नाम नामेति नामेति

Submitted by Revati1980 on 24 March, 2024 - 02:06

नाम नामेति नामेति

" नाव काय ठरलं शेवटी मुलीचं?"

" एकदम यूनिक ठेवलंय,अवीरा."

" अवीरा? काय अर्थ होतो या नावाचा?"

" बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल; कसं वाटलं नाव?"

"अवीरा म्हणजे बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल हा अर्थ तुम्ही कुठे शोधलात ?"

" गुगल बाबा आहे ना, मॉम जंक्शन नावाची एक साईट आहे तिथे मिळाले हे नाव. चांगलं नाव आहे ना?"

हे नाव हिंदू आहे?
१०० टक्के .का?

अवीरा नावाचा अर्थ होतो पुत्र आणि पतीरहित स्त्री. नास्ति वीरः पुत्त्रादिर्यस्याः सा अवीरा.
म्हणजे ही मुलगी आजन्म कुमारी असेल किंवा.... जाऊ द्या.

आता काय करायचं? बर्थ सर्टिफिकेटवर हेच नाव आहे.
मॉम जंक्शन पेक्षा ललिता सहस्रनाम वाचले असतेत तर हजारो नावं मिळाली असती.सत्तावीस नक्षत्रांची नावं माहिती नाहीत का तुम्हाला? आता काय उपयोग? ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.

आजकाल काहीतरी हटके करायच्या नादात बाष्कळपणाचा ट्रेंड चाललाय. मुलगी झाली की मियारा, शियारा, कियारा, नयारा, मायरा, टियारा, अल्मायरा ... मुलगा झाला तर वियान, कियान, गियान, केयांश. गोमांश.. आणि त्याचा अर्थ विचारला कि घे गुगल, घे याहू ...... मग उत्तरं देतील इट मीन्स रे ऑफ लाइट.;इट मीन्स गॉड्स फेवरेट.इट मीन्स ब्ला ब्ला..
हे असं यूनीक नाव ठेवायच्या नादात मिसेस शहा नी तिच्या मुलीचं नाव श्लेष्मा ठेवलं. मी तर चकितच झाले. मी तिला विचारलं, काय गं भावना, श्लेष्मा म्हणजे काय?
तिनं काय उत्तर दिलं असावं? ती म्हणाली, श्लेष्माचा अर्थ होतो,जिच्यावर आईची कृपा आहे " . मी डोकं गच्च धरून बसले. मला असं बघून ती म्हणाली, का गं, काही चुकलं कि काय?"

मी म्हणाले, काय गं, तुझ्या मुलीला सारखी सर्दी असते, नाक गळत असतं असं काही आहे का?

नाही, असं काहीच नाही, का ?

अगं श्लेष्माचा अर्थ शेंबडी मुलगी, श्लेष्म म्हणजे नाकातला कचरा, मेकुड.

तिचा चेहरा पाहण्यालायक झाला. काय करणार होती ती? तिलाही तेच सांगितलं, ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.
फॅशनेबल कपडे घालायच्या लाटेत अर्थहीन, अनर्थकारी, बेढब शब्दांचा प्रयोग समाज आपल्या संततीच्या नावासाठी करू लागलाय. नाव द्यायचा अधिकार आजी, आजोबा, गुरु, आत्याबाई यांच्याकडेच राहू द्या ना. तेच हिताचं नाही का?

व्यक्तीचे नाव आणि दैव यांच्यात एक नशिबाचा दुवा असतो म्हणून चांगले, शुभ नाव ठेवावे . नामाखिलस्य व्यवहारहेतु: शुभावहं कर्मसु भाग्यहेतु:। नाम्नैव कीर्तिं लभते मनुष्य-स्तत: प्रशस्तं खलु नामकर्म। ब्राह्मणांनी देव देवतेची नवे ठेवावीत , क्षत्रियांनी वीरता दिसेल अशी नावे ठेवावीत , उदा रिपुदमन , वीरेंद्र , ,प्रताप , राजेंद्र इत्यादी , वैश्यांनी संपत्ती दर्शक नावे ठेवावीत , उदा लक्ष्मीकांत लक्ष्मीधर, इत्यादी. आयुर्वर्चो sभिवृद्धिश्च सिद्धिर्व्यवहृतेस्तथा । नामकर्मफलं त्वेतत् समुद्दिष्टं मनीषिभि:। मुलांची नावे कशा प्रकारे ठेवावीत या बद्दल पारस्करगृह्यसूत्र मध्ये असा श्लोक आहे, द्व्यक्षरं चतुरक्षरं वा घोषवदाद्यंतरस्थं। दीर्घाभिनिष्ठानं कृतं कुर्यान्न तद्धितम्।।अयुजाक्षरमाकारान्तम् स्त्रियै तद्धितम्। नवा पण तीन प्रकारची; देवनाम, नक्षत्रनाम आणि व्यावहारिक नाम. कुंडलीतले नाव व्यवहारात नको कारण कोणी आपल्यावर जादू टोणा, जारण मारण, करणी संमोहन इत्यादी करत असेल तर त्या साठी नक्षत्र नावाची गरज असते. व्यवहारातल्या नावावर त्याचा प्रभाव पडत नाही.आपले नक्षत्र नाव सहसा कुणाला सांगायचे नसते हे ही लक्षात ठेवा.
तुमच्या समोरच्या फ्लॅट मध्ये राहणारे मिस्टर चुडासमा, त्यांच्या मुलाचं नाव ठाऊक आहे का?

होय. अनल नाव आहे.

काय स्पेलिंग कराल तुम्ही या नावाचं?

एएनएएल

याचा अर्थ इंग्रजीत काय होतो ते ही बघा एकदा गुगलवर. मुलाला त्यांनी इंग्रजी शाळेत घातलेय.

.............

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

@मनिम्याऊ - मला ३ महिन्या पूर्वी मुलगा झाला. या वेळी मुलगी होईल असे वाटून मी काही नावे shortlist केली होती. तुमच्या दिर- जावेच्या नावाचे कॉम्बिनेशन मध्ये Manodhnya / मनोज्ञा एक सुचतंय.
मी shortlist केलेली नावे ही आहेत
उर्मी
मनस्वी
नभा
द्विजा
व्योमा
इशानी
शगुन
हृता
अन्विता
ओजस्वी
अनिना
आभा
अव्याना
ध्रीती
किमया
श्रिया

व्योमा किती सुंदर नाव आहे. नक्की भरारी घेणारच मुलगी. मोकळं आकाश.

'मी एक पक्षीण आकाशवेडी
दुजाचे मला भान नाही मुळी' - ही कविता आठवली.

'असं एखादं पाखरु वेल्हाळ,
त्याला सामोरं येतया आभाळ'

व्योमा नि तां त सुंदर वाटलं मला. नभाही छान आहे पण व्योमाची उत्तुंगता नाही.

माझ्या पहिल्या मुलाचे नाव श्लोक आहे. दुसऱ्या मुलाचे नाव सुचवा ना please.
अभंग हे नाव सोडून Happy दुसरे कुठले नाव जे पहिल्या मुलाच्या नावसोबत जुळणारे असेल. (अर्थाने जुळणारे किंवा श/श्र या अक्षराने जुळणारे )
अर्चित, आव्यान, व्योम, शर्वीन हे नावं shortlist केले आहेत. श्र्लोक चा एक अर्थ प्रार्थना हा होतो आणि अर्चित चा अर्थ देखील मिळता जुळता आहे म्हणून माझ्या मोठ्या मुलाला ते नाव आवडले आहे.
माझ्या मते अर्चित म्हणजे ज्याचे अर्चन म्हणजे पूजा झाली आहे तो..म्हणजेच पूजनीय . हा अर्थ योग्य आहे का? तसेच शर्वीन चा अर्थ काय असावा ?
आणि अजून काही नावे सुचवायला व्यासंगी मायबोलीकरांनी मदत करा ना..

सुनीत

महिषा = म्हैस आणि महाराणी/ साम्राज्ञी दोन्ही होईल बहुतेक

वर प्राणनाथ आलाच आहे, यावरून “म्हशीचा प्राणनाथ” आठवले. म्हणजे रेडाच, पण सुस्त मद्दड पुरुषासाठी वापरतात Lol

महिषा >>> हे महाराणी नाही होणार. महिषी होईल.

@मृदगंधा
श्रीश - विष्णू, शालीन, शुभम, श्रेय
माझ्या कॉलेजमध्ये एक अर्चिस होता. 'पवित्र अग्नि' असा नावाचा अर्थ सांगायचा.

नभा नाव खुप आवडलं. ऋता / ह्रुता (शब्द लिहिता येईना) चा अर्थ काय?

अन्वित माझं आवडतं नाव आहे. माझ्या लेकाचं नाव जन्माच्या आदल्या दिवशी पर्यंत हेच असणार होतं. ऐन वेळेला आम्हाला (मी आणि बहिणीला) रिदित आवडलं मग शेवटी चिठ्ठ्या टाकल्या आणि रिदित फायनल झालं. फिरंगी त्याला रिडईट म्हणतात पण असो.

शर्वीन शंकराचं नाव आहे म्हणतात. माझ्या मावसभावाचं आहे. माझा मावसभाऊ असाला तरी तो ५ वर्षाचा आहे.

मुलांची नावे
राष्ट्रपती, राज्यपाल, कलेक्टर, साहेब, तलाठी, तहसीलदार, मेंबर, अशी ठेवलेली पाहिली आहेत. जपान हे सुद्धा नाव असतं.
साजन हे नाव कॉमन आहे. प्रेमनाथ, हृदयनाथ ही नावं सेलेब्रिटींची आहेत. प्राणनाथ हे नाव एका जनरल स्टोअर वर वाचले आहे.
त्या पुढे जाऊन अहो, स्वामी, बालम, बलमा, इकडमस्वारी अशी नावं ठेवायला हरकत नाही.

मुलांची नावे राष्ट्रपती, राज्यपाल, कलेक्टर, साहेब, तलाठी, तहसीलदार, मेंबर, अशी ठेवलेली पाहिली आहेत.>> साहेब पण नाव असतं.

आजच सकाळी वेगळं नाव वाचलं - अंगक्रिश ( कोलकता नाईट रायडर चा खेळाडू)
एक influencer couple आहे , ते आपल्या मुलीला " स्कायु " म्हणून हाक मारतात , तिचं नाव काय आहे अजून कळलं नाही .

अनल म्हणजे अग्नी. ताईंनी लेखात संस्कृत नावांचे अर्थ सांगितले आहेत.
याच नावाला अपवाद का केलाय ? एक तो संस्कृत पे कायम रहो या इंग्लीश पे.

स्कायु कोरियातली मराठी फॅमिलीवाली का, मी परवाच एक vlog पाहिला तिचा, स्कायु काही कळेनाच. स्काय नाव ठेवलंय की काय असं वाटलं.

असं नाव असतं मानव. पहिल्यांदा ऐकलं.

स्काय नावही कोणी ठेवलेलं ऐकलं नाहीये अजून.

किल्ली क्रांतीच्या मुलींची नावं झिया आणि झायदा आहेत. ती लाडाने गोदू आणि छबिल म्हणते.

स्कायू, स्कयनावरून अजून काही नावं सुचली

स्कायली, सूर्याक्षी, मूनवती, शनिकर्णिका, गॅलक्षी, आकाशगंगा, प्लुटोली, दीर्घिका, प्रकाशवर्षा.

कल्की च्या मुलीचं नाव साफो आणि रणबीर आलिया च्या मुलीचं नाव राहा आहे.जुन्या पिढीत(आता 55-56 वयाचे असलेले) बरेच जितेंद्र राजेंद्र होते तश्या अजून 20 वर्षांनी भरपूर मायरा कियारा वेद रियांश साफो वगैरे असतील.

Pages