Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58
आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अमा भारीच, लेकीचे अभिनंदन.
अमा भारीच, लेकीचे अभिनंदन. ती या प्रोजेक्टमध्ये आहे म्हणून बघावीशी वाटतेय सिरिज.
हाहाहा, अस्मिता, स्मिता.
कुणी कितीही हॉट दिसलं तरी काय
कुणी कितीही हॉट दिसलं तरी काय मांडे भाजायचे आहेत का ? >>
my daughter is the creative
my daughter is the creative lead for this show love storiya >>> सही! अभिनंदन अमा!
अरे वा! तुमच्या लेकीचे
अरे वा! तुमच्या लेकीचे मनःपूर्वक अभिनंदन अमा!! सीरीज बघितली नाही अजून पण बघेन लवकरच.
क्रिएटिव लीड म्हणजे काय असते या कामाचे स्वरूप?
my daughter is the creative
my daughter is the creative lead for this show love storiya >>> सही! अभिनंदन अमा! +१
बघेन, नक्की.
>>>
>>>
अरे वा! तुमच्या लेकीचे मनःपूर्वक अभिनंदन अमा!! सीरीज बघितली नाही अजून पण बघेन लवकरच.
क्रिएटिव लीड म्हणजे काय असते या कामाचे स्वरूप?
<<<
+१
अरे वा! अभिनंदन!
अरे वा! अभिनंदन!
लेकीचे मनःपूर्वक अभिनंदन अमा!
लेकीचे मनःपूर्वक अभिनंदन अमा!!
क्रिएटिव लीड म्हणजे काय आणि तिच्या अनुभवांचा वेगळा धागाच काढा..
>>>>my daughter is the
>>>>my daughter is the creative lead for this show love storiya
फार मस्त डायरेक्शन आहे. संपूर्ण चमूचे अभिनंदन. प्रत्येक गोष्ट अनवट आहे. कुठेही अतिग्लॅमरस लोक नाहीत. पण कथेत पूर्ण गुंगून जातो. प्रेम याच विषयाभोवती कथा आहेत. शेवटची ट्रान्स लोकांची कथाही भारी आहे.
बर्याच मुलांचे स्टेटस "आय अ
बर्याच मुलांचे स्टेटस "आय अॅम अॅनिमल" असे असते.
बहुधा मुलींच्या बायो मधे अॅनिमल लव्हर वाचून टाकत असावेत....
अमा, मुलीच्या करीअरचे कौतुक आणि शुभेच्छा !
>>>>my daughter is the
>>>>my daughter is the creative lead for this show love storiya >> अभिनंदन अमा ! ट्रेलर पाहिला होता - इंटरेस्टींग काँसेप्ट वाटला होता तेंव्हा.
Thank you.
Thank you.
सर्वांचे धन्यवाद मना पासून.
सर्वांचे धन्यवाद मना पासून. कामाचे स्वरूप मला धड काही माहीत नाही. व अनुभव लिहायला आजिबात परवानगी नाही. कारण प्रोजेक्ट रिलीज होइतो गोपनीय च असतात.
डंकी आवडला नाही. शाहरुख आवडतो
डंकी आवडला नाही. शाहरुख आवडतो तरीही सिनेमा नाहीच आवडला. त्याच्यातल्या अढळ स्टारपदाच्या लालसेने त्याच्यातल्या अभिनेत्याला तुडवून मागे टाकले आहे. सर्व सिनेमा, अभिनय, ते गाव, पटकथा सगळं बेगडी वाटत होतं. बोमन इराणी मला ओव्हररेटेड वाटतो, रिजिड देहबोली आणि मर्यादित हावभाव दाखवणारा चेहरा आहे. सूक्ष्म ॲटिट्यूड दिसत राहतो. पण इथे सगळे त्याच लेव्हलला उतरले आहेत. तापसी त्यातल्या त्यात प्रयत्न करत होती. सपोर्टिंग स्टाफ मोठ्या स्क्रीनवर काम मिळाले याच समाधानात 'ओव्हर' करत होता. शाहरुख अगदी भावनिक क्षणी सुद्धा उत्तेजीत वाटत होता, म्हणजे भांगड्याची एनर्जी दुःखद क्षणी दाखवत होता. त्याचे खांदे, हात ,पाय, चेहरा सगळं भांगड्याच्या तयारीत वाटलं. त्याने गमावलेला अभिनय एनर्जीने भरून काढायचा प्रयत्न केला आहे पण तेच नको होतं.
अभिनयाची रेंज पूर्वीसारखी राहिली नाही फक्त हाईट आहे. आताच्या बेगडीपणात तो मोल्ड करतोय स्वतःला, जी त्याची USP नाही. सनबर्न झालेल्या स्किनवर डिस्टेंपर फासल्यासारखा दिसतोय ते वेगळंच. फारच फेक वाटला सिनेमा, वाईट एवढ्यासाठी वाटतं की त्यांनी खरं वाटावं असे प्रयत्न केलेत असं सुद्धा वाटत नाही. आऊटडेटेड वाटला सिनेमा. कशाकशाविषयीच आस्था नसणाऱ्या लोकांची कलाकृती पोचत नाही. Failed to deliver...!
अस्मिता, छान पोस्ट.. मलापण
अस्मिता, छान पोस्ट.. मलापण फसलेला सिनेमा वाटला डंकी..
District 9
District 9
साऊथ आफ्रिकेत जोहानसबर्ग वर एके दिवस एक अवाढव्य स्पेसशिप येते. ते काही वर्ष तसेच राहते, त्याची दारे उघडत नाहीत. शेवटी माणसच वर शिपपर्यंत जाऊन दार फोडून आत जातात. तिथे लक्षावधी खंगलेले एलियन असतात. त्यांना खाली आणले जाते. तिथे त्यांना quarantine करण्यात येते. काही वर्षांत तिथे एलियन्सचा घेट्टो तयार होतो - डिस्ट्रिक्ट ९.
वीस वर्षे जातात, आणि आता लोकल लोकं आणि प्रॉन्स असे नाव पडलेले एलियन, ह्यांच्यात भांडणं चालू झाली असतात. त्यामुळे सरकार एलियनना जबरदस्तीने स्थलांतरित करण्याच्या प्रयत्नात असते. त्यासाठी सर्व्हे करायला एक टीम डिस्ट्रिक्ट ९ मध्ये गेली असते. तिथे त्यातल्या एका माणसाचा योगायोगाने महत्त्वाच्या एलियन टेक्नॉलॉजीशी संबंध येतो, आणि त्या माणसाचे आयुष्य बदलते.
उत्तम ॲक्शन पट. चांगली करमणूक झाली. Hulu वर आहे.
डंकी आवडला नाही. शाहरुख आवडतो
डंकी आवडला नाही. शाहरुख आवडतो तरीही सिनेमा नाहीच आवडला. त्याच्यातल्या अढळ स्टारपदाच्या लालसेने त्याच्यातल्या अभिनेत्याला तुडवून मागे टाकले आहे. >> +१ पूर्ण पणे गंडलेला आहे. अॅनिमल सुद्धा परवडला असे वाटले. एव्हढा इंपॅक्टफूल विषय एव्हढ्या हास्यास्पदपणे हाताळला आहे - तो हि राजकुमार हिरानी सारख्या दिग्दर्शकाने हे पटतच नाही. सगळेच एकदम गिमिकी ठेवले आहे. मूळ डंकी ला जेमतेम अर्ध्या तासाचा स्कोप आहे. " तापसी त्यातल्या त्यात प्रयत्न करत होती. नि सपोर्टिंग स्टाफ मोठ्या स्क्रीनवर काम मिळाले याच समाधानात 'ओव्हर' करत होता " हे पटले. भारतात घुसखोरीच करायची होती तर नेपाळ ला येऊन नसता का करता आली एव्हढे सोपस्कार करण्यापेक्षा
भारतात घुसखोरीच करायची होती
भारतात घुसखोरीच करायची होती तर नेपाळ ला येऊन नसता का करता आली
>>>>>
भारतात घुसखोरी करणे इतके सोपे दाखवले असते तर शाहरूखच्या चारित्र्यावर चार शिंतोडे अजून उडवायची संधी मिळाली असती त्याच्या टीकाकारांना..
तो हि राजकुमार हिरानी सारख्या
तो हि राजकुमार हिरानी सारख्या दिग्दर्शकाने>>> मला आता असे वाटायला लागले आहे की मी पूर्वी जे हिरानी चे पिक्चर पाहिले ते चुकीचे होते की काय? त्याने प्रत्येक पिक्चर मध्ये सिरियस इशू हसण्यात नेलेला आहे. सुरूवात मुन्नाभाई मध्ये "वो बाहेर कॅजुल्टी मे कोई मर रहा है तो उसको भी फॉर्म भराना जरूरी है क्या" पासूनच झालेली आहे. ३ इडियट मध्ये तर ५ पॉइंट समवन ची पूर्ण वाट लावली आहे. काहीच्या काही आहे. ते सगळे चालले. मग काय डंकी मध्ये फक्त शारुक आहे म्हणून त्याला शिव्या का?
सुरूवात मुन्नाभाई मध्ये "वो
सुरूवात मुन्नाभाई मध्ये "वो बाहेर कॅजुल्टी मे कोई मर रहा है तो उसको भी फॉर्म भराना जरूरी है क्या" >> हास्यास्पद बनवणे नि विनोद ह्यामधे फरक नाही का धनि ? प्रामाणिकपणे डंकी मधल्या एका सीन ला तरी हसला होतास का ?
बोमनच्या वर्गातले सीन्स आहेत
बोमनच्या वर्गातले सीन्स आहेत की फनी. त्याचे ते बर्मिंगहॅम, लग्नाकरता एकच फोटो वापरून केलेली लोकांची फसवणूक हे हसण्यासारखे होते. लंडनला गेल्यावर मात्र थोडा सिरियस होतो पिक्चर. शेवटी हिरानीचा पिक्चर हा असाच मध्ये सिरियस मध्ये फनी असेल असे वाटले होते आणि तसाच निघाला.
मला बाकीच्यांनी काय समजून पाहिला तेच कळले नाही.
खरा डंकी चा भाग जास्ती चालला असता हे खरे. म्हणून हा पिक्चर हिरानीच्या बाकीच्या पिक्चर सारखा नाही हे काय पटत नाही. उलट प्रत्येक पिक्चर हिरानी असाच करतो हे मी म्हणेन
"वो बाहेर कॅजुल्टी मे कोई मर
"वो बाहेर कॅजुल्टी मे कोई मर रहा है तो उसको भी फॉर्म भराना जरूरी है क्या" - हे वाक्य मला त्या टपोरी गुंडाच्या कॅरेक्टरशी सुसंगत वाटलं होतं (संजय दत्त अजिबात आवडत नाही. शाहरूखचे बरेच सिनेमे आवडले आहेत). डीडीएलजे मधला शाहरूखचा ‘ए, इसको लेकें जाओ रे’ पण फनी होता आणि त्या कॅरेक्टरला साजेसा होता. डंकी मधला आर्मीतला (तिथे तो काय करतो, बाहेर का असतो - काहीच एस्टॅब्लिश झालेलं नाही) शाहरूख आणि त्याचं सिनेमातलं वागणं, बोलणं मला तरी मिस-मॅच्ड वाटलं.
डंकी पाहीला. आवडला असता परंतु
डंकी पाहीला. आवडला असता परंतु त्या कंटेनरमधल्या शिट्टी सिनने इतकी घाण वाटली की अजिबात आवडला नाही असे म्हणेन. त्या हिरानीला इतकं एक्स्प्लिसिट दाखवायची काय गरज होती?
लग्नाकरता एकच फोटो वापरून
लग्नाकरता एकच फोटो वापरून केलेली लोकांची फसवणूक हे हसण्यासारखे होते>>. हा जोक वाटला नाही मलातरी पण तो सिन इतका अॅन्टिसिपीटेड होता कि नसता तरच नवल वाटल असत...
बाल काटू क्या...बढा सके है क्या हे वाक्य दन्गल मधुन उचलुन आणलय.
बाकी अस्मिताशी अगदी सहमत सगळ बेगडी वाटत एकाही ठिकाणी कनेक्ट नाही..
अस्मिता फार सुरेख वर्णन
अस्मिता फार सुरेख वर्णन देहबोली चे.. थकलेला तरी भांगडा पोज वाला शाखा डोळ्यांपुढे आला. पठान & दिलवाले मधेही तो मिजरेबल च होता. अवकळा आलिये अगदीच, जशी गोविंदा, अमिताभ, धर्मेंद्र ह्यांच्या वर आली होती म्हातारपणी..
सिरियस इशू हसण्यात नेलेला आहे
सिरियस इशू हसण्यात नेलेला आहे>>> कांट अॅग्री धनि. मुन्नाभाई मधे हिरो गुंड दाखवलाय, त्याला फॉर्म भरण्याचे महत्व कसे माहित असणार? मुन्नभाई सीरिज एपिक आहे, त्या विनोदाची लेव्हल च वेगळी आहे.
हास्यास्पद बनवणे नि विनोद ह्यामधे फरक नाही का>>>> परफेक्ट्ली सेड असामी.
शाहरूखच्या दिसण्यावरून जितके
शाहरूखच्या दिसण्यावरून जितके कॉमेंट पास होतात तितके मन लाऊन मी अभ्यास केला असता तर दहावीला बोर्डात पाहिला आलो असतो
असो, आपल्याकडे सौंदर्याला अवाजवी महत्त्व दिले जाते हेच खरे..
अस्मिताच्या पोस्टला अनुमोदन.
अस्मिताच्या पोस्टला अनुमोदन.
रिव्ह्यू लिहीताना इतका परखड लिहवला नव्हता. पण असंच हवं. कुणाला पटो ना पटो, आवडो ना आवडो!
वर्णनं एकदम चपखल.
हल्ली इथे दुसर्याचे मत सुद्धा आपल्या अनुभवातून पाहतात.
उदा. हे सगळं थिएटरच्या बाहेर आल्यावर... पण हल्ली सिनेमे पाहताना इतके तटस्थ पणे पाहिले जातात कि त्याच क्षणी मनात येतं.
समोरचे की सोच मेरी सोच से जुळनेवाली होणी चाहै नह्ही तो वो झुट्टाच !
आपल्याकडे सौंदर्याला अवाजवी
आपल्याकडे सौंदर्याला अवाजवी महत्त्व दिले जाते हेच खरे..
>>>>
प्रश्न सौन्दर्याचा नसून आपले वय एक्सेप्ट करून त्याला शोभेलशा भूमिका का करत नाहीत असा आहे. उतारवयातला अमिताभ जेव्हा अट्टाहासाने तरुण नायकाच्या भूमिका करत होता तेव्हा हास्यास्पद झाला होता. तोच अमिताभ वयाला साजेश्या भूमिका करायला लागल्यावर पुन्हा बँकेबल झाला. त्याच्यासारखा चांगला ऍक्टर अव्हेलेबल आहे म्हणून वेगवेगळे विषय व रोल येऊ लागले उदा. खाकी, पिंक
आऊटडेटेड वाटला सिनेमा >>> +१
आऊटडेटेड वाटला सिनेमा >>> +१ त्यातील इंग्रजी भाषा शिकतानाचे जोक्स एक दोन दशकांपूर्वी फनी होते. आता जुने झाले.
मला शाखाने काही वाईट काम केले असे वाटत नाही. पण पटकथा व संवाद इतके कमकुवत आहेत की तो ही काही करू शकला नाही. दुसर्या एका बाफ वर लिहीले होते तसेच मला लेट ८०ज मधला अमिताभ आठवला. आपलाच करिश्मा विसरलेला. इथे तो समहाऊ उपरा, मिसकास्ट वाटतो. आमिरसाठी लिहीलेल्या रोल मधे त्याला घेतल्यासारखा वाटतो. आणि त्याचे वय चांगलेच दिसू लागले आहे. त्यामुळे तो वयस्कर दाखवला आहे तेव्हा सूट होतो. सूर्यवंशम मधला तरूण अमिताभ त्यातल्या म्हातार्या अमिताभपेक्षा म्हातारा दिसतो तसेच वाटले इथे
तापसीच्या कॅरेक्टरचे प्रसन्न हास्य मात्र आवडले. चित्रपटात ज्यांच्या कॅरेक्टरच्या चेहर्यावर कायम बारा वाजलेले असतात अशा (शबाना, तब्बू) अभिनेत्रींमधे तिची गणना होतेय की काय असे वाटू लागले होते. अर्थात हे फक्त "बदला" व "थप्पड" इतक्याच भांडवलावर लिहीतोय. पण इथे ती एकदम चीअरफुल आहे.
हिरानी एखादा प्रश्न दाखवून त्याचे वेगवेगळे पैलू न दाखवता एकदम सुपरफिशियली सोडवताना दाखवतो. थ्री इडियट्स मधल्या त्या premise मधे तोच प्रॉब्लेम होता. कॉलेजच्या पोरांना जे पाहिजे त्यात करीयर करू द्या वगैरे. आता कमर्शियल पिक्चर आहे, मनोरंजन करणे हा त्याचे काम आहे त्यामुळे ते सगळे ठीक आहे. पण पब्लिक कधी कधी ते सिरीयस घेते. यावर माबोवर आधी लिहून झाले आहे. इथेही साधारण तसेच आहे. पण थ्री इडियट्स एक कमर्शियल पिक्चर म्हणून जमला होता. थ्री इडीयट्स, पीके, मुन्नाभाई त्यातले विषय व "मेसेज" गंभीरपणे घेतले नाहीत तर पिक्चर म्हणून धमाल होते.
डंकी मात्र जमला नाही.
Pages