आयपीएल २०२४

Submitted by स्वरुप on 19 March, 2024 - 14:01

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-२०२४ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बेक्कार धुतला मुंबईला!!

१९ व्या ओव्हरला हार्दिककडून मिसफिल्ड झाल्यावर बुमराहने वाजवलेल्या खडूस टाळ्या बघितल्या का? Wink

31 रन नी जिंकले हैद्राबाद
मुंबई च्या बॅटिंग लाईन अप मधे फक्त एकाचा स्कोअर अन् स्ट्राईक रेट कमजोर दिसून येतोय. २० बॉल मधे २४ रन केलेला कप्तान...

अ‍ॅक्चुअली चांगले खेळले मुंबईचे पण बॅट्समन. पिच एकदम फ्लॅट (म्हणजे नो टर्न ह्या अर्थानी) त्यामुळे सगळी मदार बॅट्समनच्या शॉट सिलेक्शन वर होती. हैद्राबादच्या बॉलर लोकांना पण चांगलच झोडपलं. मुंबई कडे फक्त मफाका हा एक्स्ट्रा आउटलायर ठरला. कैच्या कै मारले त्याला. त्या मानानी खुप कमी फरकानी हरले मुंबई.

२० बॉल मधे २४ रन केलेला कप्तान... >> कमिन्स, जयदेवच्या मधल्या हार्दिक विरुद्ध १-१ ओव्हर्स मॅच सील करून गेल्या. बाकी बॉलिंग मधे फार काही डावे उजवे नव्हते. ऑब्सीन बॅटसमन फ्रेंडली पिच होते.

२० बॉल मधे २४ रन केलेला कप्तान...
>>>>>>
4 बॉल 11 अशी सुरुवात होती त्याची...
नंतर 16 बॉल 13 आले..
आमची हाय लागली आहे त्याला Happy

अरे काय खेळतायत रॉयल्स! Sad आता पार अश्विनवर जबाबदारी आलीये! Proud
आय होप दे रिकवर. अ‍ॅवरेज काहीच नाही सध्या. पराग ला पण चान्स आहे.

रियान पराग ला प्रोमोशन भावलेले दिसते आहे. रॉयल्स नी देवधर ट्रॉफी मधे पराग ने कशा रन्स केल्या ते नीट बघितलेले दिसतेय. त्याला थोडा वेळ मिळाला कि तो वेगळा पराग बनतो हे लक्षात घेऊन दिलेले प्रमोशन दिसतेय.

दोन बाउन्सर अलाऊ केल्यापासून सगळॅ भारतीय बॉलर्स सुसाट सुटले आहेत. आपला पेस काय , लाईन काय वगैरे ह्याचा बर्‍याच जणांना पाचपोच दिसत नाही Sad कमिन्स चा स्पेल पहा ना तो शॉर्ट बॉल कसा वापरतो ते .

आपला पेस काय , लाईन काय वगैरे ह्याचा बर्‍याच जणांना पाचपोच दिसत नाही>>>> Lol

बरोबर आहे पराग बद्दल. त्यातल्या त्यात स्लो स्टार्ट पण जबरी हाणतोय आता. शॉट मध्ये एक बेदरकारपणा* आहे त्याच्या. देखणे आहेत शॉट्स! जबरी मारले आणि फायनली त्याचं कर्माचं माप भरलं असल्यामुळे मटके/तुक्के पण ४ ला गेलो १-२. Lol

१८५ म्हणजे कैच्या कै रिकवरी! पाँटिंग वैतागला असणार भयानक!

* बेदरकारपणे आणि खुप लेट खेळतो असं वाटतं विच इज जस्ट ग्रेट!

<<<<<<
तो रियान पराग फायनली या सीजनला चालेल असे वाटतेय. फटक्यात ताकद जाणवत आहे आता त्याच्या..
<<<<<<

शब्दाला जागला माझ्या रियांन पराग

पराग २.०!!! जबरदस्त!!

“ आपला पेस काय , लाईन काय वगैरे ह्याचा बर्‍याच जणांना पाचपोच दिसत नाही” - Lol खरंय.

फायनली त्याचं कर्माचं माप भरलं असल्यामुळे >> Lol आता स्वरुप नि फेफ वैतागणार Wink नॉके ला तसेही मारणे येराबगाळ्याचे काम नव्हते. असा क्वचितच त्याला तुडवलेला बघितला आहे.

अरे खत्तरनाक बॉल बर्गरचा. मार्शचे दांडके!
सकाळी जैस्वालचा पण साधारण असाच काढला की मुकेशकुमारनी. भारी! बरं आहे पीच म्हणावं लागेल.

नोर्के आणि रबाडा दिल्लीत एकत्र होते तेव्हा भारी जोडी जमली होती.
पण दिल्ली ने रबाडा ला जाऊ दिले. याला ठेवले. तिथे फसले. नंतरच्या सीझनला नोर्केला मार पडू लागला.

What a match!!
What a comeback by Royals Happy

रियान पराग चा ROI चालू झालेला आहे..... काय मारलीय शेवटची ओव्हर त्याने!! कम्माल!
अश्विनची कॅमिओ, ज्युरेल, हॅटमायर चे छोटे पण महत्वपूर्ण कॉंट्रीब्युशन!!
बर्गरचा पहीला फायरी स्पेल, चहलने मध्ये येऊन काढलेल्या विकेट्स, संदीप शर्माच्या १९व्या ओव्हरमधले नंतरचे चार बॉल आणि आवेशने टाकलेली सुपरस्मार्ट विसावी ओव्हर..... कंप्लीट टीमवर्क Happy

मजा आली Happy

बर्गरचा पहीला फायरी स्पेल, चहलने मध्ये येऊन काढलेल्या विकेट्स, संदीप शर्माच्या १९व्या ओव्हरमधले नंतरचे चार बॉल आणि आवेशने टाकलेली सुपरस्मार्ट विसावी ओव्हर..... कंप्लीट टीमवर्क>>>> येस!!! एक नंबर काम.

बॉलिंग खरच मस्त केली. स्ट्ब्सचा कॅच महागात पडू शकला असता पण बॉलर लोकांनी लगाम टाईट धरुन ठेवला अगदी. मस्त टीम आहे रॉयल्स खरं. टॉप कंटेन्डर्स!

“ खेळल बाबा पोरगं एकदाच” - Happy टॅलेंटेडच आहे रे. रॉयल्स सहसा लंबी रेस का घोडा बघून पैसे लावतात. Wink

“ आता स्वरुप नि फेफ वैतागणार” - Lol

स्वरूपने संपूर्ण मॅच त्याच्या एका पोस्टमधे समराईझ केलीय.

राजस्थान पोहोचणार प्ले ऑफ ..
कदाचित पहिल्या दोन मध्ये..
पण ट्रॉफी नाही जिंकणार..
नॉकआऊटला चोक करणार..

काल एकंदर परागचा ॲटीट्यूडपण खुपच toned-down वाटला!!
मॅचनंतर बोलताना इमोशनल पण झाला होता तो बऱ्यापैकी..... नुसता एक खेळाडू म्हणूनच नव्हे पण एक व्यक्तीम्हणून पण यावेळी जास्त परिपक्व वाटला तो!!

अरारारारा…
मॅक्सीला सोडला…. बहुत महंगा पड सकता है मुन्ना…. Uhoh

Pages