Submitted by किल्ली on 9 November, 2023 - 10:30
धनत्रयोदशी
धन्वंतरी पूजन व यम दीपदान
ह्या वर्षीच्या दिवाळीसाठी खास धागा.
आपण येथे फराळ, सजावट, किस्से, आठवणी, फटाके, खरेदी, रांगोळी असं सर्व काही लिहूया.
Virtual दिवाळी साजरी करूया!
झब्बूचा खेळही खेळता येईल.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फटाकेविरोधी लोकांच्या
फटाकेविरोधी लोकांच्या दहशतीमुळे फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणार आहे.
वजन वाढल्याने फराळमुक्त दिवाळी आहे
खिसा नरम असल्यामुळे खरेदीमुक्त दिवाळी करणार आहे
पर्यावरणवाद्यांच्या दहशतीने कंदील, दिवे, पणत्या लावून प्रदूषण आणि विजेचा अपव्यय न करता सजावटमुक्त दिवाळी करणार
आता राहिलं काय तर फक्त किस्से आणि आठवणी
(No subject)
दिवाळीच्या शुभेच्छा !
दिवाळीच्या शुभेच्छा !
मी थेट 1995 मधील लक्ष्मीपूजनाच्या दिवशीची माझी आठवण लिहीतो.
मुक्काम : एक खेडे, राजस्थान
.. ..
ग्रहण बघण्याची खरी मजा ही खग्रास सूर्यग्रहणातच येते. मी २४/१०/१९९५ चे ग्रहण पाहिले होते. त्याची काही क्षणचित्रे लिहीत आहे.
१.‘खग्रास’ (म्हणजे ९९% अंधार) चा भौगोलिक पट्टा हा मर्यादित असतो. अन्य लांबच्या ठिकाणाहून ते खंडग्रास दिसते.
२. म्हणून एकटे जाण्याऐवजी माहितगार चमू बरोबर जावे. युवाशक्तीचे अभ्यासू लोक तारखेच्या आधीच इच्छीत ठिकाणाची पाहणी करून येतात.
३. त्यामुळे आमचे राहण्याचे ठिकाण हे त्या मैदानापासून अगदी जवळचे निवडले होते.
४. जे एकटे दुकटे लोक फत्तेपूर सिक्रीला राहिले होते त्यांना त्या सकाळी हॉटेल पासून जाम एकही वाहन मिळत नव्हते. ग्रहण आपली वेळ कधीही चुकवत नाही !!! तो निसर्ग आहे, माणूस नव्हे ! त्यामुळे अशा लोकांचे सहलीचे पैसे अक्षरशः पाण्यात गेले.
५. ते ग्रहण सकाळी ८ वा होते. त्यामुळे अंधाराचे प्रमाण ७०% च्याआसपासच राहिले.
६. पण, त्यावेळेस पक्षी घरट्याकडे परतू लागले . तसेच बारीक थंडीही वाजू लागली. खग्रास काळ ३ मिनिटेच होता. जास्तीत जास्त तो साडेसात मिनिटेच असू शकतो.
७. खास चष्म्यातून सूर्याचा ‘करोना’ पाहिला. डोळ्यांचे पारणे फिटते.
८. त्या मैदानावर फक्त आमचा चमू होता. तेथील खेडवळ लोक जमले होते पण त्यांना याबद्दलचे काहीच ज्ञान नव्हते. फक्त आम्ही ४० जण असल्याने त्यांनी पटकन शेगडी आणून चहाचा धंदा करून घेतला.
९. एकून खग्रास पैकी बरीचशी समुद्रावर होतात. त्यामुळे आपल्याला जमिनीवरून पाहायला फार थोडी उरतात.
छान आठवण कुमार सर, माहितीही
छान आठवण कुमार सर, माहितीही नवीन आहे
छान धागा,
छान धागा,
आणि छान सुरुवात कुमार सर
ईथे जुन्या आठवणी आणि या दिवाळीची धमाल क्षणचित्रेही शेअर करता येतील.
फक्त कोणी फटाके प्रदूषण वगैरे चर्चासाठी हा धागा वापरू नये. त्यासाठी हवे तर आपला नेहमीचा जुना धागा वर काढावा.
दिवाळीत पाऊस:Dयाआधच २०१८ की
दिवाळीत पाऊस याआधी २०१८ की १९ सालीही दिवाळीत व्यवस्थित पडला होता.
१९९५ च्या सूर्यग्रहणाच्या आठवणी आधी लिहिल्या होत्या.
त्यादिवशी आमच्या ऑफिसात ग्रहण संपल्यावर उशिरा यायची परवानगी होती. ट्रेनला आणि ऑफिसातही सकाळी शुकशुकाट होता. लक्ष्मीपूजन त्यादिवशी नसावं. कारण लक्ष्मीपूजनाची सुटी असे.
. लक्ष्मीपूजन त्यादिवशी नसावं
. लक्ष्मीपूजन त्यादिवशी नसावं.
>>>
इथे (https://www.timeanddate.com/calendar/?year=1995&country=35)
1995 ची दिनदर्शिका पाहता येईल. 23 ते 25 ऑक्टोबर दिवाळी होती.
आणि
हे मूलभूत :
सूर्यग्रहण = अमावस्या = लक्ष्मीपूजन
आपल्याकडे एक तिथी कधी कधी दोन
आपल्याकडे एक तिथी कधी कधी दोन दिवस असते. कधी एका तिथीचा लोप होतो. आपली तिथी सूर्योदयापासून किंवा रात्री १२ वाजता बदलत नाही. वेगवेगळ्या वेळा असतात.
मी लक्ष्मीपूजन त्या दिवशी नसावं म्हणतोय कारण दिवाळीच्या शासनमान्य सुट्या लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदेच्या असतात. नरकचतुर्दशीला सुटी नसते. आपल्याकडे तो महत्त्वाचा दिवस. पहिलं अभ्यंगस्नान. पण उत्तरेत त्याला छोटी दिवाली म्हणतात. भाऊबीजेलाही सुटी नसते. आमचं ऑफिस त्या दिवशी तीनला सुटत असे.
इथे लक्ष्मीपूजन नरकचतुर्दशीच्या दिवशीच म्हणजे २३ ऑक्टोबरला होतं, असं दिलं आहे. म्हणजे अमावास्या २३ ऑक्टोबरला सुरू झाली.
https://www.birthastro.com/hindi/panchang/hindu-calendar/01-Jan-1995
बरोबर.
बरोबर.
म्हणजेच 23 व 24 असे दोन्ही दिवस (24 चा काही भाग ) अमावस्या असणार. कारण सूर्यग्रहण होताना तर अमावस्या पाहिजेच ना ?
ग्रहण 24 ला सकाळी ८ वा होते.
( माझा मुद्दा भौगोलिक दृष्टीने आहे. कार्यालयीन सुट्टी भारतात राज्यानुसार एखाद दिवस पुढेमागे असू शकेल).
बरोबर. माझा मुद्दा पंचांगाचा
बरोबर. माझा मुद्दा पंचांगाचा आहे. त्या दिवशी अमावास्या आणि सूर्यग्रहण होतं हे खरंच. पण दिवाळीतलं काही नव्हतं. असो.
समजले. धन्यवाद !
समजले. धन्यवाद !
95 च्या ग्रहणाच्या दिवशी
95 च्या ग्रहणाच्या दिवशी ऑफिस होत ह्याला अनुमोदन , मला ही हे नीट आठवतंय. आणि लक्ष्मी पूजन नसेल हे लॉजिक ही पटतय. असो. 95च मराठी कॅलेंडर बघायला हवं.
80 च्या मार्च मध्ये ही खग्रास सूर्यग्रहण होत आणि त्यासाठी आम्हाला सुट्टी ही जाहीर केली होती.
ह्या काल केलेल्या चकल्या. वाड्या वर दाखवल्या होत्या पण तिकडे वाहून जातील म्हणून किल्लीच्या सजेशन नुसार इथे ही दाखवते आहे.
ममो कित्ती सुबक आणि देखण्या
ममो कित्ती सुबक आणि देखण्या चकल्या...!
एकीकडे वाटतं पटकन फस्त कराव्यात आणि दुसरीकडे तुकडाही मोडू नये..नक्षीदार ताटात भरून पारदर्शक कव्हर लावून शोकेस मध्ये ठेवाव्यात असंही वाटतं.
स्वान्तसुखाय +१.
स्वान्तसुखाय +१.
धाग्याची कल्पना छान आहे किल्ली!
मी १९९५ मध्ये पाचवी/सहावीत
मी १९९५ मध्ये पाचवी/सहावीत असेल पण मला त्यावर्षी लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या खंडग्रास सूर्यग्रहणाबद्दल लख्ख आठवतंय. ह्या वर्षी (२०२३) जसे १२ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन असून १३ नोव्हेंबरला बलिप्रतिपदा यायला हवी होती, पण ती १४ ला आहे. त्याचप्रमाणे १९९५ साली २३ ऑक्टोबर ला लक्ष्मीपूजन होऊन, २४ ला खंडग्रास सूर्यग्रहण होते मात्र दिवाळीची कोणतीही तिथी नव्हती, त्यामुळे माझ्या बाबांना सरकारी सुट्टी नव्हती. बलिप्रतिपदा २५ ला आली होती (बलिप्रतिपदेची सरकारी सुट्टी असते). तेव्हापर्यंतच्या माझ्या ९-१० वर्षाच्या आयुष्यात यापूर्वी कधीही ग्रहण पहिले नव्हते, त्यामुळे खूप उत्सुकता होती. कारण आई बाबा दोघेही कुठल्यातरी एका जंगलातल्या गावात गेले असतांना तेथे १९८० साली त्यांनी बघितलेल्या खग्रास सूर्यग्रहणाच्या आठवणी सांगायचे.
माझ्या दुर्दैवाने अजूनही खग्रास सूर्यकिरण बघायचा योग्य आला नाही.
राहुल बरोबर मी पण मराठी
राहुल बरोबर मी पण मराठी कलेंडर बघितलं 95च , तुम्ही म्हणताय तसचं होत, 23ऑक्टोबर सोमवारी लक्ष्मी पूजन होतं आणि 24ला मंगळवारी सूर्यग्रहण होतं.
स्वा सु आणि भरत चकली प्रतिसादासाठी धन्यवाद. स्वा सु. चकली प्रतिसाद खुप सुन्दर,
मुंबईकरांची दिवाळीची सुरुवात
मुंबईकरांची दिवाळीची सुरुवात पावसाने झाली आहे.
सर्वांचे कागदी कंदिल सुरक्षित आहेत अशी आशा करते.
आमचे टिकून आहेत. मला window grills वर चढवलेल्या electric तोरणांची काळजी होती. पेटतायेत अजूनही. हुश्श्
दिवाळीची माझी सगळयात खास आठवण
दिवाळीची माझी सगळयात खास आठवण म्हणजे माझ्या मोठ्या मुलाचा जन्म लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालाय.
मला window grills वर
मला window grills वर चढवलेल्या electric तोरणांची काळजी होती.
>>>>
काही होत नाही त्यांना.. आमच्याकडे मी काढायचा आळस करतो त्यामुळे सहा आठ महिने उन्हाळा पावसाळा जवळपास पुढची दिवाळी येईपर्यंत तसेच लटकून पडून असतात
माझ्या मोठ्या मुलाचा जन्म
माझ्या मोठ्या मुलाचा जन्म लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालाय.
>>>>
अरे वा माझ्या सुद्धा लेकीचा जन्म तिथिनुसार शिवजयंतीला होता. खुशिया मुहूरत देख के नही आती असे म्हटले तरी असा एखादा चांगला दिवस असेल तर छानच वाटते.
खरयं
खरयं
मस्त धागा किल्ली. दिवाळीच्या
मस्त धागा किल्ली. दिवाळीच्या बर्याच आठवणी आहेत. वेळ मिळेल तसे लिहेल.
आज जोरदार पावसाने हजेरी
आज जोरदार पावसाने हजेरी लावलीये.
सोबत वारा ही आहे
रिद्धी, माझ्या भाचीने काढलेली
रिद्धी, ने काढलेली रांगोळी.
आवडली म्हणून share केली
वा!
वा!
अप्रतिम आहे रांगोळी.
अप्रतिम आहे रांगोळी. रिद्धी कोण? माबोवर आहेत का या?
मस्त rangoli किल्ली
मस्त rangoli किल्ली
माबोकर नाही
माबोकर नाही
दूरची Family member दिपक ची नात्याने भाची पडते, आहे आमच्याच वयाची
सुरेख आहे रांगोळी.
सुरेख आहे रांगोळी.
ममोच्या चकल्याही सुबक.
कुमार सरांचा आणि बावणकुळे यांचे प्रतिसाद आवडले.
आबा, त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
धाग्या
चकल्या आणि रांगोळी दोन्ही फार
चकल्या आणि रांगोळी दोन्ही फार सुंदर! एकदम दिवाळीचा फील आला बघून!
चकल्या मस्त सोनेरी आणि काटेरी दिसतायत!
चकल्या बघून आठवलं - माझ्या फूडी लेकाला 'खुसखुशीत' आणि 'खमंग' म्हणजे काय ते मला अजूनही अमेरिकन इंग्रजीत नीटसं सांगता आलेलं नाही.
मराठीत पदार्थाच्या पोताला किती महत्त्व आहे हे त्यासाठी किती शब्द आहेत त्यावरून कळतं! खुसखुशीत, खुटखुटीत, कुडकुडीत, गुलगुलीत, करकरीत, लिबलिबीत, थलथलीत, भुसभुशीत, सरसरीत, गुळगुळीत/गंधगाळ, पिठूळ, रवाळ, ओबडधोबड/बोबडं. इ.इ.
Pages