Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34
भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मानव, धन्यवाद !
मानव, धन्यवाद !
हा धागा (इथल्या) "रातोरात" धमाल झाला. सगळेच भारी! >>> +११
कस्तान
कस्तान
= हलका, वाळलेला पाचोळा
ग्रामीण भागात प्रचलित.
(सं.) कुत्सित + तृण अशी त्याची फोड.
>>>> केरकस्तान = केरकचरा
कस्तान माहीत नव्हता....
कस्तान माहीत नव्हता....
कसपट माहीत होता.
>>कस्तान माहीत नव्हता....>>+१
>>कस्तान माहीत नव्हता....>>+१
बरेच नवे शब्द कळले.
>>कस्तान माहीत नव्हता....>>+१
.
होय दसा अगदी बरोबर - कस्पट
होय दसा अगदी बरोबर - कस्पट
कस्पट >>>>
कस्पट >>>>
यवरुन ही म्हण आहे :
'बायको धमकट दादला कसपट'
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%...
' कस्तान ' शब्द माहीत नव्हता.
' कस्तान ' शब्द माहीत नव्हता.
धमकट म्हणजे धष्टपुष्ट का?
धमकट म्हणजे धष्टपुष्ट का?
धमकट= दांडपणा
धमकट= दांडपणा
दाते शब्दकोश
दांडगट शब्द वापरतो आपण बरेचदा
दांडगट शब्द वापरतो आपण बरेचदा यासाठी....
'आडदांड' एक
'आडदांड' एक
डंकीन
डंकीन
हे एक “विशेष”नाम असून ते लोणावळ्यातील आदिवासी स्त्रियांनी निर्मिलेले आहे. कोणत्या गोष्टीला त्या असे म्हणत असाव्यात ?
पहा विचार करून ……
नाही सुचले तर मग खालचे चित्र पहा :
..
..
..
..
या स्त्रियांच्या बोलीतला हा शब्द गेल्या पिढीतील साहित्यिक अनंत काणेकर यांच्या फार आवडीचा होता. त्या शब्दातून दख्खनच्या राणीचा वेग आणि आक्रमक रुबाब सार्थ व्यक्त होतो असे ते म्हणायचे.
मालगाडीच्या डब्यांना वाघीण (
मालगाडीच्या डब्यांना वाघीण ( वॅगन) म्हणतात तसं डेक्कन क्वीनला डंकीण
पुलंच्या पौष्टिक जीवनात त्यांनी 'पोस्टाच्या डब्याला डाकीण का म्हणू नये?' असा प्रश्न विचारलाय
रोचक!
रोचक!
डेक्कन जिमखानाचे "डे जिमखाना" लिहितात तसे लोणावळ्याला डिस्प्लेवर मराठीत 'डे क्विन' लिहितात का? आणि त्या वरुन हे नाव असा प्रवास झाला का? याचा शोध घेण्यास वाव असावा .
लहानपणी गावी पाण्याच्या मोटर-पंप सेटला डंकीन म्हणत ते आठवले. ते बेल्ट ड्रिव्हन पम्प सेट्स होते.
बहुतेक बनवणार्या कंपनीचे नाव डंकीन असावे त्यावरुन म्हणत असतील.
डाकीण, मोटर-पंप सेट >>> रोचक!
डाकीण, मोटर-पंप सेट >>> रोचक!
'डे क्विन लिहितात का?
त्या आदिवासी स्त्रिया ट्रेनमध्ये येऊन करवंदे विकायच्या/ विकत असतील.
त्यांच्या आवाजात, "आगं ये डंकीन आली बघ" असे काही ऐकायला नक्कीच मजा येत असेल.
हो..मलाही तेच आठवले.
हो..मलाही तेच आठवले.
हापशी ला डंकीन म्हणत.
अच्छा हापशीला पण म्हणतात हे
अच्छा हापशीला पण म्हणतात हे माहीत नव्हते.
डंकीण..... जेजुरी येथे जेथे
डंकीण..... जेजुरी येथे जेथे खंडोबाला हल्ली सोमवती स्नान घडविले जाते, तेथे धरण नसताना पूर्वी नदीवर जेजूरी रेल्वे स्टेशन साठी एक पाणी पुरवठा योजना होती. तेथे एक मोठी पत्र्याची शेड होती. त्या शेडमध्ये दोन चाकी भले मोठे इंजिन पाणी उपसा करण्यासाठी होते. ते इंजिन कोळशावर चालत असे. त्याला आमच्याकडे लोक डंकीन म्हणत. रेल्वे इंजिनात कोळसा टाकणाऱ्या ड्रायव्हर सारखा अवतार तिथल्या ऑपरेटरचाही होता. एकंदर माहोल कोळशावर चालणाऱ्या रेल्वे इंजिनिनासारखाच असायचा. त्यासाठी दगडी कोळसा रेल्वेनेच जेजुरी स्टेशन वर यायचा.
डंकीण..... जेजुरी येथे जेथे
दोनदा....
छान.
छान.
सध्याचे DUNKIN हे मुद्रानाम खादाडीच्या गोष्टींना दिले आहे !
https://en.m.wikipedia.org/wiki/Dunkin%27_Donuts
डंक माहीत होता डंकीन आता
डंक माहीत होता डंकीन आता माहीत झाली.
अच्छा !डंक, डंख असे दोन्ही
अच्छा !
डंक, डंख असे दोन्ही पर्याय आहेत तर...
आख्खी हळद, सुकी लाल मिरची
आख्खी हळद, सुकी लाल मिरची कुटून पावडर बनवतात त्या कांडप मशीनला डंका म्हणतात. उदा. मिरची डंक्यावर कुटली.
डंके की चोट पे हिंदीत म्हणतात
डंके की चोट पे हिंदीत म्हणतात. त्यातला डंका म्हणजे भलामोठा नगारा - पडघम.
चला,डंक, डंका, डंकी, डंके
चला,
डंक, डंका, डंकी, डंके.... अशी बाराखडी आता बघायला मिळते आहे !
डंकीण (=पंप) हा शब्द कोशात दिलेला असून तो donkey pump यावरून आलेला आहे
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A1%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%80%...
मी लहान असताना गावापासुन १०
मी लहान असताना गावापासुन १०-१२ किमी अंतरावर नीरा नदीकाठावर एक पंपहाऊस होते जिथुन पाणी उपसा व्हायचा आणी गावातील पाणी शुद्धीकरण केन्द्रावर पाणी आणले जायचे. त्या पंप हाऊसच्या आसपास काही वस्ती पण होती. आम्ही त्या वस्तीला डंकीणी म्हणायचो. आमचा समज होता की डंकिणी हे गावाचे नाव आहे पण आता अर्थबोध झाला.
लेखिका, प्राध्यापिका,
लेखिका, प्राध्यापिका, मुख्याध्यापिका, सेविका,
वरील स्त्रीलिंगी शब्दांना कोणी आक्षेप घेणार नाही कारण तसा भाषाप्रघात पडलेला आहे.
पण आता एका मुद्द्याकडे येतो :
मराठी पदवाचक/स्थितीवाचक नामांची स्त्रीलिंगी रूपे करायची की नाही हा एक वादाचा मुद्दा आहे. यासंबंधी नक्की नियम मला माहित नाही. परंतु आपण जर खालील नामांची स्त्रीलिंगी रूपे हट्टाने करायला गेलो तर कसा घोटाळा होतो ते सहज समजून येईल :
. अभ्यासक (? अभ्यासिका = अभ्यासाची जागा)
. याचक (? याचिका = अर्ज)
. मुद्रक (? मुद्रिका = आंगठी, छाप.)
. ग्रंथपाल/ रोखपाल : ??
अर्थातच वरील स्त्रीलिंगी नामे ही चमत्कारिक किंवा हास्यास्पद होतात आणि ती पदाच्या मूळ अर्थापासूनही वंचित राहतात. आणि या सर्वांवर कडी होऊ शकते ती म्हणजे देशातील सर्वोच्च पदाच्या नामाबाबत – राष्ट्रपती ! (याचा घोळ मागे एकदा आपण सार्वजनिक स्तरावर पाहिलाच).
म्हणून असे वाटते, की पदवाचक नामांच्या लिंगभेदासंदर्भात मराठी भाषेचा म्हणून असा एक ठाम नियम नाही का ? (करावीत/करू नयेत)
ग्रामीण घरासंबंधीचे दोन शब्द
ग्रामीण घरासंबंधीचे दोन शब्द अभ्यासनीय आहेत :
१. वळचण = घराच्या मूळ पायाच्या बाहेरचा पागोळ्यांच्या आतील प्रदेश.
२. पागोळी = पाण्याची धार व जेथून ती गळते तो घराचा प्रदेश.
हे अर्थ पाहिल्यानंतर सुद्धा वळचण नीट समजत नव्हती. मग इथले चित्र पाहिल्यानंतर उलगडा झाला :
https://bahuvidh.com/marathipratham/22945
वळचणीच्या संदर्भातील दोन म्हणी रोचक आहेत :
1. वळचणीची पाल = आडून कानवसा घेणारी व्यक्ति
2. वळचणीचे पाणी आढ्याला जात नाही = (पाणी खालून वर जात नाही यावरून) लहानाला मोठे होणे अशक्य.
डौल मोराच्या मानंचा या
डौल मोराच्या मानंचा या गीताबद्दल काही प्रश्न आहेत.
लाविल पैजंला आपली कुडं >> म्हणजे काय?
तान्या सर्ज्याची हनम जोडी >> 'हनम' म्हणजे?
पहिल्या कडव्यात 'सुर्व्या-चंदराची ओ जोडी, त्याच्या सर्गाची रं माडी' ह्यात 'त्याच्या सर्गाची माडी'चा कॉन्ट्क्स्ट कळला नाही. सूर्य-चंद्र मिळून स्वर्गाची माडी तयार करतात??
Pages