Submitted by Bhumika on 31 July, 2008 - 22:49
मी नुकतेच २०१२ या वर्षाबदल यु ट्युब वर विडिओ पाहिले. भन्नाट वाटले. माया, चिनी, रोमन सन्क्रुति नुसार ( नुकतेच वाचलेल्या मराठि पुस्तका प्रमाणे सुद्धा ) २०१२ या साली काहितरि खास होणार आहे हे खरे. मग ते काय असेल ? तुम्हि हि कोणि काहि माहित असेल तर नक्कि सान्गा. खालि काहि लिन्क्स आहेत.
[video:http://www.youtube.com/watch?v=XAtgPaggeTM&feature=related]
[video:http://www.youtube.com/watch?v=V5MS5Odp2qQ&feature=related]
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>> जा,
>>
जा, शुचिर्भूत होऊन माचू पिचूवरल्या देवाची पूजा कर
>>.
जाताना जांभळ्या रंगाचे कपडे आणि किरमिजी रंगाच्या हरणाचे चित्र घेउन जा.. ह्या पूजेत बटाट्यालादेखील महत्त्व आहे.. पण त्याचे डिटेल्स स्वातीकडे आहेत.. तेव्हा ते तिलाच विचार..
e un enguana
e un enguana पुस्तकानुसार या देवाला नैवेद्य म्हणून हरणाच्या दुधाचा खरवस असे.
हरणांची संख्या कमी झाल्यामुळे इंकांच्या देवाला खरवस मिळाला नाही. त्यामुळे पूजा करताना खरवसाची व्यवस्था करावी.
हे सगळे
हे सगळे वाचून अतिशय करमणूक झाली.
मी बरेचदा लिहीले आहे की, मायबोलीवरील कुठल्याही चर्चेत लिहीलेली वाक्ये वापरून अनेक विनोदी लेख, नाटके व सिनेमे तयार करता येतील. खरे तर मायबोलीवरील चर्चा या नावाची एक तुफान विनोदी सिरियलच चालू करायला पाहिजे!
त्या श्वास सिनेमा करणार्या मायबोलीकर सध्या काय करतात? त्यांना विचारून बघा. त्यांच्यात कलागुण आहेत, अनुभव आहे.
शोनू
शोनू बटाट्याचा खरवस कसा करायचा ?
मी तुम्हा
मी तुम्हा सगळ्यांच्या अगोदरच ते सगळं जाणून १९९८ सालीच माचू पिचू ला जाउन जोडीने पूजा केली आहे. पूजेचे तीर्थ म्हणुन इंका कोला प्राशन तर केला होताच पण गंगाजला सारखा त्यांच्या तीर्थाचा ही गडु आणून ठेवल आहे. ( टण्या pisco sour गूगल करुन पहा )
त्याच देवाचा प्रसाद म्हणून माझ्या घरची सर्व फुलझाडे फक्त हरणं फस्त करतात. अन तो 'नैवेद्य' त्यांच्या देवाला पोचतो
अन तो
अन तो 'नैवेद्य' त्यांच्या देवाला पोचतो>> हरणे खरवस बनवतात ?
खरेतर एक
खरेतर एक जिवंत हरीण माचू पिचूवरल्या देवाला अर्पण केले तर (म्हणजे नुस्ते देवळाच्या आवारात सोडायचे; बळी नाही द्यायचा) जगबुडीपासून नक्की सुटका होईल. कारण माचू पिचू देवस्थान सगळ्यांत उंचावर आहे. माचू पिचूचा फोटो काढला आणि ९० अंशात घड्याळाच्या उलट दिशेने फिरवला की त्या देवाचा चेहरा दिसतो.
चिन्मय, तूही सहदेवानंदबापूंचा शिष्य का? मी काही काळापूर्वी होते. पण त्यांची सगळी पुस्तके मी सुपरफास्ट स्पीडने वाचली आणि त्यांच्याकडे वाचायला काहीच शिल्लक राहिले नाही म्हणून मी नंतर गेले नाही आश्रमात. पण त्यांचे 'सिंदबादच्या सात सफरी' नक्की वाच. सात जन्म आणि सिंदबाद याची मस्त सांगड घातली आहे. आत्मा हा सिंदबाद. आणि प्रत्येक जन्म ही सफर असे मांडले आहे.
केले गूगल
केले गूगल पिस्को साउर.. इथे हॉलंडमध्ये नाही मिळायचं पण आता एव्हडा उहापोह झाल्यावर एकदा पेरुला जाउन यायलाच पाहिजे
बाकीच्या सगळ्या बीबींवर पण सध्य जगबूडी, २३८१, २०१२, १%,२४% असं चालू आहे
श्र, सहदेवा
श्र,
सहदेवानंदबापूंचा शिष्य मी नुकताच झालो. त्यांची वाचतो आहे पुस्तकं. 'सिंदबादच्या सात सफरी' वाचेन मी तू सांगितल्याप्रमाणे.
त्यांचं 'हिरव्या मुकूटाचं रहस्य' वाचतो आहे सध्या.
त्यात हिरवे किडे आणि हिरवा मुकूट यांचा अन्योन्य संबंध दाखवला आहे.
या पुस्तकाची २१ पारायणं, महिन्यातून ८ दिवस, ३ वर्षं केल्यास जगबुडीच्या वेळी बापू तारतील असं आश्रमातील लोक सांगतात.
सांगते
सांगते इंकांची गोष्ट.
टाकते शंभरावं पोस्ट.
.
नमन असो तुला माचू पिचूवरल्या देवा.
जगबुडीतून मला सुरक्षित ठेवा.
तुला बटाटे आणि हरीण वाहीन.
तुझीच स्तुती मी सदैव गाईन.
जगबुडीत जेव्हा जग हे सापडे.
परिधान करेन मी किरमिजी कपडे.
सगळ्या लोकांमध्ये मला ओळखशील ना देवा?
जगबुडीपासून मला सुरक्षित ठेवा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
'माता' रिटर्न्स.
जय माता दी
जय माता दी (आणि माचु पिचु, हरणं व बटाटे) !!!!!
.
बारावे पोस्ट कुणी टाकले काही कल्पना ?
बारावे
बारावे पोस्ट भूमिकाताईंचेच आहे. माझे तेरावे पोस्ट आहे. २०१२ ची थियरी भूमिकाताईंनी मांडली तेव्हा बारावे पोस्ट त्यांचेच असावे, हे साजेसेच झाले.
सिंडरेलाताई, तुम्ही डाळ-तांदूळ भिजत घातले का? जगबुडीपायी खाण्यापिण्याची आबाळ नका बाई करून घेऊ.
.
येईल जगबुडी.
तेव्हा येईल होडी.
तोवरी आजची भाकर
खाऊन घेऊ थोडी.
(संतकवी श्री सहदेवानंद बापू)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
'माता' रिटर्न्स.
माचू
माचू पिचूचा फोटो काढला आणि ९० अंशात घड्याळाच्या उलट दिशेने फिरवला की त्या देवाचा चेहरा दिसतो. >>>>
श्र त्यापेक्षा तूच ९० अंश जाऊन फोटो काढ की... उगिच कशाला फिरवा फिरवी फोटो ची..
सव्यसाची
सव्यसाची शब्दाचा अर्थ कळाला, धन्यवाद
एक भाबडा
एक भाबडा प्रश्न.....
जर मी हा बाफ कार्यालयात वाचत राहिली (पहिल्या तसेच दुसर्या वेलांती बद्द्ल क्षमस्व :))
तर मी २०१२ पर्यंत या कर्यालयात टिकेल का?
२०१२ नन्तर
२०१२ नन्तर जग बुडणार आहे?
================
सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज |
Marriage is a relationship in which one person is always right and the other is husband!
काय
काय टी.आर्.पी. वाढवलाय त्या जांभळ्या,किरमीजी रंगाने अन त्या हरिणाने ह्या बी.बी.चा
|| जय हरिणेश्वर ||
****************************
जसे वाजती नुपुर सुखाचे ...
अरे पण
अरे पण कुणी त्या २ ३ ८ १ ह्या आकड्याच्या पुढे काढलेल्या प्रश्नचिन्हा बाबत का लिहत नाही ? माझ्या मते तेच सर्वात मोठे कोडे आहे. मला असे वाटते की २ ३ ८ १ हा आकडा एखाद्या संख्याशास्त्रज्ञाला दाखवीला पाहीजे आणि त्या ? च्या जागी कुठली संख्या येते ते पाहीले पाहीजे.
हरीण, विविध रंगाचे कपडे, राजकुमारी, बटाटे किंवा माचु पिचु चा देव ह्यांचा बादरायण संबध नाही. त्या मुळे इथे अजुन जास्त टी. आर. पी वाढवण्यासाठी टी. पी. नको. मुख्य विषयापासून का बरे भरकटावे ? भुमीकाताईंना काय वाटेल ? आणी हे भविष्य खरे झाले (जे की होनारच आहे जर इतक्या सार्या संस्कृत्या सांगत आहेत ते का उगाच) तर मग २०१२ मधे आपले काय होइल ?
ते ल्लामा
ते ल्लामा व निलगाय लिहायचे विसरलो (दुसर्या परीच्छेदाच्या सुरवातीला)...तेवढे वाढवुन परत वाचावे.
चुकी बद्दल क्षमस्व.
तर मग २०१२
तर मग २०१२ मधे आपले काय होइल ?<<<
काळजी करू नका. तुम्ही योग्य त्या ईश्वरावताराला शरण जा. वाचाल! 'रामराज्यात मला कुठला रोल मिळेल' ह्याचा मात्र आत्ताच विचार करून ठेवलेला बरा!
रामराज्या
रामराज्यात मी शत्रूघ्न (shatrughna) होणार!! त्याला कुठलाच ताप नाही! आरामात राज्यात बायकोबरोबर चौदा वर्षे राहिला, पैसा चिक्कार होताच. काम धंदा काही नाही. मजा केली.
(अर्रेच्या, पण इथे गेली चौदा वर्षेच काय, त्याहून जास्त वर्षे माझेहि तसेच चालले आहे की! असो. मिळू दे कुठलाहि रोल, आनंदाने करीन! सध्या तरी कुंभकर्णाच्या रोलची प्रॅक्टिस जोरात चालू आहे)
तुम्ही लोक
तुम्ही लोक जगबुडीला थट्टा समजत आहात, असे माझे मत बनत चालले आहे.
अहो श्रद्धाक, समजा खूप गंभीरपणे विचार केला नि शेवटी मान्य केले की जगबुडी होणार! मग करायचे काय? ती टाळता येणार आहे का? कशी? कुणि काय करावे? (पुनः एकदा थट्टा:
एक यज्ञ करून सहस्त्रभोजन घालून ब्राह्मणाला सहस्त्र सुवर्णमुद्रा नि सहस्त्र गायी दक्षिणा म्हणून दिल्यास जगबुडी होणार नाही?
की सर्वांनी येशूख्रिस्ताला शरण जाऊन चर्चला पैसे द्यावे? की मुसलमान बनून स्वतःसकट अनेक काफिरांना मारावे?
की काय करावे?)
मग जर कुणाला काही सुचत नसेल तर आपण आपले नेहेमीचे काम करत रहावे, नि जे जे होईल ते ते पहावे!
अहो
अहो श्रद्धाक, समजा खूप गंभीरपणे विचार केला नि शेवटी मान्य केले की जगबुडी होणार! <>>>>>>>>
झक्की, माझं पोस्ट तुम्ही पूर्ण वाचलेलंत का?
~~~~~~~~~~~~~~~~~~~
'माता' रिटर्न्स.
८ या
८ या आकड्याला प्रचंड महत्त्व आहे हे आपल्या कधी ध्यानात आलंय का?
अष्टदिशा:
चार मुख्य दिशा व चार उपदिशा.
अष्टपुत्रा सौभाग्यवती भव हा आशीर्वाद:
आठच मुलं का?
अष्टवक्र:
आठ ठिकाणीच वाकडा का?
आठवडा:
दिवस सात.. मात्र नाव 'आठ'वडा. का?
अष्टौप्रहर:
आठच प्रहर बरोब्बर?
अष्टगंध:
हम्म्म्म्म्म....
अष्टनायिका:
का? का?
गावाचं नावही आष्टा (अष्ट: चा अपभ्रंश)
याला कारण आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
इंका लोकांच्या धर्मग्रंथातून वारंवार वर्णिलेला आकडा हाच. ८ ८ ८ (ख्रिस्तपूर्व आठवे शतक. साल ८ वे.) याच दिवशी इंकांच्या मूळपुरुषाने अवघड चढण चढून, नाना संकटांचा सामना करून माचू पिचू चे पठार गाठले.
तेथे त्याची प्रत्यक्ष माचू पिचूवरल्या देवाशी भेट झाली आणि देवाने त्याच्याकडे आपला प्रेषित असण्याची कामगिरी सोपवायचे ठरवले.
'मोडेन पण हरणार नाय' असे त्याचे बोधवाक्य होते. कारण तेव्हा नैसर्गिक आपत्ती अफाट होत्या. इंकांना त्यांच्याशी झुंज घ्यायची होती.
पण एका चपळ प्राण्याने आद्य इंकाला पळण्यात हरवले. तेव्हा तो उद्गारला, 'हरेन.'
अशा प्रकारे त्या चपळ प्राण्याचे नाव हरीण पडले. त्या प्राण्याने प्रत्यक्ष आद्य इंकाला हरवल्याने त्याला पवित्र समजले जाऊ लागले. आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी हरणाला पकडून मारायचे आव्हान दिले जाऊ लागले. तसेच ताकद वाढवण्यासाठी हरणाचा स्ट्यू गरजेचा झाला.
आणि आठ आकड्यामागचे अजून एक सत्य हेच की त्यावेळी हरणाला 'आठ' पाय होते.
(क्रमशः)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
'माता' रिटर्न्स.
अजुन वाट
अजुन वाट बघतेय श्रमाता तुमच्या अनमोल माहीती ची
हरणाला आठ
हरणाला आठ पाय होते............ ! ! ! ! ! ! ! ! ( आठ उद्गार चिन्हे...)
ही अनमोल माहिती आज मिळाली ०८/०८/०८............ हा एक योगायोगच ..
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज |
Marriage is a relationship in which one person is always right and the other is husband!
जग बुडीवर
जग बुडीवर उपाय म्हणून स्वामी हर्णानन्द यानी हरणाष्टक स्तोत्र रचले आहे... कुणाकडे आहे का? कोकणातील हर्णे बन्दराजवळ त्यान्ची समाधी होती.. द्वारका समुद्रात बुडाली तेन्व्हा तीही पाण्याखाली गेली असा एक उल्लेख आहे... कुणाला आणखी माहिती आहे का?
--==================------------------======================
सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज |
Marriage is a relationship in which one person is always right and the other is husband!
आज ८/८/०८
आज ८/८/०८ म्हणून मी सकाळपासून दोरीला गाठी मारुन त्याचा जपमाळेसारखा उपयोग करून देवाचा (पक्षी:गुरू) जप करत आहे, तसेच माझ्या सर्व मैत्रिणिंना (मी विवाहीत असल्याने मला मित्र नाहीत) रेडीओ वरुन संपर्क करायचा सराव करत आहे. आज जगले-वाचले तर भारतासाठी काय करायचे याचा अनेककलमी कार्यक्रम तयार केला आहे. आता मी मुलीला आणायला जाताना जर अतिरेक्यांनी आकाशातून विमानहल्ला केला आणि त्यात माझे बरे-वाईट झाले तर आत्ताच सर्वांना (२४% + १% + ७५%) माझा नमस्कार !
रावणाने
रावणाने सितेचे हरण केले होते असे ऐकून आहे! पुन्हा तिला अशोकवनात ठेवले होते.
रावणाला मारून सीतेला अग्निपरिक्षा द्यावी लागली तेव्हा तिला पुन्हा स्त्रीमध्ये परिवर्तित केले असावे. पण त्यावर बर्याच बायकी संघटनांनी आक्षेप घेतला होता असे कळले.
मुळात सीतेने हरणच्या कातडीची चोळी शिवून घेण्याचा हट्ट केल्यामुळे तिला धडा शिकवावा म्हणून रावणाने तिलाच हरण केले असेल असेही मला वाटते.
_________________________
-Man has no greater enemy than himself
म
म वा
भारतासाठी काय करायचे याचा अनेककलमी कार्यक्रम तयार केला >>
(२४% + १% + ७५%) >>
****************************
जसे वाजती नुपुर सुखाचे ...
Pages