Submitted by स्वरुप on 19 March, 2024 - 14:01
![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2024/03/19/jq_1708344183.jpg)
सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-२०२४ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बॉल कमी मिळाले खेळायला.. फक्त
बॉल कमी मिळाले खेळायला.. फक्त 48 .. त्यात शतक गेले..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विजय शंकर बाद झाला तेव्हा मी म्हटलेले की याची उगाच कॅच पकडली.. आणि तेच झाले.. तेवातियाने येऊन 8 बॉल 23 मारले... आपली गल्ली क्रिकेटची पोरे हुशार असतात.. अशा तुकुटुकु लोकांना मुद्दाम खेळवतात
मी मॅच सोडून दिली बघायची ४
मी मॅच सोडून दिली बघायची ४ विकेट पडल्या तेव्हा.
शशांक सिंघ! ऑल्मोस्ट आणलीच आहे जिंकत. जब्बरदस्त!
फॉरमॅट जेवढा मोठा आणि टेकनिक
फॉरमॅट जेवढा मोठा आणि टेकनिक टेस्ट करणारा तेवढे शर्माचे आकडे चांगले आहेत. >> मित्रा प्रश्न रन्स बद्दल नव्हता तर असा किती वेळा बाद झाला आहे हा एव्हढाच होता बाकी शापीत राजकुमार वगैरे मी सोडून देतो. प्रश्न विचारण्याचे कारण सुद्ध संगक्कारा नि बोल्ट ने मुलाखती मधे मी त्याच्या बरोबर नि विरुद्ध खेळलो आहे नि काही कल्पना होत्या. रोहित विरुद्ध स्पेसिफिक प्लॅन होता ह्या विधानांमधून आलेला होता.
पंजाब ने आज मॅच भर रन रेट ठेवला विकेट जात राहिल्या तरी त्यामूळे चेस जमून गेला. मला तरी अपेक्षा नव्हती.
व्हय व्हय! एकदम सरप्राईज विन.
व्हय व्हय! एकदम सरप्राईज विन. मस्त वाटलं पण. मला जुन्या मॅचेस आठवत नाहीत पण टायटन्स सोडले तर इतर लोअर रँक्ड टीम्स फार टस्सल देत नव्हत्या बहुतेक. ह्यावेळी वेगळं चित्र दिसतय.
>>मला तरी अपेक्षा नव्हती.
>>मला तरी अपेक्षा नव्हती.
मला पण!! शशांक सिंग आणि आशुतोष छान खेळले !!
शुभमन गिलचा दर्शन नालखंडेला शेवटची ओव्हर देण्याचा निर्णय गट्सी होता...... त्यात त्याने पहील्याच बॉलला विकेट काढली..... जिंकली असती मॅच गुजरातने तर जोगिंदर शर्मा बनला असता![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण गिल ज्याप्रकारे फिल्डींग चेंजेस करत होता..... बॉलर्सशी जाऊन बोलत होता, त्यांच्या खांद्यावर हात टाकून समजावत होता ते बघता पोरात कॅप्टन्सीचे गुण दिसतायत
ते बघता पोरात कॅप्टन्सीचे गुण
ते बघता पोरात कॅप्टन्सीचे गुण दिसतायत Happy
>>>>
दिसणे गरजेचे आहे...
कारण भविष्यातील कर्णधार तोच असेल.
The Man The Myth The माही
The Man The Myth The माही
काय क्रेझ आहे या माणसाची
सामना भारतात कुठेही असो
पब्लिक धोनी धोनीच करत असते.
तो फलंदाजीला येतो तेव्हा Noise level चा रेकॉर्ड होतो..
तुला तेच तेच तेच तेच परत
तुला तेच तेच तेच तेच परत लिहायचा कंटाळा कसा येत नाहि रे ? मायबोलीवर आले म्हणजे दर वेळी काहि तरी लिहिलेच पाहिजे असे नसते रे. मायबोलीवर वर्षानुवर्षे रीड ऑन्ली मोड मधे असलेले पब्लिक पण भरपूर आहे रे. आता ह्यावर दहा पोस्ट्स लिहिशील हेही माहित आहे पण वालूचे कण रगडता म्हणून .....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बघता पोरात कॅप्टन्सीचे गुण दिसतायत >> एव्हढी घाई नको. पूर्ण सीझन जाऊ दे नि मुख्य म्हणजे हरलेल्या किंवा हरत आलेल्या सामन्यांमधे बघून मग ठरवूया.
भाई असामी तुम्ही कोणाचे इतके
भाई असामी तुम्ही कोणाचे इतके कट्टर फॅन नाही आहात.. त्यामुळे आम्हा चाहत्यांची क्रेझ तुम्हाला कळणार नाही..
मैदानात आपल्या आवडत्या खेळाडूच्या नावाने ओरडणे, पोस्टर बनवून नाचवणे, चेहरे रंगवणे.. असे तुम्ही कधी करणार देखील नाहीत आणि या कॅटेगरीत येणारे चाहते तुम्हाला कधी कळणारही नाहीत.. जेव्हा हजारो पब्लिक सचिन सचिन.. धोनी धोनी.. किंवा आता रोहीत रोहीत करते .. तो क्षण टीव्ही वर बघणे सुद्धा त्याच्या चाहत्यांसाठी काय goosebumps म्हणतात तसला असतो..
सतत तेच ते आणि तेच ते, धोनी ,
सतत तेच ते आणि तेच ते, धोनी , धोनी आणि धोनी. चांगली चर्चा होतच नाही क्रिकेट वर
अरे पण बाकीच्यांनाही काही कमी
अरे पण बाकीच्यांनाही काही कमी हौस नाहीये. प्रत्येक पोस्टला कश्याला उत्तर देत बसता?! "काळ सोकवतो" हे बरोबर आहे. पण मी अक्षरशः काही आयडींच्या पोस्ट स्किप करून पुढे जातो. आता डोळे आणि बोटं दोन्ही ट्रेन झाली आहेत. संपूर्ण पणे अगदी एकाही कमेंटला (तुमच्या पोस्टला उत्तर असेल तरी) उत्तर देणं पूर्ण बंद करा ना!
भाई असामी तुम्ही कोणाचे इतके
भाई असामी तुम्ही कोणाचे इतके कट्टर फॅन नाही आहात.. >> डाय हार्ड सिनेमामधे ब्रुस विलिस चा एक डायलॉग आहे - assumption is mother of all f*** **s. तुला पोस्ट चे प्रयोजन समजावे म्हणून परत एकदा काही शब्द हायलाईट करतो, मला कोण नि किती आवडतो किंवा तुला धोनी/रोहित/पंत इत्यादी का आवडतो किंवा त्यामूळे काय होते हे सगळे बाजूला ठेवून वाचून बघ समजतय का - तेच तेच तेच तेच परत लिहायचा.
एकाही कमेंटला (तुमच्या पोस्टला उत्तर असेल तरी) उत्तर देणं पूर्ण बंद करा ना! >> अरे तसे नाही. उत्साहाने क्रिकेट बाफावर काही तरी वाचण्यासारखे असेल म्हणून यावे तर इथे तेच पुराण परत लागलेले असते. मूड ऑफ होतो. कौतुक समजू शकतो पण इथे अजीर्ण झालय रे.
अरे तेच ना. मूड ऑफ करून
अरे तेच ना. मूड ऑफ करून घ्यायला वाचूच नका मा मुळात! तुम्ही फक्त वाचत नाही त्यावर वादही घालत बसता आणि मग म्हणता बोर होतं म्हणून.
शर्मा आणि धोनी इथे काही
शर्मा आणि धोनी इथे काही जणांचे नावडते खेळाडू आहेत याची मला कल्पना आहे. त्यांना नावे ठेवायला संधी मिळाली की तत्परता आणि कौतुकाची वेळ आली की हात आखडता हे लक्षात येते. पण त्यामुळे मी माझ्या आवडीच्या खेळाडूंचे कौतुक करायचे नाही हा काही न्याय झाला नाही. असो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे तेच ना. मूड ऑफ करून
अरे तेच ना. मूड ऑफ करून घ्यायला वाचूच नका मा मुळात >> वाचायला नाहि लागत रे. पोस्ट आहे म्हणून यावे तर तेच तेच आहे ते ग्लान्स केल्यावरही दिसते म्हणून मूड ऑफ होतो. चल आता दुर्लक्ष करून बघतो बंड होते का. तू भलताच आशावादी आहेस![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तू भलताच आशावादी आहेस >>>>
तू भलताच आशावादी आहेस >>>> वाद घालूनही काही साध्य होत नाहीच आहे ना ? मग दुसरं काही करून बघा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"चल आता दुर्लक्ष करून बघतो
"चल आता दुर्लक्ष करून बघतो बंड होते का. तू भलताच आशावादी आहेस" - कुणी निंदा, कुणी वंदा अशी स्थिती आहे.
"उत्साहाने क्रिकेट बाफावर काही तरी वाचण्यासारखे असेल म्हणून यावे तर इथे तेच पुराण परत लागलेले असते." - +१
आज हैद्राबादने काही कारण
आज हैद्राबादने काही कारण नसताना मधेच पॅनिक मोमेंट तयार करून ठेवली होती. स्क्वेअर लेगला एक फिल्डर आणि बॅकवर्ड पॉईंट आणि कव्हर पॉईंट ला दोन फिल्डर्स असताना, बॉल स्टंप च्या लाईनमधे असताना हाय-रिस्क, लो रिवॉर्ड रिव्हर्स स्वीप मारायची अवदसा आठवायचं काहीच कारण नव्हतं. क्लासेन ने शेवटी डोकं ताळ्यावर ठेवलं हे बरं झालं.
उद्या दोन रॉयल्स भिडणार. बटलर, जैस्वाल, फाफ, मॅक्सवेल फॉर्ममधे यावे म्हणून दोन्हीकडच्या चाहत्यांनी अगदी देव पाण्यात ठेवले नसतील अगदी भरपूर प्रार्थना केल्या असतील.
गायकवाडच्या फलंदाजी वर परीणाम
गायकवाडच्या फलंदाजी वर परीणाम होत आहे वाटते कप्तानीमुळे...
मागे अश्याच सिच्युएशनमध्ये जडेजा पारच भंजाळलेला..
धोनी स्वतः संघात असताना असे दुसऱ्याला कप्तान बनवणे हे कितपत योग्य आहे हे आता काळच सांगेल..
टिपिकली मधल्या टप्प्यात
टिपिकली मधल्या टप्प्यात राजस्थान चांगल्या सुरुवातीनंतर डीरेल करायला सुरुवात करतात..... यंदा तसे होऊ नये ही अपेक्षा!!
बटलर, जयस्वालला आज फॉर्मात आलेच पाहिजे. आज उगाच अश्विनला वर पाठवण्यापेक्षा हॅट्मायर आणि ज्युरेलला वर पाठवून थोडा स्कोप दिला पाहिजेल..... किमान हॅटमायरला आरआरवाले अंडरयुटिलाइझ करतायत असे वाटते.
बंगलोरने पाटीदारला बसवायला पाहिजे..... अज्जिबातच खेळत नाहिये राव तो!!
तसे कोहली आणि थोडाफार लोमरोर सोडले तर कुणीच खेळले नाहिये म्हणा!!
Indivisual star performer आणि
Indivisual star performer आणि प्रत्येकाला आपल्या भूमिका माहीत असणे यातला फरक राजस्थान आणि चेन्नई या दोन टीम क्लिअर करतात.
बेंगलोर दरवेळी अशीच पहिल्या गटात असते तर गुजरात दुसरा गटात असल्याने गेले दोन सीजन गाजवले.
यावेळी कलकत्ता एक क्लिअर माईंड सेट असलेली टीम वाटत आहे जे गेले काही सीजन दिसत नव्हती. बाद फेरीत हे खूप गरजेचे असते.
<<असे दुसऱ्याला कप्तान बनवणे
<<असे दुसऱ्याला कप्तान बनवणे हे कितपत योग्य आहे हे आता काळच सांगेल..>>
काळ कशाला, मी सांगतो.
आता धोनी निवृत्त होणार आहे (की झाला पण?) मग दुसर्या कुणाला तरी शिकवायला नको का? प्रत्येक सामना जिंकायसाठी असला तरी त्यात सराव, सुधारणा, इतरांना संधि हे सगळे आलेच की. नि आय पी एल म्हणजे असे काय विशेष आहे? खरे तर रणजी, आंतर्देशीय सामने हे खरे.
मूर्ख लोक गल्ली क्रिकेटला पण पैसे देऊन बघायला जातील, मॅच फिक्सिंग करतील - काही पण!
चेन्नई ने केलेला विचार कदाचित
चेन्नई ने केलेला विचार कदाचित योग्य आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की धोनीचा ऑरा असा आहे की त्याखाली तो कर्णधार दडपून जाणार. आणि कोणालाही कर्णधार करा पण त्यावर धोनीचा प्रभाव राहिला तर त्याला काही अर्थ नाही. जसे भारतीय संघात धोनी नंतर कोहली नंतर शर्मा हे कर्णधार झाले ते आपापला विचार आपली स्टाईल घेऊन आले. ते चेन्नई मध्ये धोनी सोबत खेळताना शक्य नाही.
आरसीबी सुटलेत!!
आरसीबी सुटलेत!!
आरआरसाठी लॉ ऑफ ॲव्हरेज वाली मॅच?
आरसीबीची स्ट्राँग सुरुवात!!
आरसीबीची स्ट्राँग सुरुवात!!
बोल्ट आज टोटली ऑफ-कलर आहे. क्रिकेट कसला ‘लेव्हलर गेम‘ आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि आज धुतला गेलाय.
कोहली अर्धशतक
कोहली अर्धशतक
39 चेंडूत 52
पण आता प्रश्न आहे की इथून तो गियर चेंज करतो का? आज करायला हवा... नऊ दहा ओवर बाकी आणि दहा विकेट हातात आहेत..
125 ची ओपनिंग पार्टनर शिप आणि
125 ची ओपनिंग पार्टनर शिप आणि 200 करता आले नाही.
184 टारगेट
जयस्वाल शून्यावर.. पुन्हा
जयस्वाल शून्यावर.. पुन्हा अपयशी
चार पैकी तीन वेळा लेफ्ट आर्म बॉलरने बाद केले.
त्या दिवशी जसे शर्माचे रेकॉर्ड चेक केले. याचेही करायला हवे.
बटलरचा फॉर्म पाहून रॉयल्सचा
बटलरचा फॉर्म पाहून रॉयल्सचा थिंक टँक सुखावला असेल आज.
कोहली किंगसाईझ इनिंग खेळला.
कोहली किंगसाईझ इनिंग खेळला. पण बाकीच्या बॅट्समनची अजिबातच साथ लाभली नाही त्याला. फाफ, मॅक्सवेल, ग्रीन पैकी दोघांनी तरी मोठी आणि फास्ट इनिंग खेळायला हवी होती.
Pages