Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34
![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2024/03/16/m%20%E0%A4%AE.png)
भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुलं….
पुलं….
आम्ही सूक्ष्मात जातो मधले “सखे यांना मूत्रमंदिराचा मार्ग दाखव” आठवले![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
समिष की सामिष ?
समिष की सामिष ?![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
सा सा, टायपो झालेला
>>> अर्थभिन्नता पहा :
>>> अर्थभिन्नता पहा :
• मिष = ढोंग, सोंग.
• आमिष/आमीष = प्रलोभन; लालूच
• अमीष = उत्पन्न; मिळकत; देणगी >>>
बाकी सगळ्यांची सोंगे (मिष) आणता येतात परंतु पैशाचे आणता येत नाही त्यामुळे पैशाला अमीष म्हणत असतील काय?
रच्याकने ह्या मिष, आमिष, अमीष मुळे अमिश कम्युनिटी आठवली. लेख लिहिण्यासाठी चांगला विषय आहे खरा!
मस्त चर्चा
मस्त चर्चा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अमिषा पटेलच्या नावाचा अर्थ कळायचा नाही, नेहमी पैशाचे आमिष दाखवून फसवणूक, लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार अशाच भयंकर बातम्या वाचलेल्या. असं नाव कुणी का ठेवेल म्हणून मनानेच शहामृगाचं 'श' असेल आणि 'अमिशा' म्हणजे 'मिशा नसलेली ती' असं काही तरी अगम्य- विनोदी स्पष्टीकरण मनात दिलेले.
अमिश कम्युनिटी आठवली >>>
अमिश कम्युनिटी आठवली >>> अगदी ! बऱ्याच आमिषांपासून लांब असतात ही मंडळी
'अमिशा' म्हणजे 'मिशा नसलेली ती' असं काही तरी >>> लय भारी !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळ्या आमिषांपासून लांब ते
सगळ्या आमिषांपासून लांब ते अमिश...
ही कोटी भारी आहे.
'अमिशा' म्हणजे 'मिशा नसलेली ती'
हे वाचून हसून हसून पुरेवाट झाली.
आणि आत्याबाई समिशा असत्यातर ...
ही नवीन म्हण तयार झाली.
अमिश लोकंबद्दल वाचायला आवडेल
अमिश लोकंबद्दल वाचायला आवडेल मला..इथे कुणी लिहीलं तर.
आयेम फॅमिश्ड फॉर अमिश!
'अमिशा' म्हणजे 'मिशा नसलेली
'अमिशा' म्हणजे 'मिशा नसलेली ती' >>![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
पराणी
पराणी
= टोचणी, नेट
जाचणी; टुमणी हे पण समानार्थी.
प्रथमच वाचला :
.. मात्र त्यासाठी कुणीतरी त्यांना सातत्याने पराणी टोचत राहावं लागतं.
बैलगाडा शर्यतीत बैलांना
बैलगाडा शर्यतीत बैलांना पळविण्यासाठी पराणी टोचायचे पूर्वी.
बैलगाडा शर्यतीत बैलांना
बैलगाडा शर्यतीत बैलांना पळविण्यासाठी पराणी टोचायचे पूर्वी.
अच्छा ! नक्की कशी दिसते
अच्छा ! नक्की कशी दिसते पराणी ?
दाभणासारखी ?
दोन अडीच फूट लांब काठी असते.
दोन अडीच फूट लांब काठी असते. एका टोकाला मध्ये
दोन्ही बाजूला टोक असलेला खिळा खुपसलेला असतो 8-10 मिमी बाहेर असते खिळ्याचे बाहेरचे टोक.
शर्यतीतच नव्हे, एरव्हीही बैलगाडी चालवताना वापरतात, पु शर्यतीत जास्त वापरत होतो.
दोन अडीच फूट लांब काठी ओह !
दोन अडीच फूट लांब काठी ओह !
धन्स.
रपका
रपका
पाठीवर 'रपका' हाणला असे वाक्य आले, अर्थ शोधला तर
रपका = गुद्दा
असे पाठीवर मारायचे असल्यास रपाटा; धपाटा; रपका; रामटोला; रट्टा; तडाखा; गुद्दा अशी बरीच चॉईस आहे हे समजले.
ज्यांना हाणावे मारावे असे अनेक deserving दुष्ट चेहरे डोळ्यासमोर तरळले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रपका >>>
रपका >>>
हे घ्या अजून समानार्थी : भतका, भत्तका, भदका
>>>>ज्यांना हाणावे मारावे असे
>>>>ज्यांना हाणावे मारावे असे अनेक deserving दुष्ट चेहरे डोळ्यासमोर तरळले>>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आशा करतो माबोकर नसतील...
पण गुद्दा वेगळा, धपाटा वेगळा.
पण गुद्दा वेगळा, धपाटा वेगळा.
गुद्दा मुठ आवळून, धपाटा हात पसरट असताना.
पराणी
पराणी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा शब्द कोड्यात येऊन गेला होता एकदा, शेवटपर्यंत आला नाही. तुम्ही बैलगाडीचा क्लू ही दिला होता. पण शब्दच माहिती नव्हता. आताही विसरून गेला होता. रोजच्या वापरात- ऐकण्यात- बोलण्यात नसलेले शब्द आणि ती वस्तू बघितलेली नसल्याने त्याचा संबंधही मेंदूत रजिस्टर होत नाहीत. आता हे वाचून ते आठवले.
>>>ज्यांना हाणावे मारावे असे अनेक deserving दुष्ट चेहरे डोळ्यासमोर तरळले>>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आशा करतो माबोकर नसतील...
>>>>>
आणि ती वस्तू बघितलेली
आणि ती वस्तू बघितलेली नसल्याने त्याचा संबंधही मेंदूत रजिस्टर होत नाहीत. >>>> अ ग दी +११
गुद्दयाचा मुद्दा पटतोय !
गुद्दयाचा मुद्दा पटतोय !
मूठ न आवळता / हात पसरट असताना हाणण्यासाठी हे अजून आहेत :
चापट, चपराक, थापट, थापड आणि झापड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
.. आशा करतो माबोकर नसतील...
.. आशा करतो माबोकर नसतील...
नाही नाही, माबोकर नाहीत त्या यादीत, relax![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>>चापट, चपराक, थापट, थापड
>>>>चापट, चपराक, थापट, थापड आणि झापड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चापट परवडली यातली
>>> पाठीवर मारायचे असल्यास
>>> पाठीवर मारायचे असल्यास रपाटा; धपाटा; रपका; रामटोला; रट्टा; तडाखा; गुद्दा अशी बरीच चॉईस आहे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
फटके खाल्ले नाहीत वाटतं इथे कोणी लहानपणी?
माझ्याकडुन भर: रैपट.
माझ्याकडुन भर: रैपट.
नाही, धपाटे खाल्लेत आणि
नाही, धपाटे खाल्लेत आणि गुद्दे दिलेत. घेवाणदेवाण चालतच असायची. मोठ्यांनी दिला तर धपाटा, समवयीन भावंडांनी आपसात दिले तर गुद्दे. भावना एकच शब्द वेगळे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धपाट्यात जास्त क्षेत्रफळ कव्हर होते, हात पसरून मारलेले असल्याने. तेच गुद्दे मुठीने मारायचे असल्याने क्षेत्रफळ कमी तीव्रता जास्त. यावरून मला ठिबक सिंचन व तुषार सिंचन आठवलं.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
फटका तर चिरंतन आहे !
फटका तर चिरंतन आहे !
मिंग्लिश स्पीकिंग आई-बाबांचे “नाऊ यू विल गेट फटकाज् हं” (note the plurals your lordship) सर्रास ऐकू येते
ठिबक सिंचन व तुषार सिंचन …. आम्ही पाटाचं पाणी वाले![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आम्ही पाटाचं पाणी वाले >>>
आम्ही पाटाचं पाणी वाले >>>
गुलाब, जाईजुई, मोगरा फुलला वाटतं.
धमाल चर्चा. गाडी हिंसक
धमाल चर्चा. गाडी हिंसक भागातून एकदम शेतीप्रधान प्रदेशात आली.
वरती ठोसा राहिला का? समवयस्कांच्या मारामारीत ठोसेघरचा धबधबा पडत असे.
रपाटा; धपाटा; रपका; रामटोला; रट्टा; तडाखा; गुद्दा >> यातले र वरून सुरू होणारे शब्द, मारणारा हात जास्त वेगात हलला असेल, तर वापरावेत असा माझा वैयक्तिक संकेत आहे. रपक्याचा आवाज कमी होतो, पण लागते जास्त - छडीचा असतो तसा. रट्टा थोडा जास्त आवाज करतो. रपाटा हा वेगात येतो आणि आणखी जास्त आवाज करतो. धपाटा पण तेवढाच आवाज करतो, पण तो येताना दिसत नाही, त्यामुळे वेग काय होता त्याचं वर्णन त्या शब्दात येत नाही. डायरेक्ट पाठीवर बसलाकीच कळतो की अरेच्चा, धपाटा बसला वाटतं! गुद्दा समोरून आला असेल तर दिसतो, आणि पोटात बसतो. इथे पोट flexible असल्याने त्वचेचा आवाज होत नाही, पण गुद्दा पोट दाबत आतापर्यंत जाऊन आत मार देतो.
अनिंद्य
अनिंद्य![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
Pages