Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34
भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रेक्षकओढू
प्रेक्षकओढू
असे काही नवे जोडशब्द वृत्तपत्रांमध्ये दिसत आहेत :
प्रेक्षकओढू सुपरिचित चर्चासत्रांपलीकडे ‘जो जे वांछील तो’ या प्रकारच्या विषयांवर नवी माहिती करून देणाऱ्या गप्पांची इथे कमतरता नसते.
https://www.loksatta.com/lokrang/lokrang-article-on-marathi-sahitya-samm...
कुमार सर धन्यवाद या
कुमार सर धन्यवाद या दुव्याबद्दल....
सर्वसमावेशक साहित्य एका ठिकाणी ही संकल्पना प्रथम वाचनात आली. खरंच साहित्य क्षितीज विस्तारतयं याचा आनंद आहे...मी मराठी असलो तरी मला इतर भाषेत काय उलथापालथ होतेय हे रसिक म्हणून जाणून घ्यायला अशी ठिकाणं निश्चित मोलाची मदत करतील. संयोजक हुशार आहेत त्यांना माहीत आहे ह्या प्रयत्नातून पुस्तक विक्री विक्रमी होतेय.
प्रेक्षकओढ सारखा दुसरा खूपविक्या शब्द वाचला...पण एवढं पटलं नाही हे प्रकरण...एखादा नवीन शब्द देताना तो चपखल असावा याचा विचार व्हायला हवा. असं नाविन्य शोधताना भाषा सौंदर्य नष्ट करु नये...
खूपविक्या >>>
खूपविक्या >>>
अगदी माझ्या मनातलाच लिहिलात !
नंतर कधीतरी मी घेणारच होतो .
नावाजलेल्या लेखकांना देखील त्याचा मोह पडलेला आहे.
या पुस्तकात (https://www.maayboli.com/node/77708) तो बऱ्यापैकी आलेला आहे.
>>>पायावर नक्षत्र पडले -
>>>पायावर नक्षत्र पडले - आयुष्यभर भटकत रहावे लागल
हातावर नक्षत्र पडले आहे = चोरी करण्याची सवय आहे
तोंडावर नक्षत्र पडले आहे = बडबड्या स्वभाव असणे
अनिंद्य आपण मागील भागात दिलेले, नक्षत्रांवरुन आलेले हे वाक्प्रचार मजेशीर आहेत.
आभार.
आभार.
खूप प्रचलित असले तरी ते नक्षत्राचे देणे-घेणे नाही समजत मला
छान
छान
नक्षत्रचे दोन अपभ्रंश देखील आहेत
नखत्र, नखेत्र
या तीन शब्दांत वरवर
या तीन शब्दांत वरवर साधर्म्य दिसले तरी अर्थभिन्नता पहा :
• मिष = ढोंग, सोंग.
• आमिष/आमीष = प्रलोभन; लालूच
• अमीष = उत्पन्न; मिळकत; देणगी
अमीष माहिती नव्हता.
अमीष माहिती नव्हता.
अमीष माहिती नव्हता+1
अमीष माहिती नव्हता+1
या फेन-मिषें हससि निर्दया
या फेन-मिषें हससि निर्दया कैसा या ओळीतला मिषें शब्दाचा अर्थ आज कळला.
सवडीने त्या ओळीचे आमच्यासाठी
सवडीने त्या ओळीचे आमच्यासाठी विस्कटून निरूपण कराच !
सागरा प्राण तळमळला या काव्यात
सागरा प्राण तळमळला या काव्यात चौथ्या कडव्यात ही ओळ येते. सागराने कवीला मी मातृभूमीला परत आणीन असं वचन दिलं आहे. पण ते त्याने पाळलेलं नाही असा राग तो कवी आपल्या तळमळणाऱ्या अंतःकरणाने व्यक्त करत आहे.
या फेन-मिषे हससी निर्दया कैसा
का वचन भंगिसी ऐसा
फेन म्हणजे फेस (यावर याच धाग्याच्या भाग २ मध्ये फेनील चर्चा झाल्यासारखी आठवत आहे). आपण एखाद्याला "दात दाखवून विचकट हसतो आहेस" म्हणतो ना, तसं कवी सागराला (फेस दाखवून विचकट हसण्याबद्दल) म्हणतो की तू निर्दयी आहेस, ह्या ढोंगी फेसातून तू हसतो आहेस, पण मला दिलेलं वचन तू भंग केलं आहेस.
वा !ढोंगी फेसातून तू हसतो
वा !
ढोंगी फेसातून तू हसतो आहेस >>>> समजले.
धन्स.
पुण्याचा आसपास बोली भाषेत...
पुण्याचा आसपास बोली भाषेत...
काय येड्याच मिष घेतोस असे बोलतात...म्हणजे एखाद्या गोष्टी बाबत माहित नाही असा खोटा आव आणू नकोस ( ढोंग करु नकोस).
वा मस्त माहिती
वा मस्त माहिती
मला आपलं समिष आठवलं
समिष की सामिष ?
समिष की सामिष ?
स + आमिष = सामिष असेच वाटते.
निर् + आमिष = निरामिष
..
येड्याच मिष घेतोस >>> भारीच !
अमीष माहिती नव्हता ?
अमीष माहिती नव्हता ?
मला तर अमीष (पटेल) + अमीषा (पटेल) दोन्ही माहिती होते
येड्याच मिष घेतोस … बेष्ट !
तसेच “जेवणाच्या मिषाने चार लोक जमतात” असेही ऐकले आहे.
सामिष आहे...
सामिष आहे...
सामिष भोजन...मांसाहारी भोजन
निरामिष...मांसरहित
सामिष - निरामिष वरुन पु लं
सामिष - निरामिष वरुन पु लं चे नशीब 'पुरुष आणि प्रकृती' नाही लिहीले.. आठवले!
**पुरुष आणि प्रकृती' >>
**पुरुष आणि प्रकृती' >>
नाही आठवत किंवा वाचले नसावे
सांगून टाका.
देवनागरीकरण करण्याच्या नादात
देवनागरीकरण करण्याच्या नादात भारतीय रेल्वेत दुर्बोध शब्द वापरले असतात ना बरेचदा... त्याबद्दल पु लं नी लिहीले होते ;
यातायात, शयनयान, उपरी उपस्कर, सामिष निरामिष भोजनालय ..... तर तसेच जेंट्स टॉयलेट च्या दारावर पुरुष असे लिहीलेले वाचून त्यांना वाटले की स्त्रियांच्या टॉयलेट ला नशिब प्रकृती असे नाही लिहीले.... !
ओह ! छानच ..
ओह ! छानच ..
रच्याकने..
काही वर्षांपूर्वी मी एका नामांकित शिक्षणसंस्थेतील एका मजल्यावरच्या लागूनच्या 2 स्वच्छतागृहांवर असे लिहिलेले पाहिले आहे :
Ladies . llllllllll . Ganties
विनोद नाही, वस्तुस्थिती !
बापरे!
बापरे!
Ganties
Ganties
इथे अस्थानी होईल पण पार्ले मुंबईच्या एका प्रख्यात कॉलेजात युरिनलच्या दारावर “मोरारजी देसाई ज्यूस सेंटर” असे सुवाच्य अक्षरात लिहिलेले बघितलेय. प्रचंड हसायला आले होते
“मोरारजी देसाई ज्यूस सेंटर >
“मोरारजी देसाई ज्यूस सेंटर >>> होय, हा महाविद्यालयीन जीवनातला एक विनोद होता !
आता थोडे अस्थानी वाढवतो..
मी ज्या महाविद्यालयात फक्त बारावी शास्त्र शाखेपुरता होतो तिथल्या स्वच्छतागृहाच्या स्वतंत्र एक मजली इमारतीचा आकार संसदेसारखा होता. त्यामुळे विद्यार्थीवर्गात त्याला पार्लमेंट म्हटले जायचे आणि तिकडे जाण्यापूर्वी करंगळी दाखवण्याची गरज नसायची ; "पार्लमेंटला चाललोय" असे म्हटले की हशा पिकायचा.
हे फारच वाढल्यानंतर कॉलेज व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना ताकीद दिली होती.
( असो. संसदेबद्दल आदर आहे ; गैरसमज नसावा)
मोरारजी देसाई ज्यूस सेंटर आणि
मोरारजी देसाई ज्यूस सेंटर आणि पार्लमेंट
BTW, वारंवार 'पार्लमेंटला'
BTW, वारंवार 'पार्लमेंटला' जावे लागणाऱ्यांसाठी 'मुतीर' असा शुद्ध मराठी शब्द आहे
'मुतीर'
'मुतीर'
>>> अरे वा, छान शब्द !
या निमित्ताने एक नवा शब्दवेध सुरू झाला....
मुतरी, मुतारी हे मूत्र कुळातले अधिकृत शब्द पूर्वीपासून आहेतच. मराठी साहित्यातही ते व्यवस्थित वापरले जायचे. पुलंचा एक लेख आठवतो.
अलीकडे इंग्लिशच्या अतिप्रभावामुळे अशा शब्दांना कालबाह्य केले गेले आहे.
पार्लमेंटला चाललोय"
पार्लमेंटला चाललोय"
मुतीर माहित नव्हता...
बस स्थानका सारख्या ठिकाणी मुतारी शब्द वाचलाय.
काही ठिकाणी इंग्लिशचा प्रभाव
हे असे काही वाचले की ..काही ठिकाणी इंग्लिशचा प्रभाव असलेलाच इष्ट वाटते!!!
थोडे 'masking ' तरी मिळते.
Pages