Submitted by किल्ली on 9 November, 2023 - 10:30
धनत्रयोदशी
धन्वंतरी पूजन व यम दीपदान
ह्या वर्षीच्या दिवाळीसाठी खास धागा.
आपण येथे फराळ, सजावट, किस्से, आठवणी, फटाके, खरेदी, रांगोळी असं सर्व काही लिहूया.
Virtual दिवाळी साजरी करूया!
झब्बूचा खेळही खेळता येईल.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान धागा किल्ली. अत्ता pyc ची
छान धागा किल्ली. अत्ता pyc ची दिवाळी पहाट ऐकत/ बघत होते ऑनलाईन.माझी ताई आणि जिजाजी गेले आहेत तिथे.
सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा
(No subject)
फराळाबरोबरच एका वाटीत दहीपोहे आणि एका वाटीत दूध-गूळ-साय पोहे. आज नरकचतुर्दशी, श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला म्हणून पोह्यांचाही नैवेद्य असतो आमच्याकडे. मूळ पद्धत कोकणातली (माझं माहेर) असावी, सासरीपण आवडतात म्हणून आवर्जून ठेवते मी.
दिपावळीच्या शुभेच्छा! सस्नेह
दिपावळीच्या शुभेच्छा! सस्नेह नमस्कार,
दिपावळीपासून ते भाऊबीज पर्यंत,
साजरा होत असलेल्या आनंदमयी,
उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छ!
हे नववर्ष आपणास आनंदी,
भरभराटीचे, प्रगतीचे,
आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…
प्रज्ञा शेव मस्त दिसतेय गं.
प्रज्ञा शेव मस्त दिसतेय गं.
सर्वांच्या खादाडी, रांगोळ्या,
सर्वांच्या खादाडी, रांगोळ्या, आकाश कंदील मस्तच.
थॅंक्स धनुडी.
थॅंक्स धनुडी.
सर्वांच्या खादाडी, रांगोळ्या,
सर्वांच्या खादाडी, रांगोळ्या, आकाश कंदील मस्तच.>>>+१
सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
प्रज्ञा 9, फराळाचे ताट छान
प्रज्ञा 9, फराळाचे ताट छान रचले आहे.किती प्रकार केले आहेत.मस्त! ती शेव जास्त आवडली.
पोह्याचा नैवेद्य खास कोकणी पद्धत आहे.
प्रज्ञा 9, फराळाचे ताट छान
प्रज्ञा 9, फराळाचे ताट छान रचले आहे.किती प्रकार केले आहेत.मस्त!
+1
दूधपोहे सुद्धा अगदी खिरीसारखे लुसलुशीत दिसत आहेत. आवडली कोकणातली पद्धत.
अश्विनी ११ मस्त फराळ.
धनुडी, रांगोळी व आकाशकंदिल छान आहे.
छान धागा आहे आणि आठवणीही
छान धागा आहे आणि आठवणीही सुंदर सगळ्यांच्या.
दिवाळीच्या आणि एकंदरीत सगळ्याच सणांच्या आपल्या कल्पना बहुतेक वेळा आपापल्या लहानपणाशी निगडित असतात. 'तीच खरी दिवाळी' असं आता दिवाळीच्या वेळी नेहमी वाटतं.
माझ्या लहानपणी दिवाळीच्या सुट्टीत गावातली भातशेती हळूहळू कापायला तयार झालेली असायची. मग कापणी, मळणी हे सगळं सुरू असायचं गावात. त्याआधी घरासमोरची अंगणं, जी पावसामुळे उखडलेली असायची, ती परत खणून, मुरूम टाकून, चोपून गुळगुळीत करण्याचं काम करायचे. नंतर ती सारवलेली अंगणं काय सुरेख दिसायची! पावसाळ्यातला सगळा चिकचिकाट जाऊन आता गाव एकदम स्वच्छ सुंदर दिसायला लागायचं.
आकाशकंदील करण्याचं काम, फराळ तयार होत असतानाचा वास आणि गावात चाललेल्या भाताच्या मळण्या हे सगळं एकत्रच आठवतं. आकाशकंदील करायला मला आवडायचा आणि अजूनही आवडतो. चांगली रांगोळी काढायला मात्र मला तेव्हाही फारसं जमायचं नाही. ठिपक्यांची रांगोळी काढण्यासाठी मुळात ते सरळ रेषेतले ठिपके काढायला एक कागद असायचा. सुरुवातीला महत्त्वाकांक्षीपणाने रांगोळीच्या पुस्तकातली भलीमोठी रांगोळी काढायचा प्रयत्न सुरू करून मग ठिपके सरळ येईनासे झाले की मग लहान रांगोळीवर तडजोड करायचे
(No subject)
यंदा #diwali trending गाणे
यंदा #diwali trending गाणे सांगू का?
राम आयेंगे मधलं दिप जलाऊंगी कडवं
दिये जल उठते है
१०० पैकी एकोण ऐशी
Reels ना हीच गाणी आहेत
किल्ली , लक्षद्वीप हे उजळले
किल्ली , लक्षद्वीप हे उजळले घरी हे गाणे पण ट्रेंडिंग आहे . सगळ्याचे फराळ रांगोळ्या मस्त .
आमच्याकडे फटाके उडवायला सुरुवात झाली .
ही मी काढली आज . बसायला होत
ही मी काढली आज . बसायला होत नव्हते पण काढली. त्याशिवाय फिलिंग येत नाही दिवाळीचे
(No subject)
अमा, छान दिसताय
अमा, छान दिसताय
गळ्यातले मॅचिंग झाले एकदम .
(No subject)
Chapachi nath by vaman Hari
Chapachi nath by vaman Hari pethe saree by nallis. Tanmani aai cha aahe.
सूर्यग्रहणाच्या मस्त आठवणी
सूर्यग्रहणाच्या मस्त आठवणी सांगितल्या सगळ्यांनी. माझी आठवण वाईट आहे. मी जेमतेम पाच सहा वर्षांचा असेल. मी गावभर उनाडक्या करायचो आणि त्या ग्रहण काळात सूर्याला बघितलं तर डोळे फुटतात असं घरच्यांना समजलं होतं त्यामुळे त्यादिवशी माझे सगळे कपडे काढून मला घरीच डांबून ठेवलं होतं जेणेकरून बाहेर जाऊन मी सूर्याकडे बघू नये.
काय सुरेख, प्रसन्न दिसता आहात
काय सुरेख, प्रसन्न दिसता आहात अमा!
दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा.
(No subject)
अमा छान दिसताय.
अमा छान दिसताय.
मंजूताई मला अनारसे दिसले
मंजूताई मला अनारसे दिसले नाहीत
अमा अगदी भारी दिसत आहात !
अमा अगदी भारी दिसत आहात !
मायबोलीकरीना घेऊन झिम्मा किंवा बाईपण सारखा पिक्चर काढायचे ठरवले तर पाहिले नाव तुमचेच
रांगोळी फराळाचे फोटोही छान..
शनिवार रात्रीपर्यंत ऑफिस कामचं चालू असल्याने माझी दिवाळी लेट सुरू झाली. पण या धाग्यावर चक्कर टाकली एक दोन वेळा तरी दिवाळीचा फिल आला.
कंदील घरी बनवायचा होता तो देखील कामामुळे राहिला यंदा.
पण विकतचा देखील तसा काही वाईट नसतो
अमा, मराठी मालिकेतली
अमा, मराठी मालिकेतली मध्यवर्ती भूमिकेतील कुटुंबवत्सल अम्मा दिसत आहात.
फोटोत (तरी) प्रेमळ माऊली वाटत आहात. प्रत्यक्षात कान धरून पिळत असाल तर माहिती नाही.
अमा, किती गोड आहे फोटो..
अमा, किती गोड आहे फोटो.. सुंदर अगदी
काय सुरेख, प्रसन्न दिसता आहात
काय सुरेख, प्रसन्न दिसता आहात अमा!.... अगदी अगदी!
अमाबद्दलच्या सगळ्या
अमाबद्दलच्या सगळ्या प्रतिसादांना मम!
Chapachi nath by vaman Hari
Chapachi nath by vaman Hari pethe saree by nallis. Tanmani aai cha aahe.>> मस्तच आणि अमा मायबोलीची आहे गोड दिसतेस अमा.
किल्लीचा दिवा जाईची रांगोळी, मंजूताई चा फराळ ऋ चा कंदील आणि मायबोली ची अमा सगळं सुपर से उपर
अमा, पोझ आणि साडी दोन्ही मस्त
अमा, पोझ आणि साडी दोन्ही मस्त.
Pages