Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06
दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला ही व्यक्तीच आधी माहिती
मला ही व्यक्तीच आधी माहिती नव्हती.
पण तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनच ही बातमी दिली गेली होती असं आता वाचलं. हल्ली ट्विटर, इन्स्टा हेदेखील अधिकृत बातमीचे स्रोत झालेच आहेत. त्यामुळे माध्यमांचीही फसगत झाली असणार. आता यापुढे ते ताक फुंकून पितील अशी अपेक्षा करूया.
मला ही व्यक्तीच आधी माहिती
मला ही व्यक्तीच आधी माहिती नव्हती.
>>>>>>
2011 क्रिकेट वर्ल्डकप भारताने जिंकला तर ही बया आपले सर्व कपडे काढणार होती. तेव्हा हिचे नाव पहिल्यांदा ऐकले होते.
परवा तिच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा दुसऱ्यांदा ऐकले..
आणि काल जिवंत आहे हे समजले तेव्हा तिसऱ्यांदा ऐकले.
त्यामुळे माध्यमांचीही फसगत
त्यामुळे माध्यमांचीही फसगत झाली असणार. आता यापुढे ते ताक फुंकून पितील अशी अपेक्षा करूया.
>>>>>
माध्यमे ताक पित नाहीत तर ताक विकतात.
त्यामुळे ते फुंकायच्या भानगडीत पडून आपले नुकसान करणार नाहीत
लोकांनी आधी डेथ म्हणून आणि
लोकांनी आधी डेथ म्हणून आणि नंतर तिने उतका चिप स्टंट केला तिला शिक्षा द्या म्हणून, काही करून चर्चा आणि गुगल ट्रेंडिंग सर्च वाढावा आणि इंस्टा फॉलोअर्स वाढावे असा तो गेम असेल.अगदी रागावून पण हिला चर्चेत आणून हिचा टी आर पी वाढवू नको या आपण.अनुल्लेख हेच सर्वात मोठं उत्तर.
पूनम पांडेचे फोलॉअर वाढो
पूनम पांडेचे फोलॉअर वाढो किंवा कमी होऊ दे यात आपला काही फायदा नुकसान नाही.
पण या बातमीच्या निमित्ताने Cervical Cancer बद्दल आणखी चार लोकांना समजले हे नक्की झाले.
असो, कोणीतरी जिवंत आहे. आनंद आहे. आता ही दुःखद घटना नसल्याने याची चर्चा या धाग्यावर नको म्हणून थांबतो.
इथले जुने आयडी, समिरबापूंनी
इथले जुने आयडी, समिरबापूंनी खूप छान पोस्ट लिहिलीय त्यांच्या फेसबुकवर. नक्की वाचावी अशी
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0JCPW1HWHoU39Y1u7MKTJgM...
या धाग्याची प्रतिसाद संख्या
या धाग्याची प्रतिसाद संख्या मर्यादा संपलेली आहे. पूनम पांडेवर चर्चा करण्यासाठी वेगळा धागा काढावा.
प्रभाकर देवधर
प्रभाकर देवधर
ओह्ह! किती उत्तुंग
ओह्ह! किती उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. फार फार प्रेरणादायी परीचय. वाचूनच नतमस्तक व्हायला झाले_/\_ किर्लोस्करांच्या आत्मचरित्राची आठवण झाली. भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
भरत, लिंक दिल्या बद्दल
भरत, लिंक दिल्या बद्दल अक्षरक्षः शतशः आभार. नाहीतर नुसते एक नाव देतात आणि आपल्याला (मला) माहीतही नसते. तुमच्या लिंकवर जाउन माहीती वाचता आली. किती थोर उद्योजक, नवनवोन्मेष निर्माते असतात ही लोकं. भारताच्या प्रगतीच्या घोडदौडीत सिंहाचा वाटा असतो. खूपच प्रेरणादायी.
माझी विनम्र श्रद्धांजली.
ओह्ह अॅपलॅब वाले ना?
ओह्ह अॅपलॅब वाले ना? श्रद्धांजली
प्रभाकर देवधर विनम्र
प्रभाकर देवधर विनम्र श्रद्धांजली, त्याचा कंपनीची उपकरण ३० वर्षापुर्वी वापरली आहेत.
अॅपलॅबला कॉलेजची इंडस्ट्रिअल
भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
अॅपलॅबला कॉलेजची इंडस्ट्रिअल विझिट गेली होती.
सायन्स / इंजि वाल्या इथल्या
सायन्स / इंजि वाल्या इथल्या बहुतेक सर्वांनी अॅपलॅब ची उपकरणे वापरली असतील . दृष्टा माणूस, श्रद्धांजली.
प्रभाकर देवधर - भावपूर्ण
प्रभाकर देवधर - भावपूर्ण श्रद्धांजली!
=====
आज वर्तमानपत्रात एक दुःखद बातमी वाचली.
एका शाळेतील आठवीच्या मुलाला माहीत झाले की शाळेतील कोणी विद्यार्थी मेला तर शाळेला एक दिवस सुट्टी देतात. त्या मुलाला सुट्टी हवी होती म्हणून त्याने एका पहिलीतील विद्यार्थ्याला मारून टाकले. तो पहिलीतील विद्यार्थी घरी आला नाही म्हणून शोधाशोध सुरू झाली व पोलीस शाळेत आले. पोलीस शाळेत आल्याचे कळल्यावर आठवीतील विद्यार्थी दोन दिवस शाळेत गेला नाही. 'दोन दिवस हा विद्यार्थी शाळेत आलेला नाही' हे कळल्यावर पोलिसांना संशय आला व त्यांनी या मुलाची चौकशी केली. त्यात या मुलाने कबूल केले की त्याने त्या छोट्या मुलाला मारले होते. असे करण्याचे कारण विचारल्यावर तो म्हणाला की त्याला सुट्टी हवी होती म्हणून त्याने असे केले.
(असे विचित्र दुर्दैवी प्रकार अनेक घडून गेले असतील आजवर, पण हा प्रकार वाचून मात्र येथे लिहावे असे वाटले).
धक्कादायक व अनेक प्रश्न उपस्थित करणारा दुःखद प्रसंग!
2017 साली अशीच एक घटना घडली
2017 साली अशीच एक घटना घडली होती तेंव्हा देशभरात माध्यमातून चर्चा झाली होती:
Ryan International School, in Gurugram
https://en.m.wikipedia.org/wiki/Murder_of_Pradyuman_Thakur
प्रभाकर देवधर - भावपूर्ण
प्रभाकर देवधर - भावपूर्ण श्रद्धांजली!
बेफि, भयंकर!
अतुल, वरची बातमी वाचून ही लिंक उघडलीच नाही.
>>>>>>>>अतुल, वरची बातमी
>>>>>>>>अतुल, वरची बातमी वाचून ही लिंक उघडलीच नाही.
+१
' उडान ' या मालिकेद्वारे
' उडान ' या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेल्या कविता चौधरी यांचं निधन.
या मालिकेत काम केलेले विक्रम गोखले, उत्तरा बावकर आणि कविता चौधरी असे तिघेही आता नाहीत.
सर्फ एक्सेलच्या जाहिरातीमधुन
सर्फ एक्सेलच्या जाहिरातीमधुन घरोघरी पोचल्या होत्या त्या. उडानमधे त्यांच्या अभिनयाला वाव मिळाला.
श्रद्धान्जली !
अमीन सायानी. फली नरिमन.
अमीन सायानी.
फली नरिमन.
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
रितू राज(बनेगी अपनी बात, तोल मोल के बोल आणि रिसेंटली बंदिश बॅंडीट मधला नायिकेचा बाप) पण गेला.
ओह्ह! "बहनों और भाइयों..."
ओह्ह! "बहनों और भाइयों..." अमीन सयानी. रेडिओ युगातला हीरो आवाज. भावपूर्ण श्रद्धांजली.
कविता चौधरी. भावपूर्ण श्रद्धांजली.
_/\_
पंढरी फडके
पंढरी फडके
अमीन सायानी!
अमीन सायानी!
कानांत रुजलेले आवाज हरपत चालले आहेत.
एकापाठोपाठ एक sad news.
एकापाठोपाठ एक sad news.
श्रद्धांजली सर्वांना.
मनोहर जोशी
मनोहर जोशी
मोठं सिनियर व्यक्तिमत्त्व
मोठं सिनियर व्यक्तिमत्त्व हरपलं.श्रद्धांजली.
दंगल actress सुहानी
दंगल actress सुहानी
इथली बातमी वाचून एबीपा माझा
भावपूर्ण श्रध्दांजली!
Pages