Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34
भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शाह मात् >> शह देणे - मात
शाह मात् >> शह देणे - मात देणे
हिंदीत ‘शामत आना’ असा
हिंदीत ‘शामत आना’ असा वाक्प्रचार आहे, तोही या ‘शाह मात’चाच अपभ्रंश असावा, अर्थही तसाच (कोंडीत सापडणे, आपत्ती) आहे.
मात् वरूनच मौत आलं असेल का?
मात् वरूनच मौत आलं असेल का?
शामत बरोबर वाटतंय.
शामत बरोबर वाटतंय.
'बिलामत' पण याच माळेत गुंफता येईल काय?
स्वाती, हो बहुतेक !
मामी, हो बहुतेक !
आणि मयत ही !
असेच असावे : अर. मौत्
असेच असावे : अर. मौत्
..
'बिलामत
[फा. बर् + आमद्]
(दाते शब्दकोश)
>>>बलामत, बलागत. >>> बिलामत
अरबी :मैयत / मयत >>> मैत
अरबी :
मैयत / मयत >>> मैत
काही रोचक एकाक्षरी ( गोरे कोश
काही रोचक एकाक्षरी ( गोरे कोश)
. ठै = ठाण देणे, चिकटून बसणे
. बं = बैरागी हा उद्गार शिवनिदर्शक म्हणून वापरतात
. भुं = शंखाचा आवाज
. मं = मुलांचे खाणे ( मं मं करणे)
. यं = मिळमिळीत क्रियादर्शक शब्द ( यं यं करणे )
. स्न = पासून (ग्रामीण)
. र्ही = लज्जा, लाजरेपणा
@मानव वाह!!!
>>>>>रत्नगर्भा, खगवती, अपारा, विपुला, रेणुका
@मानव वाह!!!
ठै = ठाण देणे, चिकटून बसण
ठै = ठाण देणे, चिकटून बसण
ठाई - स्थाई???
ठाइ, ठाइं, ठाई
ठाइ, ठाइं, ठाई
= (क्रिवि.) ठिकाणी; स्थानी; जागी.
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%88
पासून करता पास्न शब्द ऐकला
पासून करता पास्न शब्द ऐकला होता (जुन्या मराठी सिनेमात 'कवापास्न' (कधीपासून) हा खूप कॉमन शब्दप्रयोग असायचा)
स्न हा नवीन समजला.
'कवापास्न', ' 'कोनापास्न' >>
'कवापास्न', ' 'कोनापास्न' >>> अगदी !
पासून >> पास्न >> स्न असे अप. असल्याचे गोरे लिहितात.
त्यास्न, तुम्हास्न म्हणजे
त्यास्न, तुम्हास्न म्हणजे त्याला, तुम्हाला.
पास्न म्हणजे पासुन.
तेव्हा फक्त स्न हा प्रत्यय लागुन पासून असा अर्थ निघण्याची उदाहरणे आहेत का?
तसेच तो एकाक्षरी वापराची?
* फक्त स्न हा प्रत्यय लागून
* फक्त स्न हा प्रत्यय लागून
>>>> आताच साताऱ्यास्न आलासा न्हवं ?
( गोरे कोशातून )
मुळात स्न अव्यय आहे.
त्यास्न, तुम्हास्न >>> ते
त्यास्न, तुम्हास्न >>> ते त्यास्नी, तुम्हास्नी असतया न्हवं ?
+१
+१
त्या कोशात स्नी हा सुद्धा एकाक्षरी म्हणून वेगळा दिलेला आहे
बाराखडीतले प्रत्येक अक्षर हे
बाराखडीतले प्रत्येक अक्षर हे सार्थ आहे हे सिद्ध करायचा या गोरे यांनी अगदी चंग बांधलेला दिसतो!
ओढून ताणून प्रत्येक अक्षराला अर्थ दिला आहे असे वाटते!
आधी वर थोडी चर्चा झाली तो
आधी वर थोडी चर्चा झाली तो “पाट” शब्द अनेकार्थी आहे, असे लक्षात आले. संदर्भानुसार अर्थ पूर्ण बदलतो:
पाट =
कालवा
बसायचे आसन
श्रेष्ठपणा, मोठेपण
लग्न / पुनर्विवाह (पाट लावणे)
हजामतीचा पट्टा
रजस्वला होणे (पाटी बसणे)
दोन्ही पाट एकप्रकारे वस्त्रच तरी गोण”पाट” आणि आंतर”पाट” सारखे नाहीत
छान.
छान.
पुनर्विवाह >> यावरूनच त्या स्त्रीला "पाटकर" असे म्हणतात.
असे अनेकार्थी शब्द शब्दकोडी
असे अनेकार्थी शब्द शब्दकोडी रचणाऱ्या
लोकांचे फ़ेवरेट असतात. इथले शब्दप्रभू सुचवतील काही.
आणि हे सगळे शब्द अधिकृत
आणि हे सगळे शब्द अधिकृत मराठीतले म्हणून धरायचे का?
उदा
मोहल्ला, शामत ई.
मोहल्ला, शामत : दाते
मोहल्ला, शामत : दाते शब्दकोश
त्यामुळे ते स्वीकृत मराठी शब्द म्हणता येतील
..........
शब्दरत्नाकरात अरबी, फारसी आणि इंग्रजीसह एकूण दहा भाषांमधून मराठीने जसेच्या तसे स्वीकारलेल्या शब्दांची यादी आहे. याहूनही अधिक भाषांचा संबंध असू शकेल.
कदाचित आश्चर्य वाटेल की, शब्दरत्नाकरानुसार हिंदुस्तान हा शब्द देखील फारसीमधून आलेला आहे !
बुद्रुक; बुद्रुख; बुजृग
बुद्रुक; बुद्रुख; बुजृग
= थोर; एकाच नावाच्या दोन गावांपैकी मोठे
[फा. बुझुर्ग = वृद्ध, थोर ]
खुर्द
= कनिष्ठ; अधिक लहान;
(फा. खुर्द; सं. क्षुद्र)
मात्र काही जण हे दोन शब्द बरोबर उलट अर्थाने वापरतात - अपरोक्ष / परोक्ष यासारखे.
असे झाल्यास त्याला अर्थव्यत्यास म्हणतात. ( गोरे कोश)
अर्थव्यत्यासाची अजून उदाहरणे शोधतोय. . .
<<मुद्राचिरी, शाह मात् >>
<<मुद्राचिरी, शाह मात् >>
छान माहिती.
दिगंबर
दिगंबर
= १. दिशा हेच वस्त्र नेसलेला; नग्न; नागवा. २. जैन धर्मातील एक पंथ.
( दिश् >> दिग् + अंबर = वस्त्र)
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
>>>>>>
वरील पहिल्या अर्थाशी समांतर इंग्लिश शब्द आणि त्याची व्युत्पत्ती :
sky-clad = naked, clothed in space
https://www.etymonline.com/word/sky-clad#etymonline_v_48725
दिग्+ अंबर सारखेच अन्य काही
दिग्+ अंबर सारखेच अन्य काही शब्द:
दिग्-विजय = दिग्विजय
दिग्-पाल
दिगंतर
दिगंती - अशी कीर्ती पसरत असते जनरली
दिग्-दर्शन
मांत्रिक तांत्रिक करतात ते एक दिग्-बंधन
हिंदीसारखाच मराठीत सध्या खूप चलनात असलेला “दिग्गज” सुद्धा असाच जन्मला असावा, त्याची व्युत्पत्ती नाही समजली मात्र.
छान !
छान !
आणि
**** + अंबर सारखेच हे :
पीतांबर, चर्मांबर
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%...
व्याघ्रांबर, मृगांबर,
व्याघ्रांबर, मृगांबर, नीलाम्बर, पीतांबर, श्वेतांबर !
जय हो !
दिग्गज = दिग् +गज . प्रत्येक
दिग्गज = दिग् +गज . प्रत्येक दिशेच्या अंती असलेला एकेक हत्ती. ऐरावत , पुंडरीक, वामन, कुमुद, अंजन, पुष्पदंत, सार्वभौम आणि सुप्रतीक
( वा. गो. आपटे)
मी दिग्गज म्हणजे दिशा जिंकणारा असा अर्थ समजत होतो. अनिंद्य, तुमच्यामुळे हा अर्थ शोधावासा वाटला आणि मिळाला.
Pages