मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अ प्रिन्सेस रिमेंबर्स
जयपूरच्या महाराणी गायत्रीदेवी यांचे आत्मकथन
मूळ इंग्रजी. अनुवाद आशा कर्दळे
मेनका प्रकाशन,२००४.
पाने २७०
बडोद्याचे गायकवाड हे आजोळ असलेल्या गायत्रीचा जन्म कोचबिहार या संस्थानात झाला. जयपूरच्या जय सिंगाशी तिचा प्रेमविवाह झाला. जयची दोन लग्ने बालपणीच झालेली. त्या महाराणींनीही हिला स्विकारले तिसरी सवत म्हणून नव्हे तर आपलीच मैत्रीण म्हणून .राजांच्या अधिक बायका असणे फारच साधारण गोष्ट होती तेव्हा. पण जयपूरमध्ये पडद्याआड राहावं लागलं. इकडे कोचबिहारात पोहणे,घोडे हत्तीवर बसणे, टेनिस खेळणे असे मोकळ्या पद्धतीने वावरत नंतर पडदा सांभाळणे कठीण होतं. उन्हाळ्यात उटी किंवा लंडनला गेल्यावर स्वच्छंदी फिरता यायचं. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर संस्थानांचे विलीनीकरण,राजकारण,निवडणूका या सर्व घटना घडत गेल्या. महाराणीतून खासदार होणे, कॉन्ग्रेसविरोधी स्वतंत्र पक्षातून निवडून येणे याबद्दल वाचायला आवडले. जयच्या मोठ्या भावाला मुलगा वारस नव्हता. गायत्रीने आपला मुलगा जगत यास त्यांना दत्तक दिले.
एकूण वाचनीय पुस्तक.

होय. आणि गायत्रीची आईसुद्धा गाजली होती. सोळाव्या वर्षी तिचे लग्न चाळीस वयाच्या महाराजांशी(ग्वाल्हेरचे) ठरवून तयारी झालेली. पण तिने पत्र लिहून नकार दिला. तिचं कोचबिहारच्या तरुण राजकुमाराशी सूत जमलं होतं.

होय. आणि गायत्रीची आईसुद्धा गाजली होती. >>>>>>
सौन्दर्यासोबत सौन्दर्यदृष्टीही होती मायलेकीला. फ्रेंच शिफॉनचे मटेरियल आवडले पण त्याच्या साड्या बनत नव्हत्या. इंदिरादेवींनी फ्रेंच शिफॉनच्या साड्या खास विणून घ्यायला सुरुवात केली. गायत्रीदेवींनी शिफॉन साड्या व मोत्याची एकेरी/दुहेरी माळ ही फॅशन फेमस केली. उतारवयातील त्यांचे असे फोटो काय ग्रेसफुल आहेत. अजूनही सो कॉल्ड राण्या, कुमारी इ. ही फॅशन फॉलो करतात.

आता आम्ही विविध संस्थानिकांचे महाल पाहतो तेव्हा त्यातली चित्रे आणि झुंबरे आणि जुनी टांगलेली शस्त्रे आहेत. घोडे,हत्ती,जवाहिर ,सोन्याच्या वस्तू वारसांनी नेल्या. ( काही महालांत राजे राहतात तो भाग थोडासा दाखवतात यूट्यूबवरच्या चानेलवर.)
असो.

गायत्रीदेवीचं छान आहे पुस्तक, मी काही वर्षांपूर्वी वाचलेलं. त्यांच्या आईचं त्या काळात डेरिंग बघून कौतुक वाटलेलं. एकंदरीत राजघराणे कसं असतं, त्यांची लाईफस्टाईल, त्यांच्या चालीरीती, त्यांचं नोकर लवाजमा घेऊन फिरणं. सर्व रोचक आहे.

भुरा
शरद बाविस्कर (आत्मकथन)
लोकवाङमय प्रकाशन २०२१ पहिली आवृत्ती,२०२२ आठवी.
पाने ३२५

लोकसत्ता पुस्तक यादी* (२०२२)इथे आली होती (दीपक घारे). लोकसत्ता पेपराने काही लोकांना हल्ली वाचलेल्या पाच पुस्तकांची नावे विचारली होती त्यात हे पुस्तक बऱ्याच जणांनी सांगितले होते. कालच हे पुस्तक वाचनलयात सापडले आणि एका दमात वाचून काढले.
चौथीपर्यंत शाळेत जायला टाळाटाळ करणारा रावेर (धुळे) येथून येणारा 'भुरा' (शरद) पुढे पुस्तकं आणि शिक्षणाची गोडी लागून जिद्दीने इंग्रजीत एमए होता होता स्वतः च फ्रेंच भाषा शिकून त्यात पुढे प्रगत शिक्षण कसं घेतो ,जेएनयूत फ्रेंच भाषेतील तत्त्वज्ञानाचा प्रोफेसर कसा होतो याची कहाणी. (हे अगदी थोडक्यात.)
उद्बोधक.

लोकसत्ता नवी यादी २०२३

एकंदरीत राजघराणे कसं असतं, त्यांची लाईफस्टाईल, त्यांच्या चालीरीती, त्यांचं नोकर लवाजमा घेऊन फिरणं

>>> आणि याच कारणामुळे मला अशी पुस्तकं वाचायला आवडत नाहीत Lol (द क्राऊन मालिकाही या कारणामुळे सोडून दिली.)

मराठीत रंगकलाकार, चित्रकार,कारखानदार,लेखक तसेच जातीबद्दल लिहिणारेही आपलं जीवन लिहून गेलेत मग यांनी का मागे राहावे आणि त्यांचेही वाचावे.
त्यांच्या विश्वात डोकावून पाहण्याची एक संधी.

आज लायब्ररीमध्ये टंगळमंगळ करताना एक मस्त पुस्तक सापडुन गेलं -
Better Living Through Birding : Notes from a Black Man in the Natural World by Christian Cooper
यावर्षीच मेमध्ये पब्लिश झालेले हे पुस्तक केवळ 'बर्डिंग' अर्थात पक्षीनीरीक्षण हा विषय असल्या कारणाने चाळायला घेतले आणि बुडुन गेले. एक तर हा लेखक आहे कृष्णवर्णिय त्यात समलैंगिक तेव्हा त्या अनुषंगाने काही टिप्पण्या आहेत, थोडाफार बालपणाचा भागही येतो. पण हे अगदी जेवताना घेतलेल्या चटणी कोशिंबिरी सारखे.
मुख्य मेजवानी आहे ती त्याच्या पक्षीनिरीक्षणाच्या, छंदाची, वेडाची आणि त्यातून अनुभवाने समृद्ध होत गेलेल्या त्याच्या दैनंदिन जीवनाची. किती वेडा आहे हा माणुस. हा रहातो लॉंग आयलंडमध्ये म्हणजे मला तो कधीतरी सबवे, एल आय आर आर मध्ये दॄष्टीस पडण्याची संधी आहे तर. उन्हाळ्यात लवकर उठून गबाळ्या वेशात तो सेंट्रल पार्कमध्ये राउंड घेतो. कामाची वेळ झाली त्याच गबाळग्रंथी वेशात ऑफिसात जातो. लोकांना वाटते अरे हा काय असा कॅज्युअल येतो? पण त्याला त्याची पर्वा नसते कारण एकच - असल्या क्षुल्लक गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ आहे कोणाला. पक्षीनीरीक्षण हेच मुख्य ध्येय.
त्याने पुस्तकात मधे मधे 'बर्डिंग टिप्स' पेरलेल्या आहेत. या छंदांची क्रमवार कारणे दिलेली आहेत. यामधील 'elegy' हे प्रकरण खूप मस्त आहे. तर ही elegy आहे २ प्रकाशाचे मनोरे. कोणते तर ९ सप्टेंबरला जे ट्विन टॉवर्स अतिरेक्यांनी पाडले, त्या टॉवर्स च्या जागी हे लाईट बीम्स दर वर्षी त्या दिवशी म्हणजे ९ सप्टेंबरला, सोडले जातात. काय करुण आणि सुरेख कल्पना आहे ही. दर वर्षी तिथे गेले की डोळे भरुन येतात, कलेक्टिव्ह कॉन्शस शी संबंधित हा आवंढा असतो. उगाचच हुरहूर लागते, हे प्रकाश बीम्स आकाशात दूर दूर उंच सोडलेले आहेत खालती सतत पाणी वहाते आणि त्या पाण्याचा आवाज आणि सगळेच गूढ भासते. पण पक्षीनीरीक्षकांनी हे पाहीले की त्या काळात पक्ष्यांचे उत्तर अमेरीकेत स्थलांतर होत असते आणि बरेचसे सॉंगबर्डस दिवसा उर्जा सेव्ह करुन, रात्री अंतर कापतात. हे पक्षी या बीम्स्कडे आकर्षित होतात, त्यांभोवती फिर फिर फिरुन थकून खाली पडतात, मरतात. तर यावर उपाय एक म्हणजे ऑडोबान या पक्ष्यांच्या सोसायटीने, उघड उघड विरोध करुन हे बीम्स, सरकारला बंद करायला लावणे. पण नाही ऑडोबानने एक आऊट ऑफ बॉक्स उपाय योजला तो म्हणजे पक्षीनिरीक्षक पाळत ठेवणार की अमुक इतक्या वेळात किती पक्षी घिरट्या घालताना दिसतायत, जर संख्या अमुक एका थ्रेशोल्डपेक्षा जास्त असेल तर मग थोडा वेळ हे बीम्स बंद करायचे. त्या वेळात थवा दुसरीकडे निघून जातो.
लेखकाला लहानपणी सुतारकाम शिकण्याच्या एक्स्ट्राकरिक्युलर अ‍ॅक्टीव्हीटीमध्ये त्याच्या आईवडीलांनी भरती केलेले होते. तेव्हा स्टूल आणि बर्ड फीडर यामध्ये लेखकाने बर्ड फीडर निवडला व लाकडाचा बर्ड फीडर बनवला. अर्थात मग लगेच त्याचे उद्घाटन झाले. तर त्या बर्ड फीडरवरती खूप खूप 'रेड विंगड ब्लॅक बर्डस' येउ लागले. आणि लेखकाला वाटले की नवीन कावळ्याची जात त्याला सापडली : ) अर्थात पुढे हाच मुलगा पक्षीच पक्षी ओळखू लागला इतका अचूकतेने की नाना प्रजातीच्या पक्ष्यांचे साधर्म्य, फरक त्याला चुटकीसरशी सांगता येउ लागले.
असे बरेच प्रसंग येत गेले. पुस्तक खूप आवडले.
https://lh3.googleusercontent.com/pw/ADCreHePQ6SzTqGszGS5tMNCnFks192BGELV3VWwqzZxRe1tLkwMk7PMH6r40mWlDvunQ7mBPYlE7BtBFgdRRr_zV_ME1j9Rl8TCs8D5a1Sy6a-oy3jI5XGdfPVmn8NbnT6RDGYsYTggTCsro8-RGcLn1BBUyQ=w264-h400-s-no-gm?authuser=0

Better Living Through Birding
पुस्तक आवडून गेले आहे. प्रत्यक्ष पक्षी निरीक्षण यापेक्षा त्या छंदाकडे लेखक कसा गेला,काय करतो,इतर गंमतीजमती हा विषय नवीन आहे.
पुस्तक २०२२ मध्ये हल्लीच प्रकाशित झालं आहे. मिळवलं आहे. भाषा आवडली. "As a Black kid in the 1970s, I was rarer than an Ivory-Billed Woodpecker in the very white world of birding; as I simultaneously struggled with being queer, birds took me away from my woes suffocating in the closet."!!!!.
एकूण मजेदार वाटतंय.
नवीन पुस्तकाबद्दल धन्यवाद @सामो.

इंटरेस्टिंग. नावावरून शंका आल्याने चेक केले तर तोच निघाला. एक दोन वर्षांपूर्वी तो सेण्ट्रल पार्क मधे फिरत असताना एका महिलेने त्याच्याशी वाद झाल्यावर पोलिसांकडे त्याच्याबद्दल तक्रार केली होती.
https://en.wikipedia.org/wiki/Central_Park_birdwatching_incident

तेव्हा तो रेसिझमचा प्रकार म्हणून चर्चेत आला होता व तिची नोकरीही गेली होती. नंतर काय झाले माहीत नाही. विकीवरचे आर्टिकल पूर्ण वाचलेले नाही.

सामो, परिचय आवडला. एका पक्षीप्रेमी मित्राला रेको पाठवला.

फारएण्डने उल्लेख केलेली बातमी वाचल्याचं आठवतं आहे.

फारएण्डने उल्लेख केलेली बातमी वाचल्याचं आठवतं आहे.>> मी ती बातमीच वाचली आहे. ती कारेन पण ह्या काड्या डॉ ग वॉक कर्ताना करते. व कांगावा करते की हा माणूस कुत्र्याला कायतरी करतो आहे. तिची नोकरी गेली. पूर्ण जीवनच वरखाली झाले.

बर्डिंग मस्त शौक आहे. पण मला इजिली फक्त कावळे, कबुतरे क्वचित साळुंक्या व कधीतरी खंड्या दिसतो. बाकी सगळे रील्स वर बघते.

वर्षा, हे पुस्तक वाचताना तुझीच आठवण झाली होती. होय अमा - कॅरेन Lol ...... रेसिस्ट कॅरेन होती ती. कांगावखोर आणि खोटारडी.
ललीता, मामी, कॉमी - आभार.

brahmni kite, brahmni starling(myna) ही नावे racist आहेत असं माझा मित्र म्हटलेला. ही नावं अर्थात भारतीयांनी ठेवली नसावीत.

बर्डिंग मस्त शौक आहे. >>> हो. लोक फार डीप असतात त्यात. मी एकदा बर्डिंग वॉक की ट्रेल काहीतरी होते त्याला एका हौशी मित्राच्या आग्रहावरून गेलो होतो. एकदम मेजर लीग इक्विपमेण्ट वगैरे असतात त्यांच्याकडे. ते सारखे "ऑटोबान" का म्हणत होते तेव्हा कळले नाही. जर्मनीच्या हायवेचा काय संबंध असे वाटले. नंतर कळाले की एक "ऑडोबॉन सोसायटी" आहे बर्डर्स ची.

पण या ट्रेलमुळे थोडे का होईना कुतूहल जागे झाले व आसपासच्या पक्ष्यांकडे लक्ष जाउ लागले(हे वाक्य एकेकाळी फार मजेदार अर्थाने वापरले जायचे) आमच्या तेव्हाच्या बॅकयार्ड मधेच जवळजवळ १०-१५ प्रकारचे पक्षी येत असे लक्षात आले.

सामो, फार मस्त परिचय करून दिला आहेस. Happy
Birding/ पक्षी निरीक्षण आवडणाऱ्यांनी The big year हा Jack Black, Steve Martin आणि Owen Wilson यांचा सिनेमा बघा, त्यातली स्पर्धा-चढाओढ- गंमत धमाल दाखविली आहे.

'कुण्या गावाचं आलं पाखरू' का ? >>> Happy Happy हो साधारण तसेच. पक्षीनिरीक्षण याला गहन अर्थ असे.

द बिग इयर ची जाहिरात पाहिली होती. थँक्स रेको बद्दल.

>>>>>> The big year
नोट केलेला आहे. धन्यवाद.

Pages