चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेरी बातो मे...पाहिला , ठीक वाटला, फुल ऑन कॉमेडी करायला भरपुर स्कोप होता >>> + १००००
मला मध्ये मध्ये कंटाळा आला तो भाग पुढे ढकलत पाहिला .
क्रिती खरोखर सुन्दर दिसते , शाहिद पण एक्दम भारी .
आवडलेल्या गोष्टी - डिम्पलच घर , डिम्पल , मावशी आणि भाच्याच नातं , क्रिती ची रोबोट अ‍ॅक्टीन्ग (शेवटी शेवटी जेन्व्हा सगळी गडबड होते ) , एक फॅन्टसी कथा आणि कथेचा पटण्यासारखा शेवट . ( कोणाला काय स्पष्टीकरणं दिलीत तो भाग गाळलाय , नो मेलोड्रेमा देअर ) . धक्धक डान्स भारी आहे , क्रिती रॉक्स .
न आवडलेल्या/पटण्यासारख्या गोष्टी - स्वतं एक रोबोटीक ईन्जीनिअर असून शाहिद मावशीच्या कंपनीत , हॅमलेज मध्ये शिरलेल्या लहान मुलासारखा दिसतो , रोबोट कितीही माणसासारखा बनवला तरीही ..... far stretched , टोमॅटो पचणार नाही म्हणून सोय असते शरीरात तर बाकीच्या गोष्टी शाहिदला कळू नयेत ईतक्या हुबेहुब ?? Happy , तो मॉन्टी की कोण तो मित्र अजिबातच आवडला नाही , घरात पसाभर लोक आहेत पण एकाचही कॅरेक्टर एस्तब्लिश होत नाही किन्वा कोणी फारस लक्शात रहात नाही . फक्त एक मोठी हॅपी फॅमिलीच्या नावाखाली लोक आहेत , सगळ्यात शेवटचा गेस्ट अपीअरन्स - एक्दम ओम फट स्वहा ! .

स्वस्ति Lol (तेरी बातोंमें कधीकधी आवडला, कधीकधी कंटाळा आला. शेवटचा बिघडलेला भाग मलाही आवडला). कृती सनन दिसायला आवडत नाही पण काम बरंच चांगलं करते. ती युट्युबवरच्या बॉलीवुड पार्ट्यातल्या ड्रेसेसमधे जास्त Gorgeous दिसते.

ते शेवटचा गेस्ट अपीरंस असेच ठिगळ असते. गमतीने घ्यायचे असते. कभी हा कभी ना मध्ये कशी शाहरुखला जुही भेटते. तसेच हे. हॅपी एंडिंग. तेवढेच माझ्यासारख्या पब्लिकला बरे वाटते. चला भेटली कोणीतरी. कारण आम्ही स्वताला हिरो जागी ठेवून पिक्चर बघत असतो Happy

सुचित्रा कृष्णमूर्ती ऐवजी जुही भेटणे बेस्ट आहे
किंवा मेला मध्ये फैजल ला ऐश्वर्या भेटणे.
पण क्रिती ऐवजी झानवी भेटणे थोडा तोट्याचा व्यवहार वाटला.

इथले प्रतिसाद वाचून अनेक सिनेमे नाही पाहिले. त्यात तेरी बातों मे ची आणखी एक भर.
( जसं काही नसतं लिहीलं तर लगेच बघणार होतो Lol )

तेरी बातों मे वरून एक सिनेमाचं नाव सारखं आठवत होतं. आमीर, जुही , नाग , नागीन आहे म्हणून आठवून तेरी बाहो मे शोधला तर त्यात मदर टायगर आणि न्यूटन्स सन !

पण क्रिती ऐवजी झानवी भेटणे थोडा तोट्याचा व्यवहार वाटला >>> हो हे खरे आहे Proud पण सौंदर्याचे निकष प्रत्येकाचे वेगळे असतात. आणि ते लावता जान्हवी जास्त भारी वाटणारे सुद्धा बरेच असतील.. नव्हे आहेत Happy

ज्वेल थीफ ज्यांना ज्यांना आवडला असेल त्यांच्यासाठी..
निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक यांनी मिळून ज्वेल थीफच्या प्रेक्षकांवर भयाण सूड का उगवावा याचे उत्तर "रिटर्न ऑफ ज्वेल थीफ" पाहून द्यावे. सगळे थकेले नायक, पन्नाशीतल्या धर्मेंद्रापेक्षा अलिकडचे फिफ्टी प्लस, सिक्स्टी प्लस नायक जास्त ताजेतवाने वाटतात. रजनी तर ७३ आहे. जॅकी श्रॉफ सारखा देखणा नट यात पण वयस्कर वाटत होता. तरूण एकच होता देव आनंद. टॉर्चर आवडत असेल तर चुकवू नका.

उतारा म्हणून "ए वतन मेरे वतन" पाहिला. ठीक आहे. उषा मेहता यांच्या कार्याची माहिती झाली. उषा मेहता पथ कुठेतरी पाहिला आहे. बहुतेक मुंबईत. राम मनोहर लोहिया यांच्याबद्दल पण फारशी माहिती नव्हती. आता मिळवून वाचाविशी वाटते.

नवीन Submitted by रघू आचार्य on 11 April, 2024 - 14:

पण सस्पेन्स भारी होता
ज्या वेळी चित्रपट आला स्पर्धा पण भरवली होती कि ज्वेल थिफ ओळ्खा

>>पण क्रिती ऐवजी झानवी भेटणे थोडा तोट्याचा व्यवहार वाटला >>> हो हे खरे आहे Proud पण सौंदर्याचे निकष प्रत्येकाचे वेगळे असतात. आणि ते लावता जान्हवी जास्त भारी वाटणारे सुद्धा बरेच असतील.. <<
सिनेमात जान्हवी पण ह्युमनॉय्ड आहे?

पण क्रिती ऐवजी झानवी भेटणे थोडा तोट्याचा व्यवहार वाटला >>> हो हे खरे आहे Proud पण सौंदर्याचे निकष प्रत्येकाचे वेगळे असतात. आणि ते लावता जान्हवी जास्त भारी वाटणारे सुद्धा बरेच असतील.. नव्हे आहेत Happy

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 April, 2024 -

जेव्हा क्रिति लौन्च झाली तेव्हा कोणाला लक्शात पण आली नव्हती ,दिल् वाले मधे शाखा म्हणून कोण्त्या तरी डाउन मार्केट बरोबार आली तेवा तर चित्रपट परिक्शण. कर् ण्या र्यानि तिला झोडपले होते , ताड माड उन्चि चि म्हणून
बरेली कि बर्फी मधुन फक्त पुढे आली

अगं साडे तीन मिनिटंच आहे झानवी.तिने काही नातं बनवलेलं नाही त्याच्याशी.
अरे, पोतं वाली कमेंट,मला का आठवत नाहीये?

पण सस्पेन्स भारी होता
ज्या वेळी चित्रपट आला स्पर्धा पण भरवली होती कि ज्वेल थिफ ओळ्खा >>> रिटर्न ऑफ च्या वेळी पण ? आठवत नाही.

अन्जुताई!
झावी एखाद -दोन मिनिटच आहे शेवटी...त्यावरुन नका कॅन्सल करु...टाइमपासला बरा आहे.

सिनेमात जान्हवी पण ह्युमनॉय्ड आहे? >> खोच कळली Wink

'तेरी बातोंमें ऐसा उलझा जिया' मधे कुणीही कुणाला मिळतबिळत नाही बिनधास्त बघा. जाह्नवी आली की नावं आली समजून बंद केला तरी चालेल. Lol

तेरी बातो में बघायचा अतोनात प्रयत्न केला. चिकाटी कशी बशी अर्धा तासचं टिकली माझी. Sad मला आवडतात हलके फुलके romcom मूवी पण हा अगदीच bored झाला. Patience level कमी व्हायला लागली आहे वाटत.

ज्या वेळी चित्रपट आला स्पर्धा पण भरवली होती कि ज्वेल थिफ ओळ्खा >>> रिटर्न ऑफ च्या वेळी पण ? आठवत नाही.

नवीन Submitted by रघू आचार्य on 16 April, 2024 - 20

>>>

https://imgur.com/a/sNsVg9W

लाल रन्ग बघा

तेरी बातोमें पाहिला.. १ टाईं वॉच म्हणायला हरकत नाही. डिंपल चे केस रोपण मस्त झाले आहे.. भरगच्च केस :डोल्यात बदाम :

सगळ्यात शेवटचा गेस्ट अपीअरन्स - एक्दम ओम फट स्वहा>>> अगदी अगदी तोट्याचच व्यवहार Sad त्यात अशी क्वेरी घेऊन कोण येतं की मला प्रेमात लक नाही यंव नी त्यंव..आणि सरळ शट अप..वा ३० सेकंदात मैत्री इतकी जवळ झाली.. Wink

कृती सनन दिसायला आवडत नाही>>> सुनिधी... Uhoh बेशुद्ध पडणारी बाहुली. खरंच एक एकेकाचे सौंदर्य निकश वेगवेगळे..

मला क्रिती चे रोबोट चे काम आवडले.. शाहिद त्रासलेला दिसल की सेम एक्सप्रेशन ने विचारते, आर यु अपसेट? होस्पिटलात गंभीर वेळी जवळ येणे वगैरे Lol

romcom मूवी पण हा अगदीच bored झाला. Patience level कमी व्हायला लागली आहे वाटत.>> रील्स जास्त बघता का? त्यामुळे पण असे होते.

@धीरज रील्स नाही बघत पण you ट्यूब बघते आणि shorts, त्याने झालंय काय की इतकं सगळं पसारलेल असत फोन च्या स्क्रीन वर की सगळं थोडा थोडा वेळ scroll केल जात. आणि असं करत काहीच आवडत नाही. आधी मी चिकाटीने आवडला नाही तरी बघायचे मूवी etc., काहीतरी आवडेल या आशेने :), आता प्रॉब्लेम ऑफ plenty रोग झालाय बहुतेक मला

चित्रपट फोनवर नाही बघायचे.
टीव्ही वर बघावेत. आता छान मोठ्या स्क्रीन असतात. त्यामुळे लॅपटॉपवर सुद्धा नाईलाज असेल तरच बघावे.
चित्रपट मोठ्या पडद्यासाठी बनवले असतात. शक्य तितका न्याय द्यावा.
अर्थात हे वैयक्तिक मत झाले. मी कधी लांबच्या प्रवासात ट्रेन मध्ये टाईमपास म्हणून सुद्धा मोबाईल स्क्रीन वर चित्रपट बघत नाही. मजाच येत नाही. इच्छाच होत नाही.

>>सिनेमात जान्हवी पण ह्युमनॉय्ड आहे? >> खोच कळली<<
माय फेथ इन माबो अक्युइटि इज रिस्टोर्ड... Proud

मला ती मख्खपणे शाहिद कपूर समोर आली तेव्हा खरोखरच ह्युमनोईड वाटली होती.की सिफ्रा नको तर अजून चांगलं व्हर्जन आलं वगैरे.

Pages