मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

भोकरवाडीच्या गोष्टी-द मा मिरासदार
नाना चेंगट, बाबू पैलवान, शिवा जमदाडे, एकेकाची बायको वगैरे पात्रं इतकी हसवुन सोडतात.

गॉगल लावलेला घोडा थोडेसे बुकगंगावर वाचायला मिळाले. पहिल्या कथेचा पाव भाग वाचून उत्कंठा प्रचंड वाढलीये. आता हे पुस्तक पुढच्या भारतभेटीत घेणे आले. अश्यात आलेला आशीश महाबळ यांचा घोस्टरायटर आणि इतर कथा हा कथासंग्रह आणि नींद नसानी होय हा जयंत पवारांचा कथासंग्रह हेही यादीत टाकले.

वावेंनी बाळूच्या अवस्थांतरणाची डायरी ह्या पुस्तकाबद्दल लिहिलंय ते खुप आवडले. बाळूच्या अवस्थांतरणाची डायरी हे एक जबरदस्त पुस्तक आहे. इतक्या तरलपणे मांडलाय बाळूचा प्रवास. मी स्वत। पण असाच कराडला आईबरोबर कॉलेजला गेलेलो ते सगळं दाटून आलं ती कथा वाचताना.

आशिष महाबळ म्हणजे मायबोलीकर aschig का? >>> हो.

लोकहो, अस्चिगचा कथासंग्रह वाचा. करकरीत साय-फाय कथा आहेत. डोक्याला टोटल खाद्य- with no mercy!
या पुस्तकाच्या संपादनप्रक्रियेत माझा सक्रीय सहभाग होता.

धन्यवाद पुंबा.
अस्चिग यांचं मराठी पुस्तक आल्याचं माहिती नव्हतं. इंग्लिश पुस्तक (इतर काही शास्त्रज्ञांबरोबर मिळून) आल्याचं समजलं होतं.

नाईट शिफ्ट मस्त आहे. किंगचे लघुकथा मध्यमातले लेखन जास्त आवडते मला. अर्थात त्याची लघुकथा सुद्धा लघु ह्या शब्दावर प्रश्न उभे करणारी असते हे वेगळे.

यात तुम्हाला साधारण २५ पुस्तकांची १ पेटी देण्यात येते. साधारण ३ महिन्यांनी ती दुसऱ्या सदस्याबरोबर बदलायची. मराठी वाचनाची गोडी≥>>> इकडेही असा पेटी उपक्रम आहे.

अलीकडे वाचलेली, आवडलेली काही पुस्तकं :-

कादंबऱ्या:
बांडगूळ आख्यान- मोहन पाटील
एक दोन चार अ — राकेश वानखेडे
पुरोगामी- राकेश वानखेडे
दिसें वाया गेलों - अरविंद रे
अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट- आनंद विंगकर
ओस निळा एकांत — जी के ऐनापुरे
जंजाळ — विक्रम भागवत
श्वास — विक्रम भागवत
भुई भुई ठाव दे — सीताराम सावंत
आदिमायेचे — राही अनिल बर्वे
डहाण- अनिल साबळे
मोनोक्रोम — सचिन कुंडलकर

कथासंग्रह:
पिवळा पिवळा पाचोळा- अनिल साबळे
हलते डुलते झुमके — मनस्विनी लता रवींद्र
गॉगल लावलेला घोडा — निखिलेश चित्रे
हरवलेल्या कथेच्या शोधात — सीताराम सावंत
नऊ चाळीसची लोकल — शिल्पा कांबळे
नासमाया — जी के ऐनापुरे

लेखसंग्रह:
साहित्य, भाषा आणि समाज — मिलिंद बोकील
नपेक्षा — अशोक शहाणे
माणदेश : दरसाल दुष्काळ— आनंद विंगकर

अनुवादित:
इस्तंबूल इस्तंबूल — बु-हान सोनमेझ (अनु. सविता दामले)

गहाळ - ओया बाय्दोर (अनु. ललिता कोल्हारकर)

जॉर्ज ऑर्वेल: निवडक निबंध आणि लेख-- अनु. मनोज पाथरकर

आकाशपाताळ - थॉमस मेले( अनु. सुनंदा महाजन)

द क्राउड/ द ट्रू बिलिव्हर- झुंडीचे मानसशास्त्र (विश्वास पाटील)

रिफ्लेक्शन्स ऑन दी गिलोटिन - आल्बेर काम्यू ( शिरच्छेद, फाशी आणि आल्बेर काम्यूचा चिंतननामा, अनु. शेखर देशमुख)

चेकॉव्हच्या सात कथा- अनु. सुमती कानिटकर

ऑफ ह्युमन बॉंडेज — सॉमरसेट मॉम (अनु. आनंद ठाकूर)

द लिटल प्रिन्स - आंतिओन द संतेक्झुपेरी (अनु. लतिका मांडे)

चेर्नोबिलची प्रार्थना — स्वेतलाना ॲलेक्सीव्हिच (अनु. स्मिता लिमये)

लेक्झिल ए ल रोयोम — आल्बेर काम्यू (अनु. जयंत धुपकर)

ॲक्टिंग: दि फर्स्ट सिक्स लेसन्स- रिचर्ड बोलेलाव्हस्की (अनु. 'अभिनयाचे प्राथमिक सहा पाठ'- सदाशिव अमरापूरकर, आनंद विनायक जातेगावकर)

खिलेगा तो देखेंगे - विनोदकुमार शुक्ल (अनु. 'फुलेल तेव्हा बघू', निशिकांत ठकार)

PS - ह्याशिवाय मग सुभाष अवचटांची 'डोन्ट पेन्ट द क्लू', 'खिडकी', 'जी ए एक पोर्ट्रेट' हीपण आहेत.

srd,
हो. ह्यातील काही पुस्तकांबद्दल एक वेगळा धागा काढतो

जन्मलेल्या प्रत्येकाला...
प्रिया तेंडुलकर

या कथासंग्रहाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक कथेतला दृष्टिकोन वेगवेगळा आहे. खरं तर सगळ्या कथा या तशा सर्वसामान्य माणसांच्याच आहेत. पण तोच तोच प्रश्न प्रत्येक कथेत येत नाही.
काही कथा अत्यंत 'डार्क', उदासवाण्या आहेत. ते वातावरण लेखिकेने नेमकं उभं केल्यामुळे त्या कथा अगदीच अंगावर येतात.
'गुग्गुम आणि झुमकू' ही कथा किंवा खरंतर ललित लेख हा लेखिकेने स्वतःच्या खऱ्या भाचरांवर लिहिला आहे असं वाटलं. तो इतका मस्त जमलाय की वाचताना पुलंच्या 'दिनेश'ची बऱ्याच वेळा आठवण झाली.

'जन्मलेल्या प्रत्येकाला' ही कथा एक वेगळंच चित्र दाखवते. व्यसनी मुलाच्या कर्तृत्ववान बापाच्या बाजूने लिहिलेली ही कथा आहे. गुंतागुंतीचे नातेसंबंध आणि माणसांमधली विविधता ही या आणि एकंदरीत सगळ्याच कथांमधून उत्तम प्रकारे उभी केलेली आहे.
काही स्त्रीप्रधान कथा वाचताना गौरी देशपांड्यांच्या कथांची आठवण झाली. कथेतल्या साधर्म्यामुळे नाही, तर मांडणीतल्या ताकदीमुळे.

प्रिया तेंडुलकरचं 'पंचतारांकित' हे पुस्तक मी खूप वर्षांपूर्वी वाचलं होतं. तेही तेव्हा आवडलंच होतं. हेही तितकंच आवडलं.

प्रिया तेंडुलकर छानच लिहायची.
गुग्गुम आणि झुमकू' ही कथा किंवा खरंतर ललित लेख हा लेखिकेने स्वतःच्या खऱ्या भाचरांवर लिहिला आहे असं वाटलं. ....... तिच्या भावाच्या आणि बहिणीच्या(अनुक्रमे) मुलांवरच लिहिले आहे.
पंचतारांकित हेही सुरेख आहे.

कथेतल्या साधर्म्यामुळे नाही, तर मांडणीतल्या ताकदीमुळे....+१.

<<ह्यातील काही पुस्तकांबद्दल एक वेगळा धागा काढतो

नवीन Submitted by संप्रति१ on 10 June, 2023 >>>

पहिल्यांदाच हे वाक्य वाचून आनंद वाटला. एरवी पोटात गोळा येतो.

वेगळा धागा काढतो
- संप्रति१

-छानच.
_______________
प्रिया तेंडुलकर, आणि गौरी देशपांडे यांची पुस्तकं वाचून इतका काळ लोटला आहे की काही आठवत नाही. त्या़ंच्या कथा आवडायच्या.

मी आताच टाटायन- ले. गिरीश कुबेर, वाचले. भारावून गेलेय. पुस्तक तर अप्रतिम आहेच पण टाटा असणे हे काय आहे हे मुळातून वाचणे हा अनुभव चुकवू नये असा आहे.

प्रिया तेंडुलकरचं 'पंचतारांकित' हे पुस्तक मी खूप वर्षांपूर्वी वाचलं होतं. तेही तेव्हा आवडलंच होतं.>>> +१

हे पुस्तक वाचायला पाहिजे ही नोंद केली.
गौरी देशपांडे, सानिया ह्या लेखिका आवडायच्या.
त्याच्या पेक्षा वेगळी शैली आणि विषय हाताळणाऱ्या मंगला गोडबोले, नरवणे ह्या ही आवडायच्या.
बरेच वर्षांत नाही वाचल .

लोकहो, अस्चिगचा कथासंग्रह वाचा. करकरीत साय-फाय कथा आहेत. डोक्याला टोटल खाद्य- with no mercy!>>>>
आजच वाचून संपवलं पुस्तक. सकाळी वाचायला घेतलं त्यावेळी वाटलं होते दुपारपर्यंत संपेल, छोटे तर आहे पुस्तक. पण असं एकदम पटापट वाचण्यासारखे नाहीये पुस्तक. काही गोष्टी अगदी सोप्या आणि छोट्या आहेत तर काही एकदम डोक्याला खाद्य type. एकूण खूप मजा आली वाचताना. मी बऱ्याच वर्षांनी मराठी विज्ञानकथा वाचल्या. परत एकदा वाचायच्या आहेत काही कथा.

लोकहो, अस्चिगचा कथासंग्रह वाचा. करकरीत साय-फाय कथा आहेत. डोक्याला टोटल खाद्य- with no mercy!
या पुस्तकाच्या संपादनप्रक्रियेत माझा सक्रीय सहभाग होता. >>>> येस. नक्कीच वाचणार.

१) अस्चिगचा कथासंग्रह वाचा
नाही मिळाला.
२)
इथे नेगल'चा उल्लेख आलेला होता ते वाचायला मिळाले. आमटे नाव दिसलं तरी आनंदवनबद्दल नाही. बाबांचा मुलगा प्रकाश यांनी पाळलेल्या प्राण्यांविषयी आहे.
नेगल -विलास मनोहर
ग्रंथाली प्रकाशन,१९९१-२००४
पाने १२०
लेखक विलास हे डॉ प्रकाश आमटे यांच्या , लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा,भामरागड येथे राहिले होते. तिथे पाळलेल्या प्राण्यांविषयीची रंजक माहिती आहे. बहुतेक रोजची डायरी लिहीत असावेत. अगदी बारीकसारीक टिपणं क्रमवार आहेत. नेगल म्हणजे तेथील माडिया आदिवासी भाषेत बिबट्या. त्यांच्याकडे फोटो काढणे परवडत नव्हते. जे काही रंगीत फोटो आहेत ते तिथे भेट दिलेल्या फोटोग्राफरांचे आहेत. माऊस डीअर,बार्किंग डीअरचे फोटो असते तर बरं झालं असतं. बोलणाऱ्या मैनांचा किस्सा मला फार आवडला. सुंदर पुस्तक.

३)प्राण्यांची आवड असणाऱ्या वाचकांनी Gerald Durrell ची पुस्तकं वाचली असतील. खास म्हणजे
A zoo in my luggage, Bafut Beagles. त्याची आठवण झाली. ही पुस्तके https://archive.org/details/bafutbeagles0000gera/page/101/mode/1up किंवा https://archive.org/search?query=Gerald+Durrell इथे स्क्रीनवर वाचता येतील.
४)टाटायन- ले. गिरीश कुबेर,
हे आहे पण कुणी नेलं होतं.

१) अस्चिगचा कथासंग्रह वाचा
नाही मिळाला.>>> मी अमेझॉन वरून घेतलं होते. तिथे बघा, किंवा बुकगंगा वर.
नेगल शाळेत असताना वाचलं होते. त्यावेळी आवडलं होते.
Gerald Durrell ची पुस्तके मेधा ने सुचवली होती मागे लेकासाठी. त्याला खूप आवडला हा लेखक. मी नाही वाचलं अजून.

नेगल वाचलं.
छान चित्र दर्शी वर्णन आहे, पण अपूर्ण वाटतं.
इतके हिंस्त्र प्राणी सांभाळणं खरेच खूप कठीण काम.
प्राण्यांना मोठे झाल्यावर जंगलात का सोडून देत नव्हते ते कळलं नाही...
पुन्हा जाऊ शकत नाहीत का ते?

मलाही हा प्रश्न पडला होता. कदाचित सुरक्षित वातावरणात वाढल्यामुळे त्यांचा जंगलात टिकाव लागणार नाही असं वाटत असेल. काही प्राणी गेलेतही परत जंगलात.

Pages