आयपीएल २०२४

Submitted by स्वरुप on 19 March, 2024 - 14:01

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-२०२४ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आज हैद्राबादला बॅटिंग प्रॅक्टीस आणि कोहलीची वर्ल्डकपची तयारी. Happy

कोहली एक 'कर्मण्येवाधिकारस्ते..' भावानं खेळत रहातो. टेबलवर शेवटच्या स्थानावर असणार्या टीमकडे ऑरेंज कॅप आहे ह्याइतका विरोधाभास नाही.

अरे आवरा कोणीतरी ह्या क्लासेनला पण! बाप रे! धाकदपटशा म्हणतात तसा सुरु आहे.
वैशाख म्हणू नका, श्रावण म्हणू नका... सगळ्यांना मारतय बेणं! Lol
आधी हेड अन आता हा!

"अरे आवरा कोणीतरी ह्या क्लासेनला पण!" - हा शेवटपर्यंत टिकला, तर ३०० च्या जवळपास स्कोअर होईल बुवा.

हो ना! बॅट लागली की गोळीसारखा सुटतोय बॉल. तुफान टायमिंग आहे. सॉलिड नजर बसलीये.

हेडचे वैशिष्ट्य म्हणजे फार कमी रुम लागते त्याला शॉट मारायला. रुम दिली तर तडकावणार हे नक्की पण बरेच बॉल फारशी रुम न दिलेली असताना पण बरोबर मिडल केले त्यानी.

अबाबाबाबाबाबाबाबाबाबाबाबा!!!!
आधी ९६ आणि आता १०६ मिटर! रुफ वर गेला बॉल! कहर सुरु आहे!

एकालाही सोडलेलं नाही त्यामुळे सगळेच बॉलर प्रचंड प्रेशर मध्ये आलेत.

मगाशी फ्लॉवर येऊन सांगत होता हातवारे करुन की लेग ला जोरदार मारत आहेत. आणि मग ऑफ ला टाकायला लागले आणि क्लासेन गेला. आत्ता मार्क्रम पण गेला पण नो बॉल.

बेंगलोर 5 ओवर 70-0
दमदार सुरुवात
पॉवर प्ले संपल्यावर कसे मारतात ते बघावे लागेल.

हेडचे वैशिष्ट्य म्हणजे फार कमी रुम लागते त्याला शॉट मारायला. रुम दिली तर तडकावणार हे नक्की पण बरेच बॉल फारशी रुम न दिलेली असताना पण बरोबर मिडल केले त्यानी. >> हँड आय को ऑर्डीनेशन वर बराच खेळतो. पाय फारसे हलत नाहित.

कोहली एक 'कर्मण्येवाधिकारस्ते..' भावानं खेळत रहातो. टेबलवर शेवटच्या स्थानावर असणार्या टीमकडे ऑरेंज कॅप आहे ह्याइतका विरोधाभास नाही. >> Lol त्याला वर्ल्ड कप मधे खेळायचेच आहे Wink

आजची मॅच खरच फालतूगिरी आहे राव. चिन्नस्वामी वर बॅन घालायला हवा. काहीही सुरू आहे.

पाय फारसे हलत नाहित.
>>>
आपल्या फायनलला सुद्धा सुरुवातीला त्याचे पाय हलत नव्हते. आणि मी आमच्या ग्रूपवर दर ओवरला पोस्ट टाकत होतो.. याचे पाय हलत नाहीत.. या ओवरला हा जाणार.. याचे पाय हलत नाही.. या ओवरला हा जाणार.. पण जसा स्विंग बंद झाला तसे त्याने आपल्याला नाचवायला सुरुवात केली Sad
तिथून मग मी सोडून दिला सामना बघायचे....

पॉवर प्ले संपल्यावर कसे मारतात ते बघावे लागेल.
>>>
झाला गेम फिल्डिंग पसरल्यावर..
सहा ओवर 79 -0 होते
दहा ओवर संपेपर्यंत 5 विकेट झाल्या...

दिनेश कार्तिकने 108 मीटरचा या सीजनचा सर्वात मोठा सिक्स मारला...
शाहरुखचा डीडीएलजे मधील डायलॉग आठवला

ए इसको ले के जाओ रे Lol

“ चिन्नस्वामी वर बॅन घालायला हवा. काहीही सुरू आहे.” - वानखेडेही त्याच मार्गावर आहे. लोकांना फक्त बाऊंड्रीज च बघायला आवडतं हा निष्कर्श काढणारे आणि टीव्ही चॅनेल्सना टीआरपी रेटिंग पुरवणारे लोक एकच असावेत.

लोकांना फक्त बाऊंड्रीज च बघायला आवडतं हा निष्कर्श काढणारे आणि टीव्ही चॅनेल्सना टीआरपी रेटिंग पुरवणारे लोक एकच असावेत. >> ह्यांना पण बॅन करायला हवे Wink

हैद्राबादची बॉलिंग : दोन वेळा अडीचशे वर चे टारगेट असताना अपोझिशनला अडिचशे क्रॉस करायला देऊन बसली आहे. कमिन्स नसता तर दोन्ही मॅचेस गेल्याही असत्या. हे नक्कीच चांगले चिन्ह नाही. शेवटी विकेट्स स्लो होत जाणार आहेत त्याचा परीणाम होईल.

सुनील नारायण राजस्थान समोर शतक मारतो.
तो सध्या चांगला खेळतोय हे माहीत असून.
त्यांच्याकडे त्याला रोखायला काही प्लान नव्हता..

आज राजस्थानच्या बॅटींगचा कस लागेल!!
या सीझनमध्ये आत्तापर्यंत त्यांना २०० च्यावर चेस करायची वेळ आली नव्हती

हो!
नराईन जब्री फॉर्म मध्ये आहे ह्या वेळी. इकडे जैस्वाल चाचपडतोय. आता बटलर अन संजू झंडा गाडके मारत राहिले तर काही खरं आहे. परागला बघायला पण मजा येइल पण इतक्यात नको. स्कोअर खुप जास्त आहे.

असं लिहे पर्यंत सॅमसन गेला पण. एनिवे. आला पराग आणि क्रॅक्लिंग मारले २-३ शॉट. राणा चांगला बॉलर आहे पण जाम कॉकी आहे. भारी वाटलं एक छक्का आणि एक चौका बसवला त्याला तेव्हा Proud

बटलर शतकं...
किती सहज फटकेबाजी चालते..

बटलर इतका सहज मारत होता. अपवाद वगळता प्रत्येक बोल सीमापार..
पण 5 बॉल 3 हवे असताना थंड झाला. सिंगल घेत नव्हता. रिव्हर्स स्वीप ट्राय केले. तीन बॉल डॉट काढले.
आणि दोन बॉल 3 ला सामना गेला.. मग फुलटॉस असून ग्राउंड शॉट मारला. शेवटच्या बॉलला नेऊन सामना संपवला.. कलकत्ता ने असे घडत असताना विचार करायला काही ब्रेक सुद्धा घेतला नाही.. काही मजा नाही आली आज.

कम्माल मॅच!!
जॉस द बॉस Happy बटलरने एकहाती जिंकून दिली मॅच!!

हॅटमायर आऊट झाल्यावर मी वैतागून बंद केले बघायचे .... १९ व्या ओव्हरला सहज स्कोअर बघितला आणि परत लावली मॅच Happy

Pages