Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34

भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राक्षस असतानाही सोन्यासारखा
राक्षस असतानाही सोन्यासारखा झळाळत असणार असा माझा कयास आहे. त्या क्वालिफिकेशनमुळे त्याची नेमणूक हरीण-हरण प्रकरणात झाली.
टरमरिक
टरमरिक आणि MDH
मला वाटलं मिरच्यांची शेती करणारा तो मरीच-माळी/ली.
सूर्यापासून हळद
सूर्यापासून हळद-मिरचीपर्यंत >>
धमाल व उत्तम चर्चा !
..
साठ झाले.>>>
चला, सूर्याला आपण 'ज्येष्ठ' तर करून टाकलं. आता तो सत्तरी गाठतोय का ते बघूया
विश्वाच्या पसाऱ्यात वयाने तो जेमतेम पस्तीशीतला आहे म्हणे !
मृगजळाला ‘मरिचिका’ असा शब्द
मृगजळाला ‘मरिचिका’ असा शब्द वापरलेला दिसला - या मृगाचा त्या मृगाशी काही (मार्गरायण?
) संबंध असेल का? 
मारीच ॲनिमॅगस होता म्हणजे.
>>> सूर्याला आपण 'ज्येष्ठ' तर करून टाकलं.

सहस्ररश्मि - हिंदीत खूपदा
सहस्ररश्मि - हिंदीत खूपदा येतो, महादेवी वर्मा, जयशंकर प्रसाद, निरालाजींच्या लेखनात. मराठीत नाही वाचला.
मरिचीमाली ! सुंदर शब्द.
सूर्य नमस्काराची चीट शीट
सूर्य नमस्काराची चीट शीट
गिरणीवाला / मिरच्यांची शेती करणारा तो मरीचमाली
रुक्मिणी आणि रुक्मी विको टरमरिक
जेष्ठ सूर्य, मार्गरायण संबंध
माबोकरांची प्रतिभा ओसंडून वाहते आहे मार्तंड कृपेने!
मार्तंड कृपेने! >>> अगदी !
मार्तंड कृपेने! >>> अगदी !
..
आतापर्यंतची साठ नावे ही सूर्य याअर्थीच प्रमाणशब्द म्हणून नोंदलेली आहेत.
धार्मिक दृष्टिकोनातून सूर्याची गुणवर्णनात्मक १०८ "नावे" इथे पाहता येतील :
https://divinemarathi.com/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%...
रुक्मिणी आणि रुक्मी विको
रुक्मिणी आणि रुक्मी विको टरमरिक, MDH, जेष्ठ सूर्य, मार्गरायण संबंध >>
राक्षस असतानाही सोन्यासारखा
राक्षस असतानाही सोन्यासारखा झळाळत असणार असा माझा कयास आहे. त्या क्वालिफिकेशनमुळे त्याची नेमणूक हरीण-हरण प्रकरणात झाली.

सगळीच चर्चा एकदम धमाल.
मायबोलीकर खूपच हुशार आहेत !
मला अगदी मित्र मैत्रिणींच्या ग्रुप मध्ये बसून गप्पा मारल्यासारखे वाटते...
It makes my day !
>>>>>>>>त्या क्वालिफिकेशनमुळे
>>>>>>>>त्या क्वालिफिकेशनमुळे त्याची नेमणूक

मार्गरायण, ज्येष्ठ सूर्य>>>
मार्गरायण, ज्येष्ठ सूर्य>>>
सूर्य आता ज्येष्ठ झाल्याने उषेकडून संध्येकडे अर्ध्या तिकिटात जाईल, ज्येष्ठांना प्रवासात सूट आहे.
मृगजळाला ‘मरिचिका’ असा शब्द वापरलेला दिसला ->>>
ॲनिमॅगसला आपल्याकडे 'मायावी' म्हणतात की
मृगजळ हेही आभासी- मायावी शिवाय misleading असते. त्यामुळे जुळते आहे असे वाटतेय.
अनिंद्य, हेही मार्तंड 'तापहीन'.
सहस्ररश्मि हा हिंदी साहित्यात अधिक आढळतो, खरं आहे.
चला,
चला,
सूर्यपुराणाची आता सांगता झाली असे म्हणता येईल !
मग नवीन शब्द द्या नाहीतर
पटकन नवीन शब्द द्या नाहीतर आम्ही तेचतेच बोलू.
.. नवीन शब्द द्या नाहीतर..,,
.. नवीन शब्द द्या नाहीतर..,,
इथल्या (सध्यातरी) “तापहीन” मार्तण्डांचा ताप होईल तुम्हाला
बरं घ्या . . . आता शब्द
बरं घ्या . . . आता शब्द ओळखायला देतो :
त्याचे तीन अर्थ :
एक झाड
एक वाद्य आणि
एक जंगली प्राणी
बस ! सध्या एवढीच माहिती पुरे.
किती अक्षरी ते देत नाही. पर्यायी उत्तर आले तरी चालेल . . .
काही क्षणांसाठी “तापहीन”
काही क्षणांसाठी “तापहीन” होणारा मार्तंड नुकताच अनुभवला आहे.
मार्चेंड मात्र तापदायच गेला
मार्चेंड मात्र तापदायच गेला सालाबादाप्रमाणे.
झाड आणि वाद्य म्हणून वेळू
झाड आणि वाद्य म्हणून वेळू/वेणू म्हणणार होते, पण जंगली प्राणी?!
दिनकर हा साधा सोपा शब्द
दिनकर हा साधा सोपा शब्द कोणीतरी लिहील म्हणून वाट बघत होतो.
आणि नभोमणि.
>>> दिनकर हा साधा सोपा शब्द
>>> दिनकर हा साधा सोपा शब्द कोणीतरी लिहील म्हणून वाट बघत होतो.
तुम्ही लिहाल म्हणून आम्ही वाट बघत होतो.
'दिनूचे बिल' राहिलेच की
'दिनूचे बिल' राहिलेच की
दिनकर झाला होता. कुमार सरांनी
दिनकर झाला होता. कुमार सरांनी मोठी यादी दिली आहे वरती. तेजोनिधी लोहगोल वगैरे राहिलं असावं. पण आता सांगता झाली म्हणून सांगता तर नवीन कोड्याचं उत्तर सांगता येईल का ते बघतो.
दिनूचे बिल >>
दिनकर नॉट दिवाकर, हर्पा
दिनकर नॉट दिवाकर, हर्पा.
रिक्षाधिनाथमित्र म्हणजे रिक्षावाल्यांचा मित्र का?ओ सॉरी.
ओ सॉरी.
रिक्षावाल्यांचा मित्र
. . शब्द ओळखायचाय : ३ अक्षरी
. . शब्द ओळखायचाय : ३ अक्षरी
त्याचे तीन अर्थ :
एक जंगली झाड
एक वाद्य आणि
एक जंगली प्राणी
प्रयत्न करतो.
प्रयत्न करतो.
उंदीरमारी किंवा गिरिपुष्प या झाडाला बंगालीत सारंग म्हणतात (असं गुगलने सांगितलं). सारंग म्हणजे हरीण. सारंगी हे एक वाद्य आहे. शिवाय सारंगी एक मासासुद्धा आहे.
आतापर्यंतचे प्रयत्न चांगले
आतापर्यंतचे प्रयत्न चांगले झालेले आहेत.
ओळखायच्या शब्दाच्या तिसऱ्या अक्षरावर अपभ्रंश झालेला असून त्यामुळे त्याची दोन रुपे आहेत.
शब्दाला कुठलाही प्रत्यय न लावता ( मूळ जसा आहे तशाच स्वरूपात) तीन अर्थ आहेत.
चिकारा / चिकाडा
चिकारा / चिकाडा
चिकारा सतारी सारखे वाद्य
चिकारा = काळवीट
चिकाडा एक दुधाळ चीक देणारी वनस्पती
मानव, छान पर्यायी उत्तर !
मानव, छान पर्यायी उत्तर !
अपेक्षित वेगळे आहे. कोणी शोधत असल्यास स्वागत
अपेक्षित शब्दातला प्राणी
अपेक्षित शब्दातला प्राणी वाघ आहे.
कोणाला शब्दासाठी प्रयत्न करायचा असल्यास करू शकता. नाहीतर जरा वेळाने उत्तर लिहीन.
Pages