२०१२ हे वर्ष सर्व संस्कृतींमध्ये कॅलेंडरचे शेवटचे वर्ष आहे का?

Submitted by Bhumika on 31 July, 2008 - 22:49

मी नुकतेच २०१२ या वर्षाबदल यु ट्युब वर विडिओ पाहिले. भन्नाट वाटले. माया, चिनी, रोमन सन्क्रुति नुसार ( नुकतेच वाचलेल्या मराठि पुस्तका प्रमाणे सुद्धा ) २०१२ या साली काहितरि खास होणार आहे हे खरे. मग ते काय असेल ? तुम्हि हि कोणि काहि माहित असेल तर नक्कि सान्गा. खालि काहि लिन्क्स आहेत.

[video:http://www.youtube.com/watch?v=XAtgPaggeTM&feature=related]

[video:http://www.youtube.com/watch?v=V5MS5Odp2qQ&feature=related]

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए, थांबवा की आता, उद्या खूप वाचायला बॅकलॉग होईल ना मग!!

आईशप्पथ! सिंड्रेला, श्रध्दा!!! Lol
आता कुणीतरी आपल्या सुमधूर आवाजात हे काव्य गुंफून इथे ऑडिओ फाईल अपलोड करा बघु!

Lol

||वैताग||

श्र, बरंय इथे आरत्या रचण्याची कॉम्पिटिशन नाहीये,सगळे विशुद्ध हेतुने जगबूडीची चिंता अन चर्चा करत आहेत. नाहीतर काचेचा बूट वाल्या देवीचं पारडं जड झालं असतं एकदम.

किती हसवाल ऑफिस मधे बसल्या बसल्या Happy

वांद्रयाचा आणि २०१२, प्रलय, आपात्कालिन परिस्थितिचि तयारि, मराठि माणुस आणि धडक कृति या गोष्टिंचा नक्कि काय संबंध आहे ?

वांद्रयाचा आणि २०१२, प्रलय, आपात्कालिन परिस्थितिचि तयारि, मराठि माणुस आणि धडक कृति या गोष्टिंचा नक्कि काय संबंध आहे ?
--- हा सर्व चाचण्यांचा भाग आहे. तुमचा प्रतिसाद कसा मिळतो, लोकांची (माफ करा गांजलेल्या) खरी अवशक्ता काय आहे ह्याचा अदमास घेणे सुरु आहे म्हणजे मग पुढची नवीन दिशा ठरेल. गोष्टीतला बादशहा अकबर वेशांतर करुन (प्रजेची नाडी तपासणी) बाहेर पडतो हे तुम्ही लहान असतांना वाचलेच असेल.

सहा सात वर्षांपूर्वी मायबोलीवर एक बीबी केवळ 'जनरल टाईम पास' नावाचा होता. त्यावर लोक असेच संदर्भ विरहित, विषय विरहित लिहीत असत. एकमेकांची खूप टिंगल करत असत. सगळे मजेत होते.
पुढे काही लोक मायबोलीवर आले, ते फारच गंभीर स्वभावाचे होते. त्यांनी 'लग्नात नवरीमुलीने सर्वांना नमस्कार केलाच पाहिजे का?' या विषयावर गंभीर चर्चा सुरु केली! बर्‍याच जणांना. मुख्यतः मला, तो विषयच अति विनोदी वाटला! मी त्यात काही लिहीले. त्यावरून मला अनेक शिव्या पडल्या.
त्यांनी संचालकांना सांगून जनरल टाईम पास बी बी बंद केला!! नि सर्वांना तंबी दिली की मायबोलीवरील चर्चेमधे काही विनोदी, किंवा त्या गंभीर लोकांच्या मताविरुद्ध लिहायचे नाही.
अर्थात् बर्‍याच मायबोलीकरांना तो जनरल टाईम पास बीबी बंद झाल्याचे फार दु:ख झाले. त्यातल्या काही लोकांनी मायबोलीला शाप दिला की इथे कुठलीहि चर्चा गंभीरपणे होणार नाही! नि ते मायबोली सोडून गेले.
म्हणून आजकाल कुठलाहि गंभीर विषय चर्चेला घेतला तरी त्याची टिंगल टवाळी केल्या जाते.
कदाचित् बहुसंख्येने मायबोलीकर प्रोग्रॅमर असावेत. प्रोग्रॅममधे विनोद केले तर नोकरी जाईल. मग विरंगुळा म्हणून इथे येतात. इथे फार तर फार शिव्या पडतील, पण कदाचित् बर्‍याच जणांना ती गंमत आवडेलहि!

चिनुक्स- (हे पुस्तक) वाचाल तर(च) वाचाल... आता तुम्ही पण रोज नव-नवे फलक सुरु करण्याचा सपाटा लावणार.

आज द्विशतक पुर्ण होणार आहे असे दिसते, एक नवा विक्रम...

उदय,
तसं काही होणार नाही. चर्चेला ऑलरेडी 'चांगले विषय' आहेत. त्यांची 'बारा वाजविण्याची' मला इच्छा नाही. आणि सध्यातरी आमच्या सहदेवानंद बापूंच्या कृपेने माझं बरं चाललं आहे. Happy

माझ्यापेक्षा सवार्थानं थोर असलेल्या मंडळीनो! आता मी बालक आपणा सर्वांचा एकेरी उल्लेख करू शकणार नाही! माझ्या कुवती प्रमाण मी काका/कू, दादा/दादी/ ताई, आजोबा/जी..... संबोधनानीच संबोधन करीन!!>>

तर झक्की काका,
का?? आजोबा??
पुढे काही लोक मायबोलीवर >>
मायबोलीला शाप दिला>>>>> अहो पण काहीतरी उ शाप असेलच की?? Happy

कदाचित्>> चीत नं?
आवडेलहि>> ही नं? Happy
दिवे घ्या मला छोटा समजून माफ करा आणी उ शाप द्या!!!

दीपू द ग्रेट
"वक्त रूकता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमीसी है"

भुमिका काकू, का कू न करता माझ्या एका प्रश्नाच उत्तर द्या!! वयाच्या २६व्या वर्षी तुम्ही प्रेम,अफेअर,करीअर,लग्न,मित्र,मैत्रीणी, शॉपिंग,आवडते कलाकार, आणी असे इतर अनेक... विषय न हाताळता हे विषय चर्चेला आणण्यामागं हेतू काय??
मी माझ्या गावासाठी काय करत आहे ?
मराठि माणुस फक्त विचारच का करतो ?
आपण युद्ध सद्रुश्य स्थितिसाठी किति तयार आहोत?
तेजो महाल जबरदस्तिने ताजमहाल बनला?
भारताची आजची खरी गरज / खर्‍या आवश्यकता काय आहेत?
२०१२ हे वर्ष सर्व संस्कृतींमध्ये कॅलेंडरचे शेवटचे वर्ष आहे का?

आणी हा ह्रुदयातुनि या माझ्या >>> हे कुणावर आहे??
काय आहे हे तुमच धडकपणे धदकण ( बघा मी ही आता चुकलो!! ;( दधकने) जाऊदेच! शी... माझ्या छातीत दधकन जोरात चालू झालय निदान २०१२ पर्यंत तरी जगीन म्हणतो मी Wink

दीपू द ग्रेट
"वक्त रूकता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमीसी है"

२०२५ पासुन रामराज्य सुरु होणार , म्हणजे राम तेव्हा साधारण २५ वर्षाचा असेल , म्हणजेच त्याचा जन्म २००० मधे झालेला आहे . आता तो ८ वर्षाचा कुठल्या बर. आश्रमात ( शाळेत) ? २०१२ मधे प्रलयाच्या आधी त्याचा राज्यभिषेक झालेला असेल , म्हणजेच तो आता कुठल्यातरी राज्याचा मुलगा आहे , कुठे कुठे अजुन राजेशाही सुरु आहे ? मुस्लिम देशात .... अच्छा , म्हणजे रामाने मुस्लिम देशात जन्म घेतलेला आहे . असे असुनही राम शाकाहारी आहे , कारण २०१२ च्या प्रलयात २५ टक्क्के शाकाहारी लोका.नमधे तो टिकुन राहणार . तसेच २०१५ च्या दुसर्‍या प्रलयात २४ टक्के मधे त्याचा न.न्बर लागणार नाही .
आता उरलेल्या १ % मधे , राम आपली सेना ('शिव'सेना नाही , कारण ९९ % सेना शिवाने खतम केली आहे ) स्थापन करुन २०२५ मधे रामराज्याला सुरुवात करेल . Happy

२०२५ = २+०+२+५= ९

पुन्हा ९ आला... ( हरणाचे ८ पाय + १ शेपूट = ९ ) बरोबर आहे... २०२५ बरोबर आहे.

|| हरिण ओम ||

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!----------------------&&&&&&&&&&&&&&&&&&

सर्व धर्मान परित्यज्य माम एकम हरणं व्रज |

|| हरि ओम ||
२०२५ = २+०+२+५= ९

९ म्हणजे नवविधा भक्ति. जे भक्तिशील आहेत सदाचारी आहेत तेच टिकतिल.

म्हणजे बांद्रावासींना चान्स नाही तर??

माझी जन्म दिनांक आहे. मी सदा-आचारी, भक्ती (कशा वर ते विचारु नका... पण नक्कीच कोणी भोंदु लफंगा बाबा नाही...) मार्गी आहेच. मग आता मला उगाचच वाटत रहातं रामाचा भाग निभावण्याची जबाबदारी माझ्यावर पडणार आहे.

कदाचित्>> चीत नं?
आवडेलहि >> ही नं?
दिवे घ्या मला छोटा समजून माफ करा आणी उ शाप द्या!!!

माझ्या मते मी लिहीलेले बरोबर आहे. हि र्‍हस्व कारण संस्कृतमधे 'खरोखर' या अर्थाने हि वापरले जाते. जसे 'न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते'|

कदाचित् हा शब्द कदा म्हणजे कधी नि चित् प्रत्यय लागून झाला असल्याने तो पण शब्द मी बरोबर मानतो. उदा. 'कश्चित् कांताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमतः' इ. मेघदूताची सुरुवात.

तरीपण मी हे सगळे १९५९ पूर्वी शिकलो. आताच्या मराठीत त्या शब्दांना मेबी आणि लाईकेलच म्हणतात.

असो. दुर्दैवाने उ:शाप दिलेला नाही. अश्वत्थाम्याला कुठे उ:शाप आहे?
मराठी मन आपापल्या मतांवर दृढ असते, ते ब्रह्मदेव पण बदलू शकणार नाही. म्हणून या शापाला उ:शाप कठिणच.

('हि' वादग्रस्त असल्याने वापरायचे टाळले.)

या विषयावर भरपूर चर्चा झाली आहे आणि हा विषय बंद करण्यात येत आहे.

Pages