तुमच्या बालपणीच्या ' बाळबोध ' अंधश्रद्धा / अफवा कोणत्या आहेत?

Submitted by ब्लू कोलंबसे on 28 April, 2024 - 10:47

आज संध्याकाळी रस्त्याने चालताना आमच्या फेवरेट ' भट ' साहेबांच्या ' राज ' या ' अति भयंकर ' शिणेमातले ' आपके प्यार में, हम सवरने लगे' हे दर्दभरे गाणे कानी पडले अन् मन थेट 23 वर्षे मागे गेले.

त्यावेळी आमच्या गावात या चित्रपटासोबत एक ' अफवा ' पण रिलीज झाली होती.

जो माणूस हा चित्रपट रात्रीचा 9.30चा शो एकटा पाहील, त्याला 1 लाख रुपये इनाम मिळेल.

..... आणि

एका माणसाने रात्री तसा तो शो पाहिलाही, अन् त्याला ते 1 लाख रुपये मिळालेही, मात्र ते घ्यायला तो जिवंत नव्हता....!

आमच्या शाळेत (त्याकाळी इंटरनेट नसूनही) या आणि अशा अनेक अफवा पसरायच्या.
तुमच्याही आठवणीत असलेल्या अशा अफवा वाचण्यासाठी हा धागा...

(Just चंमतग :P)

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

अफवा नाही ते माहितीय Happy विज्ञानाच्या पुस्तकात होतं.
चुकीच्या पद्धतीने प्रिमॅच्युअर प्रयोग केल्याने फसल्याने त्या वेळी अफवा वाटली होती.

आमच्याकडे , मुंबईत , ती भुताची फेमस गोष्ट पसरली होती . वसईत , रात्री रिक्शाने जाताना एका बाईने रिक्शावाल्याला काहीतरी विचारले .
त्याने मागे वळून बघितले , म्हणजे १८० अंशात मान वळवून तिच्याशी बोलला , ती बाई हार्ट अटॅक ने गेली तिथल्या तिथे.
गणपती दूध प्यायला लागला ते चांगले आठवतयं , तसच , समुद्राच पाणी गोड झालयं अशी अफवा होती त्यानंतर काही दिवसानी .

दुध प्यायल तर गोरं होत..
चहा प्यायला तर काळ..
बीट खाल्ल तर ओठ गुलाबी होतात.

है आणि अशा अफवा बऱ्याच मोठ्या लोकांनी पसरवल्या होत्या...

पापणी चा केस पालथ्या मुठीवर पकडायचा , डोळे बंद करून इच्छा मनात बोलायची... फुंकर मारून उडवायची... जर पहिल्या फुंकरीला उडाली तर इच्छा पूर्ण होते नाहीतर नाही.

अजून एक
आणि आम्ही चक्क ते ताजं ताजं मिळवून एकदा केलं पण आहे.मेंदी भिजवून(म्हणजे तेव्हा पानं वाटून) त्यात चिमणीचा ताजा ताजा कार्यक्रम टाकून मिसळला तर जास्त रंगते म्हणे.रंगली होती का ते आठवत नाही.

खूप असायच्या ना चिमण्या.आणि त्यांची विधी ची फ्रिक्वेन्सी पण 1 पेक्षा जास्त असेल दिवसात.फार शोधावं लागलं नाही Happy

फार शोधावं लागलं नाही >>> बाप्रे ! म्हणजे केलं ?
काय काय करावं लागतं मुलीच्या जन्माला येऊन. Happy

सर्वांना Lol
एकदाच केलाय हा प्रयोग.तसं आम्ही मेंदीचे प्लास्टिक कोन सारखे कोन घरी बनवून त्यात बागेतली माती भिजवून त्या चिखलाने हातावर मेंदी काढायचे प्रयोग पण केलेत.मैत्रिणीचं सोसायटीच्या कोपऱ्यात असलेलं घर आणि त्याचं बॅकयार्ड, तिथला ओंडका हे असे सर्व रिसोर्स(चिमणी चा विधी पण) मिळायची उत्तम जागा होती.

ही अफवा नाही. यावर शेर पण आहे.
सुर्ख़-रू होता है इंसाँ ठोकरें खाने के बाद
रंग लाती है हिना कार्यक्रम मिलाने के बाद

प्राणी पक्षी निगडित अफवा -पाठमोरा मुंगुस पाहिला आणि मुंगसा मुंगसा तुला रामाची शपथ असं म्हणलं की मुंगुस मागे वळून तोंड दाखवतो शपथ मोडू नये म्हणून (पलट, पलट वाला बॉलीवूड डायलॉग यावरूनच आला असेल का )
भारद्वाज पक्षी दिसला की दिवस चान्गला जातो.
एक साळुंखी दिसली की दिवस वाईट आणि २दिसल्या की आनंदात जातो ( one फॉर sorrow two फॉर जॉय असं काहीतरी म्हणायचो आम्ही ) त्यामुळे एक साळुंखी दिसली की आम्ही दुःखी दिवसाला सुखी करायला दुसरी कुठं दिसतेय शोधायचो

मी सांगली वालचंदला होतो तेव्हा तिथे पेंइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्यांमध्ये भुते फार फेमस होती.
एक बरे होते की भूतांचा टाईम ठरलेला होता. रात्री बारानंतर यायची. एक ते दोन वाजता त्यांचा प्रभाव सर्वाधिक असायचा.
तीन वाजता रामाचा रथ निघायचा. हे रामाचा रथ काय प्रकरण होते माहित नाही. इथे कोणी असे ऐकले असेल तर सांगा.. पण तो निघाला की भुते पळून जायची.
त्यामुळे बारा ते तीन आम्ही कोणीच वॉशरूमला बाहेर जायचो नाही. आधीच कार्यक्रम उरकून घ्यायचो.

खारीच्या पाठीवर आधी पट्टे नव्हते. रामसेतू बांधताना खारीने केलेल्या मदतीला thanku म्हणायला रामाने तिच्या पाठीवर हात फिरवला आणि त्याची बोट पाठीवर उठली. ती नंतर समस्त खार प्रजातीच्या पाठीवर उठत राहिली आशीर्वाद म्हणून. अशी स्टोरी आजी ने सांगितली होती पण प्रेमाने हात फिरवल्या वर वळ कसे उठतील, ते तर गालावर उठतात मारल्यावर अशी शंका आली होती पण आजीला राग येईल म्हणून नाही विचारले तेव्हा

अरे हो, ती खारीच्या अंगावर पट्टे वाली कथा ऐकलीय.
कांद्यावर माती दिसत नाही भुईमूग शेंगांसारखी, त्यामुळे ते झाडावर फळासारखे उगवतात असं मला बरीच मोठी होईपर्यंत वाटायचं.
आणि 'बोलाईचे मटण मिळेल' अशी पाटी असलेल्या पाटीतला बोलाई हा बैल किंवा याक सारखा वेगळा प्राणी असेल असं पण वाटायचं.बहुतेक ती प्रिपरेशन ची पद्धत आहे.
लहानपणी लिटल विमेन मध्ये 'ऍमी शहाण्यासारखी वागली, शी टूक ड्रमस्टिक' वाचलयावर 'अरे वा, अमेरिकेत पण शेवग्याच्या शेंगा खातात' असं वाटलं होतं.माझ्या आजूबाजूला मांसाहार करणारे पण ड्रमस्टिक वगैरे कधी म्हणाले नाहीत.मग के ड्रामा मध्ये लोकांना चिकन पीस खात त्याला ड्रमस्टीक म्हणताना बघून खरा अर्थ कळला.
असंच एकदा स्वीडन मध्ये बावळटसारखा भोपळी मिरची (पेपरिका) समजून पेपरोनी पिझ्झा ऑर्डर केलेला आठवतो.असंच अमेरिकेत गेले असते तर 'शेवग्याची आमटी' समजून ड्रमस्टिक ऑर्डर केल्या असत्या.

एक साळुंखी दिसली की दिवस वाईट आणि २दिसल्या की आनंदात जातो ( one फॉर sorrow two फॉर जॉय असं काहीतरी म्हणायचो आम्ही ) +१००
ते असं आहे..
One for sorrow, two for joy, three for a mail and four for a boy...

लोल

कोंबडिचं पिस हातात घेतलं की माणूस मरतं. आणि मरायचं नसेल तर मारुतीला तेल घालून यायचं. मग मरत नाही.
लग्न झालेल्या बाईचं मंगळसुत्र आपण गळ्यात घातलं की आपण लगेच गरोदर होतो.
नाक टोचल्यावर जो मोठा फोड येतो त्याला रोज चिमणीची शी (कार्यक्रम) लावली कि तो फोड बरा होतो.
मोराचं पिस वहित ठेवलं तर गणितात नापास होत नाही.

अजून एक
आणि आम्ही चक्क ते ताजं ताजं मिळवून एकदा केलं पण आहे.मेंदी भिजवून(म्हणजे तेव्हा पानं वाटून) त्यात चिमणीचा ताजा ताजा कार्यक्रम टाकून मिसळला तर जास्त रंगते म्हणे.रंगली होती का ते आठवत नाही. >>> same here... आम्ही तेव्हा गिरगावात राहात होतो. गॅलरीच्या कठड्यावर भरपूर चिमण्या बसायच्या. त्यामुळे सुकलेला कच्चा माल सहज मिळायचा. काडेपेटीच्या काडीने तो गोळा करायचा. दुपारच्या वेळेतले उद्योग.

हेहे
फोडाला चिमणीची शी..
आणि मेंदीत चिमणीची शी ही युनिव्हर्सल थिअरी आहे हे ऐकून बरं वाटलं Happy

लग्न झालेल्या बाईचं मंगळसुत्र आपण गळ्यात घातलं >> की म्हातारा नवरा मिळतो....
.
पांढरी गाडी दिसली की ३ टाळ्या वाजवायच्या म्हणजे गोड खायला मिळतं

मजेशीर आहेत आठवणी
काही विसरल्या होत्या वाचून आठवत आहेत

कुकुडकोंबडा = भारद्वाज कोपुत
सेम अंधश्रद्धा होती
गुढीपाडवा दिवशी दिसला तर पूर्ण वर्ष चांगलं जाते अशीही एक श्रद्धा होती

बोल्हाई मटण म्हणजे वेगळे प्रिपेरेशन नव्हे तर मांस वेगळे.
पुण्यात काही तालुक्यात ज्या लोकांना बोल्हाई देवी असते पूजनात, ते लोक बोकड आणि शेळी प्रजातीचे मटण खात नाहीत.
कुरळ्या केसांच्या म्हणजेच मेंढी मेंढा चे खातात.
त्यांनी बोकड खाल्ले तर त्यांना देवीचा कोप होतो, खाज उठते किंवा allergy होते असे म्हणतात.
त्यामुळे ते स्पष्टपणे हॉटेल वाले लिहितात.
बोल्हाईचे मटण मिळेल असे.

Pages