Submitted by ब्लू कोलंबसे on 28 April, 2024 - 10:47
आज संध्याकाळी रस्त्याने चालताना आमच्या फेवरेट ' भट ' साहेबांच्या ' राज ' या ' अति भयंकर ' शिणेमातले ' आपके प्यार में, हम सवरने लगे' हे दर्दभरे गाणे कानी पडले अन् मन थेट 23 वर्षे मागे गेले.
त्यावेळी आमच्या गावात या चित्रपटासोबत एक ' अफवा ' पण रिलीज झाली होती.
जो माणूस हा चित्रपट रात्रीचा 9.30चा शो एकटा पाहील, त्याला 1 लाख रुपये इनाम मिळेल.
..... आणि
एका माणसाने रात्री तसा तो शो पाहिलाही, अन् त्याला ते 1 लाख रुपये मिळालेही, मात्र ते घ्यायला तो जिवंत नव्हता....!
आमच्या शाळेत (त्याकाळी इंटरनेट नसूनही) या आणि अशा अनेक अफवा पसरायच्या.
तुमच्याही आठवणीत असलेल्या अशा अफवा वाचण्यासाठी हा धागा...
(Just चंमतग :P)
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अजुन एक भारी गम्मत म्हणजे
अजुन एक भारी गम्मत म्हणजे दोन जण सेम गोष्ट एकत्र बोलले तर त्या शब्दाची अक्षरं मोजायची.... समजा ५ अक्षरं आली तर इन्ग्लिश अल्फाबेट्स मोजायची ५ वं अल्फाबेट ई आहे म्हणजे त्या नावाची कोणितरी कॉमन व्यक्ती आपलि आठवण काढते आहे. असं गणित होतं.
अजुन एक मज्जा म्हणजे
अजुन एक मज्जा म्हणजे आपल्याला आवडणारी मुलगी/ किंवा मुलगा. असेल तर त्याचं नाव लिहून त्याच्याखाली रेष मारून आपलं नाव लिहायचं.
सगळि कॉमन अक्षरं गाळायची... म्हणजे ई/आय्/ए - हि काढली कि उरलेली अक्षरं मोजायची.
एका बाजुला एम एल एस एफ इ असं लिहायचं. मग ती अक्षर संख्या ३ असलं तर तिसरं अक्षर एस खोडायचं, त्याच्या पुढच्या अक्षरापासून पुन्हा ३ मोजून जे येईल ते खोडायचं असं करत शेवटी उरेल ते रिलेशनशिप स्टेटस,
एम म्हणजे मॅरेज, एल म्हणजे लव्ह, एस म्हणजे सिस्टर, एफ म्हणजे फ्रेंड आणि इ म्हणजे एनिमी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
भारद्वाज पक्षी दिसला की दिवस
...
अजून एक भन्नाट थिअरी:
अजून एक भन्नाट थिअरी: चेहऱ्यावर जितके मोठे(लाल झालेले, पिकलेले) ऍकने येतात त्या संख्येत आपल्यावर प्रेम करणारे कोणीतरी आपल्याला माहीत नसलेले आजूबाजूला असतात.मी नोकरीत पण ऍकने आले की आजूबाजूला अविवाहित उमेदवार असतील त्यापैकी कोण बरं वाला खेळ मनात खेळायचे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Ewww advanced acne will
Ewww advanced acne will reduce a girls desirability if anything. Treatment is available though.
म्हणूनच तो ऍकने आरश्यात बघून
म्हणूनच तो ऍकने आरश्यात बघून उदास वाटू नये म्हणून कोणीतरी ही थिअरी काढली असावी.
कुणाच्या केसांवरून>> म्हणजे
कुणाच्या केसांवरून>> म्हणजे कुणाला गोड खायला मिळतं हे तुम्हाला माहीत आहे तर. मला ते पण नाही माहीत.
भन्नाट/इंटरेस्टिंग प्रतिसाद
भन्नाट/इंटरेस्टिंग प्रतिसाद एकेक
अंडे+व्हिनेगर हे ऐकले नव्हते. गुगलून बघतो.
हे काही माझ्या आठवणींच्या पोतडीतून:
अफवा:
१. मुले पळवणारी टोळी आली आहे, पकडून धरणात गाडायला नेतात
२. १९९९ मध्ये जगबुडी येणार आहे
३. एक मंत्री वारले तेंव्हा गावात मुलांनी फटाके फोडलेले. कारण ह्याच मंत्र्यांनी दहावीच्या बोर्डचे पेपर अवघड सेट करायला सांगितले होते म्हणून बरेच जण नापास झाले अशी अफवा
अपसमज:
१. निळावंती पुस्तक वाचले की वेड लागते/मृत्यू येतो
२. पाण्यात (रस्त्याकडेच्या वगैरे) सुसू केली की आई आजारी पडते
३. बेडकाला मारले की वाचा जाते
४. वीस नखांचे (म्हणजे प्रत्येक पायाला पाच नखे) कुत्र्याचे पिलू पाळू नये, त्याचे दात विषारी असतात
निळावंती अफवांबद्दल ऐकले आहे.
निळावंती अफवांबद्दल ऐकले आहे.
कलेक्टर पदाच्या मुलाखती साठी
कलेक्टर पदाच्या मुलाखती साठी म्हणे एक उमेदवार खूप तयारी करून गेला होता. तर त्याला विचारलेले म्हणे, "तू ज्या जिन्याने आलास त्याच्या पायऱ्या किती?" याला नक्की सांगता आले नाही म्हणून रिजेक्ट केले. का? तर त्याला म्हणाले की "तुला (लेका) तुझ्याच ऑफीसच्या पायऱ्या किती हे माहीत नाही तर तुला जिल्ह्यातील माहिती कशी असेल?" असे बोलून त्याला हाकलून दिले म्हणे.
असा किस्सा सांगून सांगणाऱ्या त्या मोठ्या व्यक्तीने आम्हा मुलांना उपदेश केला होता की "अधिकारी व्हायचे असेल तर तुम्ही आजूबाजूला बारीकसारीक गोष्टीचे निरीक्षण करत रहा. असेच प्रश्न विचारले जातात"
म्हणजे, काSSSहीही पसरवायचे का? काय त्याला जरा तरी सेन्स?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आज आठवते तेंव्हा प्रचंड हसायला येते. वाटते मला जर कोणी इंटरव्ह्यूला हा प्रश्न विचारला असता तर माझे उत्तर असते,
"जिन्याच्या पायऱ्या मोजत यायला काय येडाबीडा हाये का मी?"
मी टीटोटल्रर आहे, पण पायर्
मी टीटोटल्रर आहे, पण पायर्याटोटलर नाही असे सांगायचे.
मस्त धागा आणि धमाल आठवणी.
मस्त धागा आणि धमाल आठवणी.
मी लहान म्हणजे ५/६ वीत असताना "आशिकी" चित्रपट आला होता (का येऊ घातला होता). त्याची गाणी चित्रहार मध्ये सतत लागायची. तर ह्या चित्रपटाबद्दल एक अफवा आमच्या म्हणजे समवयस्क मुलींच्या वर्तुळात पसरली होती की ह्या चित्रपटाचा शेवट नायक आणि नायिका एकमेकांचे खुप लहानपणी ताटातूट झालेले भाउ - बहिण असतात.
इतक्या लहान वयात देखील एवढे पैसे खर्च करून चित्रपट बनवायचा आणि त्याचा असा शेवट करायचा हे काही तर्कशुद्ध वाटत नव्हते. मग हिरिरिने चर्चा व्हायच्या अमुक तमुक च्या मैत्रीणी ची दुरची (दुसर्या शाळेत किंवा गावात रहायला असणारी) बहिण आहे तिने सांगितले अश्या काल्पनिक साक्षी प्रस्तुत केल्या जायच्या. एकाच गावात रहाणाऱ्या पण दुरच्या शाळेत जाणाऱ्या माझ्या मामेबहिणींनी सांगितले होते की त्यांच्या शाळेत पण हीच बातमी "ट्रेडिंग" आहे.
आम्ही सगळ्याच खुप लहान असल्याने आम्हाला चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहाण्याची परवानगी मिळणे अशक्य होते आणि नुकताच आलेला चित्रपट टिव्ही वर लागण्याची शक्यता पण शुन्य होती. चित्रपट पहाण्याची आम्हाला फार काही पडलेली नव्हती, पण बातमी खरी आहे की नाही हे कसं कळावे ही आमची मुख्य विवंचना होती.
शेवटी एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी एकत्र जमलो असताना आमची मोठ्या मावस बहीणिने (ही काॅलेज मध्ये होती आणि अर्थातच तिला आमच्या तुलनेत जास्त स्वातंत्र्य होते) , सांगितले की मी (म्हणजे तिने) मैत्रिणींबरोबर "आशिकी" बघितला. आम्ही ताबडतोब "हाय अलर्ट" मध्ये तिच्या कडे बघायला लागलो. ही अफवा तिच्या पर्यंत पोहोचली होती त्यामुळे तिलाही आमचा अनुच्चारित प्रश्न लगेच कळला. तिचे पुढचे वाक्य होते," भाऊ बहिण नसतात ते".
ही अफवा कोणी आणि का पसरवली असावी हा प्रश्न आजतागायत मला पडलेला आहे.
गिरगांवातल्या खोताच्या वाडीत
गिरगांवातल्या खोताच्या वाडीत मानकाप्या फिरतो. तो आडवे हात करुन खोताच्या वाडीच्या बोळातून फिरतो. त्याचा हात मानेला लागला की मान कापली जाते.
मग आम्ही सोल्युशन काढले होते... एक तर त्या वाडीतून शॉर्टकट म्हणून जायचेच नाही. गेलं तर तो येताना दिसल्यास खाली वाकून जायचे. आपण छोटे असल्याने त्या अरुंद बोळातून सहज बाजूने जाऊ शकू.
चिमणीची शी एवढी बहुगुणी असते
चिमणीची शी एवढी बहुगुणी असते हे माहीत नव्हतं.>>>>>> अजुन एक गुण ऐकवते …. विंचू चावल्यावर उपचारासाठी आजीकडे लोकं यायची त्याला हात/पाय ज्या अवयवाला चावला असेल तर तो जमिनीवर आपटायला सांगायची तोपर्यंत ती विडा करायची त्या विड्यात…..
कुणाच्या केसांवरून << हपा
कुणाच्या केसांवरून << हपा![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
चिमणीची शी एवढी बहुगुणी असते हे माहीत नव्हतं. << पुन्हा हपा..
मांडा त्रैराशिक : चिमणीची एवढी तर...
विंचू चावल्यावर उपचारासाठी >>
विंचू चावल्यावर उपचारासाठी >>> त्या भागावर किंवा कापलेल्या जखमेवर जवळपास अगदीच काही उपाय नसेल तर शू करायला सांगायचे पूर्वीचे लोक. त्यावरून एक ग्राम्य वाक्प्रचार पण आहे 'कुणाच्या कापल्या करंगळीवर **** पण नाही असा माणूस'.
विड्याच्या पानात ढेकूण घालून
विड्याच्या पानात ढेकूण घालून तो कविळीच्या रुग्णाला खायला द्यायचा. कोपऱ्यावरचे कावीळ उतरवणारे म्हणे तसे करत.![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
ढेकूण
मजेदार धागा हपा
मजेदार धागा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हपा
माबोकरांना कुठ्ठे म्हणुन
माबोकरांना कुठ्ठे म्हणुन न्यायची सोय नाही![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
चिमणी ला ही सोडले नाही
हे सगळं असं करत तेव्हाची मुलं
हे सगळं असं करत तेव्हाची मुलं म्हणून चिमण्या काही वर्षं भूमिगत झाल्या होत्या. सुखाने शी पण करू देईनात त्यांना. शी करायला बसली की मुलं ती गोळा करायला टपून बसत. आताची मुलं असलं काही करत नाहीत म्हणून परत येवू लागल्या.
माझ्याकडे पण चिमण्या येतात आता कुंडीत लावलेला पालक व मेथी खायला. मी त्यांच्यासाठीच लावते ह्या दोन्ही भाज्या. त्यांनी कोवळ्याच खाल्ल्यावर मला काहीही उरत नाही. पण त्या येतात म्हणून लावते त्यांचा खाऊ म्हणून. रिकाम्या (नुसती माती भरलेल्या ) कुंडीत सध्या त्यांचं अंग घुसळवून माती उडवून टाकणे चालू असते. उन्हात थंडावा मिळत असेल. ठेवलेलं पाणी पितात की नाही कळत नाही.
बोल्हाईचे मटण खूप ठिकाणी
बोल्हाईचे मटण खूप ठिकाणी वाचले होते पण असंच वाटायचं कोणता तरी प्राणी असेल. आज कळलं नक्की काय ते.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
माबोमुळे ज्ञानात भर पडते ती अशी
ह्यातल्या खूप गोष्टी ज्यांना
ह्यातल्या खूप गोष्टी ज्यांना अंधश्रद्धा म्हणतात त्या अजूनही करते. तीन तिघाडा काम बिघाडा मानते. तरी बाबांनी सांगितलं होतं की दत्तगुरु तीन देव आहेत, 3 आकडा वाईट नाही.
मी लहान असताना संतोषीमातेच्या नावाने पत्र घरी यायची ते आठवतं. चाळीतल्या बऱ्याच जणींनी ते व्रत केलेलं. आईने जय संतोषी मा पिक्चर बघायला नेलेले, त्यातलं फक्त मदद करो संतोषी मा हे गाणं, त्या कानन कौशलला छळणाऱ्या जावा, ती करवंटीत प्यायला पाणी मागते हे आठवतंय.
बोलाई म्हणजे मेंढीचं मटण.
बोलाई म्हणजे मेंढीचं मटण.
घाटावरती बरेच जण माळकरी असतात. ते बोकडाचे मटण खात नाहीत.. त्याला पर्याय म्हणजे मेंढी, म्हणजे बोलाई..
असं ऐकीवात आहे..
हो. सहावी का सातवीत, ती पत्रे
हो. सहावी का सातवीत, ती पत्रे माझ्याकडेही यायची. एक मैत्रीण व तिच्या तीन बहिणी मला भारंभार निनावी chain letters पाठवायच्या त्यात संतोषी मातेचा जप करा आणि तुम्ही सोळा जणींना पुढे पाठवा नाही तर तुमचं तळपट का काही तरी होईल आणि पाठवले तर चांगली बातमी असं आऊटपुट होते. मी कन्फ्रंट केले तर 'आम्ही नाही त्या' म्हणाल्या पण मला मैत्रिणीचं अक्षर ओळखू आलं आणि मी गठ्ठा उचलून तिला परत दिला आणि 'होऊनच जाऊ दे तळपट' म्हटलं.
त्यांना भिती वाटू लागली की परत केलेल्या पत्रासारखे काही तरी बूमरॅन्ग शाप टाईप लागेल त्यांनाच, मग मला त्यांनी यादीतून कटाप केलं.
हो तेच ना, आता नवीन अवतार वर
हो तेच ना, काहीही लिहीलेलं असायचं. तू भारी केलंस. आता नवीन अवतार वर कोणीतरी उल्लेख केलाय तसे फॉरवर्ड मेसेज असतात वेगळे, अमुक जणांना पाठवा. मी दुर्लक्ष करते.
मला कोणी असा दहा जणांना
मला कोणी असा दहा जणांना पाठवायचा मेसेज पाठवला तर मी त्यांनाच दहा वेळा पाठवायचो.. पुन्हा कधी यायचा नाही.. हल्ली गेले वाटते हे फॅड
मला कोणी असा दहा जणांना
मला कोणी असा दहा जणांना पाठवायचा मेसेज पाठवला तर मी त्यांनाच दहा वेळा पाठवायचो >> आणि मग ९ वेळा डुप्रकाटा लिहायचं.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
एकदम ताजी ताजी अफवा. आत्ताच
एकदम ताजी ताजी अफवा. आत्ताच बारक्याकडून समजली.
मला सांगतो, बाबा, डू यू नो! टाको बेल गिव्हज डायरिया!
अशा अफवा पसरायचे अव्याहत चालू आहे समजल्यावर धन्यधन्य वाटलं.
ती अफवा खरी आहे. टा बे चे
ती अफवा खरी आहे. टा बे चे तिखटजाळ सॅास खाल्ले कि ढंडाळी लागते![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Oh,बोल्हाईच मटण आणि कडकनाथ
Oh,बोल्हाईच मटण आणि कडकनाथ कोंबडा या पाट्यानी ऊत आणला होता मध्ये. बर अर्थ पण माहित नसल्याने अजून irritate व्हायचं. आत्ता कळालं काय असत बोल्हाई.
सळक भरली की पायाळू व्यक्ती कडून पाय लावून घेतला की सळक उतरते अशी अफवा होती. आमच्या वाड्यात एक पोरग होत पायाळू त्याची आई सांगायची कौतुकाने खरं खोटं देव जाणे
Pages