Submitted by ब्लू कोलंबसे on 28 April, 2024 - 10:47
आज संध्याकाळी रस्त्याने चालताना आमच्या फेवरेट ' भट ' साहेबांच्या ' राज ' या ' अति भयंकर ' शिणेमातले ' आपके प्यार में, हम सवरने लगे' हे दर्दभरे गाणे कानी पडले अन् मन थेट 23 वर्षे मागे गेले.
त्यावेळी आमच्या गावात या चित्रपटासोबत एक ' अफवा ' पण रिलीज झाली होती.
जो माणूस हा चित्रपट रात्रीचा 9.30चा शो एकटा पाहील, त्याला 1 लाख रुपये इनाम मिळेल.
..... आणि
एका माणसाने रात्री तसा तो शो पाहिलाही, अन् त्याला ते 1 लाख रुपये मिळालेही, मात्र ते घ्यायला तो जिवंत नव्हता....!
आमच्या शाळेत (त्याकाळी इंटरनेट नसूनही) या आणि अशा अनेक अफवा पसरायच्या.
तुमच्याही आठवणीत असलेल्या अशा अफवा वाचण्यासाठी हा धागा...
(Just चंमतग :P)
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
श्रीदेवीचे नाक प्लास्टिक चे
श्रीदेवीचे नाक प्लास्टिक चे आहे.... शब्दशः नसली तरी अगदीच अफवा कुठेय ही?
चकण्या माणसा कडे जास्त वेळ बघितल्यास बघणारा पण चकणा होतो
काहीही होतं ते..
मामांचा १ कम्पाऊंडर होता तिरळा, तो आला की पळून जायचो.
गणपती दूध पितो
गणपती दूध पितो
मुख्यमंत्री मनोहर जोशी होते तेव्हा.
नंतर capillary action surface tension ह्या terminology आल्या छापून.
Btw ज्याची दहावी 96 ला झाली असे व्यक्ती फार लहान नव्हते ह्या अफवे वेळी.
लोकं साईबाबांच्या नावाने चमत्कार लिहिलेले पत्रक छापायचे. तुम्ही छापा आणि वाटा नाहीतर तुमचे नुकसान होणार type धमकी असलेले. आणि ज्यांनी छापून वाटले त्यानं धनलाभ, पुत्र प्राप्ती, धंदा उत्तम चालणे type आशिर्वाद मिळालेले
नंतर लोकं म्हणायचे प्रिंटिंग प्रेस वाल्याची strategy असणार ही.
कोपुत जोतिबा डोंगराच्या पायथ्याला एक गाव आहे, तिथे डोळ्यात औषध घालणारे अचानकपणे फेमस झालेले.
Mouth पब्लिसिटी. चष्मा जातो त्याने अशी अफवा पसरलेली. इतके फेमस झाले होते की पुढारी सारख्या वर्तमानपत्र मध्ये छापून आलेले, लोकं गावातून ट्रॅक्स सारख्या गाड्या करून जायचे तिथे.
लोकं साईबाबांच्या नावाने
लोकं साईबाबांच्या नावाने चमत्कार लिहिलेले पत्रक छापायचे. >> या पत्राचे सो.मी. अवतार अजूनही फिरत आहेत.
श्रीदेवीचे नाक प्लास्टिक चे
श्रीदेवीचे नाक प्लास्टिक चे आहे.... शब्दशः नसली तरी अगदीच अफवा कुठेय ही? >>>>
मला तेव्हा शब्दश: वाटायचे. म्हणजे एखाद्या बाहुल्याचे नाक कापून तिला चिटकवले आहे असे.
पॉपसिकल्स गटरच्या पाण्याचे
पॉपसिकल्स गटरच्या पाण्याचे बनवलेले असतात.
कुल्फी वर मीठ टाकले तर त्यातून आळ्या बाहेर येतात.
पैसा (नावाचा कॉपर कलर insect) काडेपेटी मधे ठेवला की त्याचे पैसे (नाणे) तयार होते.
सुपारी किंवा चिंचोके खाल्ले की पोटात जळमटं सदृश काही तयार होतं, जे फक्त सर्जरीने बाहेर काढावं लागतं.
खरं बोललं की पुण्य आणि खोटं
खरं बोललं की पुण्य आणि खोटं बोललं की पाप लागतं.
अनुभवाने माणुस शहाणा होतो.
(शालेय) शिक्षणाने अज्ञान दूर होते.
पोलीस गुन्हेगारांना पकडतात.
वरच्या बऱ्याचश्या अफवाना मम !
वरच्या बऱ्याचश्या अफवाना मम !! पण या आता अंधश्रद्धा ट्रॅक वर जाणार आहेत ..
पेन्सिल चे फुलपाखरू, कोणाच्या हाताखालून एकदा गेलो तर बुटके होतो हे तर अगदी अगदी ! ते चतुर उडतात ना.. आपण त्याच्या शेपटीला दोरा बांधून उडवायचो काहीजण त्याला भिंगरी/ सुई म्हातारी म्हणतात त्या चतुरांची मुंडकी मातीत पेरली की नंतर त्याचे पैसे होतात असे आमच्याकडे होते.
चतुरांची मुंडकी मातीत पेरली
चतुरांची मुंडकी मातीत पेरली की नंतर त्याचे पैसे होतात असे आमच्याकडे होते. >>> बाप रे.. हे नरबळी सारखे डेंजर आहे.
कोणाच्या हाताखालून एकदा गेलो
कोणाच्या हाताखालून एकदा गेलो तर बुटके होतो हे तर अगदी अगदी !
>>>>
आमच्याकडे ढेंग्याखालून होते.
आणि यावर उपाय म्हणून पुन्हा उलट दिशेने जायचे..
उल्टे फेरे मारले कि सात
उल्टे फेरे मारले कि सात जन्माचं कंत्राट रद्द
मानव पृथ्वीकर>>>+१
मानव पृथ्वीकर>>>+१
+१ वरून आठवले, 786 नंबर
+१ वरून आठवले, 786 नंबर असलेली नोट पाकिटात असली की पाकीट कधी रिकामे होत नाही.
कसे होणार.. ती एक नोट असणारच ना.. असे विनोद नको.
डोक्यावर डोकं एकदा आपटलं तर
डोक्यावर डोकं एकदा आपटलं / टक्कर झाली तर डोक्यातून झाड येतं. ते येऊ नये म्हणून आणखी एकदा डोकी आपटवायची
अरे हो बरोबर, ते आईस्क्रीम वर
अरे हो बरोबर, ते आईस्क्रीम वर मीठ टाकून अळ्या वालं ऐकलं होतं.भारतीय हवामानात त्यांच्या थर्मोकोल फ्रिज मध्ये ठेवलेली आईस्क्रीम घेऊन उन्हात फिरणे, ही अळ्या वाली केस कोणी करून पाहिलेली खरी असेलही दुधात अळ्या होऊन.
खुर्चीवर बसून पाय हलवत राहिल्यास आईबाप मरतात ही एक डेंजर घाबरवणारी अफवा होती.सारखे पाय हलवताना बघून इरिटेट झाल्यावर कोणा आईबापानेच काढली असेल.
मातीत किंवा रेतीत रेघ उमटलेली
मातीत किंवा रेतीत रेघ उमटलेली असेल आणि ती ओलांडून गेलं की आई मरते
, आस्तिक नास्तिक कालभैरव लिहिलं की ते वाचून साप नाग घरात येत नाहीत. , कडक लक्ष्मी छोट्या पोरांना घेऊन जाते आणि चाबकाचे फटके देते, लाल कलर च्या उदबत्तीत माणसाचं रक्त घालून ती केली जाते
पान पराग खाल्ल की तात्काळ
पान पराग खाल्ल की तात्काळ मध्ये जीव जातो,
मटक्याच्या कुल्फीत आणि मेवाड आईस क्रिम मध्ये अळ्या असतात
जेवताना आळस दिला की पुढच्या
जेवताना आळस दिला की पुढच्या जन्मी गाढव व्हायला होत.
शनिवारी फुटाणे, चणे खाल्ले की पुढच्या जन्मी घोडा व्हायला होत.
मग शनिवारी जेवणात फरसाण item म्हणून चणे घेतले आणि ते खाताना आळस दिला तर खेचर व्हायला होईल का पुढच्या जन्मी?
आजीला विचारली पाहिजे ही शंका
पान पराग खाल्ल की तात्काळ
पान पराग खाल्ल की तात्काळ मध्ये जीव जातो.>>
आमच्या लहानपणी वेटींग मध्ये जीव जातो असे म्हणत.
तेव्हा तात्काळ मध्ये सुरू झाले नव्हते बुकिंग.
बॉबी खाऊ नयेत बाहेर दुकानात
बॉबी खाऊ नयेत बाहेर दुकानात मिळणाऱ्या त्यात पाल बसलेली असते
इथे शेजारच्या लहान मुलांशी
इथे शेजारच्या लहान मुलांशी माझी चांगलीच गट्टी आहे, मीही अफवा पसरवतो, चीरिओ परसदारात पुरले तर त्याचे झाड येते व त्याला डोनट्स लागतात. एका माबो गटग मध्ये एका सदस्याच्या लहान मुलीलाही सांगितली होती ही युक्ती !
पेन्सिलला टोक केल्यावर
पेन्सिलला टोक केल्यावर राहिलेला कचरा दुधात टाकला की खोड्रबर तयार होतो. म्हणून बरीच पेन्सिल तासली होती. दूध मागायची हिम्मत काही झाली नाही. Wink >>> हे मी केलं होतं. रोज डबी उघडून बघत असे. चार दिवसांनी डबी फेकून दिली मातेने.
@पान पराग, मला ती बारातीयो का
@पान पराग, मला ती बारातीयो का स्वागत वाली जाहिरात बघून खूप खायची इच्छा व्हायची पान पराग पण आमचं कुठल्या ही लग्नात असं पान पराग स्वागत झालं नव्हतं म्हणून मी नंतर हट्ट करायचे मला पान पराग हवं म्हणून तेव्हा मला हे तात्काळ चं सांगण्यात आलं
पान पराग राहिलंच खायचं मग, आता बकेट लिस्टीत तळाशी गेलं पार ते आणि आता मिळतही नसेल
अफवा नाही, पण विज्ञान पुस्तक
अफवा नाही, पण विज्ञान पुस्तक वाचून 'अरुंद तोंडाच्या बाटलीत राहणारं अंडं' बनवायचा प्रयत्न केला होता. व्हिनेगर मध्ये काही दिवस बुडवून ते बिलबिलीत होतं(अंड्याची सिरीयल किलर स्टाईल ब्राईड्स इन द बाथ' हत्या ही), आणि मग ते वाकून दाबून बाटलीत घालता येतं, मग बाटलीत पाणी ओतलं की कडक होऊन पूर्वीसारखं दिसतं. अगायाया..बहुधा कमी दिवस बुडवलं असावं. बाटलीच्या तोंडावर दाबल्यावर पच्याक करून फुटलं.फार वेळ लागला एकंदर स्वच्छतेला.तशीच ती मोरचुदाची फुलझाडं पण फार डोक्याला ताप आहेत.
बॉबी खाऊ नयेत बाहेर दुकानात
बॉबी खाऊ नयेत बाहेर दुकानात मिळणाऱ्या त्यात पाल बसलेली असते >>>> हे आम्हालाही सांगायचे. वर पाल खाल्ल्यामुळे मेलेल्या कुठल्यातरी इमॅजिनरी मुलाची गोष्टही सांगायचे.
आमच्या लहानपणी एक विचित्र
आमच्या लहानपणी एक विचित्र अफवा ऐकली होती की म्हणे एका यंग मुलीला एका नागाने विळखा घालून पकडून ठेवलं आहे कारण त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे. तो नाग कुणालाही आसपास पण फिरकु देत नाही. ही अफवा मला वर्गातल्या एका मुली कडून ऐकायला मिळाली होती वर ती हे पण म्हणाली की तिच्या कोणी नातेवाईक crime scene वर जाऊन बघून आलेत हा सीन.
मोठा काळा भुंगा जवळ आला की
मोठा काळा भुंगा जवळ आला की हाताचा अंगठा आत दाबून मुठी जोरात दाबायच्या मग तो दूर जातो .. नाहीतर कानात जातो.
क्रिकेट मध्ये 'भारताने रबर
क्रिकेट मध्ये 'भारताने रबर जिंकले' अशी बातमी येत असे. जिंकणर्या टीम ला सोन्याचे खोडरबर मिळते !
'नाईट वॉचमन' : रात्री तो पीचवरच पहारा देत झोपरण, दुसर्य टीम ने पीच वर खोदकाम करू नये !
नाईट वॉचमन वाली अफवा भारी...
नाईट वॉचमन वाली अफवा भारी...@vijaykulkarni हसून हसून लोळलो!
हाकामारीची वेगवेगळी वर्जन
हाकामारीची वेगवेगळी वर्जन असावीत सगळीकडे! ती पण सांगा लोकहो!
अरुंद तोंडाच्या बाटलीत
अरुंद तोंडाच्या बाटलीत राहणारं अंडं' बनवायचा प्रयत्न केला होता. व्हिनेगर मध्ये काही दिवस बुडवून ते बिलबिलीत होतं
>> ही अफवा नाही.
आम्ही अंड व्हिनेगर मध्ये 4 दिवस ठेवलेलं - ते पारदर्शक आणि बाऊंसी झालेलं.. वरच कवच मऊ.. eventually फुटलं.
कवचावर विनेगरचा परिणाम...
Pages