मोबाईल चे व्यसन कसे सोडवावे?

Submitted by ek_maaybolikar on 8 January, 2020 - 10:15

सतत व्हाट्सप/फेसबुकवर कुणाचे तरी मेसेज यावेत, फेसबुकवर आपल्या पोस्टला रिप्लाय यावेत, लाईक यावेत असे वाटत असते. सातत्त्याने व्हाट्सप फेसबुकवर चेक करणे सुरु असते. फेसबुकवर दोन तीन अकौंट ओपन केली आहेत. वेगवेगळे टाईमपास ग्रुप्स जोईन केलेत. एक झाले कि दुसरे अकौंट लोगिन करतो. कुठे कुठे पोस्टी टाकतो. सगळे झाले कि व्हाट्सअप बघतो. मग पुन्हा फेसबुक. मग अधूनमधून मायबोली. तोवर पंधरा वीस मिनटे जातातच. कि मग पुन्हा फेसबुक .... असे चक्र सुरु आहे. धड पंधरा मिनटेसुद्धा फोन पासून दूर राहता येत नाही. अगदी ठरवून राहिलोच जास्त वेळ बाजूला तर बेचैनी वाढते. कश्यातच लक्ष लागत नाही. मग डोके दुखायला लागते. मग पुन्हा एकवार फेसबुक व्हाट्सप वगैरे बघितले कि जरा शांत वाटते. कुणाचाच कुठेच मेसेज आलेला नसेल तर व्हाट्सपवर कुणालातरी (हि शक्यतो लेडीज असते) मेसेज करून रिप्लायची वाट बघत बसतो. पण रिप्लाय येत नाही तासनतास तशी बेचैनी वाढते.
ह्या सगळ्याचा विपरीत परिमाण जॉब आणि आयुष्यावर झाला आहे. काय करावे कळत नाही. रात्री थकवा येतो तो ऑफिसमध्ये काम केल्यामुळे नाही तर दिवसभर कुणाच्यातरी मेसेज ची, कॉमेंटची, लाईकची वाट बघितल्यामुले आलेला असतो. रात्रभर नित झोप लागत नाही. मोबाईल उशाला ठेवला असतो. थोडी जाग आली तरी चेक केल्याशिवाय रहावत नाही.

कृपया या व्यसनापासून सोडवण्याचा उपाय सांगावा. आयुष्याची वाट लागण्याची वेळ आलेली आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी क्लासेस घेतो मोबाईल सोडवण्याचे. अनेक जण शेवटच्या दिवशी त्यांचा मोबाईल फॉरमॅट मारून मला वापरायला देतात.

अनेक जण शेवटच्या दिवशी त्यांचा मोबाईल फॉरमॅट मारून मला वापरायला देतात.

इथे नियमात बसत असेल तर ते मोबाईल स्वस्तात विका आपल्या mybolikar
गरीब बांधवांना.
मला पण बघा एकदा स्वस्तात आहे का चांगला मोबाईल.

अनेक जण शेवटच्या दिवशी त्यांचा मोबाईल फॉरमॅट मारून मला वापरायला देतात.

इथे नियमात बसत असेल तर ते मोबाईल स्वस्तात विका आपल्या mybolikar
गरीब बांधवांना.
मला पण बघा एकदा स्वस्तात आहे का चांगला मोबाईल.

Pages