नाम नामेति नामेति

Submitted by Revati1980 on 24 March, 2024 - 02:06

नाम नामेति नामेति

" नाव काय ठरलं शेवटी मुलीचं?"

" एकदम यूनिक ठेवलंय,अवीरा."

" अवीरा? काय अर्थ होतो या नावाचा?"

" बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल; कसं वाटलं नाव?"

"अवीरा म्हणजे बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल हा अर्थ तुम्ही कुठे शोधलात ?"

" गुगल बाबा आहे ना, मॉम जंक्शन नावाची एक साईट आहे तिथे मिळाले हे नाव. चांगलं नाव आहे ना?"

हे नाव हिंदू आहे?
१०० टक्के .का?

अवीरा नावाचा अर्थ होतो पुत्र आणि पतीरहित स्त्री. नास्ति वीरः पुत्त्रादिर्यस्याः सा अवीरा.
म्हणजे ही मुलगी आजन्म कुमारी असेल किंवा.... जाऊ द्या.

आता काय करायचं? बर्थ सर्टिफिकेटवर हेच नाव आहे.
मॉम जंक्शन पेक्षा ललिता सहस्रनाम वाचले असतेत तर हजारो नावं मिळाली असती.सत्तावीस नक्षत्रांची नावं माहिती नाहीत का तुम्हाला? आता काय उपयोग? ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.

आजकाल काहीतरी हटके करायच्या नादात बाष्कळपणाचा ट्रेंड चाललाय. मुलगी झाली की मियारा, शियारा, कियारा, नयारा, मायरा, टियारा, अल्मायरा ... मुलगा झाला तर वियान, कियान, गियान, केयांश. गोमांश.. आणि त्याचा अर्थ विचारला कि घे गुगल, घे याहू ...... मग उत्तरं देतील इट मीन्स रे ऑफ लाइट.;इट मीन्स गॉड्स फेवरेट.इट मीन्स ब्ला ब्ला..
हे असं यूनीक नाव ठेवायच्या नादात मिसेस शहा नी तिच्या मुलीचं नाव श्लेष्मा ठेवलं. मी तर चकितच झाले. मी तिला विचारलं, काय गं भावना, श्लेष्मा म्हणजे काय?
तिनं काय उत्तर दिलं असावं? ती म्हणाली, श्लेष्माचा अर्थ होतो,जिच्यावर आईची कृपा आहे " . मी डोकं गच्च धरून बसले. मला असं बघून ती म्हणाली, का गं, काही चुकलं कि काय?"

मी म्हणाले, काय गं, तुझ्या मुलीला सारखी सर्दी असते, नाक गळत असतं असं काही आहे का?

नाही, असं काहीच नाही, का ?

अगं श्लेष्माचा अर्थ शेंबडी मुलगी, श्लेष्म म्हणजे नाकातला कचरा, मेकुड.

तिचा चेहरा पाहण्यालायक झाला. काय करणार होती ती? तिलाही तेच सांगितलं, ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.
फॅशनेबल कपडे घालायच्या लाटेत अर्थहीन, अनर्थकारी, बेढब शब्दांचा प्रयोग समाज आपल्या संततीच्या नावासाठी करू लागलाय. नाव द्यायचा अधिकार आजी, आजोबा, गुरु, आत्याबाई यांच्याकडेच राहू द्या ना. तेच हिताचं नाही का?

व्यक्तीचे नाव आणि दैव यांच्यात एक नशिबाचा दुवा असतो म्हणून चांगले, शुभ नाव ठेवावे . नामाखिलस्य व्यवहारहेतु: शुभावहं कर्मसु भाग्यहेतु:। नाम्नैव कीर्तिं लभते मनुष्य-स्तत: प्रशस्तं खलु नामकर्म। ब्राह्मणांनी देव देवतेची नवे ठेवावीत , क्षत्रियांनी वीरता दिसेल अशी नावे ठेवावीत , उदा रिपुदमन , वीरेंद्र , ,प्रताप , राजेंद्र इत्यादी , वैश्यांनी संपत्ती दर्शक नावे ठेवावीत , उदा लक्ष्मीकांत लक्ष्मीधर, इत्यादी. आयुर्वर्चो sभिवृद्धिश्च सिद्धिर्व्यवहृतेस्तथा । नामकर्मफलं त्वेतत् समुद्दिष्टं मनीषिभि:। मुलांची नावे कशा प्रकारे ठेवावीत या बद्दल पारस्करगृह्यसूत्र मध्ये असा श्लोक आहे, द्व्यक्षरं चतुरक्षरं वा घोषवदाद्यंतरस्थं। दीर्घाभिनिष्ठानं कृतं कुर्यान्न तद्धितम्।।अयुजाक्षरमाकारान्तम् स्त्रियै तद्धितम्। नवा पण तीन प्रकारची; देवनाम, नक्षत्रनाम आणि व्यावहारिक नाम. कुंडलीतले नाव व्यवहारात नको कारण कोणी आपल्यावर जादू टोणा, जारण मारण, करणी संमोहन इत्यादी करत असेल तर त्या साठी नक्षत्र नावाची गरज असते. व्यवहारातल्या नावावर त्याचा प्रभाव पडत नाही.आपले नक्षत्र नाव सहसा कुणाला सांगायचे नसते हे ही लक्षात ठेवा.
तुमच्या समोरच्या फ्लॅट मध्ये राहणारे मिस्टर चुडासमा, त्यांच्या मुलाचं नाव ठाऊक आहे का?

होय. अनल नाव आहे.

काय स्पेलिंग कराल तुम्ही या नावाचं?

एएनएएल

याचा अर्थ इंग्रजीत काय होतो ते ही बघा एकदा गुगलवर. मुलाला त्यांनी इंग्रजी शाळेत घातलेय.

.............

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मोरोबा, कुंतल, देवकी धन्यवाद.
@रिया - धन्यवाद.
मी सुचवलेल्या नावांचे अर्थ खालील आहेत.
मनोज्ञा - सुंदर
उर्मी - मनःपूर्वक इच्छा
नभा, व्योमा - आकाश
द्विजा - द्विज म्हणजे ज्याने दोनदा जन्म घेतला आहे म्हणजेच पक्षी. ज्या बाळांना डॉक्टरांनी खूप प्रयत्न करून वाचवले आहे व ज्याचा अक्षरशः दुसऱ्यांदा जन्म झाला असे म्हणता येईल अशा बाळा ल द्विज हे नाव suit होइल असे वाटते
इशानी - देवी पार्वती चे नाव
शगुन - शकुन
हृता - ईश्वराची भेट
अन्विता - दुर्गा देवी चे एक नाव ( गूगल प्रमाणे)
ओजस्वी - तेजस्वी
अनिना - हे नाव मला फार आवडलेले. Anina...Spelling नुसार हे नाव एक palindrom आहे. या नावाचा अर्थ देवाने प्रार्थनेला दिलेला उत्तर असं होतो.
या सर्व नावा मध्ये नभा, उर्मी , अनिना , व्योमा मला आवडलेले.
@मनिम्याऊ - ऊर्मी नाव देखील तुमच्या दिर जाऊबाई ना सुचवू शकता. जाऊबाईचे नाव मनीषा आहे. उर्मी आणि मनीषा अर्थ एक आहे आणि नावामध्ये मोहन नावाचा म आहे.

मलादेखील अजून काही नावे कृपया सुचवा. मुलगीच होईल असे वाटून मी मुलींची भरपूर नवे shortlist केली होती पण मुलाची तितकीशी नव्हती केली.

ग्रामीण भागात गेल्या पिढीपर्यंत मुलांची नावं धोंडू, दगडू असत.
मुलींची धोंडाबाई, दगडाबाई अशी असत.

@ मृदगंधा, छान आहेत नावं!

ग्रामीण भागात गेल्या पिढीपर्यंत मुलांची नावं धोंडू, दगडू असत.>> तेच तर. ( श्लेष्मा सारखी) बुळबुळीत नावं असण्यापेक्षा दगडू - धोंडू काय वाईट!

महिषा... माएशा अस नाव ऐकल होत.
सध्या माझ्या मुलाच्या शाळेत मीरा नावाची लाट आहे. KG to 3Rd grade मिळून 6 मीरा आहेत..
इरा सुद्धा खूप खूप च दिसतात सगळीकडे .

आदरणीय लेखिका ताईंना धागा ज्या वळणावर न्यायचा होता, त्यापासुन धाग्याने जी काही फारकत घेतली आहे ते पाहुन त्यांना कपाळबडवती करावी लागली असेल ! Wink

अनिना - या नावाचा अर्थ देवाने प्रार्थनेला दिलेला उत्तर असं होतो >> हे कुठल्या भाषेत आहे? मला तरी काही व्युत्पत्ती सुचत नाहीये.

ता.क. शोध घेतल्यावर मूळ ज्यू नाव आहे असं एके ठिकाणी दिसलं. कानाला छान वाटतं आहे.

माझ्या मैत्रिणीच्या वडिलांनी खूप मागे मला सांगितलं होतं, मी मुलाला आणि सुनेला सांगून ठेवलंय फार नावं शोधू नका, मुलगा झाला तर प्रथमेश, मुलगी झाली तर प्रथमा. दुसऱ्या वेळी द्वितीयेश, द्वितीया Lol

मामी ब्रेकिंग ब्रेड बघितली नाही. तिथे स्काय आपल्या आकाश, नभा वगैरेप्रमाणे ठेवत असणार, आपल्याकडे ऐकलं नव्हतं, ते मराठी कपल आहेना, म्हणून स्कायु वेगळं वाटलं. पूर्ण नाव काय असेल नक्की असं मनात आलं.

बऱ्याच दिवसांनी भेटली की "हे! कस्काय?" असं विचारतात का तिला? >>> हाहाहा.

हल्ली अनिका नाव फार ऐकलं, आवडलं मला. दुर्गादेवीचं नाव आहे.

आमच्या भागात जुन्या लोकांमध्ये लाडू हे नाव ठेवत असत. गावी एक दोन वयस्कर व्यक्ती या नावाच्या होत्या. एका दूरच्या नात्यातल्या पण चाळीत शेजारीच राहणाऱ्या मुलीला मी एकदा सांगत होते की लाडू हे काय विचित्र नाव आहे. कुणाला का ठेवावं वाटत असेल? लाडवासारखा गोल गरगरीत आहे म्हणून लोक आपल्या मुलाचं नाव लाडू ठेवत असतील. तिने खूप शांतपणे ऐकून घेतलं आणि नंतर म्हणाली की तिच्या आईचं नाव लाडूच आहे.

आबा छान नावं.
-------------------

अंगद, वाली, सुग्रीव, बिभीषण,दुर्योधन, दु:शासन,जटायू, अंगुलीमाल, जमदग्नी, अगस्ती अशी नावं का ठेवत नसतील ?

पुराण किंवा प्राचीन इतिहासातली ही नावं आढळतात
विष्णू, श्रीकृष्ण, परशुराम , महावीर, सिद्धार्थ, अशोक, हर्षवर्धन , रणछोडदास इ.

Doyan चा उच्चार आणि अर्थ काय?

ज्या बाळांना डॉक्टरांनी खूप प्रयत्न करून वाचवले आहे व ज्याचा अक्षरशः दुसऱ्यांदा जन्म झाला असे म्हणता येईल अशा बाळा ला
>>>
माझ्या एका मैत्रिणीच्या प्रेग्नन्सीमधे व डिलीवरीमधे खूप कॉप्लिकेशन्स झाल्या. पण सुदैवाने मुलगी सुखरूप होती. तिने भागिरथी नाव ठेवलं, भगीरथ प्रयत्नांनी जन्मलेली म्हणून. एवढं ऍप्ट नाव नसेल कुणाचं. नेहमीच्या वापरात तिला भाग्या म्हणतात.

Doyan चा उच्चार आणि अर्थ काय?
>>>> मलाच माहीत नाही Lol

मी इंस्टा वर पाहीली होती पोस्ट.

हल्ली दोन तीन मुलांचे अगस्त्य असे नाव ऐकले.
>>>>> माझ्या कलीग ने ठेवलं आहे त्याच्या मुलाचं नाव अगस्त्य.

माझ्या पुतण्याच्या मुलीचं नाव राघवी आहे. राघवाची राघवी म्हणजे रामाचं ( की सीतेचं )नाव आहे ना? मला अर्थ माहित नाही पण आवडतं हे नाव.

राघवाची राघवी म्हणजे रामाचं ( की सीतेचं )नाव आहे ना? >> हो, तसं शब्दरूप होऊ शकेल. माधव - माधवी असतं तसं. पुल्लिंगी नामांना ङीप् किंवा टाप् हे प्रत्यय लावून संस्कृतात अनुक्रमे ई किंवा आ लागून स्त्रीलिंगी नामे करता येतात.

सोना करे झिलमिल झिलमिल
रूपा हँसे कैसे खिलखिल
आहा आहा वृष्टि पड़े टापुर टुपुर
टिप टिप टापुर टुपुर
वृष्टि पड़े टापुर टुपुर, टापुर टुपुर

Pages