तुमच्या बालपणीच्या ' बाळबोध ' अंधश्रद्धा / अफवा कोणत्या आहेत?

Submitted by ब्लू कोलंबसे on 28 April, 2024 - 10:47

आज संध्याकाळी रस्त्याने चालताना आमच्या फेवरेट ' भट ' साहेबांच्या ' राज ' या ' अति भयंकर ' शिणेमातले ' आपके प्यार में, हम सवरने लगे' हे दर्दभरे गाणे कानी पडले अन् मन थेट 23 वर्षे मागे गेले.

त्यावेळी आमच्या गावात या चित्रपटासोबत एक ' अफवा ' पण रिलीज झाली होती.

जो माणूस हा चित्रपट रात्रीचा 9.30चा शो एकटा पाहील, त्याला 1 लाख रुपये इनाम मिळेल.

..... आणि

एका माणसाने रात्री तसा तो शो पाहिलाही, अन् त्याला ते 1 लाख रुपये मिळालेही, मात्र ते घ्यायला तो जिवंत नव्हता....!

आमच्या शाळेत (त्याकाळी इंटरनेट नसूनही) या आणि अशा अनेक अफवा पसरायच्या.
तुमच्याही आठवणीत असलेल्या अशा अफवा वाचण्यासाठी हा धागा...

(Just चंमतग :P)

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे हां, दरवाजा बद्दल अफवा होती.आठवली मला.
आमच्या इथे 'रस्त्यावर पैसे टाकून ते उचलायला येणाऱ्या मुलांना पळवणारे बैरागी' ही अफवा एकदम एव्हरग्रीन होती.दर 3 वर्षांनी यायची.
शिवाय तो झपाटलेल्या जागी झाडाला खिळा ठोकून त्यात चुकून स्वतःचं धोतर अडकलं हे न कळता भुताने ओढलं म्हणून जागीच मरणारा माणूस(ही अंधश्रद्धा निर्मूलन वाली कथा.)

१. चिंच खाताना चिंचोळा गिळला तर पोटातून चिंचेचं झाड उगवतं.
२. रात्री शिट्टी वाजवली तर भूत येतं.
३. मांजर ही खरंच वाघाची मावशी असते आणि तिला त्रास दिला तर वाघ बदला घेण्यासाठी येतो.
४. सेम विथ द सापटोळी. एक मारली तर अजून ७/९ येतात. (ते ही बदला घेण्यासाठी.)
५. कुणाच्या हाताखालून गेलं तर उंची वाढत नाही.
६. रात्री बाहेर फिरायचं नाही. घोड्यावर बसून गिरोबा येतो आणि फटके मारत पळवून नेतो. इ.इ.

शहरात माहिती नाही पण गावात असल्या अफवा अगदी घाऊक प्रमाणात पसरवल्या जातात. आणि लहान मुलांना त्या खऱ्या पण वाटतात.

एक नाणेटी मारली तर सात नानेट्या परत येतात.
कुणाच्या ढेंगे खालून गेलो तर उंची वाढत नाही.

पेन्सिल laa टोक केल्यावर जी फोलकट (ह्याला काय म्हणायचं?) पडतात, ती कंपास पेटीत ठेवली की फुलपाखरू तयार होत!

वादळात शु केली तर भूत येतं अशी अफवा होती.हे करून पाहण्याचा किंवा कोणी केलेलं पाहण्याचा सुवर्णयोग सुदैवाने आणि ईश्वरकृपेने आला नाही.
दोन्ही हात (नमाज सारखे) जुळवून त्यावरची अर्धवर्तुळाकार रेषा पूर्ण जुळून अर्धचंद्राकृती तयार झाली तर लव्ह मॅरेज अशी थिअरी होती.शिवाय त्याच्या खाली असलेल्या छोट्या रेषा म्हणजे आयुष्यात आलेल्या मुलांची संख्या Lol त्यानुसार माझ्या आयुष्यात साडेत्ववन किंवा पावणेचार मुलं आल्याचं आठवतं.

पेन्सिलला टोक केल्यावर राहिलेला कचरा दुधात टाकला की खोड्रबर तयार होतो. म्हणून बरीच पेन्सिल तासली होती. दूध मागायची हिम्मत काही झाली नाही. Wink

आमच्या चाळीत छमछम यायची.
आणि रात्री बाहेर कॉमन पॅसेज मध्ये कोणी झोपलेले दिसली की त्याला झपाटायची.
यावर उपाय म्हणजे लाल बत्ती.
ती लाल बत्तीला घाबरायची. म्हणून पॅसेज मध्ये सर्वांनी लाल बत्ती लावल्या होत्या. ती नसल्यास सोबत एखादी लाल बत्ती घेऊन झोपावे.
ती सुद्धा नसल्यास लाल चादर, लाल उशी असे उपाय होते.
हे माझ्या वडिलांच्या पिढीत झाले होते. आम्ही याचे फक्त किस्से ऐकले होते. त्यामुळे अफवाच असे ठाम पणे बोलू शकत नाही. माझा यावर विश्वास नसल्याने अफवा घोषित करून या धाग्यात टाकले आहे.

गणपती दूध प्यायचा अशी एक अफवा उठली होती.
मी फारच लहान असल्याने डिटेल माहीत नाहीत.
पण रस्त्यावर जागोजागी झुंबड उडाली होती. लोकं रांगा लावून गणपतीला दूध लाजत होते.

देव

ती आजही आहे.. उद्याही राहणार Happy

अंडरटेकर म्हणून WWF चा फायटर होता त्याचे सात जन्म आहेत अशी सुद्धा अफवा होती. WTF.. म्हणून मी कधीच बघितले नाही ते WWF.. सगळेच खोटे

जर एखादा कुत्रा शी करताना दिसला आणि तुम्ही तुमची करंगळी आणि मित्राची करंगळी एकमेकात अडकवून घट्ट ताणून धरली तर शी अडकून पडते आणि तो चावरा असला तरी कायमचा गरीब गाईसारखा होतो अशी ठाम समजूत माझ्या लहानपणी होती (२-३ रीत असताना). आमच्या घराजवळ एक कुत्रा होता. तो खरोखरच चावरा होता का ते माहिती नाही पण आम्हाला त्याची खूप भिती वाटायची. एकदा त्याला शी करताना पाहून मी आणि माझ्या मित्राने खूप जोरात करंगळी ताणून धरली होती.
कुत्र्याचे माहिती नाही पण मला जाम २ दिवस बद्धकोष्ट झाल्याने डॉक्टरकडे नेऊन एनिमा द्यावा लागला होता !

@mi_anu हे समजण्याची अक्कल कुठे होती तेंव्हा. दुसरीतल्या मुलाला, तिसरीतल्या कुणी काहीही सांगतलं तर ते खरं वाटतं.
बहुतेक मी मात्र चिडचिडा आणि कदाचित चावरा झालो असेन.

पेन्सिल चं खोडरबर आमच्याकडे सुद्धा प्रसिद्ध होतं.
रात्री बोरीच्या झाडावर भुतं येतात ही अजून एक.
.
मी मोठी बहीण असल्यामुळे धाकटीला घाबरवण्यासाठी (सांभाळण्याची जबाबदारी असेल तेव्हा बरं पडतं )अफवा बनवत असे.
त्यात लाल टॅक्सीवाला येतो आणि घेऊन जातो अशी होती. बहीण अजूनही लाल कार ला घाबरते. Lol
.
ओम मोठा झाल्यावर इथे येऊन लिहिणार आहे, मी brown भूभू ला घाबरत होतो. मी रडलो तर आई मला भूभू कडे देऊन टाकणार होती.

यावर एक धागा पूर्वी होता.
आपण मुलांना कसं फसवतो यावर धागा काढायचं मनात होतं. त्या क्षेत्राचा अभ्यासही बराच आहे. पण राहिलाच काढायचा. Lol

कुठल्याही कामासाठी तीन लोकांनी सोबत जायचे नाही... तीन तिघाडा काम बिघाड होतो असे म्हणतात.
मग एकाला मागे ठेवायचे किंवा सोबत कुणी चौथा घ्यायचा, ते ही शक्य नसल्यास रस्त्यावरचा एखादा दगड चौथा म्हणून खिशात घ्यायचा. Happy
३ अंका आणि कामे होण्याचा काहीही संबंध नाही. अंधश्रद्धा आहे.

माझा एक वर्ग मित्र ( < चौथा वर्ग ) होता त्याच्याशी कुणी पंगा घ्यायचे नाही. त्याने घरी साप पाळले होते असा त्याचा दावा होता. एखाद्याशी भांडण / वाद झाल्यावर तो सापाला पत्ता सांगायचा. पत्ता शोधत साप तुमच्या घरी यायचा.
असाच एकदा आमच्या घरी साप निघाला होता. दुसर्‍या दिवशी शाळेत गेल्यावर त्याला मी विचारले, " आमच्या घरी काल साप निघाला होता, तू पाठविला होता का ?" म्हणजे त्याच्याशी काहीच भांडणही झालेले नव्हते Happy

<< आपण मुलांना कसं फसवतो यावर धागा काढायचं मनात होतं. त्या क्षेत्राचा अभ्यासही बराच आहे. >>
------- अमितव Happy , तुमच्या अभ्यासाचा इतरांना पण लाभ मिळू द्या.

तो तीन तिघाडा वाला नियम मी अजून पाळते, 3 जण असले तर दगड बरोबर घेते.
हा धागा लवकरच 'प्रचलित असलेल्या अंधश्रद्धा' ट्रॅक वर जाईल अशी लक्षणे आहेत Happy

माझे पिताश्री म्हणतात पळसला पाने तीन, देवाला वाहतात तो बेल आणि दुर्वा सुद्धा तीन दळाच्या, प्रदक्षिणा तीन. मग माणसं तीन असल्यावर बिघाड का होईल?.
.
पण एखादा designer दगड बरोबर असेल तर style स्टेटमेंट म्हणून मला तो चालेल

दहावीला चांगला अभ्यास कर मग पुढे जन्मभर टेन्शन नाही - ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे.

हो हर्पा, आणि ती infinite loop मध्ये जाते.
माझं आता ते iteration सुरुये.
मुलं एकदा ५ वर्षांची झाली की आपली आपली शाळेत जातात मग काही tension नाही वगैरे hopes दाखवणे

अगदी अगदी किल्ली Happy
नवमातांना उदास वाटू नये म्हणून हे दिलासे दिले जातात.तसं म्हटलं तर 10 वर्षाची होईपर्यंत मुलांकडे लक्ष ठेवावे लागते(आणि नंतर पण Lol )

Pages