चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आज ऍनिमल मुवि पाहिला. एक नोटीस केले कि वडिलांच्यावर , भावावर , मुलावर , आजोबांवर अतोनात प्रेम आहे त्यासाठी ते सगळ्यांना मारतील. कोणीही बायकोवर , आईवर एवढे प्रेम केले नाही. ऍनिमल पार्क मध्ये ते पण एकमेकांवर च प्रेम करतील आणि एकमेकांना मारत बसतील.
जेंव्हा रणबीर त्याच्या वडिलांना सांगतो अब्रार मेला तेव्हां त्याचे वडील सांगतात त्यांना ल्युकेमिया आहे तेव्हाण तर मला हसायला आले.

देव आनंदचे शेवटचे सिनेमे हा स्वतंत्र विषय आहे
>>
अगदी

आधी गोविंदा आणि सध्या कंगना तीच वाट पकडून चालले आहेत

maitreyee च्या पोस्ट ला +125487
किळसवाणा picture+187
केहना क्या चाहते हो..असे वाटले..अत्यंत टुकार picture Animal

जी बाई सायना होती तीच सानिया? हे म्हणजे सुबोध भावे लोकमान्य टिळक बनल्यावर लगेचच पुढच्या पिक्चर मध्ये सुभाषचंद्र बोस बनल्या सारखे होईल Happy

सानिया मिर्झा वर बायोपिक बनला तर
>>>>
तिची तयारी असेल तर तिलाच घ्या की मग. तिने ऍड वगैरे केल्या आहेत तर कॅमेरा शाय असणार नाही. फिटनेसचा तर प्रश्नच नाही. दिसायलाही हिरोईनपेक्षा कमी नाही. बरं फिल्मी मॅचेस आपोआप कन्विन्सिंग होऊन जातील.

इथे वाचून 'थ्री ऑफ अस' बघितला.
एरवी मला शेफाली शाह आवडते. पण यात चक्क बोअर झाली ती. तिचा चेहरा आणि भूमिकेसाठी तिने लावलेला आवाज - दोन्ही आवडलं नाही. कंटाळवाणं, एकसुरी वाटलं.
वेंगुर्ला आणि जयदीप अहलावत - डोळ्यांत बदाम.

थ्री ऑफ अस चे ट्रेलरचे द्रुश्य बघूनच मला बोअर होते, कंटाळवाणे वाटते तेवढेच बघायला. त्यातूनच पिक्चरचा मूड कळून जातो.

सुबोध भावे लोकमान्य टिळक बनल्यावर लगेचच पुढच्या पिक्चर मध्ये सुभाषचंद्र बोस >> सुबोध भावे इन अ‍ॅण्ड अ‍ॅज सुबोध भावे अशीही पाटी झळकेल एक दिवस.

रोहित शेट्टी च्या पोलिसमॅन चित्रपटात सुचित्रा बांदेकर & म्रुनाल कु. दोघी मुस्लिम दाखवल्या आहेत Wink मुळीच शोभत नाहीत. त्यातली अ तिरेक्याची हेरोईन फारच गोड चेहर्याची आहे, तिला कुठं पाहिलय हे मात्र आठवत नाही..
फारच प्रेडिक्टेबल आहे अगदीच काही माल नसेल बघायला तर बघा..पण तरी राहुच द्या.

>>>>>>इथे वाचून 'थ्री ऑफ अस' बघितला. कंटाळवाणं, एकसुरी वाटलं.
मी पहील्या ५ मिनिटात सिनेमा बंद केला.

सुबोध भावे इन अँड ऍज सुबोध भावे Lol
मला चेहऱ्याने वाटतं की प्रशांत दामलेंवर बायोपिक बनलं तर सुबोध भावे प्रशांत दामले असेल

त्या सिनेमात प्रत्येक १० मिनिटांनी एकदा "मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं" हवं रियलिस्टिक होण्यासाठी Lol

फिबां Lol

सुबोध भावे इन अँड ऍज सुबोध भावे Lol
मला चेहऱ्याने वाटतं की प्रशांत दामलेंवर बायोपिक बनलं तर सुबोध भावे प्रशांत दामले असेल

नवीन Submitted by mi_anu on 1 February, 2024 - 07:01

>>

राहु द्या
सर्वात मुख्य जे बायो पिक होत. तीथे ट्रोल् झाले तुम्चे भावे

ऑ, सर्वात मुख्य कोणतं
मला आता आठवलं की मी एकाच पाहिलंय सुभा बायोपिक, काशीनाथ घाणेकर

Pages