Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58
आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाय द वे यावरून आठवले.
बाय द वे यावरून आठवले. "वास्तव" मधे संजय दत्त शेवटी भ्रमिष्ट झालेला दाखवला आहे. तेव्हाचा त्याचा अभिनय जसा आहे तसा रणबीर कपूर अॅनिमल मधे पिक्चरभर वाटतो
अजूनही कुणीही यारा दिलदारा
अजूनही कुणीही यारा दिलदारा पाहूनही रिव्ह्यूही लिहीलेलाही नाही ना ?
रेको शिवाय कसा पहायचा गरीबांनी ?
तोच अमिताभ वयाला साजेश्या
तोच अमिताभ वयाला साजेश्या भूमिका करायला लागल्यावर पुन्हा बँकेबल झाला.
>>>>
बॉक्स ऑफिसवर नजर टाकली या वर्षाच्या तर याचे उत्तर मिळेल.
पठाण, जवान, डंकी... तीन चित्रपट आणि २५००-३००० हजार कोटींचा व्यवसाय.. एका हिरोच्या चित्रपटांनी एका वर्षात केलेल्या कमाईचा हा आजवरचा रेकॉर्ड आहे.
आता जरा चित्रपट हा एक व्यवसाय आहे या नजरेतून बघा आणि मला सांगा हे रिझल्ट येत असताना त्याने हे करणे सोडावे का?
आता जरा चित्रपट हा एक व्यवसाय
आता जरा चित्रपट हा एक व्यवसाय आहे या नजरेतून बघा >>> इग्नोर करायचे होते पण...
चित्रपट हा व्यवसाय आहे हे प्रेक्षकांनी का बघायचे ? त्यांना ग्राहक म्हणतात कि प्रेक्षक ?
कुठल्याही कलेचं प्रदर्शन हा धंदाच आहे हे सर्वांनी मान्य करायचं ही सक्ती कशाला ? असले काहीच्या काही खुसपट काढून उगीच का हा धागा पळवायचा ?
चिकवा वरच्या प्रतिसादांवर माझी मल्लिनाथी / माझ्या मल्लुनाथ्या असा धागा काढा वेगळा. एखाद दुसरा प्रतिसाद अशा पद्धतीचा आला तर स्वागतच आहे. पण हे सततचं टॉर्चर नाहीये का ?
आता जरा चित्रपट हा एक व्यवसाय
आता जरा चित्रपट हा एक व्यवसाय आहे या नजरेतून बघा आणि मला सांगा हे रिझल्ट येत असताना त्याने हे करणे सोडावे का?
>>>
चित्रपट हा व्यवसाय असेल आणि त्यातली कमाई हाच फक्त चांगल्या चित्रपटाचा निकष असेल तर लोक ज्या अभिनय, सुटेबिलिटी वगैरे बाजूवर वगैरे टीका करतात त्यांना विरोध का बरे करता ? त्यांच्या टीकेमुळे सुधारणा झाली तर अधिक व्यूअरशिप मिळून जास्त कमाई नाही का होणार? का शाहरुखचे निस्सीम चाहते त्याने वयाला सूट होणाऱ्या सेन्सिबल भूमिका केल्या तर चित्रपट पाहणार नाहीत?
आपण चित्रपटसृष्टी या
आपण चित्रपटसृष्टी या उद्योगाचे प्रतिनिधित्व करतो या बेअरिंगमधून बाहेर पडून "नॉर्मल" माणसासारखे प्रतिसाद आले तर बरं वाटतं.
आमचा खानदानी धंदा चित्रपट निर्मिती / वितरण / वित्तपुरवठा आहे, तुम्ही अडाणी लोक काय इथे डिंग्या मारता हा टोन इरीटेटिंग आहे.
शाहरुखचे निस्सीम चाहते त्याने
शाहरुखचे निस्सीम चाहते त्याने वयाला सूट होणाऱ्या सेन्सिबल भूमिका केल्या तर चित्रपट पाहणार नाहीत?
>>>>>
निस्सीम चाहते जरूर पाहतील
शाहरुखला एखाद्या डिअर झिंदगी मध्ये बघणे सुखद अनुभव होता.
पण म्हणून त्या चाहत्यांनी अशी अपेक्षा ठेऊ नये की त्याने तेच करावे आणि पैसा कमावून देणारे चित्रपट नाकारावेत.
अमिताभने सेकंड इनिंग सुरू केली कारण त्याला लोकांनी स्विकारणे बंद केले. चित्रपट चालणे बन्द झाले. त्याची लाख ईच्छा असेल. पण त्यावर पैसे कोणता निर्माता लावणार?
शाहरूखबाबत हे लागू नाहीये. त्याच्यामागे तर आता निर्मात्यांची रांग लागली असेल. कारण त्याने आपले स्टारडम कॅश करून दाखवले आहे.
जसे रजनीकांतने सुद्धा वयाला साजेश्या भुमिका कुठे केल्यात म्हातारपणी... पण त्याचे पिक्चर सुद्धा असेच बक्कळ धंदा करून द्यायचे.. म्हणून यायचे.
थ्री इडियट अजिबात आवडलेला
थ्री इडियट अजिबात आवडलेला नव्हता बहुतेक पुस्तकाच्या मूळच्या कथेची केलेली तोडमोड आणि काहीही अतर्क्य दाखवल्याने असेल. त्यापेक्षा हा जास्ती प्रामाणिक वाटला. आणि ४७० कोटी मिळवून कमर्शियल सक्सेसफुल नसेल वाटत तर माबो वरच्या सुजाण प्रेक्षकांना किती रक्कम मिळवण्याची अपेक्षा आहे काय माहिती
आता जरा चित्रपट हा एक व्यवसाय
आता जरा चित्रपट हा एक व्यवसाय आहे या नजरेतून बघा >>>
नाही बघणार.
माझा लेखनही व्यवसाय नाही ना मला चित्रपटाच्या चालण्याशी काही देणंघेणं. मी नेटफ्लिक्स घेतलं आहे, पंधरा डॉलर मध्ये खरंखुरं बोलून मोकळे होते. मी एक
त्यातल्या त्यातनॉर्मल प्रेक्षक आहे जिला सिनेमे बघायला आवडतात. वेगवेगळ्या भाषेतले चित्रपट बघूनही हिंदी सिनेमा विषयी सर्वात जास्त जवळीक वाटते. कुणी मला आवडलेल्या सिनेमाला कितीही नावं ठेवा मला काहीही वाटत नाही. I literally feel nothing...ऋ, मला शाखा आवडतो, माहिती आहे तुला. हजरजबाबीपणा, विनोदबुद्धी, आपल्या मनातलं कुणालाच कळू न देण्यात आणि कशातही न अडकण्यात तो अजूनही आदर्श वाटतो. पण ते सगळं माणूस म्हणून, अभिनेता म्हणून तो हरवला आहे.
धन्यवाद असामी, आचार्य, आशु आणि प्राजक्ता.
आचार्य, परखड होतं ?
हे असं लिहायचं आहे.
सूर्यवंशम मधला तरूण अमिताभ
सूर्यवंशम मधला तरूण अमिताभ त्यातल्या म्हातार्या अमिताभपेक्षा म्हातारा दिसतो तसेच वाटले इथे
>>>
(No subject)
अरे इथे हे चालू आहे का!
अरे इथे हे चालू आहे का!
चित्रपटाची कमाई कशी वाटली
चित्रपटाची कमाई कशी वाटली असा वेगळा धागा काढावा.
बोमनच्या वर्गातले सीन्स आहेत
बोमनच्या वर्गातले सीन्स आहेत की फनी. त्याचे ते बर्मिंगहॅम, लग्नाकरता एकच फोटो वापरून केलेली लोकांची फसवणूक हे हसण्यासारखे होते. >> सॉरी धनि हे सगळे पहिलीच्या वर्गात असलेल्या पोरांच्या लायकीचे विनोद होते - किमान माझ्यापुरते तरी. मला फार्स नि अशा खेचलेल्या विनोदाचे वावडे नाहीहे तुला माहित आहे पण लॅव्हेट्ररीट, एकच फोटो धा जणांना विकणे नि त्यावर त्यांच्या भोंगळ प्रतीक्रिया वगैरे मला कुठेही विनोद म्हणून वाटले नाहीत. त्या क्षणापासून सिनेमा हास्यस्पद हातळणी मधे घुसला नि विकी कौशल आल्यापासून टर्न मारून सुपरफिशीयली सिरीयस नि गिमिकी होतो. शाहरुख नि हिरानी हे काँबो असल्यामूळे माझी तरी अपेक्षा अधिक होती.
शाहरूखबाबत हे लागू नाहीये.
शाहरूखबाबत हे लागू नाहीये. त्याच्यामागे तर आता निर्मात्यांची रांग लागली असेल. कारण त्याने आपले स्टारडम कॅश करून दाखवले आहे.
जसे रजनीकांतने सुद्धा वयाला साजेश्या भुमिका कुठे केल्यात म्हातारपणी... पण त्याचे पिक्चर सुद्धा असेच बक्कळ धंदा करून द्यायचे.. म्हणून यायचे. >> हे विचित्र आर्ग्युमेंट आहे. तो त्याचे स्टार डम अॅन्कॅश करतो ह्यात शंकाच नाही. बहुतांशी लोकांचा आक्षेप त्याच्याकदून अधिक अपेक्षा नि वयाला सुटेबल रोल्स करणे हि आहे हे लक्षात येत नाही का तुझ्या ? खर तर त्याच्याकडून तो करतोय त्याच्यापलीकडे जाण्याची अपेक्षा लोकांनी धरणे हि त्याच्यासाठी कौतुकास्पद गोष्ट आहे हे तुझ्या सारख्या फॅनच्या डोक्यात का शिरत नाही देव जाणे !
पण ते सगळं माणूस म्हणून,
पण ते सगळं माणूस म्हणून, अभिनेता म्हणून तो हरवला आहे.
>>>>
अभिनेता म्हणून तो हरवला नाहीये.. तर त्याने स्वतः निवड केली आहे की आपले स्टारडम दाखवून लोकांचे मनोरंजन करत हजार करोडचे पठाण जवान बनवायचे की आपल्यातील अभिनयगुण दाखवायचे..
जसे त्याच्या इतर गुणांचा आदर्श ठेवता तसेच त्याच्यातील बिझनेसमॅनचा सुद्धा आदर्श ठेवा. तो बरोबर काळाच्या सोबत चालतो. म्हणून आजही तोच सुपरस्टार आहे आणि या एका वर्षात त्याने सर्वाधिक कमाईचे तीन चित्रपट करून ते सिद्ध केले आहे. पठाणमधील शेवटचे डायलॉग आठवत आहेत ना.. देश का सवाल है, बच्चो पे नही छोड सकते... हक है बॉस असे डायलॉग मारायचा
चित्रपटाची कमाई कशी वाटली असा
चित्रपटाची कमाई कशी वाटली असा वेगळा धागा काढावा.
>>>>
एक्झॅक्टली डूड !!
चित्रपट कसा वाटला याचा धागा निघू शकतो कारण तो प्रत्येकाच्या वैयक्तिक मतानुसार चांगला किंवा वाईट असू शकतो..
उदाहरणार्थ तुम्हाला अंदाज अपना अपना बोर वाटला आणि पूर्ण बघायला झाला नाही असे तुम्ही मागे म्हणाला होतात आठवते.. पण कित्येक लोकांसाठी तो वन ऑफ द ऑल टाईम ग्रेट कॉमेडी मूवी आहे..
पण बॉक्स ऑफिस कमाई हे एक फॅक्ट आहे. जे व्यक्तीसापेक्ष नाहीये
तो करतोय त्याच्यापलीकडे
तो करतोय त्याच्यापलीकडे जाण्याची अपेक्षा लोकांनी धरणे हि त्याच्यासाठी कौतुकास्पद गोष्ट आहे
>>>>>>>>
नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे.
वेळ आल्यावर तो ते सुद्धा करेलच...
यंदा त्याने आपले स्टारडम दाखवून बॉयकॉट हॅशटॅग मध्ये अडकलेल्या बॉलीवूडला वाचवण्याला प्राधान्य दिले आहे.
माझ्या सुद्धा Dunki कडून असलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. पण त्याने अमिताभ सारखे म्हातारपणाचे, आणि हिरोहिरोंच्या बाबांचे रोल आयुष्यात कधीही केलेले मला बिलकुल चालणार नाही. त्याने आयुष्यभर सुपरस्टार शाहरूखच राहावे अशी त्याचा एक फॅन म्हणून इच्छा आहे.
नेफि वर भक्षक पाहिला. छान
नेफि वर भक्षक पाहिला. छान मूव्ही...भूमी पेडणेकर नी छान काम केलंय.. मुलींबद्दल वाटणारी कळकळ, अपराधी पकडले जावेत यासाठी करत असलेली तीची प्रामाणिक धडपड अगदी खरी वाटते.. संजय मिश्रा चा प्रश्नच नाही...कुठलीही भूमिका हा माणूस समरसून करतो..
Supporting cast ही छान.. सई ताम्हणकर ची छोटी भूमिका आहे..त्यातही लक्षात राहते ती..Girl abuse चा विषय असूनही कुठेलेही दृश्य अंगावर येत नाही...
खरंतर विकी कौशल ला अवार्ड
खरंतर विकी कौशल ला अवार्ड मिळावं इतका त्याचा रोल भारी नव्हता.म्हणजे जी सॅड कथा होती त्यामुळे कोणीही तो रोल केला असता तरी चटका लावून गेला असता. त्या 2 सह कलाकारांपैकी एकाला दिले असते अवार्ड तर जास्त भारी.आश्रम मधल्या सब इन्स्पेक्टर ला.
डंकी मध्ये कुठेही विनोदाला हसू आलं नाही.बोमन इराणी ने पण त्याचं बेस्ट दिलं नाही, उगीच मित्राला शब्द दिलाय म्हणून काम उरकल्या सारखं वाटलं.इतक्या मोठ्या शाहरुख ला तापसी बरोबर जोडी म्हणून दाखवायची गरज नव्हती.तो फ्लॅशबॅक मध्ये पण किमान 48 चा वाटतो.किमान एज ला साजेसे रोल करा बाबो.मुख्य हिरोचा बाप नाही, किमान जरा मोठा भाऊ टाईप रोल करा.
बहुतांशी लोकांचा आक्षेप>>
बहुतांशी लोकांचा आक्षेप>> कदाचित बहुतांश लोकांची अपेक्षा त्याने असे रोल्स करावे अशी असेल आणि निवडक लोकांना त्याने वेगळे रोल्स करावे असे वाटत असेल. मी किंवा माझा कंपू हेच बहुतांश लोक आहेत असे म्हणण्याचा अट्टाहास का? आधी म्हणालो तसेच की बबलच्या बाहेर पहा
Girl abuse चा विषय असूनही
Girl abuse चा विषय असूनही कुठलही दृश्य अंगावर येत नाही.
>>>
या बद्दल धन्यवाद आश्र्विनी.
मी याच कारणाने टाळत होतो. सध्या जरा डिस्टर्ब करणारे चित्रपट बघायचे नव्हते. आणि हा विषय फार डिस्टर्ब करतो..भडक किंवा अगदीच वास्तव चित्रीकरण आणखी त्रास देईल याची भीती होती.
आता ट्राय करतो मग बघायचे..
मी किंवा माझा कंपू हेच
मी किंवा माझा कंपू हेच बहुतांश लोक आहेत असे म्हणण्याचा अट्टाहास का? >> बहुतांशी हे इथल्या (पक्षी मायबोलीच्या) परिघामधे आहे हे इतके सोलून दाखवावे लागेल असे वाटले नव्हते. बबल मधे असणे-नसणे इथे गैर मतलबी आहे. तुला मुद्दा कळत नसेल तर सोडून दे. माझा आग्रह नाही.
>>>>>>Girl abuse चा विषय
>>>>>>Girl abuse चा विषय असूनही कुठलही दृश्य अंगावर येत नाही.
धन्यवाद
>>>>>>>>> मी याच कारणाने टाळत होतो.
डिट्टो.
>Girl abuse चा विषय असूनही
>Girl abuse चा विषय असूनही कुठलही दृश्य अंगावर येत नाही.
अस जरी असलं तरी संवाद फार थेट आहेत...मला तरी वाटले...
प्राईमवर Faces in the Crowd
प्राईमवर Faces in the Crowd बघितला .
हिऱोईन एका सिरियल किलर च्या हल्यातून वाचते पण पूलावरून पाण्यात पडताना तिचं डोक आपटत आणि तिला "face-blindness" होतो .
कुठलाही चेहरा परत बघितल्यावर तिला अनोळखी दिसतो . अगोदरचा चेहर लक्शात रहात नाहे . तिचा बॉयफ्रेन्ड , तिच्या मैत्रिणी , अगदी स्वतंचं प्रतिबिम्ब ही .
तिच्यावरच्या हल्ल्याचा तपास करणारा अधिकारी आणि त्याचा मित्र व प्रोफाईलर अशी आणखी दोन पात्र आहेत .
तिला हल्लेखोराचा चेहरा आठवत नाही , हल्लेखोर आजूबाजूला असेल तरी तिला कळणार नाही या विचाराने ती घाबरत असते .
बॉयफ्रेन्दचा चेहरा लक्षात ठेवण्यासाठी ती क्लुप्त्या करते , .. आणि बरचं काही
शेवटी खरा खूनि सापडत की नाही ? खरा खूनी कोण असतो ? तिचा आजार बरा होतो की नाही ?
कथानक भारी वाटलं पण चित्रपट तेवढा प्रभावी वाटला नाही . पण बर्यापैकी खिळवून ठेवतो .
काही काही चित्रपट नावावरूनच
काही काही चित्रपट नावावरूनच बघावेसे वाटत नाहीत किंवा साधारण अंदाज येतो ढ दर्जाचा असेल वगैरे. त्यामुळे डंकी, तीन अडकून सिताराम वगैरे मी कदापि नाही बघू शकणार.
परवा नवर्याने हास्यजत्रेतले सग्गळे कलाकार + गिकु + तेजस्विनी पंडीत + भाऊ कदम + सयाजी शिंदे असे मराठीतले असतील नसतील तेवढे कलाकर असलेला सिनेमा लावला. नावही काहीतरी विचित्रच लांबलचक - एकदा येऊन तर बघा रिटर्न जाणार नाही .
हास्यजत्रा आणि त्यातले कलाकार आवडत असले तरी नावावरूनच मुव्ही भयंकर निघणार याची खात्री होती. तसंच झालं
मॅक्स १० मिनिटं अटेंशन स्पॅन
अरेरे! मी आजच नोटिस केले हा
अरेरे! मी आजच नोटिस केले हा नवा सिनेमा आलेला दिसतोय आता बघू या म्हणून. मला पण हास्यजत्रा मधले कलाकार आवडतात त्यामुळे बरा असेल अशी आशा होती.
प्रसाद खांडेकरचा ना? गिकु,
प्रसाद खांडेकरचा ना? गिकु, नम्रता संभेराव दिसले. सुरुवातच इतकी सुमार वाटली पुढे कोण बघणार? मराठी पिक्चर हल्ली असेच आले आहेत की कात असं वाटतं. जनरली हास्यजत्रेत प्रमोशनला येणारे सगळे डबाच असावेत.
मी चित्रपटाचं नाव आणि शाहरुख असेल तर पार कचर्याच्या डब्यातच टाकते. फुकट ओटीटीवरही नाही म्हणजे नाही.
म्हणजे नाव वाचून होईतोवरच
म्हणजे नाव वाचून होईतोवरच अटेन्शन स्पॅन संपायचा!
Pages