Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06
दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यासंबंधी चर्चा या धाग्यावर
यासंबंधी चर्चा या धाग्यावर करा:
https://www.maayboli.com/node/54217
डोंबिवली midc त एका कंपनीत
डोंबिवली midc त एका कंपनीत स्फोट झालाय, आम्ही सुखरूप आहोत. मागच्यावेळी २०१६ साली आमच्याजवळच्या भागात झालेला आणि आमचं गॅलरी स्लायडिंग निखळून ग्रीलमध्ये पडलेले. ग्रील होतं म्हणून बरं नाहीतर खाली पडून काचा काचा झाल्या असत्या.
यावेळी मेन डोअर धडाधड वाजले, मला भूकंप वाटला, नवऱ्याला blast चा आवाज ऐकू आला, तो म्हणालाच स्फोट झाला . बाकी डोंबिवलीकर कसे आहात.
इथे लिहिण्याचे कारण आता एकाचा मृत्यू झाला असं येतंय. अनेक जखमी आहेत.
ओह अंजू.काळजी घ्या.डोंबिवली
ओह अंजू.काळजी घ्या.डोंबिवली midc मध्ये बातम्या वाढल्या आहेत अश्या.(मध्ये पालघर midc मध्ये पण वाढल्या होत्या.)
आता बातम्यात चार जणांचा
आता बातम्यात चार जणांचा मृत्यू सांगितलं. श्रध्दांजली!
मी जेवत होतो आणि तेव्हड्यात
मी जेवत होतो आणि तेव्हड्यात मोठा आवाज होऊन मागच्या काचा फुटल्या. मला वाटलं आकाशातून काहीतरी पडलं. मागे वळून बघतोय तर आकाशात धुराचा मोठा लोळ. मग मी(आम्ही) सगळेच जेवण टाकून स्फोट बघायला पळालो. धुराचे लोट आकाशात वाहत होते. भयानक होतं सगळं. थोडा वेळ स्फोट बघितला आणि परत येऊन जेवायला बसलो इतक्यात आमच्या कंपनीत सांगितलं घरी जा. मग मी चपाती भाजी टाकून दिली, सोबत नेलेली बुंदी परत डब्यात भरली आणि तिथून सुसाट गाडी चालवत निघालो. कल्याण शीळ रोडवर धुराचे ढग जमा झाले होते पाऊस पडेल असं वाटत होतं. एक बाई हसत दात दाखवत व्हिडिओ काढत होती. घरी आलो तर तिथून पण धूर दिसत होता आणि लोकं बघत होते. घरी आलो तर घरचे लवकर आलो, सुखरूप आहे पाहून खुश झाले.
अरे बापरे, बोकलत आणि अन्जुताई
अरे बापरे, बोकलत आणि अन्जुताई. सुखरूप आहात वाचून बरं वाटलं.
------
स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली... !
फेज 2 च्या जवळच निवासी भाग
फेज 2 च्या जवळच निवासी भाग आहे ना? Chemical companies जिथे असतात तिथे निवासी संकुल उभारायला परवानगी देऊ नये असं वाटतं. अर्थात शहरं एवढी पसरत चालली आहेत की हे कठीणच आहे
धुराच्या लोटांचे भयंकर फोटो
धुराच्या लोटांचे भयंकर फोटो झळकत आहेत ते पाहून इथे आलो सहा ते सात मृत्यमुखी व पन्नास जखमी अशा बातम्या आहेत. मृतांची संख्या बरीच वाढण्याची भीती आहे. काही वर्षांपूर्वी सुद्धा मला वाटते याच भागात केमिकल कंपनीत व अगदी असाच बॉयलर स्फोट होऊन बरेच दगावले होते अशी बातमी वाचल्याचे आठवते.
१. भर वस्तीत अशा कंपन्या आणि
२. एका अपघातानंतर काही वर्षांनी अगदी तसाच दुसरा अपघात...
स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली... !
बाप रे!
बाप रे!
भर वस्तीत अशा कंपन्या आणि >>>
भर वस्तीत अशा कंपन्या आणि >>>> कंपन्या भर वस्तीत नाहीत हो…. वस्ती वाढत वाढत कंपन्यांजवळ गेलीय.
. वस्ती वाढत वाढत कंपन्यांजवळ
. वस्ती वाढत वाढत कंपन्यांजवळ गेलीय.>> खरं आहे.
डोंबिवली एमआयडीसीत स्फोट, आगी अशा बातम्या मी लहान असताना पासून अनेकोनेक वेळा ऐकत आलो आहे. जिवाची किंमत नाही हेच खरं.
सुदैवाने घरी कुणीही नव्हतं..
सुदैवाने घरी कुणीही नव्हतं.. पण घराच्या काचाना तडे गेलेत..
भर वस्तीत अशा कंपन्या आणि >>>> कंपन्या भर वस्तीत नाहीत हो…. वस्ती वाढत वाढत कंपन्यांजवळ गेलीय. >>>>
हा वादाचा मुद्दा आहे..खरतरं तो पूर्ण एरिया MIDC चाच आहे.. कंपन्यांना बदलापूर अंबरनाथ येथे स्थलांतरीत करण्याचे आदेश देण्यात आहे होते पण MIDC पहील्यापासून आहे..
वस्ती नंतर वाढत गेली आहे.. कित्येक बांधकाम बेकायदेशीर आहेत.. बिग बाझार सुरू झालं होतं ते मात्र सिल केल गेलं
कंडोमपा नेहमीसारखी झोपलेलीच आहे...
बोकलत बापरे,फारच जवळ होतात.
बोकलत बापरे,फारच जवळ होतात.
यावेळी आमच्यापासून एक ते दीड kms अंतर होतं. मागच्यावेळी साधारण 500 ते 700 मीटर्स होतं. आम्ही midc त रहात नाही, पण आईस फॅक्टरी एरिया तसा जवळ आम्हाला, त्याच्या पुढे 2016 साली झालेला.
बाप रे!! काळजी घ्या.
बाप रे!! काळजी घ्या. मृतात्म्यांच्या नातेवाईकांना सावरण्याचे, बळ मिळो.
राजकोट, गुजरात येथे एका मॉल
राजकोट, गुजरात येथे एका मॉल मध्ये अग्नितांडव. गेमिंग झोन मधे आग लागली. 24 जण मृत्युमुखी. 12 मुलांचा समावेश.
अरेरे
अरेरे
काय चाललय
काय चाललय
दिल्लीत लहान मुलांच्या
दिल्लीत लहान मुलांच्या रुग्णालयाला आग सात नवजात बालकांचा मृत्यू .
------
राजकोट दुर्घटनेबाबत वर वाचून बातमी पहायला गेलो तर दिल्लीचीही बातमी दिसली, आणि इथे लिहिले.
मानवी दोषांमुळे होणार्या दुर्घटनांसाठी वेगळा धागा असावा का?
<< दिल्लीत लहान मुलांच्या
राजकोट तसेच दिल्ली
बापरे ! काय चाललंय
बापरे ! काय चाललंय
खूप वाईट आणि भीतीदायक घटना
खूप वाईट आणि भीतीदायक घटना घडत आहेत.इमारतींची फायर सेफ्टी,छोट्या कारखान्यांमध्ये बॉयलर मेंटेनन्स, दुर्घटनेत योग्य आणि मोकळे असलेले एक्झिट या सर्वांवर या अपघातांच्या निमित्ताने अजून कडक नियम व्हावे, विचार व्हावा.नवजात बाळांचं वाचून खूप वाईट वाटलं.ईश्वर दोषींना योग्य ती शिक्षा देवो.
अरे बापरे! भीषण घटना
अरे बापरे! भीषण घटना एकापाठोपाठ एक. दोन्ही मध्ये लहान बाळे व किशोरवयीन मुले...
काही वर्षांपूर्वीच अशा घटना घडल्यात, त्यांची पुनरावृत्ती होणे हे फार दुर्दैवी आहे.
किती भयंकर आहे हे सगळे.
किती भयंकर आहे हे सगळे. सुरक्षितता हा मुद्दा कोणाच्याच अजेंडावर नाही. ज्यांची कायदेशीर व नैतिक जबाबदारी आहे त्यांना पर्वा नाही. कायद्याचे रक्षक सहज विकत घेतले जातात. आणि ज्यांच्या सुरक्षिततेसाठी कायदे आहेत त्यांना सुरक्षितता म्हणजे काय हेही माहिती नाही. सगळी समाज व्यवस्था खालुन वरुन आतुन बाहेरुन पोखरलेली आहे. कधी बदलणार हे सगळे?? नवजात अर्भकांबद्दल वाचुन तर निशब्द व्हायला झाले. काय अवस्था झाली असेल त्यांची..
उत्तराखंड ला जाणाऱ्या ११
उत्तराखंड ला जाणाऱ्या ११ भाविकांचा उत्तर प्रदेशात मृत्यू.
अरे बापरे!
अरे बापरे!
<<मानवी दोषांमुळे होणार्या
<<मानवी दोषांमुळे होणार्या दुर्घटनांसाठी वेगळा धागा असावा का? >>
------ सहमत...
धागा नाही तर विभाग असायला हवा.... "टाळता येणार्या दुर्घटना " . पोर्शे गाडी अपघांत, मोरबी घटना, बिलबोर्ड पडण्याची घटना या तसेच अनेक घटना चटकन डोळ्यासमोर येतात. झालेल्या मनुष्य हानीबद्दल आपण आता काही करु शकत नाही, पण थोडी काळजी घेतल्यास भविष्यात अशा घटना जरुर टाळता येतील.
अरे बापरे काय चाललंय काय रोजच
अरे बापरे काय चाललंय काय रोजच
पुणे सातारा रस्ता (आंबेगाव
पुणे सातारा रस्ता (आंबेगाव मार्गे) - स्वामी नारायण मंदीराच्या समोर सर्व्हिस रस्त्यावर काल (शनिवार २५ मे) सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉकला गेलेल्या जोडप्याला डंपरने जोरदार धडक दिली. त्यातल्या महिलेचा चेंदामेंदा झाला आणि पुरूष खालच्या खंदकात उडून पडला.
सुन्न करणार्या घटनांची
सुन्न करणार्या घटनांची मालिका थांबतच नाहीये!
उत्तराखंड ला जाणाऱ्या ११
उत्तराखंड ला जाणाऱ्या ११ भाविकांचा उत्तर प्रदेशात मृत्यू.>>>>
चार धाम यात्रेत १५ दिवसात ५२ लोक गेले, बहुतेक सर्व ६०
च्या पुढे होते, हार्ट अॅटॅकने गेले. चार धाम यात्रा धडधाकट असतानाच केलेल्या बर्या. फिटनेस नसेल तर कृपया जाऊ नका. मी दोनदा जाऊन आलेय, कधीही आणीबाणीची स्थिती उद्भऊन आपल्या फिटनेसचा कस लागु शकतो.
Pages