शब्दवेध व शब्दरंग (३)

Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34

भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इरा = पाण्याचा झरा, विळा
सं. इरा = पाणी, पेय]
या व्यतिरिक्त अन्य अर्थासाठी संदर्भ शोधावे लागतील.
...
अवनी मुख्य यादीत आहे
...
क्षमा >>> छान.

भुमीदेवी , भुवनी, भुवनेश्वरी, भुवनेन्द्री, भुवीशा, अवनी, पृथ्वी, धरती, धात्री, धरणी, वसुधा, वसुंधरा, वैष्णवी, विष्णुपत्नि ,हिरण्मय, अम्बरस्थली, रोदसी.

हे शोधले.
https://mr.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%A5%E0%A5%8D%E0...

मेदिनी, अछला, विकेशी - हे इथे सापडले.‌
https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%A5%E0%A5%8D%E0...

उत्तम !
ला >>> चा अपभ्रंश ?

रोदसी ?

पृथ्वी आणि आकाश एकत्र असल्यास वापरतात ना ? की फक्त पृथ्वीसाठी ?

BTW, “धरती” शब्दाचा एक अर्थ “जास्त कडक / मादक दारू” असा आहे Happy

अवनी मुख्य यादीत आहे >> पहिली वेलांटी यादीत आहे, दुसरी नव्हती. मला वाटतं दुसरी वेलांटी बरोबर आहे.

(ऋतुराज, इथे तुझ्या त्या स्तोत्रातलं 'अवनीतनया कमनीयकरम्' येऊ शकेल)

जग आणि विश्व या शब्दांत पृथ्वी + तिच्यावरच्या सजीव आणि निर्जीव गोष्टी पण अपेक्षीत आहेत ना? इतर नावांपेक्षा थोडेसे वेगळे अभिप्रेत आहे या दोन शब्दांत.

छान भर घातली आहे सर्वांनी.
रत्नगर्भा विशेष आवडले.
...

इतर नावांपेक्षा थोडेसे वेगळे अभिप्रेत>>>
होय, सहमत.
तसेच "जमीन"च्या बाबतीतही वाटते

इंग्रजी शब्दकोडी सोडवताना earth, soil, dirt हे शब्द समानार्थी वापरले जाऊ शकतात हे कळले.
https://www.collinsdictionary.com/dictionary/english/earth#google_vignette
यातला तिसरा अर्थ
UNCOUNTABLE NOUN B2
Earth is the substance on the land surface of the earth, for example clay or sand, in which plants grow.
The road winds for miles through parched earth, scrub and cactus.
They will revert to tilling the earth in an old-fashioned way.
Synonyms: soil, ground, land, dust More Synonyms of earth

to soil - to make something dirty, especially with solid waste . soiled diapers वाचल्यावर हा अर्थ न शोधता लागला. पण त्यासाठी हा शब्द वापरून क्रियापद बनावे हा एक लहानसा सांस्कृतिक धक्का होता.

फरद / फरड
= यादी
. . . कुटुंबातल्या झाडून सगळ्यांच्या नावांची फरड काही लग्नपत्रिकांवर असते.
..

‘फरड’ मधील ड ला फक्त काना दिल्यावर पूर्ण वेगळा शब्द होतो :
फरडा
= पटाईत; निष्णात; निपुण

(दाते शब्दकोश)

दळभद्री शब्दाची व्युत्पत्ती काय आहे? दळ आणि भद्र असे दोन 'भद्र' शब्द मिळून इतका वाईट शब्द कसा बनला?
सिरियसली विचारत आहे Happy

अती जुन्या मराठी महसूल नोंदींमधे “मुद्राचिरी” असा शब्द अडला.

अर्थ - सही शिक्क्याचे दानपत्र, बक्षीसपत्र aka gift deed !

मुद्राचिरी>>> भारी !
यावरूनच चिरीमिरी हा आला असावा काय ?
(बक्षीस म्हणून दिलेला पैसा; लाच)

मात
= बुद्धिबळांत प्रतिस्पर्ध्याच्या राजाचा कोंडमारा करून पूर्ण विजय मिळविणे
अरबी : मात् = मरणे

अरबी : मात् याचा भाषा प्रवास रंजक आहे :
>>>> फारसी : शाह मात् ( shah mat राजा मरणे हा अर्थभ्रंश) >>>checkmate
https://www.etymonline.com/search?q=checkmate

Pages