आयपीएल २०२४

Submitted by स्वरुप on 19 March, 2024 - 14:01

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-२०२४ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ते रोहितचे चाहते नाही तर भारतीय क्रिकेटचे चाहते आहेत. >> हा कालच्या"ते मुद्दाम उलटे म्हटले होते." सारखा विनोद होता असे समजऊन चालतो. दोन दिवसांपूर्वी आयपील म्हणजे भारतीय संघ नाही वगैरे लिहून झाले होते. भारतीय चाहते आहे तर त्यांच्या लिमिटेड क्रिकेट संघामधे भारतीय संघामधे हार्दिक बसणार नाही का ? उगाच टायली लावली आहे .

मयांक यादव पूर्ण ओव्हर १५० च्या वर स्पीड ने टाकतो हे झेपतच नाही राव. एक शेन बाँड वगळता मी असे कोणालाच करताना पाहिले नव्हते. नि तोही १४८ पर्यंत गेलेलाच आठवतो पूर्ण ओव्हरभर.

आयपील म्हणजे भारतीय संघ नाही वगैरे लिहून झाले होते. भारतीय चाहते आहे तर त्यांच्या लिमिटेड क्रिकेट संघामधे भारतीय संघामधे हार्दिक बसणार नाही का ?
>>>>>

याचा काय संबंध इथे?
असो, एकंदरीतच आपल्या लाडक्या भारतीय कर्णधाराला मिळालेली वागणूक बहुतांश भारतीय क्रिकेटप्रेमींना रुचली नाहीये. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया स्वाभाविक आहे. हे सगळ्यांना पटणार नाही याची मला कल्पना आहे. कारण प्रत्येकाच्या आवडीचे नावडीचे प्लेयर वेगळे असतात Happy

मयंक यादव राडा घालतोय..
उचलतील याला वर्ल्डकपसाठी..
आपण दरवेळी 20-20 ला असा एक फॉर्मातला नवा बॉलर नेतोच..
कधी हर्षल पटेल तर कधी वरून चक्रवर्ती..
मग याला न्यायला बिलकुल हरकत नाही..

याचा काय संबंध इथे? >> एव्हढे कळत असते तर भारतीय चाहते वगैरे मधे शिरला नसतास. पहिल्या मॅच पर्यंत स्वाभाविक प्रतिक्रिया समजू शकतो त्या नंतर ते फक्त ट्रोलिंग होते. ट्रोलिंग बद्दल तावातावाने तूच मागे बोलला होतास ना रे ? का ते पण "ते मुद्दाम उलटे म्हटले होते." वाले प्रकरण होते ?

पांड्याच्या ट्रोलिंगचे मी कधीच समर्थन केले नाही. सध्या जिथे तिथे त्याचा छपरी उल्लेख केला जातो त्याचेही कधी समर्थन केले नाही किंवा मी सुद्धा असा हलका शब्द त्याच्या बद्दल कधी वापरला नाही. भले त्याचा एटीट्यूड मला बिलकुल आवडत नसला तरी नाही.. कारण आपण जे बोलतो त्यातून आपले संस्कार दिसतात.

पण रोहीत रोहीत ओरडून आणि मुंबईचा राजा रोहीत शर्मा अश्या घोषणा देऊन भारतीय कर्णधाराला पब्लिक समर्थन देते याचा मला आनंदच वाटतो. कारण या पैश्याच्या खेळात फ्रॅंचाईजी जिथे चुकले तिथे क्रिकेटप्रेमी खेळाडूंच्या पाठीशी उभे आहेत याचा आनंद आहे.

आणि हो, इरफान पठाण, हर्षा भोगले, आणि कित्येक समालोचक सुद्धा या प्रकरणात रोहितच्या समर्थनार्थ बोलत आहेत हे बरे वाटते.

बाहुबली चित्रपटात जनता कशी त्याला सपोर्ट करते आणि त्यालाच आपला राजा समजते तसे आहे हे Happy
वाह.. मस्त उदाहरण आहे हे... आवडले!

*पहिल्या मॅच पर्यंत स्वाभाविक प्रतिक्रिया समजू शकतो त्या नंतर ते फक्त ट्रोलिंग होत** ह्याचा अर्थ काय होतो ते तू ठरव. हा हा हा होतो कि अजून काही हे तुझ्यावरच सोडतो. वर जी तू नावे घेतलीस त्यांछे पोस्ट्स नीट बघितलेस तर ते तेही काही वेगळॅ बोलत नाहि आहेत हे लक्षात येईल.

कारण या पैश्याच्या खेळात फ्रॅंचाईजी जिथे चुकले तिथे क्रिकेटप्रेमी खेळाडूंच्या पाठीशी उभे आहेत याचा आनंद आहे.>>>>> कुठे चुकले म्हणे? आता माणूस परफॉर्म करत नसेल आणि टीम हारत असेल तर मालक काय करणार? फॅन म्हणून खुप स्ट्राँग फिलींग्स असतात आपले पण ते बरोबर आहेत किंवा त्यात बिझनेस सेन्स आहे असं थोडीच आहे.

आता माणूस परफॉर्म करत नसेल आणि टीम हारत असेल तर मालक काय करणार?
>>>>>>

गेल्या वेळी मुंबईचे थकेली बॉलिंग युनिट असून सुद्धा त्याने टीम प्ले ऑफ मध्ये एलिमिनेतर जिंकून सेमी पर्यंत नेली होती.
10 मध्ये 5 आयपीएल ट्रॉफी आहेत.
तुमच्या अपेक्षा 10 पैकी 8 होत्या का शर्माकडून Happy

आणि हो आयपीएल तर आहेच.. पण, इंटरनॅशनल मध्ये त्याचा विनिंग रेशिओ 73-74 टक्के आहे जो किमान शंभर सामने कप्तानी केलेल्या कर्णधारात आजच्या तारखेला ऑल टाईम नंबर वन आहे. विंडीज आणि ऑस्ट्रेलियाचे ऑल टाईम ग्रेट कर्णधार सुद्धा टक्केवारीत त्याच्या मागे आहेत. तिन्ही फॉर्मेट मध्ये आज भारत नंबर वन आहे!

राहिला प्रश्न बिजनेस सेन्सचा...
तर अंबानी आणि कंपनी आता मान्य नाही करणार
पण सध्या जे होत आहे त्यात त्यांची ही खेळी बिझनेस दृष्ट्या सुद्धा चुकली आहे हेच सिद्ध होते..

कुछ भी चल रा. अहो सर, ५/१० विन्स आणि मागच्या वर्षी एलिमिनेटर ला गेले हे जरी खरं असलं तरी कधीतरी लिडरशिप बदलावी लागतेच. ती कधीही बदलली तरी तुमच्या सारखी पब्लिक बोंब मारणार हे ही तितकच खरं आहे.

बाकी बिझनेस चे म्हणाल तर एरवी कॉर्प वर्ल्ड मध्ये सुद्धा निर्णय चुकतात, इथे तर हे आय पि एल आहे. प्लेयर फॉर्म, टीम डायनॅमिक काम करेल की नाही ह्याचा काही भरवसा नाही. जे स्टॅट्स तुम्हाला माहित आहेत ते मॅनेजमेंट टीम ला माहित नाहीयेत का?

बुवा "विंडीज आणि ऑस्ट्रेलियाचे ऑल टाईम ग्रेट कर्णधार सुद्धा टक्केवारीत त्याच्या मागे आहेत." ह्याच्या नंतर तुम्ही कसा वाद घालणार. खुद्द रोहित सुद्धा असे म्हणणार नाही (त्याला ह्युमिलिटी आहे, कॉमन सेन्स आहे नि मुख्य म्हणजे ह्युमन डीसेन्सी आहे)

वैद्यबुवा.

आपले पहिले स्टेटमेंट -
आता माणूस परफॉर्म करत नसेल आणि टीम हारत असेल तर मालक काय करणार?

मी हा मुद्दा खोडल्यावर आपले बॅकफूटला जात दुसरे स्टेटमेंट -
५/१० विन्स आणि मागच्या वर्षी एलिमिनेटर ला गेले हे जरी खरं असलं तरी कधीतरी लिडरशिप बदलावी लागतेच.

...

चला शुभरात्री Happy

असामी,
खुद्द रोहित सुद्धा असे म्हणणार नाही
>>>>

सचिनला क्रिकेटचा देव क्रिकेटप्रेमी बोलतात. खुद्द सचिन स्वतःला क्रिकेटचा देव बोलणार नाहीच.

रोहितबाबत जे फॅक्ट आहे, जे रेकॉर्ड आहेत, तेच देत आहे. मनाने पाल्हाळ लावत नाहीये..

तुम्हालाही शुभ रात्री Happy

मी हा मुद्दा खोडल्यावर आपले बॅकफूटला जात दुसरे स्टेटमेंट ->>>>>> Lol खोडल्यावर? ५/१० विन्स असल्या आणि टीम एलिमिनेटर पर्यंत गेली तरी त्याचा परफॉर्मन्स चांगला नव्हता हे ही खरच आहे ना? त्या उपर एलिमिनेटर पर्यंत गेली म्हणजे जिंकली नाही हे नक्की ना? मॅनेजमेंटला टीम आज/आत्ता जिंकणारी आणि त्यातल्या त्यात भविष्यात पण जिंकू शकेल अशी हवी असेल की नाही? मग त्या करता त्याचा परफॉर्मन्स आणी टीमचा परफॉर्मन्स बघणार नाही का? म्हणजेच जरीही पुर्वी ते ५/१० असले आणि मागच्या वेळी टीम एलिमिनेटर पर्यंत गेली तरीही मालक बदल करणारच. आलं का लक्षात?

मुंबई ची टीम ही स्लो स्टार्टर आहे. वर्षानु वर्ष पूर्वार्धात त्यांनी खोऱ्यानी सामने घालवले आहेत. यंदा ही तेच होतंय.

सो, पांड्या च्या जागी रोहित असता तरी हेच चित्र असतं, कारण टीम हीच असती.

एकदा का जिंकायला लागले की ट्रोलिंग बंद होईल...

“ ते रोहितचे चाहते नाही तर भारतीय क्रिकेटचे चाहते आहेत. ज्याना योग्य अयोग्य याची जाण आहे. म्हणून निषेध व्यक्त करत आहेत.” - ‘नीम का पत्ता कड़वा हैं। हार्दिक पांड्या **वा हैं।’ ह्या घोषणा देणारे नीरक्षीरविवेकी भारतीय क्रिकेट चाहते असतील, तर अश्या चाहत्यांशी रिलेट नाही होता येत.

>>एकदा का जिंकायला लागले की ट्रोलिंग बंद होईल...

येस्स...... तोच एकमेव मार्ग आहे...... स्वताचा परफॉर्मन्स उंचावणे आणि मुंबईला जिंकून देणे.
पण या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत पाण्ड्या ते करु शकला तर लोक त्यालाही डोक्यावर घेतील पण सध्या त्याचे जे काही चालले आहे ते बघता he was not ready for it.
सीझन सुरु व्हायच्या आधी त्याने रोहित, बुमराह वगैरे मंडळींबरोबर बसून त्यांच्या विश्वास संपादन केला असता; त्यातून एखाद दोन सकारात्मक फ्रेम्स मिडियामध्ये गेल्या असत्या तरी लोकांचा रोष कमी झाला असता पण त्याने प्रेस कॉन्फरन्समध्ये "तुझे रोहितशी बोलणे झाले का?" या प्रश्नाला जसे उत्तर दिले त्यावरुन त्याला याची गरज वाटली नाही हे स्पष्ट आहे.
You can not demand respect as a captain; you have to earn it आणि तिथेच पांड्या कमी पडतोय.
आता फक्त त्याला परफॉर्मन्स आणि परफॉर्मन्सच वाचवू शकतो!!

अर्थात पाण्ड्याला होत असलेल्या ट्रोलिंगचे समर्थन नाही होणार पण त्याच्या कॅप्टंन्सी स्किल्सची चिरफाड अनेक youtubers, analyst सप्रमाण करत आहेत!

he was not ready for it.
सीझन सुरु व्हायच्या आधी त्याने रोहित, बुमराह वगैरे मंडळींबरोबर बसून त्यांच्या विश्वास संपादन केला असता
>>
मुळात फ्रांचाईजी नी हा प्रकार ज्या प्रकारे हाताळला तिथूनच पाणी मुरायाला सुरुवात झाली. त्यात ना टीम नी हे सॉर्ट करायसाठी विशेष प्रयत्न घेतलेले दिसतात ना हार्दिक नी. सुरुवातीला तो जरा अग्रेसिव अप्रोच घेऊन दिसला पण अग्रेशन कुठवर अन् माज कुठवर हे न झेपल्यानी ट्रोल झाला. मग कूल पणाचं सोंग घेतलं, पण ते ही जमलं नाही.

He should play to his strengths.
टायटन्स मधे असताना तो बराच मॅचुअर वाटला होता. आता भंजाळलेला वाटतो.

नीम का पत्ता कड़वा हैं। हार्दिक पांड्या **वा हैं।’ ह्या घोषणा देणारे नीरक्षीरविवेकी भारतीय क्रिकेट चाहते असतील, तर
>>>>>>

अश्या ट्रोलिंगचे समर्थन नाहीच. पण निषेध करणारी प्रत्येक व्यक्ती या पातळीला गेली नाहीये. त्यामुळे सरसकटीकरण नको.
बाकी व्यक्ती तितक्या प्रकृती असणारच. प्रत्येक व्यक्ती ज्या वातावरणात आणि संस्कारात वाढते त्यानुसार ते घडतात. कोणी शिव्या देणारा आहे, कोणी दारू पिणारा आहे, कोणी ड्रीम इलेव्हन नावाचा जुगार खेळणारा आहे म्हणून ती व्यक्ती क्रिकेट प्रेमी म्हणवायच्या लायकीची नाही असे नसते. अन्यथा पांड्याने स्वतः आजवर जे गुण उधळले आहे ते पाहता त्यालाच क्रिकेट प्रेमी म्हणायला नको Happy

म्हणजेच जरीही पुर्वी ते ५/१० असले आणि मागच्या वेळी टीम एलिमिनेटर पर्यंत गेली तरीही मालक बदल करणारच. आलं का लक्षात?
>>>>>>>

जर गेले दोन सीजन पाहिले तर लक्षात येईल की त्या सीझनमध्ये जिंकता आले नाही त्याला जबाबदार शर्माची कप्तानी नाही तर गंडलेले टीम कॉम्बिनेशन जबाबदार होते.
पण असो, हे समजूनही तुम्ही अमान्यच करणार असेल तर जे तुम्हाला योग्य वाटेल Happy

शर्माला कप्तान म्हणून स्वताला सिद्ध करायची गरज नाहीये. इंटरनॅशनल असो की आयपीएल, त्याची आजवरची कामगिरी बोलकी आहे.

रोहित असा किती वेळा लेफ्ट हँड बॉलर्स ना बाद झालाय हे बघाय्ला हवे Sad
Submitted by असामी on 1 April, 2024 - 21:16

रोहीत शर्मा रेकॉर्ड - लेफ्ट हँड पेसर्स

कसोटी
धावा ४७८
बाद ३ वेळा
सरासरी १५९.३३ Happy

वन डे
धावा १६६३
बाद ३३ वेळा
सरासरी ५०.३९ Happy
स्ट्राईकरेट ८८.५९

ट्वेण्टी-२०
धावा ५४२
बाद २१ वेळा
सरासरी २५.८०
स्ट्राईकरेट १३२.१९

वन डे वर्ल्डकप
धावा ३२९
बाद ३ वेळा
सरासरी १०९.६६ Happy
स्ट्राईकरेट १११.१४

फॉरमॅट जेवढा मोठा आणि टेकनिक टेस्ट करणारा तेवढे शर्माचे आकडे चांगले आहेत.
मी सुद्धा थोडा आश्चर्यचकित झालो. बहुदा आपण त्याचे लवकर बाद झालेले लक्षात ठेवतो आणि त्यावर चर्चा करतो म्हणून ते जास्त हायलाईट होते. पण चोपलेल्या धावा लक्षात घेत नाही.
शापित राजकुमार आहे Happy

Nortje ने आज परत एकदा भरभरून रन्स दिल्या शेवटच्या ओव्हर्समध्ये...... १९ व्या ओव्हरला २५ रन्स Happy

चुम्माने आज सुद्धा अर्धशतक मारले
23 चेंडूत
5 सिक्स मारले...
येतोय तो रंगात...
वर्ल्डकपला मागच्या नंबरवर खेळायला तो चांगला पर्याय आहे..

Impact Sub ही काय भानगड आहे? म्हणजे अमेरिकेतल्या फूटबॉल नि बेसबॉल मधे जसे केंव्हाहि कुणालाहि बदलून दुसर्‍यालच खेळवतात तसे?

मग तर काय, बॅटिंग च्या वेळी सगळ्या शेपटाला Impact Sub देऊन चांगले फलंदाजच खेळवायचे!

सगळ्या शेपटाला Impact Sub देऊन चांगले फलंदाजच खेळवायचे
>>>>>

नावे पाच असतात.. पण खेळवू एकच शकतो त्यातला

Pages