दिवाळी २०२३

Submitted by किल्ली on 9 November, 2023 - 10:30

धनत्रयोदशी
धन्वंतरी पूजन व यम दीपदान
IMG-20231110-WA0003.jpg

ह्या वर्षीच्या दिवाळीसाठी खास धागा.
आपण येथे फराळ, सजावट, किस्से, आठवणी, फटाके, खरेदी, रांगोळी असं सर्व काही लिहूया.
Virtual दिवाळी साजरी करूया!

झब्बूचा खेळही खेळता येईल.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किल्लीचा दिवा जाईची रांगोळी, मंजूताई चा फराळ ऋ चा कंदील आणि मायबोली ची अमा सगळं सुपर से उपर>>>+1
अमा किती गोड दिसताय Happy

आज आपण सण म्हणून जे साजरं करतोय ते मुलांना मोठेपणी nostalgia म्हणून आठवेल..
माझी मम्मा अमुक तमुक करत होती वगैरे

आय होप! आमच्या पोरांना माईनक्राफ्ट मध्ये कसं एंडरड्रॅगनला मारलं आणि पिलेजरना टॉर्चर केलं हाच नॉस्टेल्जिआ रहाणारे अशी मला भिती आहे.

दिवाळी साठी envelopes केली आज बसून. ( आधी करायला काय झालं होतं? रोज थोडी केली तर अशी पाठ धरली नसती) असो. तर उद्या भाऊबीज ( आणि पुतणीचं केळवण आहे)
Screenshot_2023-11-14-23-07-39-813_com.google.android.apps_.photos.jpgScreenshot_2023-11-14-23-07-47-038_com.google.android.apps_.photos.jpg

भाऊबीजेच्या शुभेच्छा!
सुंदर लिफाफे. रंग किती उठावदार आहेत.. लाडक्या व्यक्तीला देण्यासाठी खास आहेत अगदी

कुमार सरांनी मस्त १९९५ च्या खग्रास सूर्यग्रहणाची आठवण काढलीय. मी पण हे ग्रहण बघायला उत्तर प्रदेशात गेले होते, खगोलमंडळाबरोबर. जबरदस्त अनुभव होता. आणि हो,दिवाळीतली अमावस्या होती ती.

बाकी सर्वांचे फोटो आणि फराळ मस्तच!

ममोच्या चकल्या, किल्लीची व छंदीफंदी यांची रांगोळी, प्रज्ञा, अश्विनी, धनूडी यांचा फराळ, साधना यांच्या लेकीने बनवलेले पोस्टर, वावे यांची गावातली आठवण, धनूडींचे लिफाफे, मंजूताईंचे अनारसे, किल्लीचा दिवा, आशूंची साडी…. सर्वच सुंदर

रांगोळी

छान धागा आहे. रांगोळ्या आणि फराळाचे विविध फोटो आणि इतर प्रतिसादही मस्त. कुमार सरांची पोस्ट माहितीपूर्ण. १९९५ चे ते ग्रहण मलाही आठवते आहे. बराच गाजावाजा झाला होता तेंव्हा त्या घटनेचा.

Pages