नाम नामेति नामेति

Submitted by Revati1980 on 24 March, 2024 - 02:06

नाम नामेति नामेति

" नाव काय ठरलं शेवटी मुलीचं?"

" एकदम यूनिक ठेवलंय,अवीरा."

" अवीरा? काय अर्थ होतो या नावाचा?"

" बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल; कसं वाटलं नाव?"

"अवीरा म्हणजे बहादुर, ब्रेव, स्ट्रॉंग, कॉन्फिडेंशियल हा अर्थ तुम्ही कुठे शोधलात ?"

" गुगल बाबा आहे ना, मॉम जंक्शन नावाची एक साईट आहे तिथे मिळाले हे नाव. चांगलं नाव आहे ना?"

हे नाव हिंदू आहे?
१०० टक्के .का?

अवीरा नावाचा अर्थ होतो पुत्र आणि पतीरहित स्त्री. नास्ति वीरः पुत्त्रादिर्यस्याः सा अवीरा.
म्हणजे ही मुलगी आजन्म कुमारी असेल किंवा.... जाऊ द्या.

आता काय करायचं? बर्थ सर्टिफिकेटवर हेच नाव आहे.
मॉम जंक्शन पेक्षा ललिता सहस्रनाम वाचले असतेत तर हजारो नावं मिळाली असती.सत्तावीस नक्षत्रांची नावं माहिती नाहीत का तुम्हाला? आता काय उपयोग? ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.

आजकाल काहीतरी हटके करायच्या नादात बाष्कळपणाचा ट्रेंड चाललाय. मुलगी झाली की मियारा, शियारा, कियारा, नयारा, मायरा, टियारा, अल्मायरा ... मुलगा झाला तर वियान, कियान, गियान, केयांश. गोमांश.. आणि त्याचा अर्थ विचारला कि घे गुगल, घे याहू ...... मग उत्तरं देतील इट मीन्स रे ऑफ लाइट.;इट मीन्स गॉड्स फेवरेट.इट मीन्स ब्ला ब्ला..
हे असं यूनीक नाव ठेवायच्या नादात मिसेस शहा नी तिच्या मुलीचं नाव श्लेष्मा ठेवलं. मी तर चकितच झाले. मी तिला विचारलं, काय गं भावना, श्लेष्मा म्हणजे काय?
तिनं काय उत्तर दिलं असावं? ती म्हणाली, श्लेष्माचा अर्थ होतो,जिच्यावर आईची कृपा आहे " . मी डोकं गच्च धरून बसले. मला असं बघून ती म्हणाली, का गं, काही चुकलं कि काय?"

मी म्हणाले, काय गं, तुझ्या मुलीला सारखी सर्दी असते, नाक गळत असतं असं काही आहे का?

नाही, असं काहीच नाही, का ?

अगं श्लेष्माचा अर्थ शेंबडी मुलगी, श्लेष्म म्हणजे नाकातला कचरा, मेकुड.

तिचा चेहरा पाहण्यालायक झाला. काय करणार होती ती? तिलाही तेच सांगितलं, ऍफिडेव्हिट करून नावं बदलून घ्या.
फॅशनेबल कपडे घालायच्या लाटेत अर्थहीन, अनर्थकारी, बेढब शब्दांचा प्रयोग समाज आपल्या संततीच्या नावासाठी करू लागलाय. नाव द्यायचा अधिकार आजी, आजोबा, गुरु, आत्याबाई यांच्याकडेच राहू द्या ना. तेच हिताचं नाही का?

व्यक्तीचे नाव आणि दैव यांच्यात एक नशिबाचा दुवा असतो म्हणून चांगले, शुभ नाव ठेवावे . नामाखिलस्य व्यवहारहेतु: शुभावहं कर्मसु भाग्यहेतु:। नाम्नैव कीर्तिं लभते मनुष्य-स्तत: प्रशस्तं खलु नामकर्म। ब्राह्मणांनी देव देवतेची नवे ठेवावीत , क्षत्रियांनी वीरता दिसेल अशी नावे ठेवावीत , उदा रिपुदमन , वीरेंद्र , ,प्रताप , राजेंद्र इत्यादी , वैश्यांनी संपत्ती दर्शक नावे ठेवावीत , उदा लक्ष्मीकांत लक्ष्मीधर, इत्यादी. आयुर्वर्चो sभिवृद्धिश्च सिद्धिर्व्यवहृतेस्तथा । नामकर्मफलं त्वेतत् समुद्दिष्टं मनीषिभि:। मुलांची नावे कशा प्रकारे ठेवावीत या बद्दल पारस्करगृह्यसूत्र मध्ये असा श्लोक आहे, द्व्यक्षरं चतुरक्षरं वा घोषवदाद्यंतरस्थं। दीर्घाभिनिष्ठानं कृतं कुर्यान्न तद्धितम्।।अयुजाक्षरमाकारान्तम् स्त्रियै तद्धितम्। नवा पण तीन प्रकारची; देवनाम, नक्षत्रनाम आणि व्यावहारिक नाम. कुंडलीतले नाव व्यवहारात नको कारण कोणी आपल्यावर जादू टोणा, जारण मारण, करणी संमोहन इत्यादी करत असेल तर त्या साठी नक्षत्र नावाची गरज असते. व्यवहारातल्या नावावर त्याचा प्रभाव पडत नाही.आपले नक्षत्र नाव सहसा कुणाला सांगायचे नसते हे ही लक्षात ठेवा.
तुमच्या समोरच्या फ्लॅट मध्ये राहणारे मिस्टर चुडासमा, त्यांच्या मुलाचं नाव ठाऊक आहे का?

होय. अनल नाव आहे.

काय स्पेलिंग कराल तुम्ही या नावाचं?

एएनएएल

याचा अर्थ इंग्रजीत काय होतो ते ही बघा एकदा गुगलवर. मुलाला त्यांनी इंग्रजी शाळेत घातलेय.

.............

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नावांवरुन विनोद चालले आहेत तर हा घ्या :
तुम्हाला भेटून आनंद झाला, असे कोण कोणास म्हणाले..?
' आनंदची आई, आनंदच्या वडिलांना..'

आमच्या वेळची मुलींची टिपीकल नांवं म्हणजे : संगिता, मनिषा, वर्षा, कल्पना, वैशाली..
मुलं : अजय, संजय, विजय, नितीन, प्रवीण, संदीप..

शेजारच्या मुलांच्या मामाचं नांव मदन होतं, आम्हीही त्याला मदनमामा च म्हणायचो पण तेव्हा काही खटकलं नाही, खरं तर आताही खटकत नाही.

अग्नी 1... अग्नी 2 सारखे ठेवायची नावे.
जितकी मुले तितकी सिरीज लांबेल. जुळी असो की तिळी काही टेन्शन नाही थेंब की ठिपका विचार करायची गरज लागणार नाही.

फा Rofl Rofl

अकाय = अ + काय, म्हणजे ज्याला काया (शरीर) नाही असा. स्पिरीट/ भूत.
BTW गेल्या आठवड्यापासून हे नाव फारच ट्रेंडिंग मध्ये आलंय. कोणी सेलिब्रिटी नी ठेवलंय का?

अकाय >> नव्यानेच ऐकला. वरती सांगितलेले अर्थ बरोबर वाटत आहेत. भूत Lol ऐवजी आत्मा असाही अर्थ काढता येईल. निराकार.

अनूष >> अनूषा ऐकून होतो. अर्थ माहीत नव्हता. अनु + उषा = उषेमागून किंवा उषेसह येणारी. अनूष असेल तर त्याचं पुल्लिंगी रूप होईल. प्रातः संधिप्रकाश असा एक अर्थ लावता येईल. नू दुसरा हवा.

Thanks Happy

प्रणय नावामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. मुळात प्रणय चा ओरिजिनल अर्थ तुम्ही चावट लोक समजता तसा आहे का? मला डाउट आहे.

प्रणय praṇaya from Berntsen's "Marathi Teaching Materials" (p. 94)
प्रणय praṇaya m. romantic love.

प्रणय praṇaya from Molesworth's "A dictionary, Marathi and English" (p. 536)
प्रणय praṇaya m S Love, affection, fondness.

प्रणय praṇaya from Vaze's "The Aryabhusan school dictionary, Marathi-English" (p. 390)
प्रणय praṇaya m Love, affection.

प्रणय praṇaya from Date's "Maharashtra sabdakosa" (p. 2116)
प्रणय praṇaya —पु. प्रेम; प्रीति; लळा. [सं.] ॰कोप-पु. नवरा- बायकोमधील लटका राग; आपल्या प्रेमाच्या मनुष्यानें आपली समजूत करावी म्हणून त्याच्यावर केलेला खोटा राग; रागाचा नखरा. प्रणयिनी-स्त्री. प्रिया; प्रियकर स्त्री. पुल्लिंगी रूप प्रणयी पहा. प्रणयी-वि. प्रेम करणारा; प्रेमी; प्रेमीजन; प्रियकर. 'प्रणयिजनाशीं एकनिष्ठतेंनें वागण्याचा उपदेश परिणामकारक रीतीनें करणारा गुरु...

तुळपुळे कोशात प्रणय असा शब्दच नाही (बिचाऱ्या मिसेस तुळपुळे!)

यावरून मला तरी वाटतं की प्रणय चा अर्थ romance इतकाच होतो. जर प्रेम, प्रीती अशी नावं चालत असतील तर प्रणय सुद्धा चालायला पाहिजे.

बिचाऱ्या मिसेस तुळपुळे!)> Lol
माझ्या ओळखीत एका बहिण भावाची नावं- लय आणि सुरेल अजून एक ऐकलेले निवांत

माझ्या लहानपणीच्या मैत्रिणीच्या जुळ्या भावंडांची नावं स्वर आणि सुर आहेत.
सुर मुलगा की मुलगी ते मला नाही आठवतेय

मला लय सुरेल ही नावं एवढी आवडली नाहीत. आम्ही हसलो होतो जेव्हा नावं पहिल्यांदा ऐकली. लय भारी वगेरे म्हणायचे सगळे ऐकून.
आता वाटतं, ज्याचा त्याचा प्रश्न आहे काय नाव ठेवावं. फक्त मुलांनी नंतर आपल्याला नांव ठेऊ नयेत म्हणजे झालं, कि हे काय नाव ठेवलंय?
.

मला चुकीची ऐकू आलेली नावं, असा काही धागा आहे का?
माझ्या कॉलेजात एक rhythm नावाचा मुलगा होता, आणि एकाचं नाव emotion होतं. मला वाटायचं काय पॉश नावं ठेवतात ह्यांच्यात. नंतर कळलं ते रिधाम आणि विमोचन होते.

गंधार पंचम वरून - माझ्या ओळखीत एका जुळ्या मुलांची नावे ऋषभ आणि निषाद आहेत.

>> आमच्याकडे निषाद, पंचम आणि गंधार आहेत Happy

Pages