मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सध्या तुकड्या तुकड्यात लोकमत फिल्मीवरची सोनाली खरे आणि बीजय आनंदची मुलाखत बघतेय. मला तो आवडलेला शांती आणि औरत सिरीयलमध्ये.

सोनाली खरे खूप आवडते असं नाही पण ती डोंबिवलीकर म्हणून सॉफ्ट कॉर्नर आहे.

मी youtube वर समोर येतील तसे दोन तीन मिनिटांचे भाग बघतेय, तो मराठी चांगलं बोलतो.

सोनाली खरे आणि बीजय आनंदची मुलाखत बघतेय. मला तो आवडलेला शांती आणि औरत सिरीयलमध्ये.
>>
मला तो 'सिया के राम' मधे जनकाच्या भूमिकेत फारच आवडला होता. जनकच वाटला होता.

ही मुलाखत नाही तर पॉडकास्ट आहे, आता कुठे 'पॉकवा' काढू.
Dr. Mike or Dr. Mikhail Varshavski, commonly known as “Doctor Mike,” is a multifaceted board-certified family medicine physician, media personality, educator, writer, and philanthropist.

Allopathy versus Ayurvedic-

https://youtu.be/zt6i6vVgiO4?si=6ommtCY8Q8bwkplb
Debating The Value Of Eastern Medicine (Ayurveda) | Healthy Gamer Dr. K

डॉ माईक हा अत्यंत बुद्धिमान, संयत व प्रामाणिक वाटला. देखणा असणं तर 'चेरी ऑन द केक'. सध्या हा फार आवडतो आहे.‌ वरच्या लिंक मधली चर्चा अतिशय उद्बोधक वाटली. दोघेही डॉक्टर आहेत. पण डॉ के आयुर्वेदिक औषधे व उपचार यांच्यावर संशोधन करत आहे. मला डॉ माईकची क्लॅरिटी आणि तळमळ जेनुईन वाटली.

औषधांच्या नावावर ज्या भ्रामक समजुती विकल्या जातात, ज्याने रुग्णांचा जीवही धोक्यात येऊ शकतो त्या गटात आयुर्वेदिक उपचारही येऊ शकतात ह्यात वैयक्तिकदृष्ट्या मला तथ्य वाटते. उपचारासाठी लागणारा वेळ आणि हाती नसलेला पुरेसा विदा किंवा न केले गेलेले क्लिनिकल ट्रायल यावर घमासान चर्चा झाली आहे. भलताच cerebral भाग आहे. मन लावून बघावा लागतो. सध्याचं आयुर्वेद हे सगळं observation based असून controlled data किंवा individual based research असा उपलब्ध नसल्याने टक्केवारी बाबत त्याची क्रेडिबिलिटी फक्त 10% आहे. त्यामुळे डॉ के ची मतं मला स्वतःला पटली नाहीत. त्याची देहबोली सुद्धा खुल्या विचारांची वाटली नाही. या उपचारांमधली 'रिस्क' त्याने कधी स्विकारली नाही. शिवाय 'सेन्स ऑफ अर्जन्सी' नसणं हा माझ्या मते आयुर्वेदिक उपचारांचा फार मोठा रिस्क फॅक्टर आहे. नंतर नंतर त्याने अध्यात्म आणलं. जिथं पुरावे नसतात तिथे अध्यात्म हा मोठाच पुरावा म्हणून वापरण्यावर अजिबात विश्वास नाही. नैराश्यावर ध्यान हा उपाय होऊच शकत नाही त्यामुळे तेही पटलं नाही. अध्यात्म तुम्हाला 'सस्टेन' करू शकतं बरं करू शकत नाही त्यामुळे तो मार्ग कुठंही 'चिकटवणे' अत्यंत चुकीचे आहे. सगळा हायपोथेसिस गृहित धरून उपचार करणं हा कल दिसून आला. आवड असेल तर ही चर्चा नक्की बघा.

हे दोघेही अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर आणि मिडिया पर्सनलॅटी आहेत.
-------------------

डॉ माईकने ग्वेनेथ पॅल्ट्रोने 'गूप' नावाचं जे काही औषधांचं ऑनलाईन दुकान काढले आहे त्याचाही 'पर्दाफाश' केला आहे. तो स्वतःला 'रिअल डॉक्टर' म्हणतो व अशा अंधश्रद्व व अवैज्ञानिक उपचारांबद्दल लोकांचे गैरसमज दूर करतो. मला Gwyneth अजिबात आवडत नाही, 'आयर्न मॅन' मुळे सहन केले. आता तर रागच येतो आहे.

The Ugly Truth About Gwyneth Paltrow and GOOP
https://youtu.be/xlbi26qhCdQ?si=GtYxZN27SSpwi_5T
हा एपिसोडही जरूर बघा. हा आठ मिनिटांचाच आहे.

ही सगळी पोस्ट अमेरिकन झाली आहे. असो. Happy

दोन तासांची चर्चा आहे, आणि तू जे जिस्ट लिहिलं आहेस त्याच्याशी आधीच तंतोतंत समहत आहे. Lol त्यामुळे वेळ झाला की बघेन.

गंमत म्हणजे तो डॉ के अमेरिकन देसी आहे आणि चरक संहितेला 'जरक' संहिता म्हणाला. आता काय 'जर्क' म्हणतोय की काय वाटले. Lol

अस्मिता, डॉक्टर माईक आणि डॉ. के मधली चर्चा पूर्ण पाहिली. मला डॉक्टर माईक थोडा biased वाटला. His questions were coming out of ignorance rather than curiosity. डॉ. के ला एका क्षणी ते कळल्यावर मुलाखत जरा रूळावर आली. दुर्दैवाने डॉ. के ला देखील आयुर्वेदाची केवळ कामचलाऊ माहिती असल्याने हत्ती आणि आंधळे अशी ही चर्चा झाली.
Reductionist paradigm वर आधारित ॲलोपथी आणि holistic paradigm वर आधारित आयुर्वेद या दोन्हीचे फायदे तोटे आहेत. अर्थात आयुर्वेदाची परंपरा ही अनेक कारणांनी खंडित झाल्याने त्याचे मूळ संपूर्ण स्वरूप आपल्याला दुर्दैवाने ज्ञात नाही. हा एक मोठा तोटा आहे.
चर्चेत शेवटी अध्यात्म आणि मंत्राचा प्रभाव हे सर्व ऐकणे मजेशीर होते!

मी मुलाखत पाहिलेली नाही.

मात्र 'आयुर्वेदाची परंपरा खंडित झाली' हे विधान अयोग्य आहे. अनेक ग्रंथ, त्यांवरील भाष्य, टीका उपलब्ध आहे. छपाईचं तंत्रच उपलब्ध नसल्यानं इतर असंख्य ग्रंथ नष्ट झाले. मात्र आयुर्वेदाचा संबंध आरोग्याशी असल्यानं ती ग्रंथपरंपरा खंडित झाली नाही. आयुर्वेदिय उपचारपद्धतीत पुरेश्या ट्रायल्स हपुरेश्या, होऊ दिल्या जात नाहीत, हे मान्य व्हावं. गेल्या विसेक वर्षांत अनेक संस्थांनी आयुर्वेदिय उपचारपद्धती वाप्रून ट्रायल्स सुरू केल्या आहेत. मात्र वैद्य, औषधनिर्मिती करणार्‍या कंपन्या यांच्या अनेकदा ट्रायल्सना विरोधच असतो.

उदाहरणार्थ, क्षारसूत्र नावाची एक उपचारपद्धती आहे. फिस्टुलासाठी ती वापरतात. मात्र त्याच्या योग्य नोंदी फार कमी आयुर्वेदिय शल्यविशारदांनी केल्या आहेत. क्षारसूत्राच्या धाग्यावर लागणार्‍या औषधामध्येही एकवाक्यता नाही. आमच्याकडे एक डॉक्टर आले होते, त्या धाग्यावर चांदीचे नॅनोकण लावता येतील का, हे विचारायला. तेव्हा लक्षात आलं की धाग्यावर लावायच्या औषधांच्या अनेक कृती आहेत, आणि अगदी तीनचारशी वर्षांपूर्वी लिहिलेल्या ग्रंथांतल्या कृतीही पूर्णपणे पाळल्या जात नाहीत. फिस्टुलासाठी मॉडर्न मेडिसिनचे सर्जन सऱ शस्त्रक्रिया करतात. त्यातून बरं व्हायला वेळ लागतो. ती खर्चिकही असते. क्षारसूत्र सोपी आहे. पण योग्य नोंदी नाहीत.

असो. हा या धाग्याचा विषय नाही.

चिनूक्स, केवळ ग्रंथ उपलब्ध आहेत म्हणजे परंपरा अखंडित आहे हे मला मान्य नाही. डॉ. माईकने मुलाखतीत एक फार चांगला प्रश्न विचारला - गेल्या ५०० वर्षांत आधुनिक वैद्यकशास्त्र किती पुढे गेलं त्यामानाने आयुर्वेदात काहीच मूलभूत बदल घडले नाहीत असे का? यावर डॉ. केचं उत्तर - आयुर्वेद आधीच प्रगत आहे - मला पटलं नाही. अनेक कारणांनी आयुर्वेदातील पद्धतींची शास्त्रीय चिकित्सा आणि त्यातून नवे बदल, प्रमाणीकरण हे घडले नाही. हे माझ्यामते परंपरा खंडित होणे आहे.

रच्याकने: प्रतिसादातील शब्दाला भिंग दाखवून त्याचा माबो सर्च तुम्हाला दिसतोय का? मला वरच्या दोन तीन प्रतिसादात तो ' अनेक ' या शब्दाला दिसतोय. Biggrin फीचर चांगलं आहे पण इथे टोटली मिस फायर झालंय.

बाकी ' अत ' एकत्र टाइप करायची समस्या मिटलेली दिसत आहे. त्याबद्दल अनेक धन्यवाद.

जिज्ञासा आणि चिनूक्स धन्यवाद.

डॉ के मुळात एक साईकियाट्रिस्ट आहे तरीही हे 'विकतो' आहे हे जास्त खटकले. 'नीम हकीम खतरे जान' प्रकारांच्या यूट्यूबर्सना लाखोंनी फॉलोअर्स आहेत, त्यांचे अशास्त्रीय तोडगे (?) अमलात आणणारेही भरपूर आहेत. त्यांना कुणीतरी आवरायला हवं. त्यामुळे माईक जरी biased असला तरी अशा चर्चा घडवून आणणं महत्त्वाचं वाटतं.

जिज्ञासा, अनुमोदन.
तू एवढ्या दीर्घ चर्चेचा व्हिडिओ आवर्जून बघून पोच दिल्याने मला फार छान वाटले. Happy

चिनूक्स, माहितीपूर्ण पोस्ट.
तुम्ही लिहिलेलं सगळं (एखादं वाक्य जरी असले तरी) आवडतंच. Happy

चिनूक्सांच्या प्रतिसादांत इतके टायपो असण्याचा हा विक्रम असावा.

अवांतर- अनुभव दिवाळी अंकात डॉ अशोक वैद्य यांनी संशोधन पद्धतीत { Reverse Pharmacology (RP), a trans-discipline for discovery novel drugs inspired by experienced remedies of traditional medicine } क्रांतिकारक बदल केला व त्यांचं संशोधन नोबेलच्या तोडीचं आहे असं वाचलं. ते नक्की कोणतं ते मात्र तिथे दिलं नव्हतं.
कोणी याबद्दल लिहावं म्हणून हे पिलू इथे सोडून देतो.

भरत रिव्हर्स फारमॅकोलॉजी हे तंत्रज्ञान आयुर्वेदिक औषधे आणि उपचार पद्धती ह्यांची उपयुक्तता शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध करण्यासाठी विकसित करण्यात आली. आधुनिक औषध विज्ञानाच एक मुलभूत तत्व आहे "structure determines function". त्याला अनुसरून आधी संयुगाची रासायनिक रचना प्रयोग शाळेत (आणि कंप्युटर मॉडेल वरुन) शोधली जाते. जवळपास सारखीच रचना असलेले (पण वेगवेगळे असे) ठराविक रेणु निवडले जातात. मग पेशींमध्ये (आत किंवा बाहेर पृष्ठभागावर) कुठला रेणु त्याच्या रचनेमुळे चपखल बसतो ते निश्चित केले जाते. मग ह्या रेणुला औषध म्हणून विकसित करण्यात येते. आयुर्वेदिक औषधांच्या बाबतीत हे टप्पे शक्य नाहीत. मग त्यांच्या चाचण्या करण्यासाठी "function determines structure" हे तत्व वापरले जाते म्हणून त्याला रिव्हर्स फारमॅकोलॉजी अशी संज्ञा दिली आहे.

ही नक्कीच अतिशय उपयुक्त पद्धत आहे. पण माझे वैयक्तिक मत असे की ह्याला पुरक असे "आयुर्वेद बायलॉजी' (हे संशोधकांनी दिलेले नाव आहे) चे संशोधन गरजेचे आहे. आयुर्वेद शरीर शास्त्र आणि औषधांची एक वेगळी परिभाषा वापरतो. उदा कफ, पित्त आणि वात अशा तीन प्रकृती. ही परिभाषा आधुनिक वैद्यकीय परिभाषेच्या अनुषंगाने पण अंदाजाने वापरली जाते (उदा दाह म्हणजे inflammation). ह्यांचा दुष्परिणाम असा की अनेक विकारांवर ज्यांचा आयुर्वेदिक ग्रंथात थेट उल्लेख नाही त्यातील लक्षणांवरून उपचार पद्धती ठरवली जाते. ह्या दिशेने झालेले संशोधन खुप उपयुक्त ठरेल.

२०००+ वर्षांपूर्वी च्या लोकांनी निव्वळ निरिक्षणाद्वारे (म्हणजे रक्त चाचण्या आणि शरीराच्या आतील चित्र स्पष्ट करणारी उपकरणे नसताना) एक वैद्यकीय उपचार पद्धती विकसित केली. त्या पद्धतीला अर्थातच मर्यादा आहेत पण काही बलस्थाने पण आहेत. ती बलस्थाने शोधता आली तर आधुनिक वैद्यकीय शास्त्रात पण काही उपयुक्त बदल करता येतील.

अस्मिता ह्यांनी सुचविलेली मुलाखत अजुन मी बघितली नाही त्यामुळे त्यासंदर्भातील चर्चेवर काही मत नाही.

छान पोस्ट पर्णिका, माहितीपूर्ण आहे. ह्या विषयाबद्दल अजिबात माहिती नाही.

पर्णीका छान माहिती व विचार.
आधुनिक वैद्यकीय शास्त्रातच आधुनिक निदान पद्धतीने निदान करून त्यावर मग आयुर्वेदिक व काही होमिओपॅथी औषधांची उपयुक्तता यावर संशोधन व्हायला हवे. (होमीओपॅथीत फक्त साखरेच्या गोळ्यातले डायल्युनशन नसते, काँसेन्ट्रेटेड मदर टिंक्चर्स) सुद्धा असतात.
काही अशा औषधांवर संशोधन होऊन ती आधुनिक फार्मसीत तयार करून वापरात आहेत, एक पटकन आठवणारे नाव म्हणजे शल्लकी. यातील आधुनिक गोळ्यांचे नाव आठवत नाहीय पण त्यात शल्लकी रेझिन एक्स्ट्रँक्ट Aflapin या नावाने होते 50 mg. हा गुडघे, सांधेदुखीवर NSAID ला पर्याय. तीव्र NSAID एवढे परिणामकारक नाही, म्हणजे NSAID ला सरसकट सब्सिट्यूट नाही पण योग्य तिथे खूप चांगला पर्याय आहे, अनेक ऑर्थोपेडिक डॉक्टर्स हे प्रिस्क्राईब करतात. (मला पावलाला इजा झाली तेव्ह डॉकने Aflapin प्रिस्क्राईब केले होते, दीड दोन महिने घ्यावे लागले. एवढा काळ NSAID घेतल्या असत्या तर सोबत antacids घेऊन/घेऊनही माझ्या पोटाची पूर्ण वाट लागली असती.)

युरिक ऍसिड साठी सुद्धा allopurinol, fabuxostat या गोळ्या सहन न झाल्याने मला होमिओपॅथीतले एक मदर टिंक्चर उपयोगी आले. इथे पण हे या गोळ्यांना सरळ सब्सिट्युट नाही . पण यावर संशोधन होऊन ओके झाले तर first line of treatment, पुढे हे + इतर गोळ्या कमी डोसेज मध्ये वगैरे पर्याय निघू शकतील.
पोट खराब झाले की लगेच अँटीबायोटिक्स पेक्षा कुटजारीष्ट, ऍक्टिव्हेटेड चारकोल पावडर यावर अधिक संशोधन झाले तर उपयोगी पडेल. (जर्मनीत मला लूज मोशन झाल्या तेव्हा एकच गोळी आतड्यांची हालचाल कमी करणारी आणि दोन दिवसांकरता ऍक्टिव्हेटेड चारकोल कॅप्सूल्स दिल्या होत्या. दोन दिवसांत नाही थांबले तर पुढे बघु म्हणाले. )

काल विकट हास्यद्वयी चॅनेलवर चिन्मय मांडलेकरची मुलाखत लावली होती. त्यात त्याने ओघात विचारलं की जसपाल भट्टी माहित आहेत का? त्यावर त्या दोघांनी एकत्र "नाही" असं उत्तर दिलं थोडंसं वाईट व खूप आश्चर्य वाटलं!
(मात्र त्या आधी कदाचित तुम्ही खूप लहान असाल किंवा तुमच्या जन्माच्या आधीची असेल ही गोष्ट असे चिन्मय मांडलेकरने म्हटले आहे.)
एकंदर नाटक सिनेमे वगैरे या क्षेत्रातील लोकांच्या मुलाखती घेत आहेत/ या क्षेत्रात आहेत तर या पूर्वी होऊन गेलेल्या अनेक दिग्गजांची नावे माहित असायला हरकत नाही, पण मग ते दोघे खरेच खूप लहान असावेत.
आणि exact याच गोष्टीवर क्षिती जोग बोली आहे. तिची आरपार chanel वर मुलखात बघितली. ती त्यात हेच म्हणाली कि नवीन , तरुण अक्टर्स /कलाकारांच्यात हा खूप मोठा फरक जाणवतोय, की त्यांना जुन्या कलाकारांविषयी माहिती नसते!! आता तुम्ही आलाय ना या क्षेत्रात, मग तुम्हाला काही व्यक्तिमत्व व त्यांचं कार्य माहित असलंच पाहिजे. बाकी हॉलिवूड मधला ५० दिग्दर्शकांची नावे तोंडपाठ असून काय उपयोग जर तुम्हाला दादासाहेब फाळके म्हणजे कोण असा प्रश्न पडत असेल तर? आपल्या इंडस्ट्रीत उतरलाय ना काम करायला? म तिकडचे update ठेऊन काय आहे? माहिती जरूर असावी पण मग इथे काय चाललंय त्याकडेही हवं लक्ष ..वगैरे.
चांगली वाटली क्षिती जोगची मुलाखत.

https://youtu.be/uljSduh6-4Y?feature=shared

डॉ. प्रियदर्श यांनी कोव्हिड काळात आम्हाला खूप मदत केली होती. आम्ही पुण्याहून छत्तीसगडच्या सीमेवर लोक पाठवायचो. सीमेवरून छत्तीसगड आणि झारखंड इथे बसने घरपोच लोकांना नेण्याचं काम त्यांनी केलं. शिवाय डॉक्टरांची मोठी फौज उभी केली.

क्षिती जोग ची मुलाखत मलाही आवडली. त्यातलं एक वाक्य वेचून उगीचच त्यावर ट्रोलिंग सुरु आहे.
प्रसाद प्रकाशन च्या चॅनेल वर डॉ. अंजली पर्वते यांची देवी तत्त्वावर मुलाखत आहे.

मीही बघितली क्षितिची मुलाखत. हे दोघे नवरा बायको फार आपल्यातले वाटतात, कुठलाही आविर्भाव नाही की आम्ही या क्षेत्रात आहोत. कुठल्या वाक्यावरून ट्रोलिंग चालू आहे? चीन्मय मांडलेकर सुद्धा ट्रोल होत आहे मुलाचे नाव जहांगीर ठेवले आहे म्हणून.
मित्र म्हणेची पुरुषांवर होणारा अन्याय ह्या विषयावर बघितली मग स्त्रीयांवर होणाऱ्या अन्यायाविषयी आपसूक सुचवली गेली तीही बघितली ऍड रमा सरोदे यांची. गश्मीरच्या दोन मुलाखती बघितल्या, एक मित्र म्हणे आणि दुसरी कोणी दोन नवखी पोरे होती. गश्मीर छानच बोलतो फक्त आता वडील गेल्यावर हे एकतर्फी आहे असे वाटते.

ही मुलाखत नाही, लेक्चर टाईप आहे पण हे ऐकलं. ह्या डॉ. सुचेता परांजप्यांची मराठीतून पुस्तकं असतील तर वाचायला आवडतील. शोधायला हवीत.

https://youtu.be/uy8yyweLJWI?si=4qncADiXbA16WIj0

काल दिलीप प्रभावळकर यांची दिलं के करीब मधली मुलखात बघितली.
अर्थात गिफ्ट द्यायचा भाग पुढे करून (८ mins) ... नंतर ती जास्त बोलत नाही..
दिप्र असं एक व्यक्तिमत्त्व आहे की त्यांनी बोलत राहावं आणि आपण ऐकत बसावं अस वाटत.. त्यांच्या आधीही बऱ्याच मुलाखती बघितल्या आहेत.

ह्यात त्यांनी आई, भाऊ, बाबा, मुलगा , आणि बायको ह्यांचा त्यांच्या वाटचालीत कसा सहभाग आहे ते सांगितलय...
साळसूद म्हणून एक dd वर मालिका होऊन गेली... त्यात त्यांनी व्हिलन च काम केलेलं.. इतकं विचित्र अंगावर येणार पात्र होत..

मला ह्या मुलाखतीत ले प्रश्न आवडले... त्यांनी पण खूप खुलून उत्तर दिलियेत अस वाटलं.

***

थोड विषयांतर

मला पुलं खूपच आवडतात
तसच दि प्र, आणि मंगला गोडबोले पण खूप आवडतात.
नंतर कधी कळत त्या दोघांना प्रत्येकी पुलं खूप आवडतात किंवा प्रेरणास्थान वाटतात.. आणि जेव्हा ते पुलं विषयी बोलतात तेव्हा ते ऐकताना अजूनच विलक्षण अनुभव वाटतो.

बहिणाबाई खूप आवडतात..आणि जेव्हा पुलं बहिणाबाई विषयी लिहितात.. ते वाचताना इतकं छान वाटत..

डोक्यात काही वेगळीच equation/ relations तयार होतात असं काहीसं वाटतं..

काल विकट हास्यद्वयी चॅनेलवर चिन्मय मांडलेकरची मुलाखत लावली होती. >>>> ही विकट हास्यद्वयी ती नव्हे. हे वेगळे चॅनल आहे.

सध्या (अगदी 2 तासांपूर्वी रिलीज झालेली) समदिश भाटिया यांनी त्याच्या unfiltered by samdish या चॅनलवर विद्या बालनची घेतलेली मुलाखत पाहतोय. मुलाखत जी रंगली आहे, ती कमाल!!!! उत्तरोत्तर तिचा दर्जा खूपच वाढला आहे आणि ती दोन व्यक्तींची मुलाखत न होता दोन उच्चतर विचारांच्या pure व्यक्तींची झाली आहे. स्व - चा विचार, स्व घडवणुक आणि आत्मभान जागृती अशा विषयावर चर्चा आवडत असतील तर ही मुलाखत आवर्जून ऐका.
Link - https://youtu.be/LgYUWcqPwJg?feature=shared

मी चिन्ह आर्ट न्यूज या यु ट्यूब चॅनेल वरच्या जवळजवळ सर्व मुलाखती ऐकलेल्या आहेत. चित्रकार, शिल्पकार तर असतातच पण प्रवीण बर्दापूरकर, श्रीकांत बोजेवार या सारखे दिग्गज लोक सुद्धा असतात. तरुण कलाकारांच्या मुलाखती तर खूपच ऐकण्यासारख्या आहेत. त्यांचा प्रवास ऐकताना खिळून जायला होते

https://www.youtube.com/@ChinhaMagazine/videos

https://youtu.be/aiwDkFPnNb0?si=uKyL4N_zy5pgCTX1
https://youtu.be/6ZZniQ4vubw?si=0z3AxI9AdJL_H4JM

सौमित्र, गुरू ठाकुर, मिलिंद इंगळे, आणि संदीप खरे यांची सुधीर गाडगीळ ह्यांनी घेतलेली मुलाखत वाजा... २०११ का झालेला एक कार्यक्रम., विषय - निसर्ग आणि कवी
आवडला ..
सौमित्र, गुरू ठाकूर आणि सधिर गाडगीळ तिघही आवडतात..

Pages