नर्मदार्पणमस्तु

Submitted by Narmade Har on 7 December, 2023 - 22:44

नर्मदार्पणमस्तु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो अगदी.फोटोज, मॅप, मार्किंग ची मेहनत याबद्दल वेगळे श्रेय ड्यु आहे.ते द्यायचे राहिले.
मी मधले मधले भाग थोडे घाईत वाचले होते ते परत वाचायला घेतले.एक वेगळं जग आहे खरं.

ओहह इथून लिखाण काढलं का, मी पुढचा लेख कधी येतोय त्याची वाट बघत होते. त्यांच्या ब्लॉगवर जाऊन वाचेन.

नर्मदे हर ! कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की मायबोलीकरांच्या यथोचित सल्ल्यामुळे ब्लॉग वरील ५० लेखांचे लिखाण आज अखेर पूर्ण झालेले आहे . आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि योग्य मार्गदर्शनाबद्दल सर्वांचे मनापासून आभार ! कळावे , लोभ असावा ही विनंती . . . नर्मदे हर !

नर्मदे हर , ब्लॉग वरची लेखमाला पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद. राहीलेले भाग वाचण्यास उत्सुक आहे. ब्लॉगवर (किंवा ईथे) तुमच्याशी संपर्क साधायची सोय देऊ शकाल का? धन्यवाद.

> > >ब्लॉग वरची लेखमाला पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद > > >
अजून लेखमाला पूर्ण झालेली नाही . १६५ दिवसांपैकी केवळ ४० दिवसांचे लिखाण पूर्ण झालेले आहे . उर्वरित देखील कूर्मगतीने पूर्ण होईल . नर्मदे हर .

> > > तुमच्याशी संपर्क साधायची सोय > > >
संपर्कसूत्र : Mazinarmadaparikrama@gmail.com

ओह बरं. "आज अखेर पूर्ण झालेले आहे" मुळे मला वाटलं लेखमाला पूर्ण केलीत.
ई-मेलबद्दल धन्यवाद. (जरा सवडीने) संपर्क करतो.

नर्मदे हर, इथल्या इंटिमेशन बद्दल धन्यवाद. अखेरचा भाग वाचायला खूप उत्सुक.48 भाग वाचून झाले होते.
पुस्तक, किंवा किमान अमेझॉन इ-बुक बनवून पब्लिश करण्याचा आणि विकण्याचा विचार अवश्य करा.

क्षमस्व .आजअखेर (पर्यंत ) ५० भागांचे लिखाण पूर्ण झाले आहे . असे मला म्हणायचे होते . रोज रात्री डायरी लिहीत असल्यामुळे प्रत्येक प्रसंग तपशीलवार आठवतो आहे .त्यामुळे अपेक्षेपेक्षा मालिका लांबत चालली आहे . परंतु स्वतंत्र ब्लॉग असल्यामुळे फारसे काही बंधन नाही . आठवणीतला प्रत्येक महत्त्वाचा प्रसंग लिखाणात उतरावा इतकाच माफक प्रयत्न आहे . नर्मदे हर .

समजलो. पटापट लिहा असं काही म्हणणार नाहीये. पण तुम्ही अनुभवकथन मधेच सोडून देणार नाही एव्हढीच अपेक्षा. हे लिखाण काही बसून घडाघड रामरक्षा म्हणावी तसं नाहीये. उरकून टाकण्यापेक्षा "बैठक जमवून" लिहिणं महत्वाचं त्यामुळे भले वर्षभर का लागेना. ईथे / ईतर संस्थळांवर बरेच वेळा लेखकानी दर्जेदार लेखमाला अर्धवट सोडल्या आहेत. एक वाचक म्हणून मी हळहळतो पण बरेच वेळा डोक्यात येतं की या लेखकानासुद्धा आयुष्याशी सामना करावा लागत असेल. लेखन थांबलं ते निव्वळ आळस / अनिच्छा म्हणून की असा काही प्रसंग त्यांच्यावर आलाय की काही लिहायची उर्मी उरली नाही म्हणून? त्यांच्या लिखाणाच्या वाचनाने मला आनंद मिळाला पण आता त्याना मदतीची गरज असली तरी मी काही करू शकत नाही. असो. मी भरकटलो, थांबतो.

नर्मदे हर , ब्लॉग वरची लेखमाला पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद. राहीलेले भाग वाचण्यास उत्सुक आहे >>> +१.

धन्यवाद. पहिले १३ की १६ वाचून मधे खंड पडला होता. आता पुन्हा तेथून पुढे सुरू करायची आहे वाचायला.

आपणा सर्वांच्या कृपेने साठ लेखांक पूर्ण झाले आहेत . १६५ पैकी ५३ मुक्काम पूर्ण करत आपण नर्मदेच्या नाभी स्थानापाशी आलेलो आहोत . उर्वरित लेखन वेळ मिळेल तसे सुरूच आहे . दुवा शोधायला सोपा जावा म्हणून येथे देत आहे .
mazinarmadaparikrama.blogspot.com
नर्मदे हर !

नर्मदे हर!
इथे कळवत राहिल्याबद्दल धन्यवाद.

फार छान लिहिता तुम्ही, एकदम ओघवत, त्यामुळे वाचाताना डोळ्यासमोर चित्र उभ राहतं. शिवाय तुम्ही लावलेले फोटोज पण छान आहेंत. त्या त्या व्यक्ती, स्थान इत्यादी फोटो त्याला लागून टाकल्यामुळे छान वाटत वाचायला

गेल्या आठवड्यात पुण्यात ज्ञानप्रबोधिनी प्रशालेमद्धे "ऐस-पैस गप्पा" या कार्यक्रमात लेखकांना प्रत्यक्ष भेटायचा योग आला. २ तास त्यांच्या तोंडुन मंत्रमुग्ध करणारे अनुभव ऐकले. ब्लॉग अप्रतिम चालु आहे. मानस परिक्रमा करतो आहोत.
मायबोलीवरच्या काही लोकांमुळे लेखकाने इथे लिहिणं बंद केलंय याचं अजुनही वाईट वाटतय. मायबोली एका अप्रतीम लेखमालेला मुकली आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते. असो. नर्मदा मैयाची इच्छा.
श्री जगन्नाथ कुंटे यांचे 'नर्मदे हर' पुस्तक वाचल्यापासुन एकंदरीतच नर्मदा परिक्रमेबद्दल खुप कुतुहल आहे. हा ब्लॉग वाचायला सुरु केले तेव्हा एके रात्री एक लेख वाचुन संपवला तेव्हा मनात विचार आला की या लेखकांना भेटायला मिळाले पाहिजे. आणि अक्षरशः दोनच दिवसात प्रबोधिनी च्या व्हॉट्स अप च्या गटावर "ऐस-पैस गप्पा" चं फ्लायर मिळालं.माझी तीव्र ईच्छा मैया ने पुर्ण केली असं म्हणावसं वाटतंय.
नर्मदे हर.

राणी घोडीचे प्रकरण वाचले. अक्षरक्षः किती कलांमध्ये निपुण आहात तुम्ही. आदर वाटतो. >> +१११

61 भाग वाचून आता असं वाटतं की वेब सिरीज किंवा युट्युब सिरीज बनली तर खुद्द लेखक हेच उत्तम नायक असतील.कारण इतक्या विविध गोष्टी येणारा एक हिरो।मिळणं कठीण.

गेल्या आठवड्यात पुण्यात ज्ञानप्रबोधिनी प्रशालेमद्धे "ऐस-पैस गप्पा" या कार्यक्रमात लेखकांना प्रत्यक्ष भेटायचा योग आला. २ तास त्यांच्या तोंडुन मंत्रमुग्ध करणारे अनुभव ऐकले. ब्लॉग अप्रतिम चालु आहे. मानस परिक्रमा करतो आहोत.>>>>

या कार्यक्रमाची व्हिडिओ/ ऑडियो लिंक कुठे मिळेल का? खूप उत्सकता वाटते आहे

हो. मनिम्याऊ यांनी विचारल्याप्रमाणे, या कार्यक्रमाची व्हिडिओ/ ऑडियो लिंक कुठे मिळेल का? खूप उत्सुकता वाटते आहे.

Shalet chaukashi karun kalavate video baddal

पुन्हा कधी असा कार्यक्रम असेल तर लेखकांनीच इथे कळवलं तर ईच्छुकांना लाभ घेता येईल. लेखमाला उत्तम हे वेगळे सांगणे न लगे.

Pages