२०१२ हे वर्ष सर्व संस्कृतींमध्ये कॅलेंडरचे शेवटचे वर्ष आहे का?

Submitted by Bhumika on 31 July, 2008 - 22:49

मी नुकतेच २०१२ या वर्षाबदल यु ट्युब वर विडिओ पाहिले. भन्नाट वाटले. माया, चिनी, रोमन सन्क्रुति नुसार ( नुकतेच वाचलेल्या मराठि पुस्तका प्रमाणे सुद्धा ) २०१२ या साली काहितरि खास होणार आहे हे खरे. मग ते काय असेल ? तुम्हि हि कोणि काहि माहित असेल तर नक्कि सान्गा. खालि काहि लिन्क्स आहेत.

[video:http://www.youtube.com/watch?v=XAtgPaggeTM&feature=related]

[video:http://www.youtube.com/watch?v=V5MS5Odp2qQ&feature=related]

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळात इन्का लोकांची ही वस्ती परग्रहावरून आलेल्या लोकांनी स्थापन केलेली होती. >> हो हो हे एकदम बरोबर आहे. पुराव्यादाखल उत्साही वाचकांनी Alien Vs Predator हा सिनेमा पाहावा. तो सत्य घटनांवर आधारीत आहे असे सुरूवातीलाच सांगितले आहे.
......
हरणाचा मुद्दा बरोबर आहे. पण गायीलाही पवित्र मानले आहे. हरणांना मारूनही खात असत.>> तुम्हा दोघांचा काहितरी गैरसमज होतोय. "तो" उल्लेख गाय किंवा हरणाचा नसून नीलगायीचा आहे. ना पूर्ण हरण ना पूर्ण गाय, ती नीलगाय.
......
ashbaby, e om engana हे पुस्तक असे सहजासहजी कोणालाही कधीच मिळत नाही. ज्यांचा २,३,८,१ ह्या आकड्यांशी संबंध आहे त्यांनाच ते मिळू शकते. (कसला संबंध ते मला विचारू नका. मला अजूनही पुस्तक मिळालेले नाही. मायबोलीकर चाफ्याला मिळालेले होते असे मी ऐकलेय आणि ते वाचल्यानंतर त्याने माझे "आठवी कथा" - परत आठ आकडा - हि त्यावर आधारीत कथा लिहिली होती)

e om engana हा अपभ्रंश असुन, त्या पुस्तकाचे मूळ नाव हरि ओम गणगणा असे आहे (गणगणा हे गणगण गणात बोते ह्यावरुन).. पुढे इंका लोकांनी त्याचा e om engana असा अपभ्रंश केला.. भारतीय संस्कृती त्याकाळी एव्हडी विस्तृत पसरली होती की दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पॉलिनेशिया, झालेच तर दक्षिण तसेच उत्तर ध्रुवावर देखील भारतीय संस्कृतीची निशाणे दिसतात.. हवाई ह्या पॉलिनेशियन बेटांपैकी सर्वात पूर्वेच्या बेटाचे नाव हवाहवाई नावाच्या भारतीय शब्दावरूनच पडलेले आहे.. Lol
हे पुस्तक मला मिळणार होते कारण माझा जन्म १९८२ (म्हणजे १, ३ चा वर्ग ९, २ आणि ८) अश्या तर्‍हेने १,२,३,८ ह्या चारही आकड्यांशी निगडित होता.. परंतु मायबोलीवरील काही तर्ककठोर माणसांनी त्यात खोडा घातला कारण त्यांच्या मते ३ चा वर्ग करताना २ हा आकडा आधीच वापरला गेला होता... Lol

असाम्या, ती नीलगाय नाही काय.. तो ल्लामा.. हा पेरु (बघा भारतीय संस्कृतीचा प्रभाव.. ह्या देशाचे नाव देखील भारतीय पेरु ह्या शब्दापासून) नावाच्या देशात सापडतो.. तिकडचा उंटच म्हणा की.. इंका लोक दळवळणाचे साधन म्हणुन ह्याचा उपयोग करत असत.. ते लोक ह्याच प्राण्याचे दूध पीत असत.. वरती उल्लेखलेल्या चित्रात हरणारा मारणारा माणुस नसुन तो ल्लामाला मारणारा माणुस आहे...

>>>>>>>>>>>>
मी नुकतेच २०१२ या वर्षाबदल यु ट्युब वर विडिओ पाहिले. भन्नाट वाटले. माया, चिनी, रोमन सन्क्रुति नुसार ( नुकतेच वाचलेल्या मराठि पुस्तका प्रमाणे सुद्धा ) २०१२ या साली काहितरि खास होणार आहे हे खरे.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>

परंतु दक्षिण-मध्य-पश्चिम आफ्रिकेतील जंगलांमध्ये राहणार्‍या इंबुट्टु (Mbumbuttueue) नावाच्या एका अतिअर्वाचीन जमातीनुसार २०१२ हे साल दशांशा नंतरचा आठवा आकडा ध्यानात न घेतल्याने आलेला आहे.. अचूक आकडेमोडीनुसार ते साल २०१३ असे आहे.. २०१३ साली होणार्‍या व केवळ दक्षिण धृवावरुन दिसणार्‍या खग्रास सुर्यग्रहणाच्या दिवशी पृथ्वीचा नाश होईल.. ह्याच संकल्पनेवरून धर्मेंद्रचा जलजीरा (की असाच काहीतरी नाव असलेला) चित्रपट बनवला गेला होता ज्यामध्ये खग्रास सुर्यग्रहणाच्या दिवशी हिमालय दुभंगून त्याच्या पोटातील सोन्याची शंकराची पिंड झळाळू लागते.. पण कोत्या मनाच्या भारतातल्या लोकांनी, हा चित्रपट म्हणजे ग्रेगरी पेक ह्या अभिनेत्याचा 'मकाण्णाचे सोने' ह्या इंग्रजी चित्रपटाची भ्रष्ट नक्कल आहे असा आरडाओरडा केला..

थोडक्यात इंका जमात व अमेझॉनच्या लोकांच्या विचारसरणीत खूप फरक आहे. त्याबद्दल आपले काय मत आहे?

यावर माझे मत असे आहे:
'डोंबल तुमचे!! लग्नाला एव्हढी वर्षे झाली, माझ्या नि सौ. च्या विचारसरणीत काय फरक आहेत तेहि कळत नाही. कुठले इंका नि अमॅझोन??'

असो. पण 'सर्व' संस्कृतींमधे भारतीय संस्कृति पण आहे. तर त्यातल्या कुठल्या ग्रंथात याबद्दल काही लिहीले आहे का? कुणि आहेत का आपल्या संस्कृतीचा अभ्यास करणारे? अर्थात् त्यात लिहिलेल्या गोष्टींवर कोण विश्वास ठेवणार? कुणा गोर्‍या माणसाने दारूच्या धुंदीत काहीतरी लिहीले की त्यावर उलट सुलट चर्चा होणार! हं! कदाचित् कॅनडा किंवा जर्मनीत सापडतील. चौकश्या केल्या पाहिजेत.

Eric von Daniken या माणसाने एक पुस्तक लिहीले होते. त्यात त्याने असे म्हंटले होते की दक्षिण अमेरिकेत परग्रहावरून लोक येऊन राहिले होते. नंतर त्याच्या मुद्द्यांचे खंडन करणारीहि पुस्तके प्रसिद्ध झाले होते.

हे २०१२ सोडा, पण तुम्ही जयंत नारळीकरांचे 'यक्षांची देणगी' हे १९९३ मधे प्रकाशित झालेले पुस्तक वाचा. एकाहून एक सरस कथा! नि काय काय कल्पना? दोरीला गाठ मारून दोरीची लांबी जशी कमी करतात, तसे कुणा परग्रहावरील लोकांनी रस्त्यालाच 'गाठ' मारून दोन ठिकाणातले अंतर कमी केले!

यावर माझे मत असे आहे:
'डोंबल तुमचे!! लग्नाला एव्हढी वर्षे झाली, माझ्या नि सौ. च्या विचारसरणीत काय फरक आहेत तेहि कळत नाही. कुठले इंका नि अमॅझोन??'
>>>>>>>>
Lol Lol Lol Lol

'डोंबल तुमचे!! लग्नाला एव्हढी वर्षे झाली, माझ्या नि सौ. च्या विचारसरणीत काय फरक आहेत तेहि कळत नाही. कुठले इंका नि अमॅझोन??' >>> ROFL... Classic Zakki!!! Happy

टण्या व असामी,
तुम्ही लोक जगबुडीला थट्टा समजत आहात, असे माझे मत बनत चालले आहे. नीलगाय काय नि ल्लामा काय? ती चित्रमालिका स्पष्ट आहे. ते हरीण आहे. हरणाला ते पवित्र मानत, आणि त्याचे मांस प्रसाद म्हणून खाल्ल्यास देव त्यांच्यावर कृपा करेल अशी त्यांची श्रद्धा होती. इंका लोकांनी बटाट्याच्या दोनशे जाती शोधून काढल्या होत्या. प्रत्येक वर्षी एका जातीचा बटाटा असे पीक ते घेत असत व पहिला बटाटा तयार झाला की हरीण व बटाट्याचा स्ट्यूसदृश पदार्थ ते त्यांच्या 'माचू पिचू' पठारावरील देवाला नैवेद्य दाखवून ग्रहण करत.
आणि ते पुस्तक लायब्ररीत उपलब्ध असेल तर कुणालाही मिळते. त्याचा त्या आकड्यांशी काहीएक संबंध नाही. ते आकडे म्हणजे २ मार्च १९८१ हा दिवस. त्यावेळेस मी काही महिने वयाची असल्याने मला त्यादिवशी नक्की काय झाले ते ठाऊक नाही. पण काहीतरी नक्कीच महत्त्वाचे झाले आहे. भविष्यातले स्पष्ट संकेत त्या गोष्टीमुळे मिळत आहेत व पुढेही मिळणार आहेत.

महिन्यातल्या पाचव्या शनिवारी जांभळे कपडे घालून हरीणाची पूजा करून लायब्ररीत गेल्यास हे पुस्तक मिळण्याची शक्यता वाढते.
हरीण नसेल तर हरीणाचे चित्र चालेल. मात्र त्या दिवशी बटाटा चिरू नये.
टीप : जांभळे कपडे हरीणाला नव्हे, आपण घालायचे आहेत.
.
लक्षात घ्या :
३ = पृथ्वीचा सूर्यमालेतील पत्ता
८ - १ = ७ = जांभळ्या रंगाचा इंद्रधनुष्यातील पत्ता
२ = शनिवारचा सप्ताहातील पत्ता (इंका मोजणीनुसार)

टीप : जांभळे कपडे हरीणाला नव्हे, आपण घालायचे आहेत.>> हे स्पष्ट केल्यामूळे बरे झाले. हरणाचे माप कसे घ्यायचे ह्याचा विचार करत होतो मी.

श्र तूला पुस्तक वाचायला मिळाल्यामूळेच तुला "ते कोणालाही मिळते" असे वाटतेय. किंबहुना पुस्तक वाचल्यामूळेच तूला "माता" हि पदवी प्राप्त झाली आहे ह्याचा तूला विसर पडला आहे. ह्या घोर पातकाबद्दल तूला mummy 3 Theatre मधे जाऊन बघावा लागेल असे मला वाटते. ह्यावर उ:शाप म्हणून तू दोन दिवस हरणाच्या कापड्याचे कपडे घालून २,१,८ ह्या आकड्याएव्हढे जांभळे बटाटे खा नि लामाचे दूध पी. Lol

जिवतीच्या चित्राप्रमाणे, हरणाचे चित्र कुठे मिळु शकेल काय?
नेमस्तक, हितगुज खरेदी पृष्ठावर 'इंकाच्या हरणाचे पूजेचे चित्र' खरेदी करण्याची सोय उपलब्ध करुन देता येईल का? हरणाच्या चित्रासोबत जांभळा वेष मोफत अशी योजना देखील सुरु करता येईल..
>>
स्वाती, तो रंग जांभळा नसून किरमिजी असाअवा असे माझे मत आहे.. कारण किरमिजी रंग हा, 'हातीमताई' नावाच्या अश्याच अतिशय गूढ व मूलभूत पुस्तकात अनेक वेळा येतो (उदा: हातीमताईने विहिरीत उडी मारली. मग त्याला प्रथम पिवळ्या रंगाचे उद्यान लागले. मग लाल रंगाचे. मग हिरव्या आणि शेवटी तो एका किरमिजी रंगाच्या उद्यानात पोचला. तिथे एक सुंदर राजकन्या हरणाची पूजा करत होती).. हातीमताईची कथा मी वर उल्लेख केलेल्या इंब्बुट्टु समाजात अतिशय लोकप्रिय होती..

तिथे एक सुंदर राजकन्या हरणाची पूजा करत होती >> नक्की हरीण होते कि ल्लामा रे ? आणि किरमिजी रंगाचे होती का ? राजकन्येने कुठल्या रंगाचे कपडे घातले होते ? जांभळ्या ?

सगळे details लिही रे. Devil is in the details.

असामी, डिटेल नीट वाच.. ल्लामा हा इंकांचा पूज्य प्राणी.. हरीण हे इम्ब्बुट्टू लोकांचे दैवत.. हतीमताई हा इम्ब्बुट्टुंचे आवडते पुस्तक.. आणि किरमिजी रंग हा हातीमताईचा आवडता रंग..
राजकन्येने कपडे घातले होते की नव्हते ह्याबद्दल महान महान पंडितांनी संशोधन केले परंतु त्यांना ह्यात यश आले नाही (त्यातले काही पंडित मग गाढवांना हरिण समजून त्यांचा अभ्यास करु लागले तर गाढवांनी त्यांना लाथा घातल्या)... आता जिथे कपड्यांबद्दलच संधिग्दता आहे तिथे रंग कुठुन कळणार!

हे सगळे वाचल्यावर मला वाटतेय कि जांभळ्या रंगाच्या नीलगायीला हरीण म्हणतात नि किरमिजी रांगाच्या नीलगायीला ल्लामा.

नाही, मला तर असं वाटतंय की कपडे घातलेल्या राजकन्येला हातीमताई म्हणत असावेत. (नाहीतरी पुरुषाला कशाला ताई म्हणतील?)

नाहीतरी पुरुषाला कशाला ताई म्हणतील? >> Lol आता पुरुषाला लामा (दलाई लामा) म्हणतात तर ताई का नाही चालणार ? Lol

विषय फार भरकटत चालला आहे.
मी आज कालनिर्णय ऑफिस मधे चौकशी केली तर त्यांनी पण सांगितले की फक्त २०१२ साल पर्यंतच्याच कालनिर्णयची त्यांनी तयारी केली आहे.

ही इंका संस्कृती इतकी प्रगत होती की त्या काळी त्यांनी संगणकीकृत बँका स्थापन केल्या होत्या.. आणी त्या बँकांचा setup आपले मायबोलीकर विनयदेसाई यांच्या पुर्वजांनी केल्याचे वाचल्याचे स्मरते.. पुस्तक सर्वत्र उपलब्ध!

स्वातीताई, तुम्हीसुद्धा गमतीत असे मूळ विषयापासून भरकटावे ना?
मुळातला मुद्दा जगबुडी आहे. त्यात इंकांच्या पुस्तकाचा संदर्भ मी दिला. तर टण्या, असामी व तुम्ही हातिमताई नाव असलेल्या राजकन्येच्या कपड्यांविषयी बोलायला लागलात. हे योग्य नाही. चर्चा मुद्द्याला धरून व्हायला हवी. तुम्ही २,३,८,१ विषयी दिलेली माहिती मात्र रंजक आहे.
.
नात्या, तुम्हाला नक्की माहीत आहे का? कारण 'e um engana' या पुस्तकात तसा काहीच उल्लेख नाही. हे पुस्तकही इंका संस्कृतीबद्दल उपलब्ध असलेल्या पुस्तकांपैकी एक मुख्य पुस्तक समजले जाते. (दुसरे आमच्या इथल्या लायब्ररीमधले!)
.
असामी, माझे पोस्ट कृपया पुन्हा वाचा. नीलगाय कुठेही नाही. त्याकाळात नीलगायीची प्रजात निर्माण व्हायचीच होती. इंका संस्कृतीमध्ये केवळ चार प्राणी वर्णिलेले आहेत ते म्हणजे वाघ, चित्ता, हरीण आणि सांबर. दोन मांसाहारी तर दोन शाकाहारी. इंकांच्या संस्कृतीत हा बॅलन्स आधी होता तेव्हा ते जगज्जेते होते. नंतर चित्त्यांनी अमाप हरणे खाल्ली तेव्हा माचू पिचू डोंगरावरच्या देवाचा कोप होऊन इंका नष्ट झाले.
माचू पिचू विषयी अधिक माहिती विकिपीडियावर मिळेल.
.
एच्चेच, तुझं बरोबर आहे पण कालनिर्णय वाले माया संस्कृतीवर जास्त हवाला ठेवतात. याउलट संशोधकांच्या म्हणण्यानुसार इंकांचे गणित जास्त बरोबर होते. त्यामुळे ते साल २०१५ येते. जून महिना.

>>'मकाण्णाचे सोने'

आणि इतर प्रतिक्रिया!!

Lol

>>> संशोधकांच्या म्हणण्यानुसार इंकांचे गणित जास्त बरोबर होते. त्यामुळे ते साल २०१५ येते. जून महिना.
टिळक पंचांगानुसार ऑगस्ट महिना.
म्हणजे टिळक पंचांग पाळणारे ऑगस्टपर्यंत जगतील असं समजायला हरकत नाही. (ते आधी हिशोब न लागलेले २४% ते तेच असावेत.)

'डोंबल तुमचे!! लग्नाला एव्हढी वर्षे झाली, माझ्या नि सौ. च्या विचारसरणीत काय फरक आहेत तेहि कळत नाही. कुठले इंका नि अमॅझोन??' >>>> Rofl
हरि ओम गणगणा >>>>>> Rofl
टीप : जांभळे कपडे हरीणाला नव्हे, आपण घालायचे आहेत.>> हे स्पष्ट केल्यामूळे बरे झाले. हरणाचे माप कसे घ्यायचे ह्याचा विचार करत होतो मी. >>> Rofl
.
बाप रे शेजारची मुलगी विचारायला आली मला काय झाले Lol

आणि मग सावरकर पंचांगावर विश्वास ठेवणार्‍यांचे काय?

Rofl स्वाती, हरणाचं चित्र चालेल म्हणतेस तसंच कपडे जांभळे नसतील तर दुसरे कोणते चालतील ते पण सांग ना..

Rofl
पण कपड्यांबद्दल संदिग्धता पाळण्यात यावी असं म्हंटंलंय ना ? (पाळणा म्हणजे क्रिब नव्हे .. पाळण्यात म्हणजे आचरणात आणावी)

या सगळ्या चर्चेतून एक मोठे सत्य समोर आलेय त्याकडे मी तुम्हा सर्वांचे लक्ष गेले नाही का?
हरणाचे कपडे ...म्हणजे मृगाजिन्....ते अंगावर धारण करणार्‍या....किरमिजी रंगाचे दूध...म्हणजे भांग पिणारा....निलगाय....म्हणजे निळ्या रंगाचा वर्ण असलेल्या पुरुषाकडून ...पृथ्विचा सर्वनाश होणार. म्हणजे साक्षात शंकर तिसरा डोळा उघडून सर्व काही भस्मसात करणार!! आपल्या पुराणां मधे सांगितलेले ते हे सत्य या सर्वकष चर्चेत पहा कसे आपोआप समोर आले.

ऑ माझा प्रतिसाद कसा काय गायब झाला बॉ ?
२०१२ च्या जगबुडीला माझा प्रतिसाद बुडण्यापासुन सुरुवात झालेली दिसतेय Proud

--------------------------------------------
Mothers are the necessity of invention.
-Calvin and Hobbs

तो ल्लामा.. हा पेरु (बघा भारतीय संस्कृतीचा प्रभाव.. ह्या देशाचे नाव देखील भारतीय पेरु ह्या शब्दापासून) नावाच्या देशात सापडतो.. तिकडचा उंटच म्हणा की.. इंका लोक दळवळणाचे साधन म्हणुन ह्याचा उपयोग करत असत.. ते लोक ह्याच प्राण्याचे दूध पीत असत.<<<<<<< इथेच तर सगळी गोची आहे. लामिणीचं दूध प्यायले असते तर सर्वनाश टळला असता.

|| हरि ओम ||
माझ्या सर्व नेट बन्धु भगिनिनो धन्यवाद आप्ले महनिय विचार मन्डल्याबद्दल. पण इथे अमेरिकेत तरि २०१२ ( तेहि २१ डिसेम्बेर २०१२ ) हिच वेळ मानलि जात आहे. ह्या दिवशी काहितरि खास होणार आहे. ( काय ते कोणालहि माहित नाहिये. तर्क वितर्क खुप चालु आहेत.

दहशत्वादि ह्या दिवशी मोठा घात्पात घडवुन आणु शक्तात असा एक प्रचार आहे. ( लोकानि ह्या साठि छान पुरावे दिलेत : अतिरेकि नेहमि काहितरि गणित मान्डुन त्यन्चे खेळ करतात. जसे ९/११ ( नेव ञोर्क) , ७/११ (बॉम्ब्स्फोट) , ६-६-६ ( ६ जुने २००६ झराखि ह्या खतर्नाक अतिरेक्याचे शिर्काण ( पण हा अजुनहि जिवन्त आहे असे मत आहे )) एत्यादि अजुनहि बरेच पण मला सगळे आठवत नाहिये.

Pages