Submitted by ब्लू कोलंबसे on 28 April, 2024 - 10:47
आज संध्याकाळी रस्त्याने चालताना आमच्या फेवरेट ' भट ' साहेबांच्या ' राज ' या ' अति भयंकर ' शिणेमातले ' आपके प्यार में, हम सवरने लगे' हे दर्दभरे गाणे कानी पडले अन् मन थेट 23 वर्षे मागे गेले.
त्यावेळी आमच्या गावात या चित्रपटासोबत एक ' अफवा ' पण रिलीज झाली होती.
जो माणूस हा चित्रपट रात्रीचा 9.30चा शो एकटा पाहील, त्याला 1 लाख रुपये इनाम मिळेल.
..... आणि
एका माणसाने रात्री तसा तो शो पाहिलाही, अन् त्याला ते 1 लाख रुपये मिळालेही, मात्र ते घ्यायला तो जिवंत नव्हता....!
आमच्या शाळेत (त्याकाळी इंटरनेट नसूनही) या आणि अशा अनेक अफवा पसरायच्या.
तुमच्याही आठवणीत असलेल्या अशा अफवा वाचण्यासाठी हा धागा...
(Just चंमतग :P)
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आपल्या भागातील कोकणी भुतांची
आपल्या भागातील कोकणी भुतांची (मुंजा, हडळ, समंध, चेटकीण) आठवण होते..
>>>
व्हिडिओ नाही पाहिला पण हे वाक्य नेहमी त्रास देते.
कोकणाचे निसर्गसौंदर्य आणि खाद्य संस्कृती इतकी भारी आहे तिथे या भूताखेतांसाठी कोकण उगाच (कु?)प्रसिद्ध झाले आहे.
मी जे काही थोडेफार कोकणात राहिलो आहे कधी रात्री अपरात्री एकटे दुकटे फिरायची भीती वाटली नाही. अंधारलेली पायवाट सुद्धा हातात टॉर्च घेऊन फिरलो आहे. कुठे असते हे भूत मुंजा हडळ हे आजवर कळले नाही.
नवर्याला काम सांगणार्या
नवर्याला काम सांगणार्या बायका
पतिव्रता , कर्तव्ये या सुद्धा अफवाच ना ?
कोकणात रात्री झोपताना
कोकणात रात्री झोपताना भुताच्या गोष्टी ऐकायला मस्त वाटायच्या, तेव्हा लाईट्सही नव्हते, आजूबाजूचे सगळे आमच्याच घरी कंदील घेऊन गप्पा मारायला यायचे आणि सोबत भुताच्या गोष्टी. लाईट्स आल्यावर ती मजा गेली, नंतर माहेरच्या कोकणात फार जाणंही झालं नाही. मला गोष्टीतल्या भूतांचे काही वाटायचं नाही, मी तिथे घाबरायचे प्रत्यक्षातल्या साप, विंचू यांना.
शनिवारी हेअरकट करू नये>>>
शनिवारी हेअरकट करू नये>>> अगदी. एकदा हेअरकटला चालले होते शनिवारची तर शेजाऱ्यांच्या बेबीसिटरला पण खटकले. वीकडेजमधे वेळ कुणाला असतो?
मी मनावर घेत नाही.वेळ असतो,
मी मनावर घेत नाही.वेळ असतो, केस नीट शाम्पू झाले तेव्हा करून टाकते, एक दोन वेळा सणाला पण केलाय.
माझी आई शनिवारी तेल, मीठ,
माझी आई शनिवारी तेल, मीठ, लोखंड, चपला, साबण घ्यायचा नाही सांगायची, मी करते अजून हे. सरप्राईजिंगली ती शनिवारी केस कापा म्हणून सांगायची, त्याला आमच्याकडे शनिवार चालायचा त्यामुळे मी हेही फॉलो करते. समहाऊ मी घाबरट असल्याने, बिनधास्तपणा नाही. बहीणही माझ्याचसारखी आहे. भाऊ मात्र हे काही मानत नाही. नवराही नाही पण मी मात्र ठाम राहते की शनिवारी ह्या वस्तु घरात येता कामा नये. त्यामुळे मला online घ्यायला आवडत नाही. एकदा बुक केलेला निर्लेप तवा शनिवारीच आला, मला तो त्या दिवशी यायला नको होता.
केस कापण्याचा हा वार, नखे
केस कापण्याचा हा वार, नखे कापण्याचा तो वार, रात्रीची नखे कापू नयेत वगैरे वगैरे पूर्वी (लहानपणी) खूप पाळले जायचे. फार पगडा होता मनावर. जसजसे कळत गेले तसतसे या पगड्यातून बाहेर आलो. बरेचजण आले. आजकाल कोण पाळतंय इतकं सगळं?
परवा फेसबुकवर कुणी पोस्ट टाकलेली की "आंबे पाहून तोंडाला पाणी सुटत आहे. पण काय करणार? अजून अक्षय तृतीय झाली नाही"
मी विचारले आंबे खाण्याचा आणि अक्षय तृतीयेचा काय संबंध?
तर मलाच सुनावले त्यांनी, "महाराष्ट्रातच राहताय ना? आपली परंपरा आहे अक्षय तृतीयेनंतरच आंबे खायचे असतात"
माहितीच नाही. इकडं आमचे चार डझन खाऊन झाले
अय्यो आमचे आता डझन पेक्षा
अय्यो आमचे आता डझन पेक्षा जास्त खाऊन झाले.
बहुतेक 'अक्षय्यतृतीयेनंतरच खा' हे सामान्यांच्या भाषेत 'नीट सिझन येऊ दे, उकाडा वाढू दे, किमती घटू दे मग खा' असेल.आता एनिवे उकाडा एप्रिल मध्येच पूर्वीच्या मे च्या तोडीचा वाढत असल्याने नॉट ऍप्लिकेबल.
तसे नाही. मी जरा गुगलून
तसे नाही. मी जरा गुगलून बघितले नंतर तेंव्हा कळले की काही ठिकाणी आंबे अक्षय्य तृतीयेला पितरांना आधी दाखवून मगच खायला घेतात
आपली परंपरा आहे अक्षय
आपली परंपरा आहे अक्षय तृतीयेनंतरच आंबे खायचे असतात" >>> हे मीही हल्लीच काही वर्षांपुर्वी ऐकलं, तुम्ही वर लिहीलं तसं काही ठीकाणी अक्षयतृतियेला पितरांना नैवेद्य दाखवतात आणि नंतर खातात . आम्ही कोकणातले, आंबे पिकले की लगेच खायचे एवढं माहीती. सिझन सुरु झाला की आंबा खायला सुरुवात करायची. तसंही आमच्याकडे अक्षयतृतियेला पितरांचं वगैरे करायची प्रथा नाहीये(कोकणात काही ठीकाणी आहे का तेही माहीती नाहीये पण आमच्याकडे तरी नाहीये), आमच्याकडे पितृपक्षात करतात आणि तेव्हा आंबे सिझन नसतो त्यामुळे आंबे वगैरे त्यांना दाखवायचं असं नाहीये आमच्याकडे.
माझी आई शनिवारी तेल, मीठ,
माझी आई शनिवारी तेल, मीठ, लोखंड, चपला, साबण घ्यायचा नाही सांगायची >>>
माझी आई तेल, मीठ एकत्र आणू देत नाही. या गोष्टी शनिवारी आणू देत नाही. अंधश्रद्धाच आहे पण सहजशक्य (कोपऱ्यावर वाणी/ब्लिंकइट/इंस्टामार्ट)आहे म्हणून मी अजूनही फारसा लोड न घेता या गोष्टी सेपरेट आणवते. पुढच्या पिढीत या समजुती प्रपोगेट करणार नाही.
अक्षय्यतृतीया आणि आंबे हे
अक्षय्यतृतीया आणि आंबे हे पहिल्यांदा ऐकत आहे. पाऊस पडला की काही जण खात नाहीत हे माहीत होते. पण तो ही मेला हल्ली कधीही पडतो.
अंधश्रद्धाच आहे पण सहजशक्य
अंधश्रद्धाच आहे पण सहजशक्य आहे म्हणून >>> हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. सहजशक्य आहे तर जमेल तसे पाळूया. म्हणून बरेच गोष्टी फॉलो केल्या जातात. गैरसोयीचे होते तेव्हा आजच्या काळात कोण एवढे पाळते म्हणत निकालात काढले जाते.
माझी आई मला एखादा श्रद्धाळू उपाय सांगते तेव्हाही असेच म्हणते, नाही तुझा विश्वास ना की याचा काही फायदा होईल, पण नुकसान तर नाही ना होत, तर मग करून बघायला काय हरकत आहे.
नखं आणि केस कापायचे वार आहेत
नखं आणि केस कापायचे वार आहेत तसे मांसाहार न करण्याचे सुद्धा वार आहेत. एक रविवार सोडला तर प्रत्येकजण आपल्या सोयीने हे वार पाळतो. आणि हे घड्याळाचा काटा बाराला जातोय की नाही हे बघत इतके काटेकोरपणे केले जाते की पाच मिनिटे अलीकडे पलीकडे झाले की धर्म भ्रष्ट झालाच म्हणून समजा.
एक मांसाहार प्रेमी म्हणून मला हे वार पाळणे कधीच पटत नाही. जर मांसाहार करणे गैर आहे तर ते प्रत्येक वाराला गैर आहे, जर ते गैर नाही तर ते कुठल्याच वाराला गैर नाही.
त्यामुळे सर्व मांसाहारप्रेमींना सांगावेसे वाटते की मांसाहाराबाबत असे देवाचे वार पाळून, आणि त्याचा संबंध पाप पुण्याशी जोडून तुम्ही स्वतःच खात असलेल्या अन्नाला अपवित्र ठरवत आहात. त्यावर नकळत तसा शिक्का मारत आहात.
आमच्या शेतावरचे आंबे तसेही
आमच्या शेतावरचे आंबे तसेही उशीरा म्हणजे मे अखेरीला येतात. त्यामुळे मला अक्षय तृतीये नंतर खाणं ही कल्पना आवडते. पण पाऊस पडल्यावर खाणे ही कल्पना आवडत नाही!!
शेवटी ' बिझनेस इज बिझनेस'!!
आंबे जेव्हा मिळतील, परवडतील,
आंबे जेव्हा मिळतील, परवडतील, मस्त गोड लागतील तेव्हा नक्की खावे
अक्षय्यतृतीया आणि हा पितरांचा संदर्भ पहिल्यांदा ऐकला.
महाराष्ट्रात/मराठी घरात पाळल्या जाणाऱ्या रुढीत काहीतरी (मॅकडी बर्गर सारखे) प्रमाणीकरण असावे,म्हणजे योग्य प्रकारे सर्व डॉक्युमेंटेशन होईल.
अतृ आणि आंबे माझ्या सासरीही
अतृ आणि आंबे माझ्या सासरीही पाळतात
तसंच कैरी सुद्धा गुढीपाडव्याच्या आधी आणत नाहीत
माझ्या माहेरी ( डहाणू तालुका)
माझ्या माहेरी ( डहाणू तालुका) हनुमान जयंतीला आंबेपूजन ( कैऱ्यांची पूजा) होते. कैऱ्या बहुतेक स्वतःच्या शेतातल्या असतात. रानचाफ्याच्या पांढऱ्या फुलांना ह्या पूजेत मानाचे स्थान असते. त्यानंतरच आंबे / कैऱ्या खाल्ल्या जातात. त्यादिवशी घरातल्या कुलदैवताची पूजा करतात. त्याला ' घर जत्रा' म्हणतात. त्या दिवशी खास कैरी आणि कोलंबीची ( हि कोलंबी शक्यतो खाडीची असते.. एकदम ताजी असते.) भाजी केली जाते. नवीन लग्न झालेलं असेल ज्या घरात तिथे कुलदैवताची पूजा मोठ्या उत्साहात पार पडते. त्या दिवशी शेतातल्या दैवताची पूजा होते. बहुतेक शेतात एकाद्या झाडाखाली शेताचा देव ( राखणदार) असतोच.
केशवकूल , तुम्ही वर लिहिले आहे तसंच आमच्याकडे पण आहे. ' भुजंग' शेतातील राखणदार असतो. त्याची पूजा केली नाही तर तो दर्शन देतो.. असं म्हणतात.. मग त्याच्या नावाने नारळ फोडून शेतीची कामे सुरू करतात. आमच्याकडे कोंबडा वैगरे बळी देण्याची प्रथा नाही.
कोणे एके काळी आंबा अ तृ च्या
कोणे एके काळी आंबा अ तृ च्या सुमारास मिळायचा. तेव्हा संशोधीत जाती, केमिचल्स वगैरे काही नव्हते. आंबा इतर फळांसारखाच एक नॉर्मल प्रकार होता, हाइप झाला नव्हता. अ तृ च्या सुमारास पिकायला लागायचा म्हणुन अ तृ ला नवं करायची म्हणजे पहिल्यांदा उष्टावायची पद्धत् पडली असावी. आता आंबा डिसेंबरपासुन मिळतो, कोण थांबेल अ तृ पर्यंत.
फणस पण बाजारात फक्त वट सावित्रीला दिसायचा. आता फेब्रुवारीपासुन दिसायला लागतो.
अ तृ च्या सुमारास पिकायला
अ तृ च्या सुमारास पिकायला लागायचा म्हणुन अ तृ ला नवं करायची म्हणजे पहिल्यांदा उष्टावायची पद्धत् पडली असावी. >>>>१००%
साधना, "नवं करणं" हे खूप खूप
साधना, "नवं करणं" हे खूप खूप वर्षांनी वाचलं.. बरं वाटलं! कोकण स्पेशल म्हणून असेल पण हा शब्द आणि अर्थ अनेकांना माहिती नाही.
लहानपणी एक अफवा ऐकली होती की
लहानपणी एक अफवा ऐकली होती की काही वर्षांनी घरात अशी व्यक्ती येईल जी सगळ ऐकेल. पुढे लग्न झाले आणि घरात बायको आली, पण ती माझे बिल्कुल ऐकत नाही आणि अफवा अफवाच ठरली. काही वर्षांपूर्वी घरात अलेक्सा आली आणि आता ती सगळ्यांचे ऐकते (आणि चोवीस तास ऐकतच असते), त्यामुळे अफवा खोटी ठरली.
Pages