नाम नामेति नामेति

Submitted by Revati1980 on 24 March, 2024 - 02:06

नाम नामेति नामेति

" नाव काय ठरलं शेवटी मुलीचं?"

" एकदम यूनिक ठेवलंय,अवीरा."

" अवीरा? काय अर्थ होतो या नावाचा?"

" बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल; कसं वाटलं नाव?"

"अवीरा म्हणजे बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल हा अर्थ तुम्ही कुठे शोधलात ?"

" गुगल बाबा आहे ना, मॉम जंक्शन नावाची एक साईट आहे तिथे मिळाले हे नाव. चांगलं नाव आहे ना?"

हे नाव हिंदू आहे?
१०० टक्के .का?

अवीरा नावाचा अर्थ होतो पुत्र आणि पतीरहित स्त्री. नास्ति वीरः पुत्त्रादिर्यस्याः सा अवीरा.
म्हणजे ही मुलगी आजन्म कुमारी असेल किंवा.... जाऊ द्या.

आता काय करायचं? बर्थ सर्टिफिकेटवर हेच नाव आहे.
मॉम जंक्शन पेक्षा ललिता सहस्रनाम वाचले असतेत तर हजारो नावं मिळाली असती.सत्तावीस नक्षत्रांची नावं माहिती नाहीत का तुम्हाला? आता काय उपयोग? ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.

आजकाल काहीतरी हटके करायच्या नादात बाष्कळपणाचा ट्रेंड चाललाय. मुलगी झाली की मियारा, शियारा, कियारा, नयारा, मायरा, टियारा, अल्मायरा ... मुलगा झाला तर वियान, कियान, गियान, केयांश. गोमांश.. आणि त्याचा अर्थ विचारला कि घे गुगल, घे याहू ...... मग उत्तरं देतील इट मीन्स रे ऑफ लाइट.;इट मीन्स गॉड्स फेवरेट.इट मीन्स ब्ला ब्ला..
हे असं यूनीक नाव ठेवायच्या नादात मिसेस शहा नी तिच्या मुलीचं नाव श्लेष्मा ठेवलं. मी तर चकितच झाले. मी तिला विचारलं, काय गं भावना, श्लेष्मा म्हणजे काय?
तिनं काय उत्तर दिलं असावं? ती म्हणाली, श्लेष्माचा अर्थ होतो,जिच्यावर आईची कृपा आहे " . मी डोकं गच्च धरून बसले. मला असं बघून ती म्हणाली, का गं, काही चुकलं कि काय?"

मी म्हणाले, काय गं, तुझ्या मुलीला सारखी सर्दी असते, नाक गळत असतं असं काही आहे का?

नाही, असं काहीच नाही, का ?

अगं श्लेष्माचा अर्थ शेंबडी मुलगी, श्लेष्म म्हणजे नाकातला कचरा, मेकुड.

तिचा चेहरा पाहण्यालायक झाला. काय करणार होती ती? तिलाही तेच सांगितलं, ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.
फॅशनेबल कपडे घालायच्या लाटेत अर्थहीन, अनर्थकारी, बेढब शब्दांचा प्रयोग समाज आपल्या संततीच्या नावासाठी करू लागलाय. नाव द्यायचा अधिकार आजी, आजोबा, गुरु, आत्याबाई यांच्याकडेच राहू द्या ना. तेच हिताचं नाही का?

व्यक्तीचे नाव आणि दैव यांच्यात एक नशिबाचा दुवा असतो म्हणून चांगले, शुभ नाव ठेवावे . नामाखिलस्य व्यवहारहेतु: शुभावहं कर्मसु भाग्यहेतु:। नाम्नैव कीर्तिं लभते मनुष्य-स्तत: प्रशस्तं खलु नामकर्म। ब्राह्मणांनी देव देवतेची नवे ठेवावीत , क्षत्रियांनी वीरता दिसेल अशी नावे ठेवावीत , उदा रिपुदमन , वीरेंद्र , ,प्रताप , राजेंद्र इत्यादी , वैश्यांनी संपत्ती दर्शक नावे ठेवावीत , उदा लक्ष्मीकांत लक्ष्मीधर, इत्यादी. आयुर्वर्चो sभिवृद्धिश्च सिद्धिर्व्यवहृतेस्तथा । नामकर्मफलं त्वेतत् समुद्दिष्टं मनीषिभि:। मुलांची नावे कशा प्रकारे ठेवावीत या बद्दल पारस्करगृह्यसूत्र मध्ये असा श्लोक आहे, द्व्यक्षरं चतुरक्षरं वा घोषवदाद्यंतरस्थं। दीर्घाभिनिष्ठानं कृतं कुर्यान्न तद्धितम्।।अयुजाक्षरमाकारान्तम् स्त्रियै तद्धितम्। नवा पण तीन प्रकारची; देवनाम, नक्षत्रनाम आणि व्यावहारिक नाम. कुंडलीतले नाव व्यवहारात नको कारण कोणी आपल्यावर जादू टोणा, जारण मारण, करणी संमोहन इत्यादी करत असेल तर त्या साठी नक्षत्र नावाची गरज असते. व्यवहारातल्या नावावर त्याचा प्रभाव पडत नाही.आपले नक्षत्र नाव सहसा कुणाला सांगायचे नसते हे ही लक्षात ठेवा.
तुमच्या समोरच्या फ्लॅट मध्ये राहणारे मिस्टर चुडासमा, त्यांच्या मुलाचं नाव ठाऊक आहे का?

होय. अनल नाव आहे.

काय स्पेलिंग कराल तुम्ही या नावाचं?

एएनएएल

याचा अर्थ इंग्रजीत काय होतो ते ही बघा एकदा गुगलवर. मुलाला त्यांनी इंग्रजी शाळेत घातलेय.

.............

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>>>>>>ज्याने माझा उस्साह च मावळला त्या नावाचा.
मला मुलीचं नाव सुमती ठेवायचे होते म्हणजे जस्ट विचार चालला होता की सासूबाईंनी शूमुती म्हणुन विरजण घातले.

मला रमासाठी पलाक्षी हे नाव सापडले आणि आवडले होते
माझ्या नावाशी जुळते म्हणून
. तेव्हा नवरा म्हणाला छोटं केलं तर पलू होईल आणि तुझं पल्लू आहे. मग confusion होईल, नको म्हणे आणि मुख्य criteria काय तर spelling सोपं हवं, जोडाक्षर नको आणि बाळाला स्वतः ला नाव सांगता आलं पाहिजे इतकं सोपं हवं.
मग काय ठेवलं रमा ओम
.
ओम तिला अमाताई म्हणतो आणि स्वतःला आम. इतकं सोपं असून सुद्धा गंडवलं आहे त्याने Lol

मुख्य criteria काय तर spelling सोपं हवं, जोडाक्षर नको आणि बाळाला स्वतः ला नाव सांगता आलं पाहिजे इतकं सोपं हवं. >> सहमत

तिला अमाताई म्हणतो आणि स्वतःला आम >> लहान वयामुळे र म्हणता येत नसेल, होईल नीट नंतर. (मला वय माहीत नाही, म्हणून निव्वळ अंदाज)

माझ्या ऑफिसात एक मेजर होता. मेजर सिंग. माझ्या बाजुच्या डेस्कवर बसायचा. मला वाटायचे हा सैन्यातुन निवृत्त होऊन ऑफिसात लागलाय. नंतर कळले की त्याचे नाव मेजर होते.
घरात कोणाशीतरी त्याचा मेजर झोल झालेला होता. फोनवर सतत भांडण सुरु. इतक्या मोठ्याने बोलायचा की मला काम करणे अशक्य व्हायचे. मी एकदा सांगितलेही त्याला पण परिणाम शुन्य. शेवटी त्याची टिम दुसरीकडे शिफ्ट झाली आणि आम्ही सगळ्यांनीच सुटकेचा श्वास सोडला Happy

लहान वयामुळे र म्हणता येत नसेल, होईल नीट नंतर>> हो अडीच वर्षांचा आहे आणि बोलायचं कंटाळा येतो त्याला मी कित्येकदा त्याला एकटा असताना गाणी म्हणताना पाहिलं आहे.
कधीकधी येत असूनही बोलत नाही.

नावाच्या इतक्या गमती सुरू आहेत.. त्यात थोडी दुसऱ्या बाजूची गंमत.

इकडे ( अमेरिकेत) :

मुलगा त्याच्या शाळेतल्या मुलाविषयी सांगत होता चेटानिया , चेटनिया म्हटलं हे कुठलं नाव? मग स्पेलिंग बघितलं तर Chaitnya.. अरे हा तर चैतन्य..

तसच बंडी-ओ- पाधी ( कधीकधी ऐकायला येत बंडी ओ पादी ) .

टने - Ta-nay - तनय

असे काही निवडक आता आठवतायत..

चेटानिया , चेटनिया
chaitnya.. अरे हा तर चैतन्य
टने - Ta-nay - तनय
तसच बंडी-ओ- पाधी ( कधीकधी ऐकायला येत बंडी ओ पादी ) .
भरपूर मनोरंजन Rofl

मुख्य criteria काय तर spelling सोपं हवं, जोडाक्षर नको आणि बाळाला स्वतः ला नाव सांगता आलं पाहिजे इतकं सोपं हवं.
>>>
माझ्या नवऱ्याने पण अगदी हाच्च क्रायटेरीआ ठेवला होता.

श्राडा, राडा,कॅफील पण >>>

इतरांचं ठीक आहे पण ज्या स्वतःलाच ‘राडा’ म्हणवून घेतात ते फार डोक्यात जातं. ज्यांनी नाव ठेवलंय ते व्यवस्थित उच्चार करत असणार.

प्रत्यंचा ओढणे Lol

आमाताई आम Happy
एकटा असताना गाणी म्हणतो आणि सगळ्यासमोर मात्र गोलमाल तुषार कपूरचा मोठा भाऊ Proud
आबा, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होती काय बदाम राणी?
मॅकेनिकल मध्ये वाळवंट असतं मग बिचारे मारतात चकरा दुसऱ्या वर्गावरून

ओम तिला अमाताई म्हणतो आणि स्वतःला आम.>>> किती गोड
ऑफिस मध्ये हेल्पडेस्क मधील एकाच नाव मनोरंजन आहे.

प्रल्हाद की प्रह्लाद?
पंचायत मध्ये प्रधानजी त्या जाड्याला ठसठशीत पणे 'प्रह्लाद' म्हणतो.

अर्चित, आव्यान, व्योम, शर्वीन हे नावं shortlist केले आहेत. श्र्लोक चा एक अर्थ प्रार्थना हा होतो आणि अर्चित चा अर्थ देखील मिळता जुळता आहे म्हणून माझ्या मोठ्या मुलाला ते नाव आवडले आहे.
माझ्या मते अर्चित म्हणजे ज्याचे अर्चन म्हणजे पूजा झाली आहे तो..म्हणजेच पूजनीय . हा अर्थ योग्य आहे का? तसेच शर्वीन चा अर्थ काय असावा ? >>माझ्या माहितीनुसार अर्चित चा अर्थ पूजनीयच आहे. माझ्या मुलाचे नावही अर्चित आहे.

माझ्या लेकाचं नाव रिदित आहे. वर्गातले सगळे चमुमंडळ त्याला रिबिट म्हणते. हा पण कधीच दुरुस्त करत नाही. एकदा त्याच्या मित्राची आई मला भेटुन नाव विचारुन गेली. नक्की तिला वाटलं असणार हे काय असं बेडकाच्या आवाजाचं नाव ठेवलंय.

माझ्या टिममधे एक हार्दिक होता. फिरंगी लोकं त्याचं नाव ऐकुन खुस्पुसायचे. त्याने मग एचडी असं नाव सांगायला सुरुवात केली.

थॅंक्स टू निक्स जिजू माझं नाव आता तरी लोकं ओळखतात नाही तर पुर्वी हमखास प्रियांका चं बियांका करायचे.

Russell Peters हा भारतीय नावांची नेहमी खेचत असतो.

त्याचे कुलदीप, सुखदीप, दीक्षित वैगरे नावांचे विनोद चहाटळ लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. Happy

आमचे एक सर होते त्यांचे नांव रोहित होते तर आडनांव कावळे दोन्ही पक्षीच!

असे बरेच कोंबीनेशन होऊ शकतात.
पोपट घारे.
रोहित गरुड
पोपट मोरे

इत्यादी इत्यादी
असेच दोघे होते कलीग एकाचे नांव कांचन होते तर दुसर्‍याचे आडनांव कांचन. आता कांचन आडनांवाच्या व्यक्तीने आपल्या मुलाचे/मुलीचे नांव कांचन ठेवले तर कसे कांचन कांचन होईल.

या धाग्यात मायबोलीवरील धमाल धागे मधे सामील होण्याचं पोटेन्शियल आहे Lol
BTW आमच्या कथकच्या वर्गात एक बंगाली मुलगी होती. कु. आलो डे. बरे, ती उत्तम मराठी बोलत असल्याने खूप दिवसांपर्यंत आम्हाला आलोडे असेच तिचे आडनाव वाटे.

तसेच १२ वीला एका ट्युशन क्लास मध्ये 'शर्विलक' नावाचा मुलगा होता.

एक ओळखीत रोहित पुरोहित आहे. पुरोहित नावाच्या माणसाला मुलाचे नाव रोहित का ठेवावे वाटले असेल? रोहित पुरोहित... कसं वाटतेय?

Pages