Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53
भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !
नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).
अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !
येऊद्या भाषेविषयी काहीही..
अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
“प्रचंड” शब्द आपण वापरतो पण
“प्रचंड” शब्द आपण वापरतो पण “चंड” नाही आता वापरात फारसा.
चंड = उग्र, तीव्र, प्रखर, मोठा इ.
यावरुन मराठीत अनेक शब्द आहेत जे आता वापरात नाहीत. उदा.
चंडवात = तीव्र वादळ - वावटळ
चंडशिळा / चंडपाषाण = मोठा अवाढव्य दगड
चंडवेग = हा कामसूत्रात येतो, high libido / तीव्र कामेच्छा असलेल्या पुरुषासाठी. त्याविरुद्ध मंदवेग.
चंडवेग = हा कामसूत्रात येतो,
चंडवेग = हा कामसूत्रात येतो, >>> सुरेख !
आवडला..
अरे वा!
अरे वा!
देवीच्या उग्र रूपाला चंडी का म्हणतात ह्याचा उलगडा झाला.
+१ त्यावरूनच 'चंडीगड'
+१
त्यावरूनच 'चंडीगड'
मूर्ती विसर्जन करणे या अर्थी
मूर्ती विसर्जन करणे या अर्थी
शिरवणे
हे क्रियापद वापरले जाते.
आशा बगे यांच्या लेखात ते वाचले.
एखाद्याची 'फिरकी घेणे' हा
एखाद्याची 'फिरकी घेणे' हा सुंदर वाक्प्रचार खूप दिवसात ऐकला नव्हता. जो काल वपु कथाकथनात , युट्युबवरती ऐकायला मिळाला. लेग पुलिंगला छान भाषांतर होइल.
>>>करंज वृक्षाला संस्कृतमध्ये
>>>करंज वृक्षाला संस्कृतमध्ये नक्तमाल >>>> रोचक आहे.
छान माहिती
माधवी
माधवी
याचे अनेक अर्थ आहेत.
त्यापैकी,
मधापासून गाळलेले मद्य
हा अर्थ प्रथमच समजला.
... कुठे ती चंद्राची सतरावी कला आणि ..... कुठे हे मद्य
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5%...
हो. माध्वी असे ही लिहितात.
हो. माध्वी असे ही लिहितात.
संस्कृत मध्ये माध्वीकम् म्हणजे द्राक्ष आणि द्राक्षापासून तयार केलेले मद्य असे दोन्ही अर्थ आहेत.
"शिरवणे" - गणपती शिरवला असे
"शिरवणे" - गणपती शिरवला असे ऐकले आहे, विशेषतः विदर्भात प्रचलित आहे. त्यालाच पुण्याकडे गणपती 'बुळवणे' असे म्हणतांना ऐकले.
फिरकी घेणे = लेग पुलिंग. याला आपल्याकडे 'टांग खेचणे' आहे की. शब्दशः भाषांतर
छान.
छान.
....
माध्वीकम् म्हणजे द्राक्ष >>> रोचक.
>>> गणपती 'बुळवणे'
>>> गणपती 'बुळवणे'
‘बोळवणे’ ऐकलं आहे.
आठवा : ‘मी-तू-पणाची झाली बोळवण’.
मी 'टांग खेचणे' हा शब्द ऐकला
मी 'टांग खेचणे' हा शब्द ऐकला नाहीये.
तुझ्या नानाची टांग - हा वाक्प्रचार माहीत आहे.
व्याज म्हणजे interest on
व्याज म्हणजे interest on money हे आपण जाणतो. प्रचलित नसलेले अन्य अर्थ:
कपट
ढोंग
सबब
बतावणी
एखादी गुप्त गोष्ट
‘निर्व्याज’ प्रचलित आहे पण.
‘निर्व्याज’ प्रचलित आहे पण.
व्याज म्हणजे कपट >>
व्याज म्हणजे कपट >>
यावरून व्याजोक्ति आलेला दिसतोय
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%...
कारा
कारा
याचे शब्दकोशांमध्ये तुरुंग व त्रासदायक धंदा असे अर्थ दिलेत.
( बृहदकोश व शब्दरत्नाकर).
मात्र एका शब्दकोड्यात त्याचा “ लग्न न झालेला” असा अर्थ दिला होता.
याचा संदर्भ कुठे मिळेल ? काराचे स्त्रीलिंगी रूप होते का ?
व्याजोक्ति अलंकार ! तसेच
व्याजोक्ति अलंकार ! तसेच व्याजनिंदा आणि व्याजस्तुति सुद्धा आहेत.
मराठीत वापर होणारे अन्य अलंकार असे :
उपमालंकार
अनन्वय
उपमेयोपमा
प्रतीप
रूपक
परिणाम
उल्लेख
स्सृतिमान्
भ्रांतिमान्
ससंदेह
अपन्हुति
उत्प्रेक्षा
अतिशयोक्ति
तुल्ययोगिता
दीपक
प्रतिवस्तूपमा
दृष्टांत
निदर्शना
व्यतिरेक
विनोक्ति
समासोक्ति
परिकर
परिकरांकुर
श्लेष
अप्रस्तुतप्रशंसा
प्रस्तुतांकुर
पर्यायोक्त
व्याजनिंदा
व्याजस्तुति
आक्षेप
विरोधाभास
विभावना
विशेषोक्ति
असंभव
असंगति
विषम
विचित्र
अधिक
अल्प
अन्योन्य
विशेष
व्याघात
कारणमाला
एकावली
माला- दीपक
यशासंख्य
पर्याय
परिवृत्ति
परिसंख्या
विकल्प
समुच्चय
समाधि
प्रत्यनीक
काव्यार्थापत्ति
काव्यलिंग
अर्थांतरन्यास
विकस्वर
प्रौढोक्ति
संभावना
मिथ्याध्य- वसिति
ललित
प्रहर्षण
विषादन
उल्लास
अवज्ञा
अनुज्ञा
लेश
मुद्रा
रत्नावली
तद्गुण
पूर्वरूप
अतद्गुण
उत्कर्ष
मीलित
सामान्य
उत्तर
चित्र
सूक्ष्म
व्याजोक्ति
विवृतोक्ति
युक्ति
लोकोक्ति
छेकोक्ति
वक्रोक्ति
स्वभावोक्ति
भाविक
अत्युक्ति
निरुक्ति
प्रतिषेध
विधि
हेतु
रसवत्
प्रेयस्
ऊर्जस्वित्
समाहित
भावोदय
भावसंधि
भावश- बलता.
अजूनही असतील. अधिक माहितीसाठी / सोदाहरण स्पष्टीकरणासाठी “प्रतापरुद्रग्रंथ” आणि “काव्यप्रकाश”
हे ग्रंथ आहेत (म्हणे).
अलंकारांची रेलगाडी आवडली
अलंकारांची रेलगाडी आवडली
वा अलंकाराची यादी आवडली.
वा अलंकाराची यादी आवडली.
मध्यंतरी अशीय यमकांबद्दलची माहिती मिळालेली. ती डकवते. इथे पूर्वी आली असेल तर क्षमस्व!
यमकाचे प्रकार:
यमकाचे प्रकार:
१) एकाक्षरी यमक:
एक्या पदे भूमि भरोनि थोडी
दुजा पदे अंडकटाह फोडी
(डी ला डी हे एकाक्षरी यमक)
२) द्व्यक्षरी:
दे तीसरा पाद म्हणे बळीला
म्हणोनी पाशी दृढ आकळीला
(ळीला हे द्व्यक्षरी)
३)चतुराक्षरी
बाई म्यां उगवताच रवीला
दाट घालुनि दही चरवीला
त्यात गे फिरवितांच रवीला
सार काढुन हरी चरवीला
(काय अफाट आहे ना हे! प्रत्येक 'चरवीला' वेगळा आशय मांडतो.)
४) मग एकाचा अन्त्य आणि दुसऱ्याचा आदि चरण सारखा.
सेवुनि संतत पाला, संत तपाला यदर्थ करतात
तो प्रिय या स्तवना की, यास्तव नाकीहि तेंचि वरितात
५) दामयमक: एका ओळीने शेवट झाला की पुढच्या कडव्याची सुरुवात त्याच ओळीनं
'श्रीपति झाला दशरथ-सुत राम दशाननासि *माराया|*
*मा राया* जनकाची होय सुता त्रिजगदाधि *साराया|*
*सारा या* प्रभुची हे लीला गाती सदैवही *सुकवी|*
*सुकवी* भवजलिं निधितें निरुपमसुख रसिक जन मनीं पिकवी|'
(पहिल्या ओळीचा शेवट ती पुढच्या ओळीची सुरुवात. पण अर्थ वेगळा.)
६) पुष्पयमक: प्रत्येक चरणात यतीच्या ठिकाणी येणारं यमक.
सुसंगति सदा घडो... पडो.. झडो... नावडो
*७) अश्वघाटी: घोड्यासारखी गती असलेलं यमक.*
वाजत गाजत साजत आज तया जतन करुनि आणा हो
(वाजत गाजत साजत आजत याजत, अशी गंमत आहे.)
मज मागे मत्स्यांचा हा रिपु-शशि-राहु-बाहु राणा हो
८) युग्मक यमक:
पायां नमी देइन वंश सारा
पा या न मी दे इनवंशसारा
(इन म्हणजे सूर्य, इनवंशसार म्हणजे सूर्यवंशात जन्मलेल्यांचं सार म्हणजे राम!)
९)समुद्रक यमक
हेही अफाट प्रकरण आहे. -
अनलसमीहित साधी राया, वारा महीवरा कामा
अनलस मीहि तसा धीरा यावा रामही वराका मा
(हे पृथ्वीपते धर्मा, वारा जसे अग्नीचे कार्य साधतो, तसे तुला साह्य करण्यास मी सदैव तयार आहे. हे धीरा, बलरामही हवे तर येतील. मग वराका (बिचारी) मा (रुक्मिणी) तुझ्या साह्यास का येणार नाही?
प्रत्येक 'चरवीला' वेगळा आशय >
प्रत्येक 'चरवीला' वेगळा आशय >>> अप्रतिम !!
आरा बाप! नशीब एवढे अलंकार
आरा बाप! नशीब एवढे अलंकार परीक्षेला नव्हते. नाहीतर योग्य अलंकार ओळखणाऱ्याचा सत्कारच केला असता.
एवढे अलंकार! अजिबात कल्पना
एवढे अलंकार! अजिबात कल्पना नव्हती एवढे असतील याची.
अवल, काय सुंदर यमक आहेत! यांचीही माहिती नव्हती.
ह पा> >आरा बाप! नशीब एवढे
ह पा> >आरा बाप! नशीब एवढे अलंकार परीक्षेला नव्हते<< मनातलं लिहिलत माझ्या
एवढे अलंकार! अजिबात कल्पना
एवढे अलंकार! अजिबात कल्पना नव्हती एवढे असतील याची.
अवल, काय सुंदर यमक आहेत! यांचीही माहिती नव्हती+११११
>>> नशीब एवढे अलंकार
>>> नशीब एवढे अलंकार परीक्षेला नव्हते. नाहीतर योग्य अलंकार ओळखणाऱ्याचा सत्कारच केला असता
हो नाा!
लोकहो, खात्रीने सांगतो ही
लोकहो, खात्रीने सांगतो ही यादी अपूर्ण आहे
@ अवल, सुंदर उदाहरणे आहेत !
@ अवल, सुंदर उदाहरणे आहेत !
यमक प्रकारही छान आहेत.
यमक प्रकारही छान आहेत.
Pages