ऐलान-ए-जंगः एक धावता संयुक्त रिव्यू

Submitted by फारएण्ड on 4 August, 2017 - 10:51

ऐलान-ए-जंग या अजरामर चित्रपटाबद्दल आपली मते येथे लिहा. हा रिव्यू क्राउडसोर्सिंग सारखा लिहू. म्हणजे सर्वांना त्यात लिहीता येइल. गेल्या २-३ दिवसांत इतर बाफ वर अनेकांनी तुकड्या तुकड्यांत या चित्रपटातील सीन्स बद्दल लिहीले आहे. त्यांनी ते इथे परत लिहा, आणि इतरांनाही त्यात भर घालता यावे म्हणून असा बाफ उघडत आहे.

इतर चित्रपटांबद्दल स्वतंत्र बाफ आहेत तेव्हा त्याबद्दल इथे लिहून हे डायल्यूट करू नका Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेय Rofl
खतरनाक लिहिलम्य.
चकधूम धिंगचॉक रचला पाया टिंगडांग झालासे कळस >>> हे अशक्य भारी उच्च आहे.

आज पुन्हा हे वाचले आणि पुन्हा लोललो! Happy

क) इथे आपल्याला फुल स्टॅक बघायला मिळतो. प्रथम कस्टमर (शोलेमध्ये ये गुडबाय क्या होता है विचारणारा इसम) येऊन बग रिपोर्ट करतो >>> पायस - बाय द वे तुझ्या तिसर्‍या पानावरच्या या "क" प्रतिक्रियेमधला तो अ‍ॅक्टर म्हणजे "मामाजी" आहेत हे मधे त्या फेसबुक वरच्या ग्रूप मधे कोणीतरी शोधून काढले ना? Happy
https://www.youtube.com/watch?v=nFnhIG46Rsw&t=1m10s

हो हो मामाजीच ते! त्या सीनमध्ये काही गोष्टी गोंधळात पाडणार्‍या आहेत. तेव्हाच का लिहिल्या नाहीत आता आठवत नाही.

१) ठकुरायन तिचा दरबार एका वडाच्या झाडाखाली भरवते. त्या झाडाखाली लोड, तक्के, गाद्या, गिर्द्या टाकून त्यावर एखाद्या महाराणीसारखी सुषमा सेठ बसलेली असते. पण त्या झाडाला पार बांधलेला नसतो. एवढी ती परोपकारी ठकुरायन पण गावातल्या लोकांना घटकाभर टेकायला झाडाला पार बांधण्याचे तिला सुचू नये - ये बात कुछ हजम नही हुई!

२) दुसरे म्हणजे असिस्टंट युनिटचा हलगर्जीपणा आहे. तिला वडाच्या झाडाखाली बसवले आहे. गोष्ट राजस्थानात घडते आहे हे एव्हाना सगळ्यांना कळून चुकलेले आहे. ते स्टुडिओतले वडाचे झाड आधी नक्कीच वटपौर्णिमेच्या सीनसाठी वापरले असावे कारण गुंडाळलेले धागे दिसत आहेत. अडचण अशी की ही प्रथा राजस्थानात नाही आहे.
मग ठकुरायन गुजरातेत (जिथे वटपौर्णिमा साजरी होते) बसली आहे असे म्हणावे तर ते वाळवंट कच्छचे रण म्हणावे लागेल. तसे असेल तर तिथे एकलिंगजीचे मंदिर कुठून आले? पुन्हा सगळा चंदनपुर आणि सभोवताल यांचा भूगोल फिस्कटतो ते वेगळेच!

पायस Lol हो भूगोल सुरूवातीच्या त्या मंगोलियाच्या नकाशापासूनच भरकटलेला आहे.

परोपकारी ठकुरायन ने कदाचित ग्रामस्थांकरता वडाच्या झाडाखाली गाद्या गिरद्या पर्मनंटली ठेवल्या असतील का?

ठकुरायनचे माहेर गुजरातेत असावे. तिला चंदनपुरात सासरी धाडताना हुंडा म्हणून वडाचे झाडही दिले असेल. त्यासोबत गुजरातमधून काही धागे सोबत आले असतील. शिवाय ठकुरायनने इकडे ती प्रथा सुरू केली असेल.

हा धागा धमाल आहे. कालपासून वाचतेय. अमेय, श्रद्धा, पायस आणि फारएण्ड सर्वांनीच हहपुवा लिहिलेय. Lol
फनहितार्थ वर काढतेय. Lol

पहातोय ! बाकी असल्या सिनेमात 'कोनाड्यात हिंदमाता, माझा नंबर पैला' टाईप्स संवाद कम्पल्सरी आहेत.
इथे धरम पाजी म्हणतात, 'यू ब्लॅक अँड व्हाईट, दद्दू इस ओन युर राईट ! ' बाकी राजेंद्रनाथ, मसाज पार्लर, गुड्डी मारुती वगैरे दर्जेदार विनोद आहेतच !

वाचतोय. धमाल चालू आहे इथे. Lol
हुकूमत, ऐलान ए जंग अजिबातच लक्षात नाहीत त्यामुळे टोटल लागत नाही.

हुकूमत, ऐलान ए जंग, फरिश्ते हे चित्रपट अजिबात लक्षात नाही याचा दोष दांडग्या विस्मरणशक्तीला द्यावा कि या चित्रपटांना ?

बहुतेक ऐलान ए जंग मधे एक पांढर्‍या पायर्‍यांचं एक घर असतं, त्या पायर्‍या वक्राकार फिरून येत असतात, त्यावरून कमांडो ज येतात आणि दिसेल त्याला गोळ्या घालतात. या पायर्‍या एका मंदीराच्या आहेत. मंदीराच्या पायर्‍यांवर असे दृश्य चित्रित करता येऊ शकते ही कल्पनाशक्ती असलेल्या अनिल शर्माबद्दल आदर का वाटू नये ? स्मशानात त्याने आयटेम साँग ठेवले तरी नवल वाटणार नाही.

हुकूमतची आठवण म्हणजे माझा माभा (मामेभाऊ) हुकूमत ची स्टोरी सांगायचा. शिवाय वेस्टर्न लाईनच्या लोकलमधून ड्राईव्ह इनच्या ओपन स्क्रीनवर रोज हुकूमत दिसायचा. तिथे तो अडीच वर्षे होता म्हणे. एखाद्याने लोकलने जाणंच सोडलं असतं. तरीही जावे लागत असेल तर मुंबईकरांची दैनावस्था आणखी काय वर्णावी ?

एकाने सांगितले कि हुकूमत मधे स्टोरी अशी काही नाही. फक्त गोळ्या सुटत असतात. कधी व्हिलन,कधी हिरो, कधी पोलीस, कधी साईड व्हिलन. तीन तास ठो ठो आवाज येत राहतो. बाहेर आल्यावर कानाचा डॉक्टर गाठावा एव्हढाच विचार डोक्यात असतो.

Pages