Submitted by Bhumika on 31 July, 2008 - 22:49
मी नुकतेच २०१२ या वर्षाबदल यु ट्युब वर विडिओ पाहिले. भन्नाट वाटले. माया, चिनी, रोमन सन्क्रुति नुसार ( नुकतेच वाचलेल्या मराठि पुस्तका प्रमाणे सुद्धा ) २०१२ या साली काहितरि खास होणार आहे हे खरे. मग ते काय असेल ? तुम्हि हि कोणि काहि माहित असेल तर नक्कि सान्गा. खालि काहि लिन्क्स आहेत.
[video:http://www.youtube.com/watch?v=XAtgPaggeTM&feature=related]
[video:http://www.youtube.com/watch?v=V5MS5Odp2qQ&feature=related]
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
|| हरि ओम || ३
|| हरि ओम ||
३ दिवसानि कळेलच मग आपण उहपोह करुयात ह्याचा ओके उपास?
८-८-८ ला
८-८-८ ला रॉजर फेडररचा वाढदिवस आहे. ह्या दिवशी फेडी, राफाला फ्रेंच खुल्या स्पर्धेत हरवेल आणि मग त्याला (आणि मला व समस्त चाहतेवर्गाला) आलेल्या आनंदाश्रुंमुळे जगबुडी होइल. बोटी बांधायला घ्या, वेळ फार थोडा आहे.
८-८-८ ला
८-८-८ ला रॉजर फेडररचा वाढदिवस आहे. ह्या दिवशी फेडी, राफाला फ्रेंच खुल्या स्पर्धेत हरवेल >>>> वा वा म्हणजे चमत्काराने त्या दिवशी ह्या वर्षीची फेंच स्पर्धा परत होणार का??
>>मग आपण
>>मग आपण उहपोह करुयात ह्याचा ओके उपास?
म्हणजे मग हा बीबी आपण २१ डिसें २०१२ नंतर उघडायला हवा (जे १% आहेत आणि संदिग्ध २४% ते वाचले तर वाचतील )
घ्या, कुणाला कशाच.. फेडी जिंकेलच पण स्वप्नात येऊन जातोय की काय.. एखाद ललित लिहून टाक मस्त पैकी लालू च्या मिटींग सारखं पण आपल्या गावाकडच्या भाषेत
सगळ्या
सगळ्या पुस्तकात नेहेमी जगबुडी, महाप्रलय, विनाश वगैरेच लिहिलेलं आहे का? कोणच अस पुस्तक नाही का ज्यात अमुक एका साली लोकांच्या वागण्यात बदल होऊन शांतता पसरेल किंवा अमुक एकासाली लोकोध्दार होईल. अस पुस्तक असेल तर वाचायला आवडेल. +ve vibrations पसरलेल्या जास्त चांगल्या.
|| हरि ओम
|| हरि ओम ||
आहे ना. मराठी नि इन्ग्लिश दोन्हि मधे आहे. २०२५ पासुन जग शन्ततेच्या मर्गाने प्रवास करु लागेल आणि रामराज्य येइल.
वाचयचे असेल तर डॉ अनिरुद्ध जोशि यान्चे " तिसरे महायुद्ध " पुस्तक वाचा. खुप छान आहे. २०१२ तो २०२४ महा सन्ग्राम पण २०२५ पासुन जग शन्ततेच्या मर्गाने प्रवास करु लागेल आणि रामराज्य येइल.
१३
१३ दिवसांच्या वनवासानंतर हे वाचून श्रमपरिहार झाला!!
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
हे वाचून
हे वाचून श्रमपरिहार झाला!! >>>> .. मला सकाळी असेच वाटले की आज अजून काही वाचले नाही तरी चालेल.
त्या २,३,८,१
त्या २,३,८,१ चा अर्थ २३८१ असा का नाही होत्?किंवा २ मार्च ८१ च पण २०८१ किंवा २१८१ अथवा ८१८१ साल किंवा ८१ वे सहस्त्रक वगैएरे??
मनकामनकाफेर!
_________________________
-Man has no greater enemy than himself
२०२५ पासून
२०२५ पासून रामराज्य येणार काय? सर्व जगात की केवळ भारतात किंवा अमेरिकेत का युरोपात? ह्या रामराज्याची लिखित संहिता उपलब्ध आहे का? नाही, समजा सुरापान बेकायदेशीर केले ह्या रामराज्यात तर २०२४ मध्ये एक कलमी कार्यक्रम म्हणजे 'स्टॉक' करणे.. अश्या इतरही वस्तु असु शकतात.. माहिती असलेली चांगली...
>>>> २ मार्च
>>>> २ मार्च १९८१ हा दिवस
झक्की???? जरा आठवून बघा हो ते साल, तुम्हाला ग्रीन कार्ड मिळाल ते साल म्हणतोय मी!
महिना मार्चच होता ना? तारीख तेवढी कन्फर्म करा!
.
माझ्या (ऐकीव) माहितीप्रमाणे २ मार्च १९८१ रोजी एकच महत्वाची घटना विश्वात घडली, ती म्हणजे श्रीयुत झक्कीन्ना ग्रीनकार्ड मिळाले! DDD
...;
आपला, लिम्बुटिम्बु
टण्या,
टण्या, स्टॉक करण्याच्या तयारीत आहेस म्हणजे तू असं धरून चालला आहेस की त्या २४% की १% तू असशील.. याला काही आधार?
--------------------------------------
जगात मागितल्याशिवाय एकच गोष्ट मिळते- सल्ला!
याला काही
याला काही आधार?>>>>>>>
याला दुर्दम्य आशावाद म्हणतात.
.
पण हे खरेच आहे, इंकांच्या बिनचूक गणितानुसार २०१५ साल, जून महिना. जगबुडी. (मराठीत 'जुने जाऊ द्या मरणालागुनी' हे याच इंका भाकितानुसार आले आहे. कारण june ह्या इंग्लिश शब्दाचा उच्चार मराठीत जुने असाच होतो.)
इंका संस्कृती फार प्रगत होती. हरीण, माचू पिचूवरचा देव, गाय आणि कॅलेंडर ही त्यांच्या जीवनाची महत्त्वाची चार अंगे होती.
इंकांच्या गुहांमध्ये इंकन गृहिणी शुचिर्भूत होऊन माचू पिचूवरल्या देवाची पूजा करत आहेत अशी चित्रे सापडली आहेत. तसेच एके ठिकाणी एक ऋषीसारखा इंकन माणूस २,३,८,१ असे आकडे लिहित आहे हे देखील चित्रात दिसते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
'माता' रिटर्न्स.
>>>>>>>>>>>>>> टण्य
>>>>>>>>>>>>>>
टण्या, स्टॉक करण्याच्या तयारीत आहेस म्हणजे तू असं धरून चालला आहेस की त्या २४% की १% तू असशील.. याला काही आधार? >>>>>>>>>>>>
समजा नसलो तर चांगलंच आहे.. पण चुकुन माकुन त्या २४% की १% मध्ये राहिलोच आणि रामराज्य आले तर? माते, हा दुर्दम्य आशावाद नाहिये तर दुर्दम्य निराशावाद आहे. अनिरुद्ध जोशींच्या रामराज्यात राहणे ह्यापेक्षा वाईट अवस्था माणसावर (माझ्यासारख्या) आणखी कुठली येउ शकेल का?
>>>>
इंकांच्या गुहांमध्ये इंकन गृहिणी शुचिर्भूत होऊन माचू पिचूवरल्या देवाची पूजा करत आहेत अशी चित्रे सापडली आहेत.
>>>>
त्या गृहिणींनी जांभळ्या रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत की किरमिजी?
इम्ब्बुट्टु लोकांच्या म्हणण्यानुसार जांभळा आणि किरमिजी रंग एकत्र केला की नारिंगी तयार होते.. साक्षात्काराची अनुभुती घ्यायची असेल तर ही नारिंगी अतिशय गुणकारी आहे.. (ती नारिंगी न घेतादेखील काही लोकांना साक्षात्कार होतो हा भाग अलहिदा)
कुठला विषय
कुठला विषय कुठे गेला ...
जसे वाजती नुपुर सुखाचे ...
सगळ्या
सगळ्या पुस्तकात नेहेमी जगबुडी, महाप्रलय, विनाश वगैरेच लिहिलेलं आहे का? कोणच अस पुस्तक नाही का ज्यात अमुक एका साली लोकांच्या वागण्यात बदल होऊन शांतता पसरेल किंवा अमुक एकासाली लोकोध्दार होईल. अस पुस्तक असेल तर वाचायला आवडेल. +ve vibrations पसरलेल्या जास्त चांगल्या. >>>>>>>> आर्च : सगळे जणं तू असं पुस्तक लिहिशील या आशेवर आहेत ................
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धारा
उलगडला धारांतून अवचित हिरवा मोरपिसारा
नाहितर काय
नाहितर काय ! टण्या, "तिसरे महायुध्द" हे पुस्तक अध्यात्मावर नाहिये. माझ्या पूर्णपणे नास्तिक दीरांनी एका दिवसात वाचून काढले. या पुस्तकात, पहिल्या / दुसर्या महायुध्दाची रुपरेषा, जगाच्या नकाशावरील विविध देश ज्यांचा जगाच्या नाशामध्ये महत्वाचा रोल आहे, विविध व्यक्तीमत्वे उदा. कोंडोलिझा राईस, ओसामा बिन लादेन इ., भौगोलिक स्थिती, राजकीय परिस्थिती, जगभरात झालेले उठाव यांचा अभ्यासपुर्ण आढावा आहे तसेच काय काय झाले (म्हणजे कुठल्या देशाने कुठला पवित्रा घेतला) तर युध्दाचे पडसाद कमी उमटतील याबद्दलही चर्चा आहे.
अश्विनी
अश्विनी असे आहे होय.. लवकरच मिळवून वाचतो.. डॉ अनिरुद्ध जोशी म्हणजेच अनिरुद्ध बापू का? हे जिओपॉलिटिक्समध्येही जाणकार आहेत हे माहिती नव्हतं.. आम्ही आपले उगीच किसिन्जर, हंटिंग्स्टन, ब्रिजेश मिश्रा, अरुण शौरी, जसवंत सिंग ह्यांची पुस्तके आणि लेख वाचत बसतो..
विषय
विषय भरकटतो आहे. इथे फक्त हरीण, गाई, २, ३, ८, १ हे आकडे, जांभळे कपडे, इंका व माया संस्कृती , e un enguana हे पुस्तक यांची चर्चा कृपया करावी.
ही पृथ्वी कशी व कधी नष्ट होणार, १/४ किंवा १% यांपैकी कोण वाचणार याविषयी चर्चा इथे अपेक्षित आहे.
अनिरुद्ध बापू व जगबुडी ,विश्वाचा नाश यांचा संबंध असल्यास त्यासंबंधी चर्चा केल्यास अथवा पुस्तकांचा संदर्भ दिल्यास उत्तम.
अरे ते वाच
अरे ते वाच म्हणून नाही सांगत आहे. तुझा गैरसमज झाला आहे असे वाटले म्हणून सांगितले. तू आपले तुझे नेहमीचे वाचन चालू ठेव कसे !
ह्म्म...
ह्म्म... मनाच्या श्लोकांतील प्रत्येक ओळ बाराक्षरी आहे.
'मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मात तोही पुढे जात आहे' हे सूचक वाटले.
शिवाय, १२वा श्लोक पुढीलप्रमाणे -
मना मानसी दु:ख आणू नको रे
मना सर्वथा शोक चिंता नको रे
विवेके देहबुद्धी सोडोनी द्यावी
विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी ||१२||
हाच श्लोक नेमका १२वा कसा काय ? हेही फार सूचक आहे (बाराक्षरी करण्यासाठी 'रे' चा ठिकठिकाणी वापर केला आहे, तो भरीचा की भारीचा हा मुद्दा इथे अप्रस्तुत होय.) समर्थांची थोरवी इथेच संपत नाही. एकूण श्लोक २०५. त्याचा १% म्हणजे २.०५. हे round off केले की उत्तर आले २. तसेच २०५चे २४% काढले. ते उत्तर आले ४९. आता २रा आणि ४९वा श्लोक काय आहेत -
मना सज्जना भक्तिपंथेचि जावे
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे
जनी निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे
जनी वंद्य ते सर्व भावे करावे ||२||
सदा बोलण्यासारिखे चालताहे
अनेकी सदा एक देवासी पाहे
सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||४९||
थोडक्यात, त्या १% मध्ये आणि २४%मध्ये कोण असतील याची लक्षणेच दिली आहेत. (समर्थांनी अजून बर्याच गोष्टींसाठी लक्षणे दिली आहेत, असतो एकेकाला छंद.)
***
It is the spirit of the age to believe that any fact, no matter how suspect, is superior to any imaginative exercise, no matter how true.
- Gore Vidal
स्लार्टी.....
स्लार्टी........... काय अफलातुन लॉजीक लावल आहे ..........
|| हरि ओम
|| हरि ओम ||
चिनुक्श " तिसरे महयुद्ध" हे पुस्तक वच. कुथेहि मिळेल ऑनलाइन पण इन्ग्लिश मधे विकत मिळते. अमॅझॉन वर पण आहे. अतिशय सुन्दर आणि माहितिपुर्ण पुस्तक आहे. अध्यत्मावर बिल्कुल नाहिये. पहिल्या दोन महयुधात आप्ल्याला माहित नसलेल्या बर्याच गोस्झ्ति सचित्र आहेत. आणि तिसर्या महायुधाचि जडण्घडण , कसे होवु शक्ते, कसे होइल , २०२५ नन्तर कसे होइल एत्यादि.
डॉ अनिरुध जोशी नि अजुनहि बरीच [पुस्तके लिहलि आहेत अध्यत्मावर आणि उत्सुकतेचि गोष्ट हि कि ह्यातिल एका पुस्ताकाचे शेवटचे पान कोरे थेवले आहे आणि म्हटलय कि २०२५ सालि ह्या पानावर लिहले जाइल.
भूमिकाताई,
भूमिकाताई,
या पुस्तकाच्या माहितीबद्दल धन्यवाद.
पण सध्या मी सहदेवानंदबापूंची पुस्तकं वाचतोय. आणि आमचे बापू खूप कडक आहेत. इतर कुणाची नॉन-अध्यात्मिक पुस्तकं वाचण्यावर त्यांनी निर्बंध घातले आहेत. त्यांच्या आज्ञांचे पालन केले तरच १% किंवा १/४ लोकांमध्ये माझा नंबर लागू शकेल.
शिवाय डॉ. अनिरुद्ध जोशी यांच्या पुस्तकात २०२५ नंतरच्या घटनांवर भर दिला आहे. त्यामुळे आधी चिंता २०१२ ची.
अयायायाया..
अयायायाया.. पोटात कळा येऊ लागल्यात अक्षरश:! (हसण्यामुळे नाही हो, जगबुडीच्या भीतीमुळे!!!!!!!!) इतकं भारी चाललंय, की अजिबात डिस्टर्ब करावसं वाटत नाही भुमिकाज्जीला.
श्रध्दा, टण्या, असामी, स्लार्टी- अफाट, अफाट, अफाट, अफाट!!!!!!!!
मालदीव बेटावरची हिज्बामा संस्कृती अन झांबियातली अर्वाचीन आक्रस्तुलांडू जमात यावर मी सध्या अभ्यास करतोय. पण संदर्भग्रंथांची नावं देत नाही. कारण तुम्ही सगळे फारच हुशार लोकं हाय बॉ. माझ्याआधीच कुणीतरी अभ्यास करून पोस्टायचं इथं.
दुसरं म्हणजे- १% मध्ये मी बसणार नाही, हे तर कळलंच. पण त्या २४% मध्ये तरी कशीतरी जागा मिळवायचं- हे अभ्यास वगैरे करून ते जमतंय का बघतो.
अभ्यास होऊ दे. मग मी पोस्ट केल्यावर सगळ्यांची तंतरते की नाही बघा. कारण ते हरीण, नीलगाय, इंका, जांभळा अन किरमिजी रंग, १ अन २४%, २०१२, २०२५, २-३-८-१ याबाबत काही महत्वाचे संदर्भ मला सापडलेत.
अभ्यासासोबतच एका प्रश्नाचा सध्या मी गांभीर्यानं विचार करतोय- २०१२ साली जग बुडाल्यावर २०२५ ला रामराज्य कसं येणार बुवा? थोडक्यात मी माझ्या एलआयसी पॉलीशा चालू ठेवायच्या का नाय?
ह्या २०१२
ह्या २०१२ आणि जगबुडी विषयी कळल्यापासुन मी तर इडली-दोशासाठी डाळ्-तांदुळ भिजत घालणे थांबवले आहे. एक तर ते १२ तास पाण्यात बुडवुन ठेवावे लागतात आणि पुन्हा "फसफसनेके वास्ते" १२ च तास ठेवावे लागतात.
.
स्लार्टि, तुमच्या विवेचनावरुन मी खालील निष्कर्ष काढला आहे:-
मानसी नावाचे लोक २०१३ किंवा २०२५ मधे नको
विवेक नावाचे लोक सोडुन द्या.
मुक्ती नावाचे लोक जाऊ द्या.
भक्ति २०१३/२०२५ मधे जाऊ द्या.
श्रीहरी जेता:- हा सगळ्यांचा राजा.
जनीला तर अजिबातच सोडुन द्या.
सदा चालेल.
सगुणी नाही.
.
टण्या (सगळे तुला असे म्हणतात म्हणुन मी पण म्हणते आहे), माफ कर तु ह्यात येत नाहीस. तेव्हा स्टॉक करण्याच्या भानगडीत पडु नकोस. काय असेल ते २०१२ च्या आधी संपव आणि हे करत असताना काही ब्रम्हज्ञान प्राप्त झाल्यास "ह्या" बाफवर येउन प्रवचन दे
काचेच्या
काचेच्या बूट वाल्या राजकन्ये
डाळ अन तांदूळ ५ -६ तास भिजवले तर पुरे. थोड्या कोमट पाण्यात भिजवलेस तर चार तास सुद्धा पुरेत.
एवढ्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा चालली असताना मधेच विषय बदलला म्हणुन पुण्यवान व्यक्ती क्षमा करतीलच अशी अपेक्षा आहे ( उरलेले जितके टक्के असतील त्यांचा राह फक्त २०१२ पर्यंत टिकेल त्यामुळे त्याची काळजी नाही )
>>२०१२ साली
>>२०१२ साली जग बुडाल्यावर २०२५ ला रामराज्य कसं येणार बुवा?
१% किंवा १/४ यांपैकी कोणीतरी २०२५ मध्ये असतीलच.. आणि डॉ. जोशी असताना रामावतार कोण, हे ओघाने आलेच.
टण्या
टण्या (सगळे तुला असे म्हणतात म्हणुन मी पण म्हणते आहे), माफ कर तु ह्यात येत नाहीस. तेव्हा स्टॉक करण्याच्या भानगडीत पडु नकोस. काय असेल ते २०१२ च्या आधी संपव आणि हे करत असताना काही ब्रम्हज्ञान प्राप्त झाल्यास "ह्या" बाफवर येउन प्रवचन दे
>>>>>>>>
तुला काय वाटले मी हे प्रवचन स्टॉक कन्झ्युम न करता देतोय की काय?
असो.. ह्या जगात केवळ १% का २४% लोक शिल्लक राहणार आहेत.. ते सुद्धा केवल सत्शील, सद्गुणी इत्यादी इत्यादी.. मग येणार रामराज्य.. तर अश्या ह्या रामराज्यातून वाईट गोष्टींचा नाश व्हावा म्हणुन मी आत्तापासूनच हातभार लावत आहे.. उदा: दारू ही अतिशय वाईट गोष्ट आहे. म्हणुन जितकी संपवता येईल तितकी मी संपवायचा प्रयत्न करत आहे. बाकी देवाच्या हातात आहे की तो माझ्या ह्या प्रयत्नांना किती यश देतो ते.
हरि ओम गणगणा..
डाळ अन
डाळ अन तांदूळ ५ -६ तास भिजवले तर पुरे >>>> अजाण बालिके, तुला १२ ह्या आकड्याचे महत्व कळालेले दिसत नाहीये म्हणुन अशी बाष्कळ बडबड करते आहेस. जा, शुचिर्भूत होऊन माचू पिचूवरल्या देवाची पूजा कर आणि "तिसरे महायुद्ध" पुस्तकाचे १२ वेळा पारायण कर
Pages