Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34
भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अबब, अनिंद्य! यावरून तिथे हा
अबब, अनिंद्य! यावरून तिथे हा देव किती लोकप्रिय आहे याचा प्रत्यय येतो.
हपा भारी पोस्ट. बेसिकली, घर
हपा भारी पोस्ट. बेसिकली, घर का मुलगा तमिळ मुरुगन बराबर!
अनिंद्य...
हो, मुरगन लै फेमसाय तिकडे
हो, मुरगन लै फेमसाय तिकडे
आश्चर्य वाटेल पण लहान मुलांना कष्ट-वेदना देण्यात आनंद मानणाऱ्या देवतांमधे एक नाव स्कंद आहे. त्या एकूण ९ आहेत पूतना, गंधपूतना वगैरे ! आठवा : पूतना मावशीचे प्रेम / पान्हा
तोच मुरुगन स्वत: कुमार वयाचा / लहान बालक आहे हे विचित्रच.
मामी
मामी
अनिंद्य, स्कंद या शब्दाचा शब्दशः अर्थ "सरकलेला" असा होतो. मुरुगन देवाचं तसंच वर्णन आहे. त्या नावाचं मूळ त्याच्या जन्मकथेसंबंधी आहे. त्या सहा अप्सरा आणि त्यांना बघून आकाश मार्गाने जाणारा अग्नी "सरकला". मग त्यांच्यापासून ६ मुलं होऊन ती नंतर एकमेकांना चिकटून धड एक झालं आणि डोकी ६ - म्हणून षण्मुगा (षण्मुख, तमिळ भाषेत ख नाही).
हर्पा आणि अनिंद्य, छान पोस्ट.
हर्पा आणि अनिंद्य, छान पोस्ट.
'शिवाची सात रहस्ये'- हे डॉ पटनायक यांचं पुस्तक माझ्याकडे आहे. त्यात तारकासुराला शिवाच्या बालक रूपातील सेनापतीच्या हातून मृत्यू येईल असा वर होता. त्यामुळे इंद्र स्वर्गातील सिंहासन परत मिळविण्याच्या गडबडीत शिवशक्ती यांच्या प्रणयाराधनेत व्यत्यय आणायला अग्निला पाठवतो. तेव्हा ते वीर्य सांडते - जीवनाची चिळकांडी म्हणजे स्कंद.. !
देवांना ते बीज शक्तीच्या गर्भात जाऊ द्यायचे नसते कारण त्यांना शिवाचे प्रतिरूप क्लोन हवे असते बाळ नाही. ते घेऊन हा अग्निदेव साऊथला पळून जात असताना सांडतो व तळ्याजवळील सहा कृत्तिकांना किंवा मातृकांना त्यापासून गर्भधारणा होते व सहा तुकड्यात ते बाळ जन्माला येते व नंतर सहा मुखं घेऊन चिकटते. सहा मुखे असलेला तो म्हणून षण्मुगन् किंवा आरमुगन असेही ओळखला जातो. (मुग म्हणजे मुख असावे)
नंतर ते बालक साऊथमधेच करिअर करते. तारकासुराच्या दोन मुलांशी सिंहमुखन व सुरपद्मनशी युद्धही होते . त्यापैकी सिंहमुखनला अनुक्रमे दुर्गेचे वाहन सिंह करून जीवदान दिले जाते. तेव्हा सुरपद्मन मोठ्या पर्वताचे रूप घेतो. कार्तिकेय त्याच्यावर भाला फेकण्याने त्या पर्वताचे दुभंगून दोन तुकडे होतात. समोरचा भाग कोंबडा व मागचा भाग मोर होतो. कोंबडा मुरुगनच्या ध्वजावर आरुढ होतो व मोर मुरुगनचे वाहन बनतो. तिथेच देवसेना नावाच्या राजकन्येशी व्यवस्थित फ्लर्ट करून लग्नही करतो.
---इति इन्ना रास्कला मुरुगन माईन्ड इट संपूर्ण
अस्मिता
अस्मिता
>>> स्कंद या शब्दाचा शब्दशः अर्थ "सरकलेला"
Interesting!
परवाच इथल्या व्यंकटेश्वराच्या देवळाला भेट दिली तेव्हा ‘व्यंकट’ म्हणजे वाकडा हे ऐकून मुलं अशीच चकित झाली.
अस्मिता
अस्मिता
कार्तिकेयाने साऊथ मध्ये केलेलं पुढचं करिअर नॉर्थ वाल्यांना ठाऊकच नाही.
मुख >> मुग या आणि अशा साऊथ उच्चारांवर पार्श्वभूमी देणारा एक धागा लिहीन म्हणतो. असे माझे बरेच कमिटेड धागे पेंडिंग आहेत.
हो, काढा धागा. रजनीकांत आणि
हो, काढा धागा. रजनीकांत आणि कार्तिकेय सारखेच झालेत आम्हाला
आपली बरीच नावं बॉडी-शेमिंगोद्भव किंवा self explanatory आहेत. उदा. कुंभकर्ण, लंबोदर, पंडू.
तेव्हा शेमिंग होत होतं का
तेव्हा शेमिंग होत होतं का माहीत नाही. कृष्ण पण तसच आहे ना नाव.
तिथेच देवसेना नावाच्या
तिथेच देवसेना नावाच्या राजकन्येशी व्यवस्थित फ्लर्ट करून लग्नही करतो. >>> अस्मिता, हे कुणाबद्दल आहे? मोर / कोंबडा / कार्तिकेय? कार्तिकेय ब्रह्मचारी आहे ना?
उत्तरेत कार्तिकेय ब्रह्मचारी
उत्तरेत कार्तिकेय ब्रह्मचारी आहे आणि दक्षिणेत त्याला दोन पत्नी आहेत (म्हणून मी वरती म्हणालो की नॉर्थ वाल्यांना ठाऊकच नाही म्हणून). उत्तरेत गणपतीला दोन पत्नी आहेत आणि दक्षिणेत तो ब्रह्मचारी आहे. शंकराला एकूण २ सुना आहेत यावर अखिल भारतीय एकमत आहे.
शंकराला एकूण दोन सुना आहेत..!
शंकराला एकूण दोन सुना आहेत..!!
अस्मिता,
त्याच्यावर भाला फेकण्याने त्या पर्वताचे दुभंगून दोन तुकडे होतात. समोरचा भाग कोंबडा व मागचा भाग मोर होतो.
समोरुन भाला फेकला तर पर्वताचे आडवे (लेफ्ट आणि राईट असे) दोन भाग होतील ना?
समोरचा - मागचा असे कसे होतील?
आणि हे सर्व करुन, तारकासुराचा हेतू साध्य झाला की नाही?
त्याच्या मुलांना वाहनं करुन कसेबसे गप्प केले पण मूळ तारकासुराचे काय?
छल्ला, चांगला प्रश्न आहे.
छल्ला, चांगला प्रश्न आहे. बहुतेक तो पर्वत बाजूला तोंड करून साईड व्ह्यू प्रोफाईल देऊन उभा असेल. त्यामुळे हे शक्य झालं.
उत्तरेत कार्तिकेय ब्रह्मचारी
उत्तरेत कार्तिकेय ब्रह्मचारी आहे आणि दक्षिणेत त्याला दोन पत्नी आहेत >>> अच्छा असं आहे तर!
हो, माधव. एकीचे नाव वल्ली आणि
हो, माधव. एकीचे नाव वल्ली आणि दुसरीचे देवसेना आहे. डॉ देवदत्त पटनायक यांचे 'शिवाची सात रहस्ये' वाचून लिहिले आहे. मुरुगनवर एक स्वतंत्र प्रकरण आहे. मुरुगन स्वतःतील ब्रह्माचा शोध घेण्यासाठी जन्मला असल्याने त्याला 'सुब्रह्मण्यम' सुद्धा म्हणतात.
----------
एकदा सहा मुखं एकमेकांना चिकटून 'षण्मुगन्' तयार झाला यावर विश्वास ठेवल्यावर, पर्वताचे दुभंगून दोन तुकडे झाले, समोरचा भाग कोंबडा व मागचा भाग मोर झाला याचे काय आश्चर्य...
तारकासुराचा अंत झाला..!
-------
शंकराला एकूण २ सुना आहेत यावर अखिल भारतीय एकमत आहे. >>>>
शंकराला एकूण २ सुना आहेत यावर
शंकराला एकूण २ सुना आहेत यावर अखिल भारतीय एकमत आहे. >>>>
+१ धमाल !
+१
धमाल !
>>> आपली बरीच नावं बॉडी
>>> आपली बरीच नावं बॉडी-शेमिंगोद्भव किंवा self explanatory आहेत
मला उलटही वाटून गेलं. व्यंकट, घनश्याम, लंबोदर, एकदंत, नीळकंठ, अष्टभुजा, अर्धनारीनटेश्वर वगैरे दैवतं सेलिब्रेट करणारं कल्चर किती इन्क्लुजिव असायला हवं! का नाहीये?!
मला वाटतं त्यांना मखरातच
मला वाटतं त्यांना मखरातच ठेवल्याने (किंवा पूर्ण अस्तित्वच नाकारण्याने) त्यामागची वैचारिक भूमिका समजून घेण्याची गरजच वाटली नाही. ते देव आहेत त्यांचा एक दात किंवा वाकडं तोंड कशानकशाचं प्रतिक होतं, आपण मात्र माणसं त्यामुळे हे फक्त वैगुण्य म्हणून उरतं. All inclusive वगैरे मिथकात/ पुराणातच उरलं, अप्लाय कोणी केलं नाही. उलट वाळीत टाकतील अशी मानसिकता आहे.
हो ना!
हो ना!
किलोत्पाटी
किलोत्पाटी
म्हणजे नक्की काय ?
किलोत्पाटी वानर / किलोत्पाटी उद्योग . . . असे वाचण्यात आले.
वानराची जात ??
पोलीस
पोलीस
रंजक भाषाप्रवास :
PIE मूळ tpolh = किल्ला >> (ग्रीक) polis = शहर >> { (संस्कृत) पुर(म)} >> ( लॅटिन) politia = नागरी प्रशासन >>> (इंग्लिश व फ्रेंच ) police >>> पोलीस (मराठीत स्वीकृत )
सन १८०० नंतर अर्थविस्तार : कायदा व सुव्यवस्था राखणारे नागरी दल
https://www.etymonline.com/search?q=police
मस्त चर्चा आणि विवेचन
मस्त चर्चा आणि विवेचन
कृतिकांचा मुलगा म्हणून कार्तिकेय?
कार्तिकेयाचे आणखी एक नाव षाण्मातुर
आणखी एक कार्तिकेयाचे नाव जे सौथला मुलग्यांचे असते ते म्हणजे विशाख - शाखा नसलेला.
पोलिस शब्द प्रवास रोचक
पोलिस शब्द प्रवास रोचक
पोलिस शब्द प्रवास रोचक +१
पोलिस शब्द प्रवास रोचक +१
“ठीक आहे” असे पूर्ण न लिहिता “ठीके’ असे लिहिण्याची चलती आहे असे दिसते. पण मायमराठीत “ठीके” / ठिके म्हणजे सामानाचे गाठोडे
ठिके >>> भारी !
ठिके >>> भारी !
हे पण अर्थ दिलेत :
तुकडा; भाग; ठिगळ; तीळ.
संन्यासी
संन्यासी
हा शब्द इंग्लिश शब्दकोशाने स्वीकारलेला आहे. (https://www.collinsdictionary.com/dictionary/english/sannyasi)
अलीकडे भारतीय इंग्लिश वृत्तमाध्यमांमध्ये तो ( किंवा त्याचे रुप ) वापरलेला दिसतो :
https://www.ndtv.com/india-news/pune-porsche-case-pune-porsche-accident-...
संस्कृती
संस्कृती
या शब्दासंबंधीची रोचक माहिती भाषापंडित अशोक केळकर यांच्या लेखातून साभार :
‘कल्चर’ या इंग्लिश शब्दाचा मूळ अर्थ, शेतीसाठी जमिनीची मशागत हा आहे.
भारतीय भाषा अभ्यासकांनी ही संकल्पना भारतीय भाषांमध्ये आणायची ठरवली तेव्हा बांगलाभाषकांनी त्यासाठी कृष्टि ( कृ = कृषि ) हा शब्द योजला. परंतु तो शब्द रवींद्रनाथ ठाकूर यांना पसंत पडला नव्हता. म्हणून त्यांनी पुण्यातील संस्कृतचे प्राध्यापक डॉ. प. ल. वैद्य यांचा सल्ला घेतला. तेव्हा वैद्यांनी त्यांना सांगितले की, वि का राजवाडे यांनी यासाठी घडवलेला संस्कृती हा शब्द समाधानकारक आहे.
हे रवींद्रनाथांना पटले आणि मग संस्कृती हा शब्द अखिल भारतीय पातळीवर रुळला.
छान माहिती. 'कृष्टि' कृश-
छान माहिती. 'कृष्टि' कृश- दुःखीकष्टी-कुपोषित वाटतो. संस्कृती सुंदर आहे. त्यात संस्कार, सुसंस्कृत, संस्कृत (भाषा), कृती असा सर्वसमावेशक नाद आहे. नक्की कारण माहीत नाही पण माझ्याकडून नेहमी नादाला महत्त्व दिले जाते.
इंटरेस्टिंग माहिती.
इंटरेस्टिंग माहिती.
गंमत म्हणजे विरजणालाही कल्चर म्हणतात.
आपल्याकडे परगावी/देशी जाताना हातावर दही द्यायची पद्धत आहे. त्याचा एक प्रतीकात्मक अर्थ ‘जाल तिथं आपलं कल्चर न्या’ असा आहे असं ऐकण्यात आलं होतं.
Pages