चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाईपण अतीचशय भिकार आणि भंपक आहे. कैच्या कैच. वंगु चांगले काम करते नेहमी, ह्यात नाही आवडली. त्या बँक मॅनेजर नटीला एक चांगला मोठा सीन मिळाला, पण कसच काय..नुसती ओरडते, डोळ्यातून एक टिपूस पाणी नाही. नवलकर बरी वाटली. पटकथा लिहिताना लेखकाने समोर भिंतीवर ' जगी सर्व सुखी असा कोण आहे ' असे समर्थवचन लावले होते की काय, एवढे प्रॉब्लेम प्रत्येकीला. बकवास.

हीच गाडी शाहरुख ने पुढे ठेवली तर शाहरुख असला तरी खरच चालतील का ?
>>>>>>>>

असामी,
जेव्हा चालायचे बंद होणार तेव्हा तो पुन्हा काहीतरी वेगळे करणार... शाहरूख आहे तो. आयुष्यभर तो काळानुसार स्वताला अपडेट करत राहणार Happy
आजच्या तारखेला एका वर्षात तिन्ही पिक्चरची मिळून जी त्याने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे तिचे कौतुक करूया... जसे सचिनने वयाच्या सदतिसाव्या वर्षी पाहिले एकदिवसीय द्विशतक मारल्यावर त्याचे केले..

शारुक जगात २ नंबरचा श्रीमंत? आँ >> खरंच आहे. त्याच्या माजी सेक्रेटरीचे नाव अ‍ॅलन मस्क आहे. सध्या त्याने स्वतंत्र व्यवसाय सुरू केलाय म्हणतात.

सुनिधी
आता चौथ्या क्रमांकावर गेला. रोज काही चेक करत नाही.
रोज तर शाहरूख सुद्धा आपले पैसे मोजत नसेल Happy
दोन तीन वर्षापूर्वी दुसऱ्या क्रमांकावर आलेला तेव्हा बातमी कानावर आलेली. भारतात मात्र आजही पहिलाच आहे Happy

आता गूगल केले तर हे सापडले.

World's Richest Actor:

Tyler Perry. Net Worth: $1 Billion. Age: 54 years. ...

Second Richest Actor in the World: Jerry Seinfeld. Net Worth: $950 Million. Age: 69 years. ...

Third Richest Actor of the World: Dwayne Johnson. Net Worth: $800 Million. Age: 51 years. ...

Fourth Richest Actor of the World: Shah Rukh Khan. Net Worth: $730 million

Fifth Richest Actor of the World: Tom Cruise. Net Worth: $600 million.

लोकहो, तुम्ही शाहरूख चाहते असाल नसाल पण अश्या गोष्टींचा एका भारतीय म्हणून अभिमान असायला हरकत नाही. Happy

अभिमान फारच पुळचट शब्द झालाय आजकाल.
निदान गर्व तरी म्हणावे. आणि अगदी स्पष्टच व्यक्त व्हायचे असल्यास माज शब्द वापरतात.
अभिमान काय, तो तर आमच्याकडली चिल्ली पाल्ली सुद्धा बाळगत नाहीत आजकाल.

ओ ऋन्मेष, कोणता चित्रपट पाहिला आणि कसा वाटला ते लिहा बरं आता इथं...आजकाल सिनेमा शोधण्यातच अर्धा तास जातोय. चांगले सिनेमे सुचवा जरा..

विषयांतर नको प्लीज.>>> Lol
मराठी आवडतं असतील तर गाढवाच लग्न पाहिला आहेस का मृ.
वेडेपणा आहे नुसता.. मला जाम मजा येते.
त्यातले सीन्स आता मीम्स च्या रूपाने viral होत आहेत

शाहरुख चा विषय मी नाही काढला
वाढला तेव्हा नाईलाजाने उडी घेतली.
बाकी या धाग्यावर अवांतर पोस्ट फार असतात हे मान्य
कधी पिक्चर काय कसा बघायला यावे तर भलतेच वाचायला मिळते.
शाहरूख तेवढा एकटाच बदनाम आहे Happy
पण प्रत्यक्षात काही लोकांनाच त्याबद्दल बोलायला आवडते आणि त्याचा विषय काढत आणि वाढवत राहतात...

आजकाल सिनेमा शोधण्यातच अर्धा तास जातोय
>>>>>

मी फेसबूकवर साऊथ इंडियन डब सिनेमांची क्लिप बघत राहतो.. त्यात जे इंटरेस्टिंग वाटेल ते युट्यूबवर शोधून त्याची लिंक कुठेतरी सेव्ह करून ठेवतो. नंतर पिक्चर बघायचा मूड असताना ते बघतो.
ते कोणाला रिकमंड करत नाही. कारण अश्या पिक्चर बाबत प्रत्येकाची आवड वेगळी असते. आपले आपण बघून काय आवडते ते शोधावे Happy

सर्च देताना मिथुन, ९०'ज मल्टीस्टारर, टाईमपास असे प्रॉम्प्ट दिले कि पीसफुल सिनेमे दिसतात.

जुना ज्वेल थीफ, वक्त, हमराझ आज ही निर्मिती मुल्य आणि सादरीकरणामधे कितीतरी नवीन सिनेमाच्या पेक्शा उजवे वाटतात,

मला The Other Sister (1999) हा मूव्ही बघायचा आहे, पण तो कुठं सापडत नाहीये, कुणाला कुठल्या ओटीटी किंवा अजून कुठं असेल सापडला तर कृपया कळवा

बाईपण भारी देवा आला तेव्हा आयपी टीव्ही वर पाहिलेला, तेव्हा मला बरा वाटलेला टी पी. होता. त्यांचे प्रॉब्लेम्स असे काही खास मनाला भिडले नाहीत. पण काही fb ग्रूप्स वर काही बायकांना तसे रिलेट झालेले वाचले. खासकरून सुचेता बांदेकरच्या कॅरॅक्टरशी. बाकीच्यांचे काय प्रॉब्लेम्स होते हेही आता आठवत नाही. परत सिनेमा काही पाहणार नाही कारण रिपीट value नाही. वन टाइम वॉच आहे

I SEE YOU - प्राईम

नवरा बायकोमध्ये आलेला दुरावा आणि त्या दुराव्याकरता आईला दोषी ठरवणारा मुलगा - ही सिनेमाची सुरुवात. पुढे कथा उलगडायला लागते. बायको डॉक्टर / काउन्सेलर आणि नवरा डिटेक्टीव. गावात दोन मुले नाहीशी झालेली असतात, त्यांचा तपास चालू असतो. तपासात नवराही सहभागी असतो. पुढे त्याच्याच घरात विचीत्र / भयानक घटना घडायला लागतात आणि आपण कथेत गुरफटायला लागतो.

सिनेमा अर्धा संपतो आणि त्या विचीत्र घटनांची उकल फ्लॅशबॅकने व्हायला लागते. आपल्याला सिनेमा फुसका बार वाटायला लागतो आणि एका गाफिल क्षणी ठसका लागतो. पहिल्या अर्ध्या भागात घडलेली एक घटना आणि आपण त्याचा लावलेला अर्थ आणि आता फ्लॅशबॅकमध्ये त्याचा उलगडलेला अर्थ यात जबरी तफावत असते. इथून खरे नाट्य उलगडायला लागते. शेवटी पण एक धक्का आहेच - झाले ते बरेच झाले असं वाटायला लावणारा.

हेलन हंट सोडल्यास बाकीची स्टारकास्ट फारशी प्रसिद्ध नाहीये. पण सगळ्यांनी सुंदर अभिनय केलाय. कास्ट अवे, अ‍ॅज गुड अ‍ॅज इट गेट्स, पे इट फॉरवर्ड यातली हेलन हंट या सिनेमात पटकन ओळखू न येण्याइतपत वेगळी दिसते - पण अभिनयात तीच सहजता आहे.

नेरु (२०२३) - एका आंधळ्या मुलीचा रेप होतो आणि ती अपराधी ला ओळखते.. अपराधी बडे बाप की औलाद आहे ज्याचे लग्न होम मिनिस्टर च्या मुलीबरोबर ठरले आहे.. एकदम टॉप चा वकील त्याला डिफेंड करतोय…
मिडल क्लास मुलीला डिफेंड करायला आपला हिरो आहे.. जबरदस्त कोर्ट ड्रामा आहे…
दृश्यम , १२th मॅन, मेमरिज, दृश्यम २ चा डायरेक्टर जितू जोसेफ आणि सुपरस्टार मोहनलाल कॉम्बिनेशन…
नक्की बघावा- नाहीतर अजय देवगण रिमेक करेल तेंव्हा तो बघा…
हिंदी डब मधे उपलब्ध आहे…

कुठे आहे च्रप्स? हिंदी डब?

सापडला.. होटस्तार.. ट्रेलर चांगला वाटला.. बघेन आता वेळ असेल तेव्हा.. धन्यवाद.

"डंब मनी" बघा, नेफिवर आहे. गेमस्टॉप सागा होण्या आधी हेज फंड मॅनेजर्स स्टॉक मॅनिपुलेट करायचे, यात रिटेल इन्वेस्टर्स काय करु शकतात हे दाखवलं आहे.. सत्य घटनेवर आधारीत...

गेमस्टॉप, एएमसी वगैरे रिटेल लोकांनी कसे चढवले वगैरे वर मधे एक डॉक्युमेन्टरी आली होती. ती पाहिली आहे. ती पण चांगली होती.

कॉमी - धन्यवाद. पूर्वी एकदा प्राइम का कोठेतरी पाहिले आहेत दोन्ही वासेपूर. यू ट्यूबवर इथे बघता आला तर बघतो.

माधव बघायला सुरुवात केली पण मधेच भिती दाटून आली अन बंद केला Sad
मला भूत वगैरे खरं असे चित्रपट अजिबात आवडत नाहीत. तसं असेल तर पुढे बघणार नाही.
पण तसं नसेल तर सांग.
पण घेतलाय जबरीच हे मान्य

Pages