चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाखा चे पिक्चर बघणारे आणि ते आवडणारे आमच्या सारखे बरेच आहेत रे. त्यामुळे पिक्चर हिट होतो आणि तुम्हाला कळत नाही म्हणजे ते पिआर असणार असे नसते. बऱ्याच लोकांना आवडलेला असतो आणि त्यांनी पाहिलेला असतो. बबल मधून बाहेर पहा Lol

>>अ‍ॅनिमल मी टीव्हीवर सुद्धा कसाबसा पूर्ण पाहिला.<<
अ‍ॅनिमल चित्रपट अ‍ॅप्रिशिएट करणं, इज ए डिफरंट बॉल गेम. यु मे वाँट टु कॉल इट ए सिनेमॅटिक मचुरिटी.. चित्रपटात दाखवलेला वायलंस, हा निव्वळ ग्रोस वायलंस नसुन इट्स ए पार्ट ऑफ कॅरेक्टर डेवलपमेंट - याची कल्पना आली कि वायलंस जाणवत नाहि...

बाय्दवे, संदीप रेड्डी वेंगा इज नो टेरंटिनो, बट हि डिड अ‍ॅन ओके जॉब...

बबल मधून बाहेर पहा >>> Happy शाखाचे पिक्चर मलाही आवडतात की. हे स्पेसिफिकली शाखाबद्दल नाही. पण मी हा जनरल बॅरोमीटर वापरतो की आपल्या ओळखीच्यांमधे, नातेवाईकांमधे, अगदी फेबु फ्रेण्ड्स मधे खूप लोकांनी थिएटर मधे जाउन पाहिलेला पिक्चर असेल तर तो खरा हिट. आता या सर्कल मधे शाखा आवडणारेही बरेच आहेत.

शाखाचा तसा हिट्ट पिक्चर मला चेन्नई एक्सप्रेस नंतर लक्षात नाही. आमिर चा दंगल नंतर.

अ‍ॅनिमल चित्रपट अ‍ॅप्रिशिएट करणं, इज ए डिफरंट बॉल गेम. यु मे वाँट टु कॉल इट ए सिनेमॅटिक मचुरिटी. >>> मी तो पिक्चर आवडणार्‍या काही लोकांचे रिव्यू वाचले आहेत. आता मी हे खूप ढोबळपणे सांगतोय पण हे बरेचसे लोक व्हिडीओ गेम्स खेळणारे/आवडणारे, मार्व्हल युनिव्हर्स वगैरे बद्दल प्रचंड माहिती असलेले, टॉलीवूड मधले अ‍ॅक्शन हीरोज चे फॅन्स असलेले, "केजीएफ क्राउड" टाइप होते. त्यांची आवड व त्याबद्दलची वेव्हलेंथ माझ्याशी अजिबात जुळत नाही. त्यामुळे हा पिक्चर मला झेपला तर नाहीच पण प्रचंड बोअर झाला. हे व्हायोलंस बद्दल नाही. एकूणच पिक्चर बद्दल. (बाय द वे, अनेकदा खूप पॅची एडिटिंग आहे ते वेगळेच).

त्यामुळे त्या वर्ल्ड मधली सिनेमॅटिक मॅच्युरिटी असेलही. but why should I care? I didn't like it.

यारा दिलदारा कुणी पाहिला असेल तर लिहा हो इथे.
नसेल पाहिलेला तर पूर्ण पाहून लिहायची तयारी असलेल्यांचे आभार. Happy

माधव Lol

वन लायनर स्टोरी >>> पैशाची चणचण, शिक्षणाचा अभाव यातून येणारी अगतिकता, परदेशी सगळं छान छान असण्याचा गैरसमज, त्यामुळे जिवावरचा धोका पत्करून परदेशात जाण्याची खटपट करणारी माणसं कशी अधिक गर्तेत जातात (हे दाखवण्याचा मूळ उद्देश होता असं मला वाटलं Proud )

पिक्चर हिट आहे तर मान्य करायला हरकत नाही.
जर पठाण जवानला खोटे चित्र उभे करता येत असेल तर शाहरूखचेच गेल्या काही वर्षातील फ्लॉप चित्रपटांनाही हिट दाखवता आले असते.

आपल्या ओळखीच्या लोकांनी चित्रपट पाहिला की नाही, त्यांना आवडला की नाही, हा फार म्हणजे फार छोटा सँपल साईज आहे.
(यावर मी नंतर सविस्तर लिहितो किंवा वेगळा धागा काढतो)

जवान बद्दल बोलाल तर मी टाळ्या आणि शिट्ट्या माहोल स्वतः पाहिला आहे. इथेही काहींनी हा अनुभव घेतला आहे.
मग उगाच त्याचे बॉक्स ऑफिस यश नाकारण्यात काय अर्थ आहे?

आणि हो, तो animal सुद्धा खूप हिट गेलाय. आपल्या जवळचे कित्येक लोकं बघूनही आले असतील पण टीका झेलायला नको म्हणून सांगत नसतील Happy

ॲनिमल सारख्या पिकचरपासून प्रॉब्लेम असणाऱ्यांनी खरे तर शाहरूखचे विशेष कौतुक करायला हवे. कारण हिंसाचार आणि अश्लीलता याचा आधार न घेता तो निव्वळ आपल्या स्टारडम वर चित्रपट सुपरहिट करत आहे.

संदीप रेड्डी वेंगा इज नो टेरंटिनो, बट हि डिड अ‍ॅन ओके जॉब...>>>>
ॲनिमल बद्दल माझेही मत किंचित वेगळे आहे. मला सिनेमा पाहून शेवटी मळकी फिलिंग आली, पण एकंदर सिनेमा एंगेजिंग वाटला.

न आवडलेल्या गोष्टी-
डायरेक्टर अनेक ठिकाणी खूपच वाहवत गेला आहे. उदा. तो कुऱ्हाडीने मारामारीचा सीन. किल बिल मध्ये सुध्दा असे सीन आहेत. पण ते टिपिकल Tarantino विनोदी पद्धतीत आहेत. म्हणजे त्यात कुठे थेट जोक नाहीत. पण सिनचे 'एक्स्ट्रा' असणे हेच विनोदी आहे. ॲनिमल मध्ये टिपिकल साऊथ सिनेमा प्रकारात unironic मारामारी दाखवली आहे, ती कंटाळवाणी वाटली. इतके होऊन रणबीर जिवंत राहतो आणि तगड्या तंदुरुस्त बॉबी देओल बरोबर तासभर मारामारी करतो, तिथेही रग्गड मार खाऊन सिनेमाच्या शेवटपर्यंत जिवंत राहतो हे काहीच्या काही आहे.

वांगाचे शिश्नाबद्दल असलेले obsession दोन्ही सिनेमांमध्ये जाणवले, आणि हसू आले. कबीर सिंह मध्ये सुद्धा पूर्ण निरुपयोगी असा सीन होता, ज्यात हिरो प्युबिक हेअर कापतो. ह्यात पण उगाच प्युबिक हेअर आणि अंडरवियर बद्दल चर्चा घुसाडली आहे. ती चर्चा नैसर्गिक सुध्दा वाटत नाही, फोर्सड वाटते. अगदी ओपनिंग सीन मध्येच पुढे कुठेही संबंध येत नाही असा भविष्यातील सीन आणि एक ऑब्सिन जोक घुसाडला आहे. पूर्ण सिनेमात काहीही कारण नसताना "edgy for the sake of being edgy" सीन ढिगाने आहेत. ते खटकले.

शेवट अगदीच हास्यास्पद आहे. वडील गेले तिथे सिनेमा संपवला असता तर बरे झाले असते.
स्त्री - पुरुषांमधले डायनॅमिक इथेही खूप वाईट प्रकारे दाखवले आहे, हे तर आहेच.

आणि, शेवटी अनिल कपूरच्या तोंडात संवाद घातला आहे, की "तू गुंड आहेस. माझ्या संरक्षणाच्या नावाखाली तू तुझी विकृती खपवत आहेस". पण जर हा संवाद प्रेक्षकांनी सिरीयसली घेणे अभिप्रेत होते तर तिथे लिखाण फसले आहे. उलट अनिल कपूर कसा कमकुवत "बेटा मेल" आहे असे त्यातून वाटते. इथे मला ब्रेकिंग bad फिनाले आठवला. त्यात मुख्य पात्र स्वतः कबुली देतो की मी हे सगळे कुटुंबासाठी करत नव्हतो. हे सगळे मी माझ्यासाठी करत होतो कारण मला ते आवडत होते. इथे तितक्या स्पष्टपणे मुख्य पात्राचा धिक्कार केला नाहीये. कथेत कोणताही character arc नाही. रणविजय काहीही शिकत नाही, त्यामध्ये काहीही बदल होत नाही. उलट रणविजय परफेक्ट आणि सद्गुणांचा पुतळा आहे असेच वांगाला वाटत असावे. इतक्या खूनाखूनीचा कसलाही consequence रणविजयला भोगावा लागत नाही. जितके आठवते त्यानुसार पूर्ण सिनेमात कुठेच पोलीस दिसत नाही, मग चांगले लाखभर लोक का मेले असोत.

अनेक गोष्टी आवडल्या नाहीत, तसेच काही एलेमेंट आवडले सुद्धा.
एकूण कथा बालिश असली तरी कुटुंबाला जवळ ठेवणे कसे महत्त्वाचे ही जी एक थीम आहे ती आवडली. एक कुटुंब आजोबांच्या वेळेस दुरावते. वडिलांना पुन्हा संबंध जोडण्याची संधी आली असतानाही ते त्यांना वाऱ्यावर सोडतात आणि संबंध कायमचे तुटतात, त्याचे काय होते हे सिनेमात दिसतेच. आणि दुसऱ्या आजोबांचे कुटुंब सुद्धा दुरावत असते तिथे रणबीर कपूर जाऊन संबंध पुन्हा जोडतो, आणि ते जोडलेले कुटुंब त्याच्यासोबत शेवटपर्यंत राहते - हा कॉन्ट्रास्ट आवडला.
गाणी चांगली आहेत. टेक्निकल बाबींमध्ये सिनेमा कमी पडत नाहीच.

यारा दिलदारा या चित्रपटात हिंसाचार आणि अश्लीलता नाही.
अरूण गोविल, कमल सदाना, सुमित सैगल यांचेही सिनेमे असेच क्लीन होते.

शाहरूख खानने शिल्पा शेट्टीला गच्चीवरून ढकलून दिले होते. तो खूपच हिंस्त्र व्हायचा पण लपून छपून हल्ले करायचा. स्टॉकिंग या घाणेरड्या प्रकाराला त्याने लोकप्रियता मिळवून दिली. तसेच नायिकेचा नकार न पचवता आल्याने तिला मानसिक त्रास देण्यापासून ते तिच्या पतीचा खून करणे, तिचा पिच्छा करणे, तिच्यावर दहशत बसवणे इत्यादी गैरप्रकार त्याने केले. अ‍ॅनिमल,कबीर सिंग ही त्याची नातवंडं शोभावीत.

अशा माणसाला पोकळ बांबूचे फटके दिले पाहीजेत. त्याचे सिनेमे आवडीने पाहणार्‍यांना उलटे टांगून खालून मिरचीचा धूर दिला पाहीजे. अजून बरंच काय काय वाटतं पण ते व्यक्त करणं चुकीचे आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र अनिर्बंध नाही आपल्याकडे.

आवडलं Lol

पैशाची चणचण, शिक्षणाचा अभाव यातून येणारी अगतिकता, परदेशी सगळं छान छान असण्याचा गैरसमज, त्यामुळे जिवावरचा धोका पत्करून परदेशात जाण्याची खटपट करणारी माणसं कशी अधिक गर्तेत जातात (हे दाखवण्याचा मूळ उद्देश होता असं मला वाटलं Proud ) >>> समजले.

अ‍ॅनिमल मधले मला का-ही-ही आवडले नाही (बॉबी देओलच्या एण्ट्रीचे गाणे सोडले तर). प्रचंड बोअर आहे. कबीर सिंग निदान एंगेजिंग होता. साउथ वाल्यांना आपल्या हीरोंना त्यांच्या वयाच्या मानाने फारच काहीतरी अचाट कर्तृत्व किंवा पॉवर देण्याची सवय आहे. कोणी वीसेक वर्षांचा असताना मोठा अनाथाश्रम चालवत असतो, किंवा जागतिक दर्जाचा उद्योगपती असतो वगैरे. इथे श्रीमंती आहे. हा हल्ल्यातून उठल्यावर त्याच्यावरच उपचार करून त्याला तितपत बरा केलेल्या डॉक्टरांची टीम त्याचे नोकर असल्यासारखी याच्या "दरबारात" बसून त्याला अपडेट देत आहे तो सीन तर शिसारी आणणारा आहे.

बॉबी देओल वगैरे ओव्हररेटेड आहेत. फालतू रोल आहे. सिनेमात ओव्हरऑल सतत येणारे प्रचंड रिग्रेसिव्ह संवाद व सीन्स प्रचंड वैतागवाणे आहेत.

कोणी वीसेक वर्षांचा असताना मोठा अनाथाश्रम चालवत असतो, किंवा जागतिक दर्जाचा उद्योगपती असतो वगैरे. >> Lol

अ‍ॅनिमल मधे रणबीरच्या इण्ट्रोला "सुपरस्टार" हे दिसले तेव्हाच तेलुगू चित्रपटसृष्टीचा प्रभाव दिसला. तेथे ही नावे निर्माते देतात. >> वांगा मराठी भाजी असली तरी या नावाचा दिग्दर्शक साऊथचाच आहे.

फा +१
मला अजिबात आवडला नाही ॲनिमल. हिंसेच्या बाबतीत मी असहिष्णू नाही, मला 'मिर्झापूर' आवडली होती. त्यात हिंसेला त्या पात्राच्या क्रौर्याचा/ विकृतीचा किंवा प्रतिशोधाचा व्यवस्थित आधार होता. ॲनिमलमध्ये मात्र 'इतका रक्तपात दाखवू की तुम्ही भंजाळून आवडला म्हणाल' असा अप्रोच आहे. इथल्या विकृतीला कसलाच आधार नाही किंवा कसली सुसूत्रताही नाही. कसल्याच भावभावनांचे स्पष्टीकरण दिले नाही. रणबीरच्याच नाही तर अनिल कपूरच्याही नाही. काहीही कॅरेक्टर डेव्हलपमेंट नाही. कुणीकडूनही चिळकांडी उडवायला निमित्त. बंदूक असतानाही कुऱ्हाडीनं मारताना/ गळा आवळून मारताना दाखवण्याचा काय हेतू होता. एकही विनोद दर्जेदार नाही, थोडंही हसू येत नाही. चीप तर आहेतच पण 'आऊट ऑफ प्लेस'ही आहेत. घरातील शेकडो लोकांसमोर डॉक्टर 'सेक्स लाईफ' विषयी कंसल्ट करते आणि हा मूर्खासारखा तिची उलटतपासणी करतो. सत्यनारायणाची पूजा आहे की काय. गाणीही बंडल आहेत, चड्डीचे 'हस्तांतरण' करून 'मराठी पंजाबी भाई भाई' दाखवणं किती बावळटपणाचं आहे.

मला विकृतीपेक्षाही या सर्व मूर्खपणाची जास्त शिसारी आली. जरा इंटेलिजन्ट विकृती हवी होती. समोरच्याने एक वाक्य बोलले की रणबीर पन्नास वाक्य बोलतो तेही आचरट, त्यापेक्षा स्वतंत्र किळसवाणे 'टेड टॉक' ठेवा सरळ. कंटाळा आला अशा एकतर्फी कॅमाराडरीचा(?). अनिल कपूर सुद्धा कंटाळल्या सारखा वाटला या प्रकाराला. पुष्पावती फंक्शन, पॅडचे संवाद, तृप्ती दिमरी सोबत जवळीक, भावकीचे अचानक येऊन जीवावर उदार होणं, बॉबीच्या आजोबांनी मुस्लिम धर्म स्विकारणं, त्याची तीन लग्नं, सूट घालून सर्वांना गोळ्या घालत फिरणं (दहशतवादी आहेत का बिझनेसमन) , मधेच कामगारांना मोटिव्हेशनल स्पीच, ब्रा पिळण्याचा सीन, 'रश्मिकाच्या बाळंतपणात रणबीर केला त्याग'- गोष्ट काहीच्या काही आहे.

पिनोकिओ वाटावा असा डुप्लीकेट अनिल कपूर तर कळस..... इथे ओरिजनल इतका त्रयस्थ वागत असताना डुप्लिकेट फक्त ऑकवर्डच वाटत होता. ओरिजनल मेला असता तरी काहीही वाईट वाटलं नसतं असा बिल्ड अप होता. शेवटी तर उलटीवरून तृप्ती पोटुशी आहे हे ओळखणं हे तर हाईट आहे. स्त्रियांविषयीचे संवाद तर ओढूनताणून आणि जाणूनबुजून डिमीनिंग वाटले.

----

हिंसक करमणूक म्हणून जरी बघायचा असेल तर थोडातरी 'क्लेव्हर' नको का? पाच मिनिटे ह्यांचे प्रमोशन बघितले तर बॉबी सर्वांपेक्षा हॉट कसा दिसतोय हे रणबीर व अनिल कपूर म्हणत होते. 'मी कुठं हॉट- हाच खरा हॉट' खेळत होते. कुणी कितीही हॉट दिसलं तरी काय मांडे भाजायचे आहेत का ? आजकालच्या प्रथेनुसार 'अहो रूपं - अहो ध्वनी' प्रमोशन होते.

पिनोकिओ वाटावा असा डुप्लीकेट अनिल कपूर >> Lol

मला संपवावा लागेल आता हा लवकरच.. अर्धा बघून सोडला आहे.. पोरांसमोर बघता येत नसल्याने थांबलो आहे. तसे विसरलो सुद्धा होतो.. पण आता पुन्हा चर्चा बघून उत्सुकता वाढली आहे..

यारा दिलदारा नक्की बघा.
अश्लीलता आणि हिंसाचार यापासून अलिप्त आहे. पहिले गाणे मिनिटभरात सुरू होते.
तिथेच चुणूक जाणवली. सध्या वेळ नसल्याने पाहिला नाही.
पण हा कल्ट क्लासिक मधे जाऊ शकेल असे वाटले.

वुमन इन गोल्ड बद्दल कोणीतरी आधी लिहीलेले. तेव्हाच खरे तर पहायचा होता तो सिनेमा. काल पाहीला. सुंदर आहे. एका स्त्रीच्या मावशीने रंगविलेले एक पेंटींग नाझिंनी बळकावलेले असते. त्या स्त्रीने अमेरिकेत येउन, पुढे अनेक दशकांनंतर त्याच पेंटिंगची मालकी मिळवण्याकरता दिलेला लढा.
सत्य घटना.

अस्मिताने छान पिसे काढलेली आहेत. वैताग आहे तो सिनेमा. किती ऑब्सेसिव्ह आणि विकॄत आहे ते रणबीरचं पात्रं.

सध्याच्या नवीन चित्रपटांमधून जरा हवापालट म्हणून गेले दोन आठवडे आंतरजालावर जुने हिंदी चित्रपट शोधण्यात आणि बघण्यात गेले. ते चित्रपट खालीलप्रमाणे:

१. घुंघट: मूळ कथा टागोरांची आहे. कलाकार बीना राय, भारत भूषण, प्रदीप कुमार, आशा पारेख. कलाकारांच्या नावावर जाऊ नका. कथा एकदम इंटरेस्टिंग आणि धरून ठेवणारी, वेगळी आहे. आणि सर्वांनी चक्क चांगली कामं केली आहेत. भा. भू. ला एकही गाणं नाही आणि तो सुटाबुटात चांगला दिसतो. बीना रायला या चित्रपटासाठी फिल्मफेअर मिळाले होते. गाणीही श्रवणीय आहेत.

२. बसेरा: कलाकार राखी, रेखा, शशी कपूर, राज किरण, पूनम धिल्लोन. एकदम वेगळी कथा आहे, मनोरुग्ण अवस्थेविषयी. सर्वांचीच कामे उत्तम, विशेषतः राखी आणि रेखाचे काम तर फारच सुंदर झाले आहे. आर डी चे संगीतही मस्त आहे. 'सावरे सुनाओ बांसुरी', 'आऊंगी एक दिन', 'जहाँ है सवेरा, वहींपे बसेरा', सगळीच गाणी सुंदर आहेत.

३. इष्क पर जोर नही: साधना, विश्वजित आणि धर्मेंद्र. मुख्यतः एस डी बर्मनदांच्या संगीतासाठी बघितला. 'ये दिल दिवाना है', 'मैं तेरे रंग राती'. 'ओ मेरे बैरागी भंवरा' सगळीच गाणी एकसे एक आहेत. कथा म्हणजे घिसा पिटा प्रेमाचा त्रिकोण, मैत्री, त्याग. त्यात काही नवीन नाही. विश्वजितने बरं काम केलंय, एरवी तो आवडत नाही. साधनाच्या थायरॉईड ऑपेरेशननंतरचा हा सिनेमा त्यामुळे त्यात तिचा चेहरा एकदम बदललेला दिसतो.

४. ये रात फिर ना आयेगी: सस्पेन्स चित्रपट माझ्या आवडीचे. यातील सस्पेन्सही शेवटपर्यंत चांगला सांभाळला आहे. कलाकार शर्मिला टागोर, विश्वजित आणि मुमताज. 'यही वो जगह हैं'. 'हुजुरेवाला' ही श्रवणीय गाणीही आहेत.

स्त्रियांविषयीचे संवाद तर ओढूनताणून आणि जाणूनबुजून डिमीनिंग वाटले. >>> हो. आणि त्यावरून कोणत्या प्रेक्षकवर्गाला चुचकारायचे आहे ते उघड आहे.

कुणी कितीही हॉट दिसलं तरी काय मांडे भाजायचे आहेत का ? >>> Lol

Happy थॅंक्स मित्रमैत्रिणींनो,
यावेळी मलाच गरज होती 'कात' टाकण्याची.

आता हळूहळू वाचेन इथल्या सगळ्या पोस्टी.

Thank you Samo my daughter is the creative lead for this show love storiya

@चीकू - छान पोस्ट. कत्ल सुचवल्याबद्दल आभार.

(आत्ता सहाव्या पानावर आहे. चीकूची पोस्ट दिसली. पुढच्या अद्याप नाहीत पाहिल्या. बघेन).

त्यापेक्षा स्वतंत्र किळसवाणे 'टेड टॉक' ठेवा सरळ >>> हे आवडलं Biggrin

बसेरा - शाळेत असताना थेट्रात २-३ दा पाहिला आहे. (म्हणजे तेव्हा घरातल्या मोठ्यांना आवडला होता, त्यामुळे वेगवेगळ्या ग्रूप्सबरोबर त्यांनी २-३ दा पाहिला, त्यांच्याबरोबर आम्ही पण पाहिला. Proud )

कुणी कितीही हॉट दिसलं तरी काय मांडे भाजायचे आहेत का ? >> हा हा हा हा....
रश्मिका आणि ती बॉबी ची तिसरी बायको दोघी मिळुन रणबीर आणि बॉबी च्या पाठीवर मांडे भाजत आहेत असं चित्र आलं डोळ्यासमोर Wink

Pages