेजाऱ्याचा कुत्रा
प्रश्न 6. शेजाऱ्याचा कुत्रा लई भुंकतो ..काय करावं ?
तुम्ही वाघ पाळा
प्रश्न ७ - किडनीत ब्रेन
प्रश्न ७ - किडनीत ब्रेन हॅमरेज होऊ नये यासाठी काय करावे ?
राजमा आणि अक्रोड कालवून खाणे
भारी उत्तरं सांग्या.
भारी उत्तरं सांग्या.
Pages