रिटे प्रश्न तिरपागडी उत्तरे

Submitted by रघू आचार्य on 30 May, 2024 - 04:40

या चित्रात दोन स्टार्स ओळखा, एक डोळा बंद करून काय दिसले ते सांगा, गायीला गोठ्यात जायचा रस्ता कोणता असे प्रश्न सोमिवर येत असतील तर आपण एका नॉर्मल रिटे वातावरणात आहोत असे समजावे.

अशा प्रश्नांना काही वेळा तिरसट, तिरपागडी उत्तरे (त्या शहराचे नाव टाळले आहे. नोंद घ्यावी) दिलेली असतात कि लोळण फुगडी @ घातल्याशिवाय राहवत नाही.
@ Copyright मामी

या धाग्यावर असाच खेळ खेळायला या.
प्रश्न गहन / अवघड नको. तो रिटे वाटला पाहिजे.
त्याची उत्तरे जास्तीत जास्त ट्रोलिंग वाटेलशी असावीत.
प्रश्नांना क्रमांक देऊयात.
उदा.

0) घराचा छज्जा रस्त्यावर किती फूट असावा?

उत्तरे

प्रश्न 0) जितका जास्त काढता येईल तितका काढावा. एक ना एक दिवस हे सगळे इथेच सोडून जायचे आहे.
Submitted by Gangaram

प्रश्न 0) 50 फूटाला 40 फूट तरी असायलाच हवा.
Submitted by Dhondi Ram

प्रश्न 0) पापड, कुरडया वाळवता येईल इतके तरी असावे.
. Submitted by Thami

खेळ करायचा का सुरू मग?
विचारा प्रश्न..

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण गुटखा/पान खाऊन थुंकलो, लहान पोरांनी छज्जातुन कचरा फेकला तर आपल्या आवारात न पडता रस्त्यावर पडेल एवढा असावा.

१) कमीत कमी शून्य आणि जास्तीत जास्तही शून्य. कारण कांदे कितीही घ्या, बिना बेसनाची भजी कशी काय बनणार?

पांढरा कांदा की लाल कांदा ते कुठे सांगितले तुम्ही?

तुम्हाला एकच भजे करायचे असेल तर १ किलो कांद्याचे एकच भजे करायला एवढी मोठी कढई आहे का तुमच्याकडे? तेल किती फुकट घालवाल तुम्ही! आणि जास्तीत जास्त कितीही करा हो, पोटाला झेपतील का बघा आधी!
-------

जमतंय का मला तिरपागडे बोलायला? Lol

रिकाम टेकडे

जमतंय का मला तिरपागडे बोलायला? >> हो तर Lol

माझ्याकडे एक फुटकी कढई आहे त्यात करा भजी. जगातला कुठलाही कांदा, बेसन, तेल घातलं तरी भजी होणार नाहीत. ती कढई पोटाला चांगली आहे. 'डाएट कढई' नाव देऊ तिला. 'डाएट फूड' खूप झालं, आपल्याला गरज आहे डाएट भांड्यांची.
Wink त्यात जे काही घालू ते सांडून जाईल आणि आपोआपच पुसापुसी करण्याने व्यायाम सुद्धा होऊन जाईल.

अस्मिता Lol
डाएट कढई Proud

प्रश्न २) भुवईच्या केसाच्या जंगलात कोणकोणते प्राणी (ऊवा,लिखा) राहतात त्यांना त्रास होऊ नये.
शांपू लावल्यावर त्या क्रूरसिंगसारख्या होतात का ? झाल्यास त्याला किती पिशव्या लटकवून बाजारात जाता येईल ?

क्रूरसिंग सारख्या होत असतील तर शाम्पू आणि मुलायमसिंग सारख्या होत असतील तर कंडिशनर असं म्हणायचं आहे की काय तुम्हाला. पण आमच्याकडे शाम्पू सोबत कंडिशनर फ्री येतं मग त्या दोघांनी मिळून बाटल्या बदलायला कुठं भेटावं,..... सांगा आता. Lol

एक किलो कांद्याची जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती भजी बनू शकतील? >>> भजीलाच हिंदी मध्ये 'पकोडे' म्हणतात ना??? Sorry I'm already employed.. Wink

२) भुवया धुण्यासाठी शॅम्पू निवडताना कोणते निकष विचारात घ्यावे? >>> शॅम्पू कोणताही निवडा, पण सर्वात आधी बाजारात भुवया उगवण्यासाठी तेल उपलब्ध आहे की नाही ते पाहावे... शॅम्पू ने केस गळती झाल्यास कंन्टेजन्सी प्लॅन म्हणून.

प्रश्न २) भुवया धुण्यासाठी शॅम्पू निवडताना कोणते निकष विचारात घ्यावे? >>> भुवया कापून टाका आणि मार्कर ने हव्या तश्या काढा. Lol
https://www.youtube.com/watch?v=pjaJnFqNimI

जगबुडी येऊन खायला नसले तरी टॉयलेट पेपरची साठेबाजी करून ठेवा. नाही निर्मळ मन काय करील 'ढुं एक्स एक्स'.

आम्रविकेत आलात की कुठल्याही समस्येवर उपाय शोधताना ढुंxx धुवायची सोय हा यक्षप्रश्न समोर ठेवूनच होते. आणि तिथेच संपते. Proud

Pages