मोबाईल चे व्यसन कसे सोडवावे?

Submitted by ek_maaybolikar on 8 January, 2020 - 10:15

सतत व्हाट्सप/फेसबुकवर कुणाचे तरी मेसेज यावेत, फेसबुकवर आपल्या पोस्टला रिप्लाय यावेत, लाईक यावेत असे वाटत असते. सातत्त्याने व्हाट्सप फेसबुकवर चेक करणे सुरु असते. फेसबुकवर दोन तीन अकौंट ओपन केली आहेत. वेगवेगळे टाईमपास ग्रुप्स जोईन केलेत. एक झाले कि दुसरे अकौंट लोगिन करतो. कुठे कुठे पोस्टी टाकतो. सगळे झाले कि व्हाट्सअप बघतो. मग पुन्हा फेसबुक. मग अधूनमधून मायबोली. तोवर पंधरा वीस मिनटे जातातच. कि मग पुन्हा फेसबुक .... असे चक्र सुरु आहे. धड पंधरा मिनटेसुद्धा फोन पासून दूर राहता येत नाही. अगदी ठरवून राहिलोच जास्त वेळ बाजूला तर बेचैनी वाढते. कश्यातच लक्ष लागत नाही. मग डोके दुखायला लागते. मग पुन्हा एकवार फेसबुक व्हाट्सप वगैरे बघितले कि जरा शांत वाटते. कुणाचाच कुठेच मेसेज आलेला नसेल तर व्हाट्सपवर कुणालातरी (हि शक्यतो लेडीज असते) मेसेज करून रिप्लायची वाट बघत बसतो. पण रिप्लाय येत नाही तासनतास तशी बेचैनी वाढते.
ह्या सगळ्याचा विपरीत परिमाण जॉब आणि आयुष्यावर झाला आहे. काय करावे कळत नाही. रात्री थकवा येतो तो ऑफिसमध्ये काम केल्यामुळे नाही तर दिवसभर कुणाच्यातरी मेसेज ची, कॉमेंटची, लाईकची वाट बघितल्यामुले आलेला असतो. रात्रभर नित झोप लागत नाही. मोबाईल उशाला ठेवला असतो. थोडी जाग आली तरी चेक केल्याशिवाय रहावत नाही.

कृपया या व्यसनापासून सोडवण्याचा उपाय सांगावा. आयुष्याची वाट लागण्याची वेळ आलेली आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणाचाच कुठेच मेसेज आलेला नसेल तर व्हाट्सपवर कुणालातरी (हि शक्यतो लेडीज असते) मेसेज करून रिप्लायची वाट बघत बसतो.

>>>>

यूह नीड ए गर्लफ्रेंड !

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

सॉरी..... पण दुसराच कोणता उपाय नाही माझ्याकडे.
पण हा शंभर टक्के खात्रीचा आहे ... आणि यापेक्षा चांगला कुठला नसेल.. हे जमले नाही तरच ईतर पर्याय चाचपा

सहा महिन्यांनी मला पत्र पाठवून विचारा, तेव्हा पत्रानेच कसे सोडले हे व्यसन ते कळवेन.

नो रेंज. प्रोब्लेम सॉल्व्ह
>>>
याने त्डफड वाढते फक्त..

कुठेही गुण्तलेले मन बाहेर काढायला नेहमी एकच उपाय काम करतो ते म्हणजे मन गुण्तवायला दुसरा बेटर पर्याय शोधणे

स्मार्ट फोन सोडून थोडे दिवस साधा मोबाईल फोन वापरून बघा. हे स्मार्टफोन आणि पर्यायाने whatsapp, फेसबुक येण्याआधी साधे मोबाईल होतेच की. स्मार्ट फोन नसेल तर फारसा काही फरक पडत नाही.

चांगल्या डॉक्टरकडे जाणे उत्तम. त्यांनी सल्ला दिला तर एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रात दाखल व्हा. स्वतःला आपण चुकतो आहोत याची जाणीव होणे ही पहिली खूण आहे योग्य मार्गावर असल्याची.
एखाद्या आडगावात बिना फोनचे रहा जाऊन काही दिवस किंवा आपल्या आनंदवनात स्वयंसेवक म्हणून जा काही दिवस.
शुभेच्छा!

विपसना केंद्रात जा. 10दिवस मेडीटेशन, कुणाशीच न बोलता आणि तुमच्यासाठी मुख्यत्वे विदआउट इंटरनेट राहाव लागत.
तिकडे जाण्याआधी व्हॉट्सअप काढुन टाका. फेबु इन्स्टाच अकाउंट डिलीट करा.
परतल्यावर कुटुंबासोबत, कलीग- फ्रेंड्ससोबत टाईम स्पेंड करा.
बघा. विचार करा. नक्की जमेल तुम्हाला. Happy

पाथफाईंडर आणि बोकलत एकच आहेत का?>>>
मी बरेच दिवस पाथफाईंडर = ऋ आणि बोकलत = पृथ्वीकर समजत होतो. Lol

@ek maaybolikar,
तुम्हाला उपाय सापडला तर आम्हालाही सांगा.

• साधा फोन वापरणे
• रेंज नसलेल्या ठिकाणी काही दिवस जाऊन राहणे

हे चांगले उपाय आहेत. अजूनेक उपाय

• फारसा डेटा नसलेला फक्त कॉल-समस असलेला कोणता प्रिपेड प्लॅन असेल तर तो ऍक्टिव्हेट करा मोबाईलवर.

हा एक मानसिक रोग आहे.
मानसिक स्वास्थ ठीक नसल्याचे लक्षण आहे.
ऑफिस मध्ये काहीच शारीरिक काम नसेल तर जिम्, स्विमिंग,जॉगिंग चालू करा रोज.
Healthy शरीरात च हेल्धी मन राहत हे सत्य आहे.
त्या मुळे व्यायाम,योगा फर्स्ट.
आपल्या आजूबाजूला असलेलं जग च खर असते .
महाजलावरील भासमय जगातील संकट,समस्या ह्यांचा विचार करू नका त्या खऱ्या नसतात फक्त खऱ्या असल्याचा भास निर्माण करतात.
मित्र मैत्रिणी ह्या मायावी दुनियेतील नकोत खऱ्या दुनियेतील असाव्यात.
त्यांना आपल्या विषयी आदर वाटेल असे वर्तन ठेवा.
तिकडे चांगल्या पोस्ट टाकून प्रयत्न करता न तसे.
तुम्ही उल्लेख केलेली दोन्ही ऍप निर्माण करण्यात जो उद्देश होता निर्माण कर्त्याचा तसाच वापर त्यांचा करा.
प्रेम संबंध जुळवण्या साठी ते ऍप नाहीत.

प्रेम संबंध जुळवण्या साठी ते ऍप नाहीत. >>>>>राजेशजी भलत्याच हिंट देऊ नका त्यांना नाहीतर प्रेम जुळवण्यासाठी ते Tinder सारख्या डेडिकेटेड ऍप चा वापर सुरु करून अजूनच मोबाईलच्या आहारी जातील Lol Lol

सर्वात आधी तुमचे ते जास्तीचे फेसबूक अकाउंट्स आहेत, ते डिलीट करा (मन जड करून).

फक्त आणि फक्त एक, तुमचे जे ऑफिशियल म्हणा, किंवा रियलवाले म्हणा तेच अकाउंट राहू द्या. त्या अकाउंटवर तुमच्या सक्रियता किंवा activity log चेक करा. त्यात तुम्ही केलेल्या कॉमेंट्स, रिएक्शन(likes, haha, sad, love, wow), तुम्ही केलेल्या पोस्ट या सर्वांचा आढावा दिसतो. आजपासून मनोमनी ठरवा आज कोणतीही पोस्ट करायची नाही, कुठे कॉमेंट करायची नाही ना कुठे रिएक्शन द्यायची नाही.

आणि, हा उपक्रम दिवसभर चालवा. सतत activity log चेक करत राहा. आज राहावल्या न जावून काही पोस्ट केले असल्यास ते activity log मध्ये जाऊन डिलीट करा.

असे करण्याने नवीन पोस्ट येणार नाही, आणि पोस्टच नसल्याने रिएक्शन कुठून येणार! मग त्यामुळे तुम्हाला रिएक्शन, टिप्पणी पाहायची हुरहुर लागणार नाही. आधी तुम्ही केलेल्या पोस्ट वगैरेवर सध्या रिएक्शन येत असतील पण काळजी नको एक दोन दिवसात सर्व ठंड होईल. त्यामुळे मनावर आवर ठेवून आतापासून पोस्ट करणे टाळा.

फेबु मॅसेंजर अॅप असल्यास उडवून टाका.

आता राहिला व्हॉट्सअॅपचा प्रश्न. त्याच्या सर्व ग्रुपच्या नोटिफिकेशन ऑफ करा. आणि तुम्ही ज्या व्यक्तीला, माहिला मित्राला मॅसेज पाठवता ती चॅट विंडो डिलीट करा. फक्त महत्त्वाचे ग्रुप्स असतील त्याचेच मॅसेज राहू द्या.

Voila!! तुमचे मोबाईलचे व्यसन क्यूअर होईल.

मोबाइल इतका स्मार्ट कशामुळे झाला ?​*
खूप काही खाल्लं आहे या मोबाइलनं
याने हाताचं *घड्याळ* खाल्लं
याने *टॉर्च-लाईट* खाल्ला
याने *चिठ्या-पत्रे* खाल्ली
*पुस्तक* खाल्लं
*रेडिओ* खाल्ला
*टेप रेकॉर्डर* खाल्ला
*कँमेरा* खाल्ला
*केल्क्युलेटर* खाल्लं
याने *मैत्री* खाल्ली
*भेटीगाठी* खाल्ल्या
आपलं *सुख समाधान* खाल्लं
आपला *वेळ* खाल्ला
*पैसे* खाल्ले
*नाती* खाल्ली
*आठवण* खाल्ली
याने *आरोग्य* खाल्लं
व एवढं *सर्व खाऊन तो स्मार्ट बनलेला* आहे.
बदलणाऱ्या जगावर असा परिणाम होऊ लागला...
*माणूस वेडा आणि फोन स्मार्ट होऊ लागला...*
*जोपर्यंत फोन वायरने बांधला होता.*
*माणूस स्वतंत्र होता.*
*आता माणूस फोनला बांधला गेला...*
*बोटंच निभावतात आता नाती*
*भेटायला-बोलायला वेळ कोणाला आहे.*
सर्व *टच* करण्यात बिझी आहे.
परंतु *टच* मध्ये कोणीच नाही.....?

*हेच सत्य आहे*

@Aadesh203

त्यांना उपाय हवा आहे, WhatsApp वरील फॉरवर्ड तत्त्वज्ञानी लेख नको.

फोनवरून सोशल मिडिया अ‍ॅप्स काढून टाका. शक्यतो व्हॉट्सअ‍ॅप -वेबचा वापर करा. रात्री झोपताना डेटा ऑफ करून टाका. तुमचा अर्धा प्रश्न निकालात निघेल.
आणि लवकरात लवकर एखाद्या काऊंसेलरला भेटा.

न्यूज बघणे आणि वाचणे की बंद केलं की जगात सर्व शांतता आहे ह्याचा फिल येतो.

न्यूज बघणे,वाचणे चालू केलं की जगात सर्वत्र हिंसाचार चालू आहे,अशांतता पसरली आहे सर्वत्र असे तीव्र वाटत आणि उगाच काळजीने जीव वेडा पिसा होतो.
व्हॉट्स ऍप,आणि fb
हेच फिलिंग आणत.
एकदा स्त्री आयडी रिस्पॉन्स द्यायला लागला(आयडी ह्या साठी लिहाल आहे त्या मागे पुरुष सुद्धा असण्याची शक्यता जास्त असते)की स्त्री मैत्री करणे सोपे वाटू लागत आणि पुढच्या स्टेप ची आस निर्माण होते.
रिअल लाईफ मध्ये सहज स्त्री शी मैत्री होत नाही.
मग रिअल life पेक्षा fb,wA
फायद्या चे वाटून त्यात माणूस गुरफटून जातो

म्हणून अजुन सांगतो जमिनीवर या खऱ्या खुर्या ओळखीच्या माणसात रमा ,त्यानं जीव लावा .

@Aadesh203
त्यांना उपाय हवा आहे, WhatsApp वरील फॉरवर्ड तत्त्वज्ञानी लेख नको.
नवीन Submitted by प्रशि_क on 9 January, 2020 - 00:13
>> चुकलं. माफ करा.

माबोवर डू आयडी ने धागे काढणे या व्यसनावरील उपाय ही सुचवावेत.

नवीन Submitted by पाथफाईंडर on 9 January, 2020 - 02:59

    मी परत येईन ,परत येईन ही मला पण आलेली शंका खरी आहे का?

तुमच्या लेखावरुन तुम्ही पाठवलेल्या मेसेजला उत्तर मिळत नसल्याने तुमचा त्रागा होतो असे दिसते. तुम्हाला reply मिळाले असते तर असा धागा काढला नसता.
So फळाची अपेक्षा न करता आपण कर्म करीत रहावे, मोबाइलवर राग काढु नये.

Pages