नाम नामेति नामेति
" नाव काय ठरलं शेवटी मुलीचं?"
" एकदम यूनिक ठेवलंय,अवीरा."
" अवीरा? काय अर्थ होतो या नावाचा?"
" बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल; कसं वाटलं नाव?"
"अवीरा म्हणजे बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल हा अर्थ तुम्ही कुठे शोधलात ?"
" गुगल बाबा आहे ना, मॉम जंक्शन नावाची एक साईट आहे तिथे मिळाले हे नाव. चांगलं नाव आहे ना?"
हे नाव हिंदू आहे?
१०० टक्के .का?
अवीरा नावाचा अर्थ होतो पुत्र आणि पतीरहित स्त्री. नास्ति वीरः पुत्त्रादिर्यस्याः सा अवीरा.
म्हणजे ही मुलगी आजन्म कुमारी असेल किंवा.... जाऊ द्या.
आता काय करायचं? बर्थ सर्टिफिकेटवर हेच नाव आहे.
मॉम जंक्शन पेक्षा ललिता सहस्रनाम वाचले असतेत तर हजारो नावं मिळाली असती.सत्तावीस नक्षत्रांची नावं माहिती नाहीत का तुम्हाला? आता काय उपयोग? ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.
आजकाल काहीतरी हटके करायच्या नादात बाष्कळपणाचा ट्रेंड चाललाय. मुलगी झाली की मियारा, शियारा, कियारा, नयारा, मायरा, टियारा, अल्मायरा ... मुलगा झाला तर वियान, कियान, गियान, केयांश. गोमांश.. आणि त्याचा अर्थ विचारला कि घे गुगल, घे याहू ...... मग उत्तरं देतील इट मीन्स रे ऑफ लाइट.;इट मीन्स गॉड्स फेवरेट.इट मीन्स ब्ला ब्ला..
हे असं यूनीक नाव ठेवायच्या नादात मिसेस शहा नी तिच्या मुलीचं नाव श्लेष्मा ठेवलं. मी तर चकितच झाले. मी तिला विचारलं, काय गं भावना, श्लेष्मा म्हणजे काय?
तिनं काय उत्तर दिलं असावं? ती म्हणाली, श्लेष्माचा अर्थ होतो,जिच्यावर आईची कृपा आहे " . मी डोकं गच्च धरून बसले. मला असं बघून ती म्हणाली, का गं, काही चुकलं कि काय?"
मी म्हणाले, काय गं, तुझ्या मुलीला सारखी सर्दी असते, नाक गळत असतं असं काही आहे का?
नाही, असं काहीच नाही, का ?
अगं श्लेष्माचा अर्थ शेंबडी मुलगी, श्लेष्म म्हणजे नाकातला कचरा, मेकुड.
तिचा चेहरा पाहण्यालायक झाला. काय करणार होती ती? तिलाही तेच सांगितलं, ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.
फॅशनेबल कपडे घालायच्या लाटेत अर्थहीन, अनर्थकारी, बेढब शब्दांचा प्रयोग समाज आपल्या संततीच्या नावासाठी करू लागलाय. नाव द्यायचा अधिकार आजी, आजोबा, गुरु, आत्याबाई यांच्याकडेच राहू द्या ना. तेच हिताचं नाही का?
व्यक्तीचे नाव आणि दैव यांच्यात एक नशिबाचा दुवा असतो म्हणून चांगले, शुभ नाव ठेवावे . नामाखिलस्य व्यवहारहेतु: शुभावहं कर्मसु भाग्यहेतु:। नाम्नैव कीर्तिं लभते मनुष्य-स्तत: प्रशस्तं खलु नामकर्म। ब्राह्मणांनी देव देवतेची नवे ठेवावीत , क्षत्रियांनी वीरता दिसेल अशी नावे ठेवावीत , उदा रिपुदमन , वीरेंद्र , ,प्रताप , राजेंद्र इत्यादी , वैश्यांनी संपत्ती दर्शक नावे ठेवावीत , उदा लक्ष्मीकांत लक्ष्मीधर, इत्यादी. आयुर्वर्चो sभिवृद्धिश्च सिद्धिर्व्यवहृतेस्तथा । नामकर्मफलं त्वेतत् समुद्दिष्टं मनीषिभि:। मुलांची नावे कशा प्रकारे ठेवावीत या बद्दल पारस्करगृह्यसूत्र मध्ये असा श्लोक आहे, द्व्यक्षरं चतुरक्षरं वा घोषवदाद्यंतरस्थं। दीर्घाभिनिष्ठानं कृतं कुर्यान्न तद्धितम्।।अयुजाक्षरमाकारान्तम् स्त्रियै तद्धितम्। नवा पण तीन प्रकारची; देवनाम, नक्षत्रनाम आणि व्यावहारिक नाम. कुंडलीतले नाव व्यवहारात नको कारण कोणी आपल्यावर जादू टोणा, जारण मारण, करणी संमोहन इत्यादी करत असेल तर त्या साठी नक्षत्र नावाची गरज असते. व्यवहारातल्या नावावर त्याचा प्रभाव पडत नाही.आपले नक्षत्र नाव सहसा कुणाला सांगायचे नसते हे ही लक्षात ठेवा.
तुमच्या समोरच्या फ्लॅट मध्ये राहणारे मिस्टर चुडासमा, त्यांच्या मुलाचं नाव ठाऊक आहे का?
होय. अनल नाव आहे.
काय स्पेलिंग कराल तुम्ही या नावाचं?
एएनएएल
याचा अर्थ इंग्रजीत काय होतो ते ही बघा एकदा गुगलवर. मुलाला त्यांनी इंग्रजी शाळेत घातलेय.
.............
माझ्या एका मित्राचं नाव बंदिश
माझ्या एका मित्राचं नाव बंदिश आहे, ह्याआधी मी कोणाचं ऐकलं नव्हतं
गंधार पंचम वरून - माझ्या
गंधार पंचम वरून - माझ्या ओळखीत एका जुळ्या मुलांची नावे ऋषभ आणि निषाद आहेत.
>> आमच्याकडे निषाद, पंचम आणि गंधार आहेत Happy <<
तिळे आहेत की काय..?
माझ्या लहानपणी आमच्या ओळखीचं
माझ्या लहानपणी आमच्या ओळखीचं एक कुटुंब होतं. त्या तिघी बहिणींची नावं छाया, माया आणि जोया होती.( तिळ्या नव्हत्या.)
जोया हे कुठल्या तरी राणीचं नाव होतं बहुतेक.
परिंदा
परिंदा
एका common friend चं नाव
माझ्या मित्राचे नाव परींद आहे
माझ्या मित्राचे नाव परिंद आहे.
“आमच्याकडे निषाद, पंचम आणि
“आमच्याकडे निषाद, पंचम आणि गंधार आहेत” - अरे वा! मेजर कॉर्ड बनवलीय.
मोरोबांशी सहमत. प्रणय म्हणजे romance. त्यात इतकं अवघडण्यासारखं काही नसावं.
बाकी नावांना अर्थ असलाच पाहिजे असं मलाही आता वाटत नाही. सर्वसामान्य लोकांना अभिप्रेत असलेल्या व्याख्येत अनर्थ होऊ नये इतपत ठीक आहे. उदा. पार्थिव. मी एक द. भारतीय नाव ऐकून हतबुद्ध झालो होतो - ‘विकृती‘
लक्ष्मीचे एक नाव आहे खरे
लक्ष्मीचे एक नाव आहे खरे विकृती.
“लक्ष्मीचे एक नाव आहे खरे
“लक्ष्मीचे एक नाव आहे खरे विकृती.” - म्हणूनच लिहिलंय कि ‘सर्वसामान्य लोकांना अभिप्रेत असलेल्या व्याख्येत अनर्थ होऊ नये’.
उपेक्षा असाही एक नाव ठेवतात
उपेक्षा असाही एक नाव ठेवतात लोक.
एक अक्षांश आणि रेखांश माहितीत
एक अक्षांश आणि रेखांश माहितीत आहेत.
एक अक्षांश आणि रेखांश माहितीत
एक अक्षांश आणि रेखांश माहितीत आहेत.
टियारा
टियारा
कियारा, काया सुद्धा आहे
रमाची मैत्रीण
समीक्षा असे एकीचे नाव ऐकून मी
समीक्षा असे एकीचे नाव ऐकून मी चकीत झालेले. लग्नानंतर नाव बदलले, तेही असे..
माझ्या लेकीचं तिच्या
माझ्या लेकीचं तिच्या मावश्यानी काया हे नाव ठेवलं होतं.
आमच्या सोसायटीत टिनी मिनी
आमच्या सोसायटीत टिनी मिनी नावाच्या जुळ्या बहिणी आहेत. लहान आहेत. बालवाडीत आहेत. आधी मला वाटलेले की लाडाचे नाव असेल. किंवा टिना मीना असेल. पण नाही. टिनी आणि मिनी हेच खरे नाव आहे. आणि त्यांची आई सुद्धा मुलांमध्ये टिनीमिनीची आई म्हणून ओळखली जाते.
माङ्गल्यं ब्राह्मणस्य स्यात्
माङ्गल्यं ब्राह्मणस्य स्यात् क्षत्रियस्य बलान्वितम्।
वैश्यस्य धनसंयुक्तं शूद्रस्य तु जुगुपसितम् ॥ 31 ॥
इत्यादी हा भाग "शुद्रांनी निंदक/अपमानकारक नावे ठेवावीत" असा पूर्ण होतो. मनुस्मृती.
कॉमी, ह्या लेखिकेकडून आणखी
कॉमी, ह्या लेखिकेकडून आणखी काय अपेक्षा ?
नाम मे क्या रख्खा है ?
नाम मे क्या रख्खा है ?
असं म्हणलं जातं खरं ; तरीही ...
मस्त आवडला लेख . .
वेगळं नाव ठेवण्याच्या बाबतीत लोक अर्थाचा अनर्थ करतात . त्यांना अर्थ माहिती नसतात . फक्त शब्द माहिती असतात .
एका समाजात - पिस्तुल्या , वायऱ्या , चॉक्लेटया अशी नावं ठेवली जातात . पण त्यांची सामाजिक परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही . तो वेगळाच भाग आहे
पण जेव्हा सर्वसाधारण शिकलेला वर्ग अशी मूर्खपणाची नावे ठेवतो ; तेव्हा आश्चर्य वाटतं आणि हसूही येतं
पुलेशु
एका समाजात - पिस्तुल्या ,
एका समाजात - पिस्तुल्या , वायऱ्या , चॉक्लेटया अशी नावं ठेवली जातात . पण त्यांची सामाजिक परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही . तो वेगळाच भाग आहे
>>>>>> आमच्या गावाकडे यांच्यात एकाचं नाव मुतखड्या आहे
ओळखीत ठेवलेली निर्वाण,
ओळखीत ठेवलेली निर्वाण, प्रारब्ध अशी नावं माहीत आहेत. लग्नानंतर सासरच्या नात्यात अकल्पित आणि विनोद ही नावं ऐकल्यावर, ह्यांच्याकडे सगळं नकळत, हसत खेळत झालं असावं, असा पीजे मारला होता.
थेंब - ठिपका, रजस्वला, श्लेश्मा ही नावं ऐकल्यावर पूर्वी ठेवत ती धोंडू, बंडू, बाळू इ. नावं काय वाईट आहेत, असं वाटून गेलं.
अर्थाच्या मागे लागून ठेवलेली क्लिष्ट नावं सुद्धा नको वाटतात. नाव घरचे, दारचे आणि मुख्य म्हणजे ते मूल ह्या सर्वांना उच्चारायला सोपं आणि व्यावहारिक भाषेत विपरित अर्थ नसलेलं असावं इतकंच.
>>>>>> पूर्वी ठेवत ती धोंडू,
>>>>>> पिस्तुल्या , वायऱ्या , चॉक्लेटया अशी नावं ठेवली जातात . पण त्यांची सामाजिक परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही . तो वेगळाच भाग आहे
मी ऐकलेले की बाळाला दृष्ट लागू नये म्हणुन दगड्या वगैरे नावे असत. पूर्वी बालमृत्युचे प्रमाण खूप होते तसेच अंधश्रद्धेचेही.
मी ऐकलेले की बाळाला दृष्ट
मी ऐकलेले की बाळाला दृष्ट लागू नये म्हणुन दगड्या वगैरे नावे असत.
>>>>>
आमच्या शेजारच्या एका आजोबांचे नाव दगडू होते, आधीची दोन मुले जगली नाही म्हणून त्यांचे असे नाव ठेवलेले.
आजोबा ऑलमोस्ट शंभर वर्षे जगले.
(No subject)
आमच्या सोसायटी मध्ये प्रतोद
आमच्या सोसायटी मध्ये प्रतोद नावाचे गृहस्थ आहेत
पुण्यातल्या शिक्षणक्षेत्रातील
पुण्यातल्या शिक्षणक्षेत्रातील एका उच्चपदस्थ व्यक्तीचं पहिलं नाव 'नेहरू' आहे.
आमच्या आजोबांचे नाव धोंडिबा
आमच्या आजोबांचे नाव धोंडिबा होते
कारण त्यांच्या आधीची मुलं जगत नव्हती, मग दगडू धोंडू अशी नावं ठेवली तर दगडासारखी कणखर तब्येतीने होउन जगतील अशी श्रद्धा / अंधश्रद्धा होती.
नकुशी माहिती असेलच तुम्हाला असेच एक नाव आंबू ठेवायचे मुलीचे. सलग मुली झाल्या म्हणून मन आंबून गेले म्हणून आंबू.
हे देखील गावी पाहिले आहे.
हल्ली नसते, मागच्या पिढीत असे काही घरात होते.
मानव, वकीलाचे नाव कुरापती
एखाद्या विषयावर आधारित (theme
एखाद्या विषयावर आधारित (theme based) नावे ठेवण्याची प्रथा पूर्वीपासून असावी.
माझ्या एका ओळखीतल्या कुटुंबातील चार मुलांची नावे तुषार, मेघा, वर्षा आणि सागर अशी सगळी पाण्याच्या संदर्भातील होती.
मानव,
मानव,
“ अशी सगळी पाण्याच्या
“ अशी सगळी पाण्याच्या संदर्भातील होती” - आई वडिलांचे सगळे कष्ट पाण्यात गेले म्हणायचे
Epic comment
Epic comment
Pages