Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वर्णिता, वावे, परिचय आवडले.
वर्णिता, वावे, परिचय आवडले.
वर्णिता अप्रतिम ओळख गं.
वर्णिता अप्रतिम ओळख गं.
कुठल्यातरी फार प्रसिद्ध
कुठल्यातरी फार प्रसिद्ध नसलेल्या इंग्रजी पुस्तकावरून उचललेली गोष्ट वाटतेय ही.
'इकडे येऊन तिकडची आठवण काढत बसणार, तिकडे जाऊन इकडची आठवण काढत बसणार' या असल्या 'पलीकडच्या' बाईची गोष्ट सांगण्याऐवजी --- इंग्लंडहून इथे आलेल्या काही अविवाहित अधिकाऱ्यांचे इथल्या स्त्रियांशी संबंध आले, त्यातून त्यांना मुलंही झाली. --- यांची गोष्ट सांगायचा चांगला पर्याय होता कर्दळे बाईंकडे.
पुस्तकाचे नाव : अशीही एक झुंज
पुस्तकाचे नाव : अशीही एक झुंज
लेखिका : डॉ मृदुला बेळे
इथे अभिप्राय वाचून पुस्तक वाचले. छान आहे. ओघवती भाषा. खूपच मनोरंजक पद्धतीने गोष्ट मांडली आहे. पुस्तक वाचून जेनेरिक औषधांबद्दलची भीती कमी झाली. पुढच्या वेळी उपलब्ध असतील तर जेनेरिक औषधेच घ्यायचा प्रयत्न करेन. धन्यवाद वर्णिता.
इंग्लंडहून इथे आलेल्या काही
इंग्लंडहून इथे आलेल्या काही अविवाहित अधिकाऱ्यांचे इथल्या स्त्रियांशी संबंध आले, त्यातून त्यांना मुलंही झाली. --यांची गोष्ट
व्हाईट मुघल्स - विल्यम डर्लिंपल'ची अशी ऐतिहासिक कादंबरी (२००६)
धन्यवाद ललिताप्रीति, सामो,
धन्यवाद ललिताप्रीति, सामो, माबोवाचक.
एक संदर्भ हवा होता म्हणून व्यंकटेश माडगूळकर यांचं 'गोष्टी घराकडील' हे पुस्तक वाचनालयात बघत होते . तेव्हा ते तिथं मिळालं नाही तर त्याऐवजी त्याच नावाचं पण वेगळ्या लेखकाचं पुस्तक मिळालं. छोटं 240 पानी पुस्तक आहे. आवडलं.
पुस्तकाचे नाव : गोष्टी घराकडील
लेखक : राजेंद्र बनहट्टी
आठ - नऊ सख्खी भावंडं असलेलं एक सुखवस्तू कुटुंब. प्रशस्त वाड्यात राहणारं. काळाच्या ओघात कुटुंब विस्तारलं आणि पांगलं. पण बालपण जिथे गेलं त्या घराकडच्या, गावाकडच्या गोष्टी सांगणारं हे पुस्तक . नागपुरात ज्या वाड्यात लेखकाचे बालपण गेलं त्या घराच्या गोष्टी पासून सुरुवात होते . गावातली रोजच्या संपर्कात येणारी खास माणसं, त्यांच्या लकबी , लक्षात राहिलेले काही प्रसंग या वरची स्मृती चित्रे आहेत. हे सगळे लेख वेगवेगळ्या दिवाळी अंकात, विशेषांकात पूर्वप्रसिद्ध झालेले आहेत.
समृद्ध, सुखवस्तू बालपण असलं तरी ते एका शिस्तीत कसं गेलं. जुन्या काळातलं, गावातलं जुनं वातावरण अनुभवताना आपसूक आपल्यालाही बऱ्याच गोष्टी रिलेट होतात.
कोणताही आजार झाला तरी 'हवा खराब आहे' म्हणणारे डॉक्टर बामकाका, शाळेतले भिन्न स्वभावाचे दोन मास्तर, अत्यंत हुशार पण बरीच वर्षे अंगठा चोखायची सवय लागलेला म्हणून अंगठेबहाद्दर नाव पडलेला सख्खा भाऊ. सणासुदीचा जास्तीचा फराळ बनवायला येणारे दोन तेलंगी ब्राह्मण बल्लवाचार्य, कागदाचे कपटे गोळा करणारे काळे काका , निम्म्याच्या वर आयुष्य तलावाच्या पाण्यात काढणारा - कित्येकांना पोहायला शिकवणारा रेंटू अशी अधूनमधून नर्म विनोदाची पखरण करत लिहिलेली व्यक्तीचित्रणे सुरेख आहेत.
दुमजली भरपूर व्हरांडे असलेला 16 खोल्यांचा वाडा , त्याच्या मागे असलेल्या रुळांवरून धावणाऱ्या आगगाड्या, गावाबाहेर मोकळ्या जागेवर बांधून घेतलेलं स्वतःचं घर, त्यात झालेली फसवणूक, ते मोकळं राहील म्हणून दिलेल्या भाडेकरूने त्यात उघडलेला जुगाराचा अड्डा ,त्याची झालेली पोलीस पाटील चौकशी ,शेवटी लेखकाचे वडील भरपूर पगाराची असलेली नोकरी सोडून गांधींच्या कामात स्वतःला झोकून द्यायचे ठरवतात तेव्हा एवढ्या मोठ्या कुटुंबाला ओढगस्तीचे जगणं वाटायला येईल म्हणून आईची होणारी घालमेल रंजकतेने लिहिली आहे.
मजेदार, रंजक किस्से वाचायला वाचकांना आवडतातच. 40-50 वर्षांपूर्वीच्या गोष्टी जेव्हा आपण ऐकतो तेव्हा कसे रंगून जातो. विषयांनाही बंधन नसतं. एकातून एक विषय निघतात आणि मग केलेल्या खोड्या, करामती , झालेली फजिती ऐकत मिश्किल हसू तोंडावर रेंगाळतं तसे विरंगुळा म्हणून हलकफुलकं असे हे पुस्तक आहे. आत्ता चाळीशी, पन्नाशीत असलेल्या बऱ्याच व्यक्तींनी हे असं बालपण अनुभवलेलं असेल. त्यामुळे त्यातल्या कितीतरी आठवणी आपल्याला आपल्याशी निगडित असलेल्या वाटतात.
Lovecraft country नावाची
Lovecraft country नावाची कादंबरी/अँथॉलॉजी वाचली. आवडली.
जिम क्रो काळातल्या अमेरिकेत एक कृष्णवर्णीय कुटुंब अचानक काही अनैसर्गिक शक्तींच्या कलहामध्ये पडते.
जिम क्रो चे भयंकर रूप अगदी प्रभावी दाखवले आहे.
इथला परिचय वाचून अभिराम
इथला परिचय वाचून अभिराम भडकमकर लिखित ' At any cost ' वाचले . मालिकांच्या पडद्यामागच्या गोष्टी वाचून मन सुन्न झाले . धनाच्या आईचे संवाद छान लिहिले आहेत. अजूनही अशी अनवट पुस्तके असतील तर सांगा प्लीज.
गोष्टी घराकडील - .@ वर्णिता
गोष्टी घराकडील - .@ वर्णिता
परिचय वाचून आवडणार हे नक्की.
"आपल्यालाही बऱ्याच गोष्टी रिलेट होतात."
यासाठी
"आपल्याशी निगडित असलेल्या वाटतात."
मराठी भाषा गौरव.
गोष्टी घराकडील >>> छान परिचय
गोष्टी घराकडील >>> छान परिचय वर्णीता, वाचायला आवडेल.
गोष्टी घराकडील- मस्त वाटतंय
गोष्टी घराकडील- मस्त वाटतंय परिचय वाचून. पुस्तक वाचायला आवडेल.
यावरून राजन खान यांच्या एका कादंबरीचा एक भाग एका दिवाळी अंकात वाचला होता तीनचार वर्षांपूर्वी, त्याची आठवण झाली. लहानपणच्या आठवणीच, समृद्ध शेतकरी घरातल्या. काय छान लिहिल्या होत्या. तेही पुस्तक शोधून वाचायला हवं.
ॲडम (कादंबरी) - रत्नाकर मतकरी
ॲडम (कादंबरी) - रत्नाकर मतकरी
१९८८ साली रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेली, एक 'धाडसी' कादंबरी.
कादंबरीचा नायक वरदराजन ऊर्फ वरदा, हा एक दक्षिण भारतीय ख्रिश्चन पुरुष आहे. त्याच्या लहानपणापासून त्याच्या लैंगिकतेचा होत गेलेला प्रवास हा या कादंबरीचा विषय आहे.
पौगंडावस्थेत सुरुवातीला केवळ कुतूहलातून निर्माण झालेलं स्त्रीचं आकर्षण. मग शारीरिक सुखाचा अनुभव घेतल्यानंतर तो अनुभव परत परत घेण्याची लागलेली ओढ, अनेक स्त्रियांशी विविध प्रकारे (विवाहपूर्व, विवाहबाह्य, कधी बळजबरीने (कधी त्याच्या बाजूने तर कधी स्त्रीच्या बाजूनेही)) आलेले संबंध असा हा त्याचा प्रवास आहे.
मात्र तरीही वरदराजन चारित्र्याने वाईट नाही. अनेक जणींशी रूढार्थाने अनैतिक असलेले संबंध ठेवूनही त्याची नैतिकता सामान्यतः जागृत आहे. कधीकधी तोही चुकला आहेच. पण त्याची त्याला जाणीव आहे.
असं व्यक्तिमत्त्व उभं करणं सोपं नाही, पण रत्नाकर मतकरींनी ते समर्थपणे उभं केलेलं आहे. त्याच्या आयुष्यात आलेल्या स्त्रियाही खऱ्याखुऱ्या वाटतात, त्यात कृत्रिमता नाही.
कुठेही उपदेशाचे डोस न पाजता, सरसकटीकरण न करता अशा विषयावर लिहिणं हे कठीण आहे. पण अतिशय उत्तम जमून गेलेली ही कादंबरी आहे!
'ॲडम' हे नावही समर्पक आहे.
यावरून राजन खान यांच्या एका
यावरून राजन खान यांच्या एका कादंबरीचा एक भाग एका दिवाळी अंकात वाचला होता तीनचार वर्षांपूर्वी, त्याची आठवण झाली. लहानपणच्या आठवणीच, समृद्ध शेतकरी घरातल्या. काय छान लिहिल्या होत्या. तेही पुस्तक शोधून वाचायला हवं. >>> कथानायक कुठेतरी उत्तरेत आजोळी वाढला, आजोळच्यापेक्षा वडील यांची जात खालची होती असं काही आहे आणि त्यामुळे त्याला आजोळच्यांना पाठवायचे नव्हतं पुण्यात वडलांकडे, आई लहानपणीच गेलेली वगैरे. शेवटी वडील नेतात त्याला. ह्या कादंबरीतला भाग असेल तर मी पूर्ण कादंबरी एका दिवाळी अंकात वाचली आहे.
लहानपणापासून टीनेजर होईपर्यन्तचा प्रवास, मुंबईच्या मामेबहिणीशी जमलेलं सूत, अजून बऱ्याच गोष्टी त्यात ओपनली लिहिलेल्या, त्या मी इथे सांगत नाही पण तीच असावी असं वाटतंय. त्यांची शैली आणि ओघवती भाषा मात्र खिळवून ठेवते आपल्याला. तेव्हापासून राजन खान यांना ओळखू लागले. कादंबरीचे नाव आठवत नाहीये. कदाचित कादंबरी नसेल दीर्घकथा असेल पण समृद्ध शेतकरी वगैरे वाचून तीच वाटतेय, त्यात आजोळ तसं होतं.
वाचन अतिपुर्वी अति केलंय आणि आता दहा वर्षात अजिबात पुस्तक वाचन झालेलं नाहीये त्यामुळे संदर्भ अर्धवट आठवत रहातात, काही गोष्टी लख्ख आठवतात, काही हयात त्यात मिक्स होऊन जातात.
अंजु >>> मीही ही कादंबरी
अंजु >>> मीही ही कादंबरी दिवाळी अंकात वाचली आहे आणि क्लीअरली लक्षात आहे. राजन खान यांची पुस्तके हार्ड हीटिंग असतात. त्याचप्रमाणे ही लक्षात राहिली. नाव मलाही आठवत नाही.
राजन खानांच्या कादंबरीचं नाव
राजन खानांच्या कादंबरीचं नाव 'खुद्द आणि पाऊस'. ( २०१९ च्या श्री व सौ दिवाळी अंकात मी म्हणतेय तो भाग आला होता . मी एका व्हॉट्स app ग्रुपवर त्याबद्दल लिहिलं होतं ते शोधलं आज) पण बहुतेक तुम्ही दोघी म्हणताय ती वेगळी असावी.
नाही. मी जी कांदबरी वाचली आहे
नाही. मी जी कांदबरी वाचली आहे ती 'यतीम' आहे. बुकगंगा वर सापडले नाव.
वावे,
वावे,
अॅडम परिचय आवडला.
मी वाचली नाहीय, पण मतकरींनी त्या कादंबरीबद्दल, तेव्हा पुस्तकावर आलेल्या प्रतिक्रियांबद्दल, एकूण ही कादंबरी कशी 'रिसीव्ह' केली गेली याबद्दल त्यांच्या 'आत्मनेपदी' पुस्तकात सविस्तर लिहिलं आहे.
(आत्मनेपदी पुस्तकाच्या कॉपी-एडिटिंगमध्ये मी सहभागी असल्याने ते माझ्या लक्षात राहिलं आहे.)
अॅडम वाचलीए..
अॅडम वाचलीए..
पुस्तक परिचय चांगला केला आहे वावे.
धन्यवाद ललिता-प्रीति आणि
धन्यवाद ललिता-प्रीति आणि मृणाली.
एकूण ही कादंबरी कशी 'रिसीव्ह' केली गेली >>
हो, पुस्तकाच्या प्रस्तावनेतही त्यांनी सविस्तर लिहिलंय याबाबतीत.
नाना फडणवीस/फडणीस यांचं
नाना फडणवीस/फडणीस यांचं चरीत्र वाचलं. पेशवे,श्रीमंत,तात्या,भाऊ,दादा,पंत ,आपा,मामा, या नावांनी मला खूपच गोंधळायला होते कारण या टोपणनावांनी ओळखली जाणारी बरीच वेगळी लोकं होती.
माझे मन, यतीमच असेल पण अजूनही
माझे मन, यतीमच असेल पण अजूनही मला नाव आठवत नाहीये. सर्व कादंबरी मात्र आठवतेय, नातेवाईकांची नावं आठवत नाहीयेत पण त्यांनी उधळलेले गुण आणि त्याचा सविस्तर आढावा, बऱ्यापैकी आठवतोय.
चकवा चांदण
चकवाचांदण
- मारुती चितमपल्ली
सातशे पानांचं आत्मकथन वाचायला घेतलं आहे. लेखकाची इतर पुस्तके अगोदर वाचली,पाहिली आहेत. डोंगर भटकणे,रानात भटकणे आवड असल्याने हा आवडता लेखक आहे.
The Left Hand of Darkness
The Left Hand of Darkness वाचतोय.
'रोअर लाइक अ गॉडेस' हे आचार्य
'रोअर लाइक अ गॉडेस' हे आचार्य शून्या यांचे पुस्तक आवडलेले होते. त्याच लेखिकेचे 'सॉव्हेरिन सेल्फ' वाचायला घेतले आहे.
https://www.youtube.com/watch?v=xdWF7t9Jdso - येथे ओळख सापडेल.
विषय निघालाच आहे तर लिहीते - https://www.youtube.com/@SoundstrueManyVoices ट्रान्फॉर्मेटिव्ह टुल्स उपलब्ध करुन देणारा हा चॅनल फार मस्त आहे.
शरदजी 'चकवाचांदणे' कसे आहे. मी चितमपल्लींचे 'पाखरमाया' वाचलेले आहे. काय सुंदर सुंदर अनुभव चितारतात ते. खरोखर अरण्यऋषी.
समो,चकवाचांदण सुरेख आहे.
सामो,चकवाचांदण सुरेख आहे.
धन्यवाद देवकी. चितमपल्ली
धन्यवाद देवकी. चितमपल्ली सिद्धहस्त लेखक आहेतच. प्रश्नच नाही. घेते पुस्तक. अॅमेझॉनवर पाहीलेले.
चकवा चांदणे हेच नाव का दिले
चकवा चांदणे हेच नाव का दिले ती गोष्ट आवडली. रानात आदिवासी शिकारीसाठी फिरतात तेव्हा कधी मिळते कधी नाही. कधी नुसतीच पायपीट. मग पशुपक्ष्यांच्या संदर्भांत ,शकून, एकाने उलगडा केला यावरून ते नाव घेतलंय.
The Left Hand of Darkness
The Left Hand of Darkness वैज्ञानिक कथा दिसते आहे. परग्रहावर जात धर्म न पाळणाऱ्या लोकांत जाऊन संबंध वाढवण्याविषयी आहे. एकदम वेगळं आहे.
______
ट्रान्फॉर्मेटिव्ह टुल्स उपलब्ध करुन देणारा साउंडस ट्रू चॅनल ओझरता पाहिला. अध्यात्मिक उन्नती, ताण , आयुर्वेदिक उपचार इत्यादींवर बोलणाऱ्याचे या,लेखकांच्या मुलाखती दिसताहेत.
__________
राजन खानांची पुस्तके पाहतो मिळतात का.
परग्रहावर जात धर्म न
परग्रहावर जात धर्म न पाळणाऱ्या लोकांत जाऊन संबंध वाढवण्याविषयी आहे.
>>> जात धर्म नव्हे, तर स्त्री पुरुष भेद नसतो त्या ग्रहावर. सगळे लोक हे वर्षात काहीच वेळ कामुक असतात आणि केवळ त्याच वेळेस ते स्त्री किंवा पुरुष भूमिका घेत असतात. आणि दरवर्षी तीच भूमिका असेल असेही नाही. वर्षाच्या उरलेल्या वेळेस लोक कामुक नसतात आणि उभयलिंगी असतात.
सामो : 'चकवाचांदण' चांगले आहे
सामो : 'चकवाचांदण' चांगले आहे. मी घेतले आहे. एकदा वाचल्यावर परत नाही वाचावेसे वाटत. मी ते काढून नाही टाकणार. इतरांना वाचण्यासाठी ठेवले आहे. विकत घ्यायच्या आधी इतर सोर्सेसवर वाचता येईल का पहा.
Pages