नाम नामेति नामेति
" नाव काय ठरलं शेवटी मुलीचं?"
" एकदम यूनिक ठेवलंय,अवीरा."
" अवीरा? काय अर्थ होतो या नावाचा?"
" बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल; कसं वाटलं नाव?"
"अवीरा म्हणजे बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल हा अर्थ तुम्ही कुठे शोधलात ?"
" गुगल बाबा आहे ना, मॉम जंक्शन नावाची एक साईट आहे तिथे मिळाले हे नाव. चांगलं नाव आहे ना?"
हे नाव हिंदू आहे?
१०० टक्के .का?
अवीरा नावाचा अर्थ होतो पुत्र आणि पतीरहित स्त्री. नास्ति वीरः पुत्त्रादिर्यस्याः सा अवीरा.
म्हणजे ही मुलगी आजन्म कुमारी असेल किंवा.... जाऊ द्या.
आता काय करायचं? बर्थ सर्टिफिकेटवर हेच नाव आहे.
मॉम जंक्शन पेक्षा ललिता सहस्रनाम वाचले असतेत तर हजारो नावं मिळाली असती.सत्तावीस नक्षत्रांची नावं माहिती नाहीत का तुम्हाला? आता काय उपयोग? ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.
आजकाल काहीतरी हटके करायच्या नादात बाष्कळपणाचा ट्रेंड चाललाय. मुलगी झाली की मियारा, शियारा, कियारा, नयारा, मायरा, टियारा, अल्मायरा ... मुलगा झाला तर वियान, कियान, गियान, केयांश. गोमांश.. आणि त्याचा अर्थ विचारला कि घे गुगल, घे याहू ...... मग उत्तरं देतील इट मीन्स रे ऑफ लाइट.;इट मीन्स गॉड्स फेवरेट.इट मीन्स ब्ला ब्ला..
हे असं यूनीक नाव ठेवायच्या नादात मिसेस शहा नी तिच्या मुलीचं नाव श्लेष्मा ठेवलं. मी तर चकितच झाले. मी तिला विचारलं, काय गं भावना, श्लेष्मा म्हणजे काय?
तिनं काय उत्तर दिलं असावं? ती म्हणाली, श्लेष्माचा अर्थ होतो,जिच्यावर आईची कृपा आहे " . मी डोकं गच्च धरून बसले. मला असं बघून ती म्हणाली, का गं, काही चुकलं कि काय?"
मी म्हणाले, काय गं, तुझ्या मुलीला सारखी सर्दी असते, नाक गळत असतं असं काही आहे का?
नाही, असं काहीच नाही, का ?
अगं श्लेष्माचा अर्थ शेंबडी मुलगी, श्लेष्म म्हणजे नाकातला कचरा, मेकुड.
तिचा चेहरा पाहण्यालायक झाला. काय करणार होती ती? तिलाही तेच सांगितलं, ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.
फॅशनेबल कपडे घालायच्या लाटेत अर्थहीन, अनर्थकारी, बेढब शब्दांचा प्रयोग समाज आपल्या संततीच्या नावासाठी करू लागलाय. नाव द्यायचा अधिकार आजी, आजोबा, गुरु, आत्याबाई यांच्याकडेच राहू द्या ना. तेच हिताचं नाही का?
व्यक्तीचे नाव आणि दैव यांच्यात एक नशिबाचा दुवा असतो म्हणून चांगले, शुभ नाव ठेवावे . नामाखिलस्य व्यवहारहेतु: शुभावहं कर्मसु भाग्यहेतु:। नाम्नैव कीर्तिं लभते मनुष्य-स्तत: प्रशस्तं खलु नामकर्म। ब्राह्मणांनी देव देवतेची नवे ठेवावीत , क्षत्रियांनी वीरता दिसेल अशी नावे ठेवावीत , उदा रिपुदमन , वीरेंद्र , ,प्रताप , राजेंद्र इत्यादी , वैश्यांनी संपत्ती दर्शक नावे ठेवावीत , उदा लक्ष्मीकांत लक्ष्मीधर, इत्यादी. आयुर्वर्चो sभिवृद्धिश्च सिद्धिर्व्यवहृतेस्तथा । नामकर्मफलं त्वेतत् समुद्दिष्टं मनीषिभि:। मुलांची नावे कशा प्रकारे ठेवावीत या बद्दल पारस्करगृह्यसूत्र मध्ये असा श्लोक आहे, द्व्यक्षरं चतुरक्षरं वा घोषवदाद्यंतरस्थं। दीर्घाभिनिष्ठानं कृतं कुर्यान्न तद्धितम्।।अयुजाक्षरमाकारान्तम् स्त्रियै तद्धितम्। नवा पण तीन प्रकारची; देवनाम, नक्षत्रनाम आणि व्यावहारिक नाम. कुंडलीतले नाव व्यवहारात नको कारण कोणी आपल्यावर जादू टोणा, जारण मारण, करणी संमोहन इत्यादी करत असेल तर त्या साठी नक्षत्र नावाची गरज असते. व्यवहारातल्या नावावर त्याचा प्रभाव पडत नाही.आपले नक्षत्र नाव सहसा कुणाला सांगायचे नसते हे ही लक्षात ठेवा.
तुमच्या समोरच्या फ्लॅट मध्ये राहणारे मिस्टर चुडासमा, त्यांच्या मुलाचं नाव ठाऊक आहे का?
होय. अनल नाव आहे.
काय स्पेलिंग कराल तुम्ही या नावाचं?
एएनएएल
याचा अर्थ इंग्रजीत काय होतो ते ही बघा एकदा गुगलवर. मुलाला त्यांनी इंग्रजी शाळेत घातलेय.
.............
टापुर आणि टिपूर . हृषीकेश
टापुर आणि टिपूर . हृषीकेश मुर्खर्जींच्या नातींची नावं. >>> या मॉडेल्स होत्या ना?
नशीब कुठल्या मुलाचं नाव लघव
नशीब कुठल्या मुलाचं नाव लघव असं नसतं.)))
लाघवी नावाची एक वृत्तनिवेदीका आहे कुठल्यातरी वाहिनीवर...
माझ्या पहाण्यात नुकतेच विशा
माझ्या पहाण्यात नुकतेच विशा(षा)द हे नांव आले. ह्याचा अर्थ काय अभिप्रेत असावा ठेवताना? आणि ही व्यक्ती ५०+ वयाची आहे. त्यामुळे आजकालच्या प्रथे नुसार हे ठेवले गेले नसावे. त्यावेळी ह्या मुलाच्या जन्माने असा काय विषाद वाटला असावा मातापित्यांना?
गावी एका मुलाचं नाव 'अध्ययन'
गावी एका मुलाचं नाव 'अध्ययन' ठेवलं होतं.
त्या नावाचा अपभ्रंश होऊन गावची लोकं त्याला 'आदेन' हाक मारू लागली.
आणि मग हळूहळू त्या आदेन चा लादेन कधी झाला हे त्या मुलाला कळलं सुद्धा नाही.
अय्यय्यो
अय्यय्यो
ते वृष्टि पडे होतं होय?
मी आतापर्यंत इश्क करे टापुर टिपुर च ऐकत आलोय.
विशाद
विशाद
शाळेत ल च्या जागी द केले असेल.
काळे आडनावाच्या मुलाचे नाव अविनाश ठेवावे आणि गुरूजींनी नीट न ऐकू आल्याने अ खाऊन टाकावा.. तसंच असेल प्रकरण.
एवढ्या चर्चेत हे कसे काय
एवढ्या चर्चेत हे कसे काय आठवले नाही :-). १५/२० वर्षांपूर्वी माझ्या मावशीच्या कॉलनी मध्ये एका मुलाचे नाव
संगणक ठेवले होते. त्या नावावरून आम्ही खूप जोक्स करायचो.
आमच्या इमारतीत आमच्या खालच्या
आमच्या इमारतीत आमच्या खालच्या फ्लॅट मध्ये राहणाऱ्याचे नाव सजीव आहे.
याबद्दल मी मागे गप्पांच्या धाग्यावर लिहिले होते.
आमची भेट इमारतीतीलच एक लहान मुलीच्या पहिल्या वाढदिवशी झाली. तेव्हा आमच्या खालील फ्लॅट मध्ये नुकतेच भाडयाने राहायला आले होते. ओळख झाल्यावर त्याने नाव सांगितले तेव्हा मी खात्री करायला परत विचारले.
मग आम्ही बोलत उभे होतो. तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला होता की मी जर इथे माझे मायबोलीवरील नाव सांगितले असते, आणि मग कुणी तिसऱ्याने इतरांना आमची ओळख करून दिली असती "हे सजीव मानव आहेत" तर लोक म्हणाले असते "वा! काय मौलिक माहिती पुरवलीत!"
, तसं शब्दरूप होऊ शकेल. माधव
, तसं शब्दरूप होऊ शकेल. माधव - माधवी असतं तसं. पुल्लिंगी नामांना ङीप् किंवा टाप् हे प्रत्यय लावून संस्कृतात अनुक्रमे ई किंवा आ लागून स्त्रीलिंगी नामे करता येतात.>>>> धन्यवाद हर्पा. माहिती बद्दल.
अत्ता माझ्या लेकाने सांगितलं "जाज्वल्य अभिमान मराठे" असं एकाच पूर्ण नाव आहे.प्रगल्भ पण नाव असतं !! अशा नावांचा मुलगा मॅच्युरिटी च्या नावाने बोंब असेल तर?
संजीव, संगणक काय एकेक नावं
सजीव, संगणक काय एकेक नावं आहेत!
प्रगल्भ आणि प्रत्यंचा अशी
प्रगल्भ आणि प्रत्यंचा अशी माझ्या आते भावाच्या मुलांची नावं आणि अगाध- शतरुपा अशी त्याच्या बहिणीच्या मुलांची!
प्रत्यंचा माझ्या मित्राच्या
प्रत्यंचा माझ्या मित्राच्या मुलीचेही नाव आहे.
प्रद्युम्न धृष्टद्युम्न
प्रद्युम्न धृष्टद्युम्न मार्कंडेय असे नाव वाचल्याचे आठवते.
खरे आहे की नाही, माहीत नाही.
आजच्या काळात प्रत्त्यंचा
आजच्या काळात प्रत्त्यंचा सिग्रेटच्या ब्रॅंडचं नाव केलं पाहिजे. प्रत्यंचा ओढून येतो.
(No subject)
प्रत्त्यंचा सिग्रेटच्या
प्रत्त्यंचा सिग्रेटच्या ब्रॅंडचं नाव >>
सगळेच धनुर्धारी छाती फुगवून पराक्रम सांगतील .
माझ्या वर्गातल्या एका मुलीचं
माझ्या वर्गातल्या एका मुलीचं नाव वैज्ञानिका होतं. तिच्या मावशीने की कोणीतरी ठेवलेलं.
आता काय करते ती ?
आता काय करते ती ?
आमच्या ऑफिसमध्ये रावसाहेब
आमच्या ऑफिसमध्ये रावसाहेब आहेत. आमच्याच टीम मध्ये आहेत. तरीही जवळपास वर्षभराने मला समजले की ते त्यांचे नाव आहे. आडनाव नाही.
कोण??? मावशी!
कोण??? मावशी!
रावसाहेब, बाळासाहेब हे।कॉमन
रावसाहेब, बाळासाहेब हे।कॉमन नाव आहे तसे
मावशी नाही वैज्ञानिका.
मावशी नाही वैज्ञानिका.
आमच्या गावाच्या आसपास कुठेतरी एका मुलाचं नाव राष्ट्रपती ठेवलं होतं. शाळेत मास्तरांनी ते बदलून राष्ट्रपाल केलं.
त्याच्या कारकिर्दीची दैदीप्यमान सुरूवात तलाठी पदाने झाली. आता तहसीलदार आहे.
गावातले लोक म्हणतात राष्ट्रपतीला पण एव्हढी कमाई नसते.
अध्ययन हे शेखर सुमन यांच्या
अध्ययन हे शेखर सुमन यांच्या मुलाचे नाव आहे
तथागत हे एक नाव आठवले
तथागत हे एक नाव आठवले
समाधान नाव पण ऐकलं होतं.
समाधान नाव पण ऐकलं होतं.
"धनगरी जीवन" नावाचा u tube
"धनगरी जीवन" नावाचा u tube चॅनेल आहे. त्यानं कुत्र्यांचं नाव आमदार ठेवलंय...हाय की नाय भन्नाट नाव. दिवसरात्र मेंढ्याचा कळप राखतो असा इमानी आमदार आहे हा.
रावसाहेब, बाळासाहेब हे।कॉमन
रावसाहेब, बाळासाहेब हे।कॉमन नाव आहे तसे
>>>
अच्छा.. मला वाटायचे या पदव्या मिळतात नंतर.. किंवा आडनावे असतात..
पाळण्यातल्या बाळाचेच नाव कुणी असे ठेवील हे वाटलं नव्हतं
मी माझ्या मुलाचं नावं अगस्त्य
मी माझ्या मुलाचं नावं अगस्त्य ठेवणार होते पण त्याच्या बाबाला आवडले नाही म्हणून शेवटी बारगळले. बाबाने का नको ते नावं हे मला पटवताना एक अतिशय पांचट जोक मारला होता ज्याने माझा उस्साह च मावळला त्या नावाचा. तो म्हणे की पोराची भांडण झाली की मित्र त्याला ए अग्या हग्या म्हणून चिडवतील.
न्यूझीलंडच्या एका खेळाडूचे
न्यूझीलंडच्या एका खेळाडूचे नाव राचिन आहे, त्याच्या बाबांच्या आवडीचे राहुल (द्रविड) व सचिन (तेंडुलकर) यांच्या नावाचे मिश्रण करून नाव ठेवले.
राचिन दोघांच्याहि तोडीचा फलंदाज होऊ शकेल असे सध्या वाटते आहे.
प्रत्यंचा ओढून येतो >>>
प्रत्यंचा ओढून येतो >>>
बाकी नावाचा अर्थ आणि ते लोक प्रत्यक्ष आयुष्यात काय करतात किंवा काय स्वभावाचे आहेत यात तफावत असणं हे काही नवीन नाही. नाव सोनुबाई नि हाती कथलाचा वाळा - ही जुनी म्हण आहेच की. नाव राजेभोसले आणि चालवायची पिठाची गिरणी - हे उदाहरण अनेकांना आठवेल.
Pages